Maharashtra News Updates : Sonia Gandhi: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल; खासदार राहुल शेवाळेंची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Strike Against Privatization) करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. वीज महामंडळाच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ मुंबई, ठाणे, नाशिक, रायगडसह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कामगार संपावर. 86 हजार कामगार, अभियंते आणि अधिकारी आणि 42 हजार कंत्राटी कामगार संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा आहे. विज संपाच्या पार्श्वभुमीवर 30 संघटनांच्या नेत्यांना देवेंद्र फडणविसांनी संघटनांना दुपारी 12 वाजता चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे.
आजपासून राष्ट्रवादीची जनजागर यात्रा
राष्ट्रवादीची महिला आघाडी राज्यभर जगजागर यात्रा काढणार आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात प्रत्येक विधानसभा भागात जाणार आहे आज पुण्यात शरद पवार (sharad pawar) यात्रेला झेंडा दाखवणार आहे, संध्याकाळी 6 वाजता.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिंदे गटात युती होणार? आज एकत्रित पत्रकार परिषद
पीपल्स रिपब्लिकन पार्टी (People's Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) यांच्यात होणार युती होणार? आज जोगेंद्र कवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करण्याची शक्यता, दुपारी 1 वाजता
‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन
मुंबई – 4 ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता.
घाटकोपर पाणी खात्यावर शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
घाटकोपर पाणी खात्यावर शिवसेना नेते अनिल परब (anil parab) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आहे. विभागात पाणी मिळत नाही यासाठी मोर्चा निघणार आहे, सकाळी 11 वाजता.
मंत्री उदय सामंत यांचा जनता दरबार
बाळासाहेब भवन येथे मंत्री उदय सामंत (uday samant) यांचा जनता दरबार होणार आहे, सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत
सीबीआयकडून मुंबईतील इन्कम टॅक्समधील अधिकाऱ्याला अटक
सीबीआयकडून मुंबईतील इन्कम टॅक्समधील अधिकाऱ्याला अटक..
उमेश कुमार या अधिकाऱ्याला 8 हजारांची लाच घेताना अटक..
एका प्रकरणात तक्रारदाराला मदत करण्यासाठी अधिकाऱ्याने 10 हजारांची मागणी केली होती..
सीबीआयने सापळा रचून अटकेची कारवाई केली..
पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर, गणवेश भत्त्यात वाढ
पोलिस अधिकाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर
गणवेश भत्त्यात वाढ
गृह विभागाचा निर्णय
आधी ५ हजार रुपये मिळत होता भत्ता
आता प्रति वर्षी ६ हजार रुपये मिळणार
पोलीस उप निरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना मिळणार लाभ
संत सेवालाल महाराजांच्या जीवनावर आधारित 'संत मारो सेवालाल' चित्रपट 13 जानेवारीला प्रदर्शित होणार
Washim News : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जीवनपटावर आधारित 'संत मारो सेवालाल' हा बंजारा भाषेतील चित्रपट येत्या 13 जानेवारीला विदर्भातील काही जिल्ह्यात प्रदर्शित होणार आहे. संत सेवालाल महाराजांनी 300 वर्षापूर्वी पर्यावरणसह विविध विषयांवर विशेषत: पाण्याविषयी केलेली भविष्यवाणी यामध्ये दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे निर्माते आणि पोहरादेवीच्या महंतांनी याविषयी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली
गोंदिया गारठला... 12.5 सेल्सिअस तापमानाची नोंद
Gondia Cold News : मागील दोन दिवसांपासून तापमान खालावल्याने विदर्भ गारठला आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. तर, बुधवारी दिवसभर दाट धुक्याची चादर होती. अशात गुरुवारीही शीतलहर सुरु असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी जाणून लागली आहे. विदर्भात सर्वात कमी 12.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदियात झाली आहे. अगदी सकाळपासून ही शीतलहर सुरु असल्याने दिसून येत आहे. गारव्यामुळे हुडहुडी भरली असून अनेक ठिकाणी नागरिकांनी दिवसभर शेकोट्यांचा आधार घेतल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
Jalgaon News: जळगाव: रेशन धान्याचा अवैधरित्या साठा केल्याच्या संशयावरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची कारवाई
Jalgaon News: रेशन धान्याचा अवैधरित्या साठा केल्याच्या कारणावरून जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी धरणगाव येथील दोन धान्य गोडाऊन वर छापेमारी करत ही गोडाऊन सिल केल्याने रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे