Maharashtra News Live Updates: भाभा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai: मुंबईच्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Mumbai: मुंबईच्या वांद्र्यातील भाभा रुग्णालयातील परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करण्यात आलं. दरम्यान संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Bhiwandi : शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करणार
Bhiwandi : भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेना शिंदे गटातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाला जय महाराष्ट्र!!! करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश होणार आहे.























