Maharashtra News Updates: चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. शिवाय आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा फायनल थरार
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. पुण्यात सुरु असलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातील अंतीम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोन अंतीम लढतींमधील विजेते महाराष्ट्र केसरीच्या अंतीम लढतीत खेळणार आहेत. शनिवारी संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येतील आणि यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय. दुखापतीतून सावरत शिवराजने मॅट विभागाची अंतीम लढत गाठलीय. इथे त्याची लढत 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे.
औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार दिन
आज औरंगाबाद विद्यापीठ नामविस्तार दिन आहे. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आणि नेते उपस्थित असतात. या निमित्ताने आज महाविकास आघाडीकडून एक सभा घेतली जाणार आहे. त्यासाठी कॉंग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते अंबादास दानवे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, नितीन राऊत, चंद्रकांत हांडोरे, सुषमा अंधारे , रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
पंढरपुरात भोगीनिमित्त रूक्मिणी मातेला भोगी करणार
आज भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येतात. यावेळी मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ, लालपेठ आणि नांदगाव परिसरात जाणवले भूकंप सदृश्य धक्के... रात्री अंदाजे 9:30 च्या दरम्यान जाणवले भूकंप सदृश्य धक्के, धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये पसरली दहशत, अंदाजे 2 किलोमीटर भागा मध्ये हा प्रभाव जाणवल्याने या घटनेची कुठल्याच भूकंप मापक यंत्रात नोंद नाही, तज्ज्ञांच्या मते हे धक्के वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (WCL) च्या भूमिगत खदनींमध्ये अंतर्गत भूस्खलन झाल्याने बसल्याची शक्यता, या भागात आहेत अनेक बंद पडलेल्या भूमिगत कोळसा खाणी, या खाणी योग्य पद्धतीने बुजवण्यात आल्या नसल्याचा आहे आक्षेप, काही महिन्यांपूर्वी घुग्गुस शहरात अशाच प्रकारे भूमिगत कोळसा खाण धसल्याने एक घर जमिनीत झाले होते गुडूप, प्रशासन सध्या या घटनेनंतर कारणांचा घेत आहे शोध
अहमदनगर शहरातील कोठला परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद
नाशिकमध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी
मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजा गळ्यात अडकल्यानं दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झालीय. मामासोबत दुचाकीवर जात असताना या मुलीच्या गळ्याला मांजा कापला. जखमी मुलीला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखर करण्यात आलंय.
Nashik News: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल
मकर संक्रातच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक घटना
- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी
- मामासोबत दुचाकीवर जात असताना घडली घटना
- धामणगाव नदीच्या पुलावरील सायंकाळी सहा वाजेचा प्रसंग
- उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले
Mumbai : निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर आणि कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल, किरीट सोमय्या यांनी दिली माहिती
Mumbai: मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे कुटुंबीय आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध वरळी येथील गोमाता जनता एसआरएची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.