एक्स्प्लोर

Maharashtra News Updates: कोकणातील रिफायनरी विरोधकांची राजकारणात उडी, ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लढवणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates: कोकणातील रिफायनरी विरोधकांची राजकारणात उडी, ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लढवणार

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वच न्यायालयांमध्ये आजपासून ई-फायलिंग द्वारे कामकाजाला सुरुवात होणार आहे. यामुळे संपूर्ण कामकाज पेपरलेस होईल. आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडतय. याबरोबरच आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून धडक आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. 
 
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर करणार

12 लाख रुपयांच्या मोबदल्यात शाळांना सीबीएसईची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं समोर आलंय. त्यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आलाय. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुण्यातील तीन शाळांची चौकशी सुरु झालीय. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करतायत. आज या प्रकरणात चौकशी अधिकारी शिक्षण उपसंचालकांना त्याचा अहवाल सादर करणार आहेत.  
 
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 
 
आयसीआसीआय बॅंक घोटळा प्रकणी हायकोर्टाचा निकाल

आयसीआयसीआय बँक घोटाळ्याप्रकरणी चंदा आणि दिपक कोचर यांच्या याचिकेवर  हायकोर्ट सकाळी 10:30 वाजता निकाल जाहीर करणार आहे. सीबीआयची कारवाई बेदायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तात्काळ सुटकेची कोचर दांपत्यानं हायकोर्टाकडे मागणी केली आहे. 

अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा

आज अमरावतीत किन्नरांची कलश यात्रा निघणार आहे. अमरावती शहरात तब्बल 50 वर्षानंतर राष्ट्रीय किन्नर संमेलन 3 ते 11 जानेवारी दरम्यान पार पडतय. आज किन्नरांसाठी महत्वाचा दिवस आहे. अमरावती शहरातून देशभरातून आलेले किन्नर सजून डजून या कलश यात्रेत सहभागी होतात. यावेळी अनेक किन्नर एक ते दिड किलो सोन्याचे दागिने परिधान करून या कलश यात्रेत सहभाग घेतात.  
 
यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा धडक आक्रोश मोर्चा

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून धडक आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहेत.  

19:39 PM (IST)  •  09 Jan 2023

Belgaum News: कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ असणाऱ्या माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक

 Belgaum News: कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जवळ  असणाऱ्या माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ऊस शेतीतील आग दुकानाच्या बाजूने येत असताना शेतकरी व युवकांनी ताबडतोब येऊन ऊस तोडून ऊस शेतीचे दोन भाग केल्याने टोलनाक्याकडे येणारी आग विझली. यामुळे पुढील अनर्थ टाळला. अन्यथा या ठिकाणी व्यावसायिकांचेही लाखो रुपयाचे नुकसान झाले असते.

18:22 PM (IST)  •  09 Jan 2023

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन कामे देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, जलसंधारण महामंडळाकडील कंत्राटदार नोंदणीची जुनी पद्धत तात्काळ बदलून नवी पारदर्शक, खुली प्रक्रिया राबवून निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नोंदणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

18:14 PM (IST)  •  09 Jan 2023

राजकारण्यांसाठी कोणती शाळा का नाही? राजेंद्र आर्लेकर हिमाचल प्रदेश राज्यपाल

प्रत्येक क्षेत्रात एका विशिष्ट पदावरती बसायचे असल्यास त्या क्षेत्राचा अनुभव आणि शिक्षण महत्त्वाचं आहे, मात्र राजकारणात येताना किंवा आमदार मंत्री अशी पदे भूषवताना कोणतेही शिक्षण किंवा अनुभवाची अट का महत्त्वाची नाही असा सवाल हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर यांनी उपस्थित केला.गोवा विधानसभेच्या विधिकार दिनानिमित्ताने आरलेकर पर्वरी येथील कार्यक्रमात बोलत होते. विधानसभेच्या वतीने सोमवारी सकाळी पर्वरी येथील विधानसभा संकुलात गोवा विधानसभा विधीकार दिन आयोजित होता यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विधानसभेत प्रवेश करताना आपण कसे निवडून आलो त्यापेक्षा लोकांनी आपल्याला का निवडून दिले हा विचार प्रत्येक आमदार व खासदारांनी करायला पाहिजे असेही आरलेकर आपल्या भाषणात म्हणाले.
विधानसभेत आल्यानंतर आपण काय बोलावं, कसं बोलावं किती वेळ बोलावं आणि कोणते मुद्दे उपस्थित करावे याचं भान प्रत्येक विधानसभा सदस्य व आमदाराला असला पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. राजेंद्र आर्लेकर यांनी गोवा विधानसभेचे माजी सभापती व गोवा सरकारच्या विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले.सध्या ते हिमाचल प्रदेश राज्याचे विद्यमान राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
17:31 PM (IST)  •  09 Jan 2023

वरळीत लिफ्ट कोसळुन दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 

वरळीत लिफ्ट कोसळुन दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती 

अविघ्न हाऊस मायानगर येशील इमारतीत घडली घटना 

इमारतींचं बांधकाम पुर्ण झालेलं असताना घडली घटना 

१९ मजल्याची आहे इमारत पोलीस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी

17:08 PM (IST)  •  09 Jan 2023

कोकणातील रिफायनरी विरोधकांची राजकारणात उडी, ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका लढवणार

कोकणातील रिफायनरी विरोधकांनी आता थेट निवडणुकीच्या मैदानात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत आगामी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवण्याचा निर्णय रिफायनरी विरोधकांनी घेतलाय. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचा सरपंच निवडून आल्याचा दावा रिफायनरी विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील रिफायनरी विरोधक लढवणार आहेत. तसेच प्रस्ताविती भागांमधील कातळशिल्पाचं गोरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी देखील शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यापूर्वी रिफायनरी विरोधकांनी रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या कोणत्याही नेत्याला गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेनेला त्या ठिकाणी शिव संपर्क अभियान देखील राबवता आलं नव्हतं.  

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget