Maharashtra News Updates: म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये माझं कार्यालय नाही, म्हाडाची लेखी माहिती, किरीट सोमय्या खोटारडे: अनिल परब
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मागील काही दिवसात सुरू असलेल्या अपघातांची मालिका पाहता शहरातील युवकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर पोलिस, आरटीओ अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, जड वाहतूक विरोधी कृती समिती सदस्यांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी शहरात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहतूक बंदचे आदेश काढले आहेत.
म्हाडाच्या बिल्डिंगमधील माझे अनधिकृत कार्यालय असल्याचा जो आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता तो खोटा असल्याचं म्हाडाने दिलेल्या पत्रातून स्पष्ट झालं आहे असं शिवसेना नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या हे खोटे बोलत असून त्यांच्यावर मी बदनामीचा गुन्हा दाखल करत आहेत. किरीट सोमय्या केवळ मला बदनाम करण्यासाठी आरोप करत आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर आता अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयात भेट दिली आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. म्हाडाच्या ज्या अधिकाऱ्याने मला ही नोटीस पाठवली त्याच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही अनिल परब यांनी सांगितलं.
Aurangabad News: मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्यासाठी औरंगाबादमध्ये आज वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांनी एकत्र महामोर्चा काढला, शहरातील भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरवात झाली, पुढे हा मोर्चा आमखास मैदान मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या मागण्याचे निवदेन दिले. यावेळी मोठ्या संख्येनी वेगेवेगळ्या पक्ष आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग पाहायला मिळाला...
Economic Survey 2022-23 : भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही चांगला वाढला आहे. UNCTAD च्या 2022 च्या जागतिक गुंतवणूक अहवालात जगभरातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या 20 देशांमध्ये भारताचं स्थान आठवं (8th) आहे. यावर्षी भारतात 84 अब्ज (US$ 84.8 billion) अमेरिकी डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे. त्यातील एकट्या सेवाक्षेत्रात 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे.
मार्च 2023 अखेर भारतीय अर्थव्यवस्था 3.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची असेल असा विश्वासही आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेने 7 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चलनवाढीचा दरही 6 टक्क्यांच्या आतमध्ये ठेवणं शक्य झालं आहे. 2021-22 च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील सेवा आणि वस्तूंची निर्यात तब्बल 16 टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यातील निर्यातीची आकडेवारी विचारात घेण्यात आल्याचं आर्थिक सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.
सेवा क्षेत्राला बँकांकडून होणाऱ्या वित्तपुरवठ्यातही सकारात्मक वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल 21 टक्क्यांची आहे. वैद्यकीय पर्यटन म्हणजे वैद्यकीय उपचारांसाठी जगभरातून भारतात येणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याऱ्या जगातील 46 देशांमध्ये भारताचा क्रमांक दहावा असल्याची माहिती आर्थिक अहवालात नोंदवण्यात आली आहे.
MPSC च्या विद्यार्थ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा दिलासा...
MPSC चे नवे 2025 पासून लागू होणार...
थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार...
Economic Survey 2022-23: 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली आहे. सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे, 2023-24 मध्ये सेवाक्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पूर्ण झाली आहे, म्हणजेच कोरोनाच्या काळात झालेली पिछेहाट यावर्षी भरुन निघाल्याचा दावाही संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला आहे.
Economic Survey 2022-23: भारतीय जीडीपी वाढीचा दर हा 7 टक्क्यांच्या आत अपेक्षित असला तरी जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढणारी असेल, असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं. भारताकडे परकीय चलनातील गंगाजळी पुरेशी आहे. त्यामुळे रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थान कितीही डळमळीत झालं तरी ते सावरण्यासाठी हस्तक्षेप करता येऊ शकतो. देशातील पुरेशा परकीय चलनाच्या साठ्यामुळे चालू खात्यातील तूटही नियंत्रणात आणता येऊ शकते, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. जगभरातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतातील परकीय चलनाची स्थिती मजबूत असल्यामुळे सीपीआय इन्फ्लेशनचा (CPI inflation) वाढता दर रिजर्व्ह बँकेच्या आवाक्यात आहे, असंही त्या म्हणाल्या.
Economic Survey 2022-23: पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6 ते 6.8 टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा संसदेत आज सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत 2022-23 चा आर्थिक अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला.
जागतिक मंदीमुळे भारतातून होणाऱ्या निर्यातीचा वेग मंदावण्याची भिती आहे, त्यामुळेच गेल्यावर्षी 7 टक्क्यांच्या वाढीने वाढण्याची अपेक्षा करण्यात आली असताना आता त्यात एक टक्क्याची घट अपेक्षित आहे.
6 ते 6.8 टक्के हा अर्थव्यवस्थेचा अपेक्षित वृद्धीदर गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी आहे.
Maharashtra News: शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि खासदारांची सुरक्षा काढल्या प्रकरणी दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. खासदार राजन विचारे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांना सुधारीत याचिका दाखल करण्याची सूचना दिली आहे. याचिकेतून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं नाव वगळण्याचे आदेश दिले आहेत.
Beed News: पत्नीच्या अंगावर वार करून तिचा खून केल्याप्रकरणी मृत महिलेच्या पतीला बीडच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बीड तालुक्यातील बोरखेड येथील नगीना नावाच्या महिलेचा विवाह शहाजी शहाजी काळे या तरुणाशी झाला होता. त्यानंतर त्याने वारंवार बाहेरून पैसे आणण्याची मागणी करत, तिला मारहाण केली आणि यामध्येच तिचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली होती. याच प्रकरणात बीडच्या न्यायालयाने शहाजी काळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Bhandara News: भंडारा पंचायत समितीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी 95 हजाराचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे अनेकांनी गोठा बांधकाम केलेत. परंतु मागील तीन वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेळकाढू धोरणामुळे त्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. परिणामी शेतकरी अनुदान मिळावे यासाठी शासकीय दरबारी चकरा मारून त्रस्त झाले असून प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांनी शेतकऱ्यांना घेवून भंडारा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ संघमित्रा कोल्हे यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनुदान थांबविण्यात अधिकारी, करमचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.
Pune Crime News: पुण्यातील नुमवि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या हातावर कोयताने वार केला आहे. 17 वर्षीय विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी हल्ला केला आहे. विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कालच पोलिसांनी या शाळेत जाऊन या गुन्हेगारी बद्दल समुपदेशन केले होते.
Pune Election 2022: चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पहिला अर्ज खरेदी केला. माजी नगरसेविका माया बारणे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत सात जणांनी अर्ज घेतले आहेत.
Sanjay Raut: शिंदे गटाने माझ्या धमक्यांमुळे शिवसेना सोडली की खोक्यांमुळे हे एकदा स्पष्ट करावं, असा संजय राऊतांचा खोचक टोला दिला आहे, तर ज्या भाषणाचा शिंदे गटाने उल्लेख केला, ते भाषण सुरतहून गुवाहाटीला पोहोचल्यानंतर केलं असे राऊत म्हणाले,
Himachal Snowfall : हिमाचल प्रदेशमध्ये 30 जानेवारी रोजी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चार महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
Himachal Snowfall : हिमाचल प्रदेशमध्ये 30 जानेवारी रोजी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चार महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
Himachal Snowfall : हिमाचल प्रदेशमध्ये 30 जानेवारी रोजी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे चार महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
Parbhani News: परभणी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय हे दलालमुक्त करण्यात यावे यासह ज्या ज्या लोकांनी खोटे लेबर कार्ड काढले आहेत ते रद्द करण्यात यावे या मागणीसाठी परभणीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले आहे..वारंवार निवेदन देऊन कारवाई केली जात नसल्याने आज मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांसमोर रडून आंदोलन केले आहे..येत्या 15 दिवसात जर या मागण्यांबाबत कारवाई करण्यात आली नाही तर अधिकाऱ्यांना आम्ही रडवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक सोनु लाहोटी यांनी या आंदोलन प्रसंगी दिलाय.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या वांद्रे येथील म्हाडा कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा आहे. फोटो ट्विट करत ही माहिती दिली. . सोमय्या आज करणार पाहणी करणार आहे. त्यामुळे वादाची शक्यता आहे.
Sindhudurga: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर आहेत. मोहन भागवत यांचा 1 आणि 2 फेब्रुवारी सिंधुदुर्गात खाजगी दौरा आहे. 1 फेब्रुवारीला सायंकाळी सरसंघचालक जाणार सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने सिंधुदुर्ग किल्यावर जाणारी प्रवासी होडी वाहतूक बंद असणार आहे. उद्या दुपारी 12 वाजल्यापासून सिंधुदुर्ग किल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रवासी होडी वाहतूक बंद असणार आहे.
Shirdie News: MPSC अभ्यासक्रमात बदल केल्याच्या निषेधार्थ शिर्डीतल्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.. गेल्या सहा दिवसांपासून या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे मात्र अद्याप प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होतोय..
Kolhapur News: दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडीतल्या विद्यालंकार शाळेत शिक्षकाने विद्यार्थीनींना पॉर्न दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान याप्रकरणी शाळेने त्या शिक्षकाची बदली केली मात्र त्या शिक्षकावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा प्रशासन या शिक्षकाला पाठिशी घालतीये का असा सवाल उपस्थित होतोय. व्ही. पी बागडी असं संबधित शिक्षकाचं नाव असून त्याची सध्या सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आलीेय..
Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी भागत असलेल्या जुन्या टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. रात्री 2 च्या सुमारास आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्रीची वेळ असल्याने टायरच्या गोडाऊनमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही . मात्र आग ज्या ठिकाणी लागली त्याच ठिकाणी बाजूला खाजगी रुग्णालय असल्याने सुरक्षितेचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना विविध रुग्णालयात शिफ्ट केले. आग आटोक्यात आणण्यात तब्बल 4 तासांनी अग्निशमन दलास यश मिळाले.
Palghar Accident: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या लक्झरी बसवर धडकल्यामुळे अपघात घडला. कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ते पूर्ण गुजरातच्या बारडोली मधील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या सर्व मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून कासा पोलीस अधिक तपास करत आहेत
Nashik News: नाशिक विभागाच्या पाचही जिल्ह्यातून मतपेट्या स्ट्रॉंग रूमला पोहोचल्या आहेत. नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी स्ट्रॉंग रूमला तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यत आल्या आहेत. थोड्याच वेळात स्ट्रॉंग रूम सील केली जाणार आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यात चालणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. 31 जानेवारी 2023 ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशन 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरू होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.30 वाजता बाईट देण्याची शक्यता आहे. भारताचे चीफ इकोनॉमिक एडवाईज आर्थिक सर्वेक्षणावर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेतील.
आसाराम बापूला आज न्यायालय सुनावणार शिक्षा
गुजरात - महिला सहकाऱ्यांच्या बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला न्यायालयाने दोषी ठरवलंय. आज आसाराम बापूला सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावली जाईल. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयात ही सुनावणी झालीय. 2013 मध्ये दोन बहिणीवरील अत्याचाराचं हे प्रकरण होतं. यात एकूण सात आरोपी होती. त्यापैकी आसारामची पत्नी, मुलगीसह सहा आरोपींची सुटका करण्यात आलीय.
एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज आंदोलन
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आयोगाने त्यांचे म्हणणे एकावे यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आलं आहे, ज्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकातच जोरदार आंदोलन करण्यात आले होते.
राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक
राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक होणार आहे, सकाळी 11 वाजता.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
पुणे – कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जरी नक्की नसले तरी कोण कोण उमेदवारी अर्ज घेणार याबाबत उत्सकता.
राहुरी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून ही सुरु, आज आंदोलनाचा 6 वा दिवस
शिर्डी – राहुरी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजून ही सुरु असून आज आंदोलनाचा 6 वा दिवस आहे. अद्याप शासनाने या आंदोलनाची दखल सुद्धा घेतली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -