Maharashtra News Updates 8th January 2023 : हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का, 3.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jan 2023 08:58 PM
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील अनेक कामे शिंदे सरकारच्या काळात रद्द, माहिती अधिकारातून बाब समोर  

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली अनेक कामे शिंदे सरकारच्या काळात रद्द करण्यात आली. यामध्ये राज्यातील जलसंधारण महामंडळातील 6191कोटीची कामे राज्यपालांमार्फत रद्द करण्यात आली आहेत. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी ही रद्द झालेली कामे स्थगित दाखवून खोटी कागदपत्रे केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीने ही स्थगिती उठवली गेल्याचे दाखवली. त्यानंतर ही कामे पुन्हा सुरू करण्यात आली. हा सर्व प्रकार माहिती आधिकारांतर्गत उघड झाला आहे.

गोंदिया : भर रस्त्यात दुचाकीने घेतला पेट

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये भर रस्त्यात दुचाकीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. दुचाकी मालक हे आमगाव तालुक्यातील किकरिपार येथील रहिवासी असून ते काही कामानिमित्त आले होते, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

माजी पंतप्रधान अटलजी यांना खरी श्रदांजली वाहायची असेल तर मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवा : देवेंद्र फडणवीस

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे बघून सुरवात केली. त्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळताना आनंद होतोय. नव्या भारताची मुहूर्तमेढ ही अटल बिहारी वाजपेयी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एका उंचीवर नेऊन नरेंद्र  ठेवलंय. भविष्याचा विचार करता भारताशी संबंध चांगले ठेवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यामुलेच जी 20 चं अध्यक्षपद भारताला मिळालं आहे. अमेरीकेचे अध्यक्ष असो किंवा रशियाचे अध्यक्ष पुतीन हे पंतप्रधान मोदी यांच्याशी हात मिळवण्यासाठी आतुर असतात. अणुशक्तीसाठी मोठ्या प्रमाणावर दबाव होता. अनेक देशांनी व्यवहार करणार नाही असा दबाव टाकला. मात्र अटल बिहारी वाजपेयी यांनी कोणताही विचार न करता हे काम पूर्ण केलं. भारतीय जनता पार्टाचा जन्म मुंबईचा आहे. राष्ट्रीय पक्षाचा जन्म हा फक्त भाजपचा आहे. अटलजी यांना खरी श्रदांजली वाहायची असेल तर मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे. भाजप आणि शिंदे गट मिळून हा झेंडा फडकवायचा आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. 

 सोलापूरमध्ये तरुणांमध्ये फ्री स्टाईल मारहाण, अनेकांना पोलिसांनी घेतंल ताब्यात

 सोलापूरमध्ये तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालीय. शहरातील चार हुतात्मा स्मारकाजवळ हा राडा झालाय. एका युवकाला जमावाने बेदम मारहाण केलीय. या प्रकरणी अद्याप कोणाकडून तक्रार दाखल झालेली नाही. परंतु, गोंधळ घालणाऱ्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

खासदार पुत्राला खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

वर्ध्यात खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्या तक्रारीवरून दोघांवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंकज तडस यांच्या कुटुंबियाविरुद्ध खोट्यानाट्या तक्रारी देण्याची भीती दाखवत खंडणी वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एक वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणात दोघेही खंडणीसाठी सतत तगादा लावत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

खासदार पुत्राला खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

वर्ध्यात खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्या तक्रारीवरून दोघांवर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंकज तडस यांच्या कुटुंबियाविरुद्ध खोट्यानाट्या तक्रारी देण्याची भीती दाखवत खंडणी वसूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एक वर्षापूर्वी घडलेल्या या प्रकरणात दोघेही खंडणीसाठी सतत तगादा लावत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

 छत्रपती संभाजीनगरचं काय झालं? माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बॅनरमधून विचारला प्रश्न 

फसव्या हिंदुत्वद्यांचा जाहीर निषेध, छत्रपती संभाजीनगरचं काय झालं? असा प्रश्न कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विचारलाय. हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद शहरामध्ये बॅनर लावले असून, त्यामध्ये फसव्या हिंदुत्ववाद्यांनी हिंदूंची मते घेऊन तीस वर्षे हिंदूंनाच फसविलयाचा आरोप केलाय. फसव्या हिंदुत्ववाद्यांचा जाहीर निषेध करत छत्रपती संभाजीनगरचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित करून औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुन्हा एकदा पुढे आणला आहे.

राज्यपालांविरोधात मराठा समाज आक्रमक,  राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी

राज्यपालांविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावी अशी मागणी मराठा समजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबरोबरच  मराठवाड्यातील कार्यक्रम उधळून लावू असा इशारा मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेतून देण्यात आलाय. 

विहिरीत पोहण्यास गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, पालघर जिल्ह्यातील बोईसर पास्थळ येथील घटना

 पालघर जिल्ह्यातील बोईसर पास्थळ येथे विहिरीत पोहण्यास गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झालाय. अखिलेश प्रदीप यजस्वाल असं 23 वर्षीय मृत युवकाचं नाव आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांकडून मृतदेहाचा शोध सुरू असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.   

माहीम चर्चमधीळ स्मशानभूमीत तोडफोड करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

माहीम चर्चमधल्या स्मशानभूमीत तोडफोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई परिसरातून या आरोपीला ताब्यात घेतलं असून आरोपी मानसिक रुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काल माहीम चर्चमधील स्मशानभूमीत तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती.  

Wardha Weather : वर्ध्याच्या तापमानात झाली घट; तापमान 9.4 अंश सेल्सिअस

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसा आधी अवकाळी पासून पडल्याने वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. वर्ध्याचे आजचे तापमान 9.4 अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले आहे. तापमानात 2.4 अंश सेल्सिअसने दोन दिवसात घट नोंदवली गेली आहे. तपमानात घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात सकाळी दाट धुके बघायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोटी पेटवायला सुरवात झाली आहे. थंडीपासून बचावासाठी वर्धा जिल्ह्यातील नागरिक आता शेकोटीचा आधार घेतांना दिसत आहे तर, नागरिक उबदार कपडे परिधान करून थंडी पासून आपलं संरक्षण करत आहे. त्यातच वर्धा जिल्हा प्रशासनाने थंडी पासून बचाव करण्याकरिता मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहे.

बँक अधिकारी असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची एक लाखाची फसवणूक, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime News : बँक अधिकारी असल्याचे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाची एक लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या तीन सायबर गुन्हेगारांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी तक्रारदाराला एक संदेश पाठवला आहे की, त्याचे बँक खाते ब्लॉक केले गेले आहे आणि त्याला पॅन कार्ड केवायसी तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. पोलिसांनी सांगितले की पीडितेला मदत करण्याच्या बहाण्याने त्यांनी ओटीपी घेतला आणि मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी रोख हस्तांतरित केले. याप्रकरणी पोलिसांनी बिहारमधील सैफ अली (वय 22) आणि कमल अन्सारी (वय 22) यांच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे. अरुण कुमार मंडल (वय 24) याला झारखंडमधील जामतारा येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींवर 10 हून अधिक गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले.  या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा माटुंगा पोलिस शोध घेत आहेत.

Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का, 3.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद 

Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून भूकंपाचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी या तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी जमीन हादरत असल्याने सर्व नागरिक भयभीत झाले होते. जिल्ह्यात 3.6 रिश्टर  स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. सकाळी सर्व नागरिक साखर झोपेत असताना या भूकंपाच्या हादऱ्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे भाग केले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा आर्थिक हानी झाली नसून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची भूकंपमापक केंद्रात नोंद झाली असून भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल एवढी असल्याचं सांगितले जात आहे.

कल्याण पूर्वेत पोलिसांकडून हॅप्पी स्ट्रीट चे आयोजन

कल्याण डोंबिवली शहरातील देखील नागरिकांना मोकळा आनंदी श्वास घेता यावा, त्यांच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याठी कल्याण चे डी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण कोलशेवाडी पोलीस ठाणेच्या वतीने कल्याण पूर्वेत हप्पी स्ट्रीटची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड वर सकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या हॅप्पी स्ट्रीट या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेतील लेझिम पथक, कराटे, योगा, झुंबा डान्स, स्केटिंग, सिंगिंग,बेस बॉल असे अनेक उपक्रम एकाच वेळी एकाच ठिकाणी करण्यात आले. लहान मुलांसाठी विविध कार्टून देखील रस्त्यावर होते. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, माजी नगरसेवक महेश गायकवाड ,यांच्यासह ठाणे शहर पोलिस कलामंच, पोलीस अधिकारी कर्मचारी देखील खेळ गाण्यासह विविध उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले .आमदार गणपत गायकवाड, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, केडीएमसी उपायुक्त अतुल पाटील यांनी बेस बॉल, सायकलिंग चा आनंद घेतला .यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस आणि नागरिकांमधील अंतर कमी करण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत. कल्याण पूर्वेतील पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चांगला संदेश दिला तसेच नागरिकांनी देखील या कार्यक्रमात उत्स्फूर्त पने सहभाग घेतला त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन केलं.

Go First Air : गो फर्स्ट विमानात एअर होस्टेससोबत घाणेरडे कृत्य, अश्लील भाषा वापरत केली 'ही' मागणी

Go First Air Flight Incident : विमान प्रवासातील गैरवर्तानाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गो फर्स्ट एअरलाइनच्या (Go First Airline) विमानात प्रवाशाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केल्याची घठना घडली आहे. प्रवाशाने एअर होस्टेसशी अश्लील भाषेत संवाद साधत तिच्याकडे अश्लील मागणी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका परदेशी प्रवाशाने एअर होस्टेसला जवळ बसण्यास सांगितले होते आणि दुसऱ्या एका प्रवाशाने एअर होस्टेसशी बोलताना अश्लील भाषा वापरली. एअर फर्स्टचे विमान दिल्लीहून गोव्याला जात होते. एअर इंडियाच्या विमानातील महिला प्रवाशावर लघवी केल्याची घटना ताजी असताना ही नवीन घटना समोर आली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

IAF Depart for Japan : भारतीय हवाई दल रविवारी जपानला रवाना होणार

Aerial Wargames 2023 : देशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि जपान संयुक्त हवाई सराव 'वीर गार्डियन-2023' आयोजित करणार आहेत. भारतीय हवाई दलाने (IAF) निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असेल. 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत जपानच्या हवाई सेल्फ डिफेन्स फोर्ससोबत वीर गार्डियन 2023 या पहिल्या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी रविवारी जपानला रवाना होईल. चार Su-30 MKI, दोन C-17 ग्लोबमास्टर्स आणि एक IL-78 टँकर भारतीय हवाई दलासह सहभागी होतील.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Weather Update : धक्कादायक! कानपूरमध्ये थंडीमुळं 14 जणांचा मृत्यू

Weather Update : धक्कादायक! कानपूरमध्ये थंडीमुळं 14 जणांचा मृत्यू


Weather Update In India: देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी (Cold Weather) पडली आहे. थंडी आणि धुक्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (kanpur) थंडीमुळं हृदयविकाराचा झटका आल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. 

Avani Chaturvedi : परदेशी भूमीवर दिसणारी 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी

Veer Guardian 2023 : भारतीयांना अभिमानाने मान उंच करायला लावणारी बातमी आहे. भारतीय हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी (Avani Chaturvedi) नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदीसह भारतीय हवाई दलाच्या तीन महिला वैमानिक देशाबाहेर होणाऱ्या एरियल वॉर गेममध्ये (Aerial Wargames) भारतीय सैन्य दलाचा भाग असणार आहेत. ही ऐतिहासिक कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला पायलट ठरणार आहे. असा पराक्रम करण्याची अवनी चतुर्वेदीची ही पहिलीच वेळ नाही. अवनीने यापूर्वीही अनेक इतिहास रचले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मिरजेत ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेल्या पाडापाडीच्या निषेधार्थ आज मिरज शहर बंदचे आवाहन

मिरज शहरात आज सर्वपक्षाकडून  मिरज शहर बंदचे आवाहन  करण्यात आलंय. मिरजेत बस स्थानकाजवळील जागा ताब्यात घेण्यावरून आणि महापालिकेने  अतिक्रमण काढायला सांगितलंय असे सांगत ब्रह्मानंद पडळकर यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह त्या जागेवरील इमारत, गाळे मध्यरात्री 4 पोकलँडने पाडलेत. याचा निषेध म्हणून सर्व व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  या बंद मध्ये मोर्चा किंवा निदर्शने करण्यात येणार नसून केवळ व्यवहार  बंद करण्याचे आवाहन करण्यात आलंय. या तोडफोड प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 लोकांवर मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.

Hisha Baghel Durg : रिक्षाचालकाची मुलगी ठरली पहिली महिला अग्निवीर, नौदलात निवड

First Woman Agniveer : एका रिक्षाचालकाच्या (Auto Driver ) मुलीची पहिली महिला अग्निवीर (First Woman Agniveer) म्हणून निवड झाली आहे. छत्तीसगडमधील रिक्षाचालकाच्या मुलीने आपल्या मेहनत आणि हिंमतीच्या जोरावर येश मिळवलं आहे. हिशा बघेल दुर्ग (Hisha Baghel Durg) ही अग्निवीर योजनेसाठी निवड झालेली पहिली तरुणी आहे. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तिच्या वडिलांची 12 वर्षांपासून कर्करोगाशी झुंज सुरु आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Wheat Cultivation : यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड, वाचा सविस्तर आकडेवारी...

Wheat Cultivation : यंदा देशात गव्हाची विक्रमी लागवड, वाचा सविस्तर आकडेवारी...


Wheat Cultivation : यावर्षीही देशात अन्नधान्याचे (Grain) मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण मोठ्या प्रमाणावर शेती पिकांची (Agriculture Crop) लागवड यावर्षी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं गव्हाच्या लागवडीच्या (Wheat Cultivation) संदर्भातील आकडेवारीची माहिती दिली आहे. देशात यावर्षी गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळं अन्नधान्याचं कोणतेही संकट येणार नसल्याचं सरकारनं सांगितलं आहे. गव्हाची विक्रमी लागवड ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. कडधान्ये आणि तेलबियांच्या (oilseeds)पेरणीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजूनही काही शेतकरी गव्हाची लागवड करत आहेत. आत्तापर्यंत देशात 3.32 कोटी हेक्टरवर गव्हाची लागवड झाली आहे. 

Dhule Accident: धुळ्यात हिट अँड रनची भयानक घटना, टँकरनं अनेक वाहानांना उडवलं.

Dhule Accident: एका विचित्र अपघातानं धुळ्यात खळबळ उडाली आहे. धुळ्यात एका टँकर चालकानं अनेक वाहानांना उडवलं आहे. या अपघातात काही वाहन चालक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. टँकर गुजरातकडे जात असताना त्यानं अनेक वाहानांना धडक दिली. मद्यपी टँकर चालक राजेंद्र सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शहरातील संतोषी माता चौक ते फाशीदपूर दरम्यान ही घटना घडली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


काँग्रेस नेते विश्वजीत कदम कार्यवाह असलेल्या भारती विद्यापीठाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सक्खु देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत, दुपारी 2 वाजता, भारतीय विद्यापीठ. 


प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर घेणार राज ठाकरे यांची मुलाखत 




पुणे – 18 व्या जागतिक मराठी परिषदेत आज राज ठाकरेंची मुलाखत प्रकाश अकोलकर आणि प्रभाकर वाईरकर घेणार आहेत, सकाळी 11 वाजता. सम्मेलनाच्या समारोपाला चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार उपस्थित रहाणार आहेत.



अशोक सराफ यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार होणार


ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार होणार आहे, संध्याकाळी 5.30 वाजता, यशवंत नाट्यगृह.


अंधेरीतील चंद्रशेखर सहनिवास या सोसायटीचा पुनर्विकास होणार 


मुंबई – अंधेरीतील चंद्रशेखर सहनिवास या सोसायटीचा पुनर्विकास होणार आहे. चंद्रशेखर सहनिवासमध्ये घालवलेले क्षण, अनेक वर्ष सोबत केलेल्या सोसायटीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोसायटीतील रहिवाशी एकत्र जमणार आहेत. यावेळी पोलीस बँडच्या सादरीकरणातून सोसायटीला अखेरची मानवंदना दिली जाणार आहे, संध्याकाळी 7 ते 8.30 वाजताच्या दरम्यान हा कार्ययक्रम होणार आहे. 


मुंबई – मुंबई पोलीस दलाच्या वतीने पोलीस ढाल आमंत्रित क्रिकेट स्पर्धेच्या अमृत महोत्सवी समारंभाचा पारितोषिक वितरण सोहळा पद्मश्री दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित राहणार आहेत, संध्याकाळी 6 वाजता, मरीन ड्राईव्ह, पोलीस जिमखाना.


अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा 


कोल्हापूर – विधानसभा विरोधीपक्ष नेते अजित पवार आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. ट्रॉमा केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण समारंभ होणार आहे. चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आणि शेतकरी मेळावा होणार आहे, सकाळी 11 वाजता. गडहिंग्लज तालुक्याचे माजी सभापती अमर चव्हाण यांचे वडील रामचंद्र चव्हाण यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत, दुपारी 4 वाजता.


सर्वपक्षीय मिरज शहर बंदचे आवाहन, ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 लोकांवर  गुन्हा दाखल
 
सांगली – आज सर्वपक्षीय मिरज शहर बंदचे आवाहन करण्यात आलंय. मिरजेत बस स्थानकाजवळील जागा ताब्यात घेण्यावरून त्या जागेवरील इमारत, गाळे पाडल्याचा निषेध म्हणून सर्व व्यापाऱ्यांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आलय. आज यात मोर्चा किंवा निदर्शने करण्यात येणार नसून केवळ व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यात आलंय. या तोडफोड प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधु ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 लोकांवर मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.


केसरी कुस्ती स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद 


पुणे – 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद होणार आहे, सकाळी 11 वाजता, कै.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरी, कोथरूड.


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वंजारी विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन 


नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात वंजारी विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन करण्यात आलंय. कार्यक्रमाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत, सकाळी 9.30 वाजता.


खंडोबा देवस्थानचा तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाचा आज मुख्य दिवस


अहमदनगर – पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा तीन दिवसीय वार्षिक यात्रोत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबा देवाच्या पालख्यांची मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत मानाच्या काठ्या हे आकर्षण असते.


आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी गोलमेज परिषद


जालना – आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी गोलमेज परिषद होणार आहे. या परिषदेत मराठा समाजाला त्यांच्या हक्काच्या कायमस्वरुपी टिकणाऱ्या आरक्षणासाठी राज्यातील विविध संघटना, अभ्यासक आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर दिशा ठरवणार, महापुरुषांच्या अवमाना प्रकरणी भूमिका जाहीर केली जाणार, सकाळी 10.30 वाजता.


अखिल भारतीय गझल संमेलनाचा आज समारोप


अकोला – अखिल भारतीय गझल संमेलनाचा आज समारोप होणार आहे. दुपारी 4.30 वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षीय भाषणानं संमेलनाचा समारोप होईल. त्यानंतर गझलनवाज भिमराव पांचाळे यांची गझल मैफिल होईल.


वरोरा येथे 41 किलोमीटरच्या मॅरेथॉनचं आयोजन


चंद्रपूर – माता महाकाली बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने आज वरोरा येथे 41 किलोमीटरच्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे . आनंदवन चौक ते पडोली अशी ही मॅरेथॉन राज्यस्तरीय असून या मध्ये संपूर्ण राज्यातून शेकडो स्पर्धक सहभागी होणार आहे, सकाळी 6 वाजता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.