Maharashtra News Updates: जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल..
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या चार तासापेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याशिवाय प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होमग्राऊंडवर आज दोन सभा होणार आहेत.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या चार तासापेक्षा जास्त झालेल्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी यांनी चार तासांपेक्षा जास्त युक्तिवाद केला. कोर्टाची वेळी 4 वाजता संपल्यामुळं सुनावणी दुसऱ्या दिवशीवर ढकलली गेली होती. आज शिंदे गटाचे वकील हरिष साळवे युक्तिवाद करतील.
प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची मुंबईतील टिळक भवनमध्ये बैठक
प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. यावेळी विधान परिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार व भारत यात्रींचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या होमग्राऊंडवर आज दोन सभा होणार आहेत. पहिली सभा कल्याणमध्ये तर दुसरी सभा उल्हासनगरमध्ये होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचा कल्याणमध्ये कार्यक्रम होईल.
राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षातील सर्व आमदारांची बैठक आज सकाळी 10 वाजता विधान भवनात होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित असतील. आगामी अर्थ संकल्पात विरोधकांना धारेवर धरण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक असेल. 10 दिवसांपूर्वी अशीच एक बैठक पार पडली होती त्यामध्ये महागाई, भ्रष्टाचार यासोबतच अदानी समुहामुळे झालेली वाताहत यावर सरकारला धारेवर धरण्याच निश्चित करण्यात आलं होतं.
पुरंदर तालुक्यातील वीर येथील मस्कोबाच्या यात्रेची सांगता
पुरंदर तालुक्यातील वीर येथील मस्कोबाच्या यात्रेची सांगता होणार आहे. मारामारीने म्हणजेच रंगाची शिंपण करून या यात्रेची सांगता होते. ही रंगांची शिंपण बघण्यासाठी राज्यभरातून लोक दाखल होत असतात. दुपारी 12 वाजता या रंगाची शिंपण करून यात्रेची सांगता होणार आहे... देवावर रंगाची शिंपण केली जाते, यानंतर तो रंग भाविकांवर सिंपडला जातो. तो रंग अंगावर घेण्यासाठी जी गडबड गोंधळ होतो त्यालाच मारामारी म्हणतात.
पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुनावणी
पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्ती दिनेश शर्मा यांच्यापुढे सुनावणी चालणार आहे. राज्य सरकारनं एखाद्या संस्थेवर बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना नियमानुसार आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. तर राज्य सरकारही बंदी का आवश्यक यावर बाजू मांडणार.
आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल..
नौपाडा पोलिसांनी ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३०७, ३३२, ५०६(२), १४३, १४८, १४९, १२० (ब), सह शस्त्रास्त्रे प्रमाणे नोंद केली आहे. नगरपालिका. अधिनियम 3/25, 4/25 अन्वये एफआयआर (क्रमांक 60/2023) नोंदविण्यात आला आहे.
बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर व अन्य तिघांनी महेश आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केला. महेश आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिजीत पवार हे जितेंद्र आव्हाड यांचे खाजगी सचिव आहेत.
NCP Jitendra Awhad: ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, महेश आहेर यांना मारहाण केल्याचा संशय
ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नौपाडा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कार्यकर्त्यांवर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याचा पोलिसांना संशय आहे.
अमरावती शहरात हेल्मेट आणि सीट बेल्ट अनिवार्य, नियम मोडल्यास होणार कारवाई
आजपासून अमरावती शहरात हेल्मेट, सीट बेल्ट पोलिसांनी अनिवार्य केलं आहे. मागील वर्षी अमरावती शहरात 91 अपघात झाले, ज्यामध्ये 101 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 106 गंभीर अपघात झाले ज्यामध्ये 151 जण जखमी ज्यात 93 जणांना गंभीर दुखापत झाली होती. त्याच प्रमाणे 201 अपघात हे किरकोळ झाले ज्यात 247 जण जखमी झाले. त्यामुळेच अमरावतीचे पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट अनिवार्य केले आहेत. सर्व दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालकांसाठी सीटबेल्ट अनिवार्य करण्यात येत आहे. नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध आगामी काळात प्रभावी कार्यवाही करणार असे आदेशात देण्यात आले आहेत.
बार्शीतील फटाका फॅक्टरी ब्लास्ट प्रकरणात दोषींवर कारवाई करा; लहुजी शक्ती सेनेची मागणी
बार्शीतील पांगरी फटाका फॅक्टरी ब्लास्ट प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करत मागणी केली आहे. बार्शी तालुक्यातील शिराळा - पांगरी गावाजवळ असलेल्या फटाका फॅक्टरी मध्ये काही दिवसांपूर्वी ब्लास्ट झाला होता. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने केलेल्या तपासणीत ही फटका फॅक्टरी अवैधरित्या सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर देखील दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. मागील चार ते पाच वर्षांपासून ही फॅक्टरी सुरू होती. तेव्हा ह सगळा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला नाही का असा सवाल उपस्थित करत लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आणि मुंडन आंदोलन करण्यात आले. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी या आंदोलनाच्या वेळी करण्यात आली.
22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन करणार; राजू शेट्टींचा इशारा
मुंबई : येत्या 22 फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन केलं जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये तातडीने अनुदान द्यावे. वीजबील दुरुस्त करून घ्या आम्ही भरतो, मीटर बंद असले तरी बीलं मोठ्या प्रमाणात आली आहेत. 37 टक्क्यांची वीजदरवाढ आम्हला परवडणारी नसून ती मान्य नाही. शेतीसाठी दिवसा वीज देण्यात यावी, सरकारने दिलेलं आश्वासन पाळावे, या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.