Maharashtra News Updates 7 October 2022 : मंत्रालयात लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाची जागा वाढवली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Oct 2022 11:16 PM
दसरा मेळाव्यासाठी गेलेला तरूण शिवसैनिक मुंबई येथून बेपत्ता

शिवसेना (ठाकरे गटाच्या) मेळाव्यासाठी मुंबई येथे गेलेला एक तरूण शिवसैनिक बेपत्ता झाला आहे. सागर उर्फ मिटू बाकले (वय 30) असे गायब असलेल्या तरूण शिवसैनिकाचे नाव आहे. तो उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील रहिवाशी आहे. हा शिवसैनिक रेल्वेने गेला होता. मात्र तो गावी परतला नसून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्याचे कुटूंबिय चिंतेत पडले आहेत. तो नेमका कुठे आहे? त्याला कोणी गायब तर केले नसेल? असा सवाल आता सागरचे कुटुंबिय विचारत आहेत. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या सारोळा गावातीलच सागर बाकले हा तरूण शिवसैनिक आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबई येथील शिवतिर्थवर तो गेला होता. सारोळा येथून मंगळवारी रात्री सागर हा इतर शिवसैनिकासोबत गेला. त्यानंतर रेल्वेने तो मुंबईला गेला होता. दसरा मेळावा करून गावातील इतर शिवसैनिक गुरूवारी गावाकडे परतले. मात्र सागर बाकले हा शिवसैनिक मात्र आला नाही. याबाबत कुटूंबियांनी इतर शिवसैनिकांकडे विचारणा केली असता तो सभेसाठी आला होता. मात्र नंतर कुठे गेला याची माहिती नसल्याचे सांगितले. तीन दिवसापासून सागर याचा कसलाही संपर्क होत नसल्याने कुटुंबिय चिंतेत पडले आहेत. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्याशी कुटूंबियांनी संपर्क साधला असून त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा लावली असल्याचे पाटील यांनी सांगितले. सागर याच्याकडे मोबाईल नसला तरी त्याला जवळच्या व्यक्तींचे मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहेत. मात्र अद्यापही त्याने कोणालाही संपर्क केला नाही. सागर याचा ठावठिकाण लागत नसून सागर नेमका कुठे आहे? त्याने कुटूंबियांशी का संपर्क केला नाही? का त्याला कोणी गायब केले? असे सवाल आता विचारले जावू लागले आहेत.


 
Jalna News: महाराष्ट्रातल्या राजकारणावर आणि भाषणांवर संभाजीराजेंची खंत 
लोकशाहीत विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत जाऊ नये कोणाच्या नातवापर्यंत जाऊ नये, असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  लोकशाहीमध्ये विरोध करत असताना कोणाच्या घरापर्यंत आणि कोणाच्या नातवापर्यंत जाऊ नये असा सल्ला छत्रपती संभाजी राजे यांनी सर्वच राजकारण्यांना दिलाय. राजकारणात टीका करताना अपशब्द वापरले जात असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली जालन्यातील बदनापूर येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये भाषणात ते बोलत होते..

 

 
Sangli News: खानापूर तालुक्यातील माहुली गावातील नागरिकांची पुण्यातील चौघांकडून कोट्यवधीची फसवणूक

Sangli News: खानापूर तालुक्यातील माहुली गावातील नागरिकांची पुण्यातील चौघांकडून कोट्यवधीची फसवणूक 


तीन महिन्यामध्ये दीडपट रक्कम देण्याच्या आमिषाने झाली तब्बल 3 काेटी 28 लाखांची फसवणूक


माहुली गावच्या आबासाहेब देशमुख यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील चौघांविरूध्द विटा पाेलीसांत गुन्हा दाखल


ऋषीकेश अशोक, बारटक्के , नितीन सुभाष शहा, आदित्य दाडे,  श्रीमती निलमणी धैर्यशील देसाई  अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे


ऋषीकेश अशोक बारटक्केला विटा पोलिसांनी केली अटक

भाजपचे आमदार, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसाकडून चौकशी सुरु

भाजपचे आमदार, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी


PFI संघटनेवर कारवाई केल्याबद्दल जीवे मारण्याची धमकी, हस्तलिखित पत्रात उल्लेख


पत्रावर महंमद शफी बिराजदार असे नाव लिहिण्यात आले असून पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरु


मागील महिन्यात pfi वर देशभरात कारवाई झाली, सोलापुरात देखील एक व्यक्ती पोलिसांनी घेतलाय ताब्यात


Pfi वर झालेल्या कारवायचा उल्लेख करतं आमदार देशमुख यांना धमकीचे पत्र


आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने 4 तारखेला प्राप्त झाले आहे पत्र


आमदार देशमुख यांचे स्वीय सहायक उमेश कोळेकर यांनी दिली पोलिसात तक्रार


पोलिसाकडून चौकशी सुरु

शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ कार्यासाठी बंगल्याचे वाटप,मंत्रालयाच्या समोर क-2 ब्रह्मगिरी हा बंगला शिंदे गटाच्या विधिमंडळ कार्यासाठी

शिवसेना शिंदे गटाच्या विधिमंडळ कार्यासाठी बंगल्याचे वाटप


मंत्रालयाच्या  समोर क-2 ब्रह्मगिरी हा बंगला शिंदे गटाच्या विधिमंडळ कार्यासाठी वाटप


शिवसेनेच शिवालय कार्यालय मंत्रालयाच्या समोर आहे त्याच परिसरात शिंदे गटाच विधीमंडळ कार्यालय असणार

मंत्रालयात लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाची जागा वाढवली

मंत्रालयात लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाची जागा वाढवली


मुख्य इमारतीच्या सातव्या मजल्यावर 2000 चौरस फुटांच्या अतिरीक्त जागेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी काम करणार


सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरेशी जागा नसल्याने सातव्या मजल्यावर अतिरीक्त कार्यालय सुरु करण्यांत येणार

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 21 ऑक्टोंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 21 ऑक्टोंबर 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस

नांदेड   :- जिल्ह्यात शुक्रवार 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 1081.30 मिलीमीटर पाऊस झाला आहे.


जिल्ह्यात शुक्रवार 7 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 19 (1089.30), बिलोली-6.60 (1059.40), मुखेड- 25.40 (983.90), कंधार-9 (926.20), लोहा-9.90 (938.80), हदगाव-13.70 (970.30), भोकर-35 (1218.90), देगलूर-9.90 (881.80), किनवट-29.40 (1319.20), मुदखेड- 7.80 (1207.60), हिमायतनगर-12.60 (1331.90), माहूर- 32.20 (1166.40), धर्माबाद- 13.90 (1351.60), उमरी- 9.30(1242.50), अर्धापूर- 10.30 (999.70), नायगाव-8.40(953.20) मिलीमीटर आहे.

नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपी पोलीसांच्या ताब्यात

नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. नांदेड शहरातील शारदानगर स्थित त्यांच्या राहते घर राज निवास समोर भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील नागरिकांत व व्यावसायिकांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातील दोन प्रमुख आरोपीपैकी गोळीबार करणारा आणि मोटारसायकल चालवत येऊन अंधाधुंद गोळीबार करणारा आरोपी दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलाय. दरम्यान नांदेड पोलिसांनी SIT गठीत करून हे पथक देशाच्या सहा राज्यात व बाहेर देशवारीही करून आले. तर हे मुख्य आरोपी अटकेत आणण्यासाठी नांदेड पोलिसांनी जंगजंग पछाडले व आज गुजरातमधून सदर अल्पवयीन मुख्य आरोपीस ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.


 

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक -  3 नोव्हेंबरला मतदान

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या  एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.


            
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 7 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 14 ऑक्टोबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – 15 ऑक्टोबर 2022 (शनिवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2022 (सोमवार), मतदानाचा दिनांक – 3 नोव्हेंबर 2022 (गुरुवार), मतमोजणीचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक - 8 नोव्हेंबर 2022 (मंगळवार) आहे.


            
या पोटनिवडणुकीसाठी दि. 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असून ही सामग्री उपलब्ध आहे.


मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक / पोस्ट ऑफिसचे फोटोसहीत पासबुक, वाहन परवाना, पॅन कार्ड, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टार अंतर्गत रजिस्टर जनरल ऑफ इंडीया यांचे स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहीत निवृत्ती कागदपत्रे, केंद्र / राज्य / महामंडळ / मंडळ यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, विधानमंडळ सदस्य / लोकसभा सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमिकरण विभागाने दिलेले अंपगत्वाचे ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र मतदारांकडे असणे अनिवार्य आहे. 


या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी कळविले आहे.

 वांद्रे वरळी सी लिंक अपघातातील चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

वांद्रे वरळी सी लिंक अपघातातील चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  मुंबईतीळ वरळी पोलिसांनी इरफान बिलकिया नावाच्या आरोपीला अटक केली होते आणि तो एक दिवस पोलीस कोठडीत होता.  इरफानला आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  अतिवेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला होता. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले होते.  वरळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इरफान याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

 वांद्रे वरळी सी लिंक अपघातातील चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

वांद्रे वरळी सी लिंक अपघातातील चालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  मुंबईतीळ वरळी पोलिसांनी इरफान बिलकिया नावाच्या आरोपीला अटक केली होते आणि तो एक दिवस पोलीस कोठडीत होता.  इरफानला आज न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  अतिवेगाने आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे हा अपघात झाला होता. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले होते.  वरळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इरफान याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

पक्षाचे प्राथमिक सदस्यच उरले नाहीत तर मग निवडणूक चिन्हावर दावा कसा? ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला चिन्हाच्या लढाईत उत्तर

पक्षाचे प्राथमिक सदस्यच उरले नाहीत तर मग निवडणूक चिन्हावर दावा कसा


ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला चिन्हाच्या लढाईत उत्तर


एकनाथ शिंदे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा करू शकत नाहीत


त्यांचं बंड म्हणजे स्वेच्छेने पक्ष सोडल्याची कृती

उद्धव ठाकरे गटाला आता उद्यापर्यंतची मुदत, दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर सादर करावे लागणार 

उद्धव ठाकरे गटाला आता उद्यापर्यंतची मुदत, दुपारी दोन वाजेपर्यंत उत्तर सादर करावे लागणार 

निवडणूक आयोगात कागदपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे आतमध्ये नेले जात आहेत. शिंदे आणि ठाकरे गटात आकड्यांची लढाई कशी रंगणार याचा नमूना

निवडणूक आयोगात कागदपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे आत मध्ये नेले जात आहेत. शिंदे आणि ठाकरे गटात आकड्यांची लढाई कशी रंगणार याचा नमूना


ही काही शपथपत्रे आहेत शिंदे गटाकडून आज सादर झालेली..

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 


शिंदे गटानं ग्रामीण भागातून लोकांना मुंबईत आणण्याकरिता परिवहन महामंडळाच्या हजारो बसेस बुक केल्यानं ग्रामीण भागांतील लोकांना त्रास झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. 


तसेच 10 कोटी रुपये एसटी महामंडळाला कसे आणि कोणी दिले?, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.


याप्रकरणी आर्थिक गैरव्यवहार आणि आयकर कायदा कलम 68 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. 


दिपक जागदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

शिंदे गटाकडून तब्बल 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रं दाखल

शिंदे आणि ठाकरे गटाची आयोगात कागदपत्रांची लढाई आजपासून सुरु झाली आहे. आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्य प्रभारी आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाकडून आयोगात सादर करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तब्बल 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रं दाखल करण्यात आली आहेत. 

वाशिममधील 6 पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

Washim Panchayat Samiti Sabhapati : वाशिम जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीच्या सभापतीपदाचे मुदत संपली असून अडीच वर्षाचा काळ पूर्ण झाल्याने पुढील अडीच वर्षासाठी आज नव्याने आरक्षण जाहीर करण्यात आलं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन सभागृह येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोडत सभेत निश्चित करण्यात आले. जिल्ह्यातील 6 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये वाशिम पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मंगरुळपीर पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जातीसाठी, मानोरा व मालेगाव पंचायत समितीपदाचे आरक्षण सर्वसाधारण (महिला) आणि रिसोड व कारंजा पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.

मतभेद असले तरी घटना बदलावी असे शिवसेना म्हणत नाही, त्यामुळे युतीसाठी आम्ही त्यांना हाक दिलीय : प्रकाश आंबेडकर

Maharashtra News : "वंचित बहुजन आघाडीचा युतीसाठी केवळ शिवसेना आणि काँग्रेसला प्रस्ताव. आम्ही युती केवळ शिवसेना आणि काँग्रेस बरोबरच करणार. मात्र आमच्या निरोपाला प्रतिसाद नाही. त्यामुळे आम्ही आमची तयारी केली.", असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 


राष्ट्रवादी बरोबर युती का नको याचं कारण योग्य वेळी सांगू, असंही यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

धनुष्यबाण कोणाला मिळेल? प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

 

जो कोण निर्णय घेणार आहे, त्याच्या समोर सर्व तथ्य आली पाहिजेत, ते आल्याशिवाय ते देऊ शकणार नाही. त्यामुळे इन्स्टट निर्णय होईल असं वाटत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

 

बीजेपी आणि आरएसएसचा एकमेव अजेंडा घटना बदलण्याचा आहे. शिवसेनेबरोबर मतभेद असले तरी घटना बदलावी, असं ते म्हणत नाहीत तर काँग्रेस या घटनेचा एक भाग म्हणून आम्ही एकत्र येण्यासाठी त्यांना हाक दिली. आमचे कार्ड ओपन आता उत्तर देण्याची त्यांची जबाबदारी. मात्र एवढा वेळ लागतोय याचा अर्थ ते इच्छुक नाहीत. 

 
40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्य प्रभारी आपल्या बाजूने; शिंदे गटाचा आयोगात दावा

शिंदे  गटाकडून निवडणूक आयोगाकडे 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्य प्रभारी आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाकडून आयोगात सादर करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तब्बल 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रं दाखल करण्यात आली आहे

Kokan Railway : रत्नागिरी-लांजाजवळ कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

Kokan Railway : रत्नागिरी-लांजाजवळ कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. आडवली रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर दगड आल्याने कोकण रेल्वेची वहतूक ठप्प झाली आहे. 

Beed Rain Updates : बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक पाण्यात तर सात महसूल मंडळात अतिवृष्टी

Beed Rain Updates : बीड जिल्ह्यात रात्री 35 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले तर कापसावरही या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे..


सध्या सोयाबीनचे पीक हे काढणीला आला असून रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि यामध्ये सोयाबीनचे पीक पूर्णपणे पाण्यात गेला आहे तर सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने काढणीला आलेला कापूस आणि सोयाबीनचे मोठ नुकसान झाल आहे.
Rain Updates : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस माजलगावच धरण 100% भरलं एका दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू
Rain Updates : बीड जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे माजलगावच धरण 100 टक्के भरलं असून धरणाचा एक दरवाजा उघडून 406 क्युसेक्स पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आल आहे.

 

पावसाळ्यापूर्वी माजलगावच्या धरणामध्ये 27 टक्के एवढा पाणी साठा होता मात्र त्यानंतर जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे धरणातला पाणीसाठा हळूहळू वाढत होता तर रात्री बीड जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे माजलगावच्या धरणात शंभर टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.

 

धर्म क्षेत्रामध्ये आणखी पावसाचा अंदाज वर्तवल्याने धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून सिंदफणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
Thackeray vs Shinde : जयदेव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिलाय; ठाकरेंच्या बहिणीचा आरोप

Thackeray vs Shinde : बाळासाहेब ठाकरे हयात असताना स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या तर जयदेव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला असा आरोप उद्धव आणि जयदेव ठाकरेंच्या आतेबहीण असलेल्या किर्ती फाटक यांनी केलाय. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे मोठे बंधु जयदेव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे उपस्थित राहिल्यानं अनेक उलटसुलट चर्चा होतायत. उद्धव आणि जयदेव ठाकरेंच्या आतेबहीण असलेल्या किर्ती फाटक यांनी या वादात उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. कुटुंबातील कलहाचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर होणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

Thackeray vs Shinde : जयदेव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिलाय;

Thackeray vs Shinde : बाळासाहेब ठाकरे हयात असताना स्मिता ठाकरे काँग्रेसमध्ये जायला निघाल्या होत्या तर जयदेव ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना नेहमी मनस्तापच दिला असा आरोप उद्धव आणि जयदेव ठाकरेंच्या आतेबहीण असलेल्या किर्ती फाटक यांनी केलाय. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे मोठे बंधु जयदेव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे उपस्थित राहिल्यानं अनेक उलटसुलट चर्चा होतायत. उद्धव आणि जयदेव ठाकरेंच्या आतेबहीण असलेल्या किर्ती फाटक यांनी या वादात उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. कुटुंबातील कलहाचा अशाप्रकारे राजकारणासाठी वापर होणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

कोकण रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत, लवकरच वाहतूक सुरळीत होणार

विलवडे स्टेशन जवळ बोल्डर आणि माती ट्रॅक वर आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. 12 च्या दरम्यान ही घटना घडली त्यावेळी ट्रॅकवर कोणतीही ट्रेन नव्हती. या घटनेमुळे 10106 ही गाडी थांबवून ठेवण्यात आली होती. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आता बोल्डर बाजूला काढण्याचे काम पूर्ण झाले असून लवकरच वाहतूक सुरू करण्यात येईल. 

Thackeray vs Shinde : ठाण्यात पुन्हा ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने, कोपरी येथील कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यावरून दोन गट आमने सामने

परळीच्या श्रद्धा गायकवाडला 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक; ऑलम्पिक स्पर्धेसाठी ही निवड

अहमदाबाद येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या कुमारी श्रद्धा  गायकवाड हिने स्केट बोर्डिंग मध्ये सुवर्णपदक पटकावल आहे. श्रद्धाचे वडील हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीत तिने सराव करून हे यश संपादन केलं आहे.


तिने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी देखील तिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये निवड होणारी परिणीती पहिली खेळाडू ठरले असून सर्व स्तरातून तिच कौतुक केला जात आहे.

माढ्यासह करमाळा तालुक्यात तुफान पाऊस

Madha Rain News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील ढवळस (Dhavalas) परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणची वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपयांचा दिवाळी बोनस

उल्हासनगर पालिकेत सुमारे अडीच हजार कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी निमित्त बोनस म्हणजे सानुग्रह अनुदान दिले जाते. या वर्षी महापालिकेत कार्यरत असलेल्या विविध कामगार संघटनांनी बोनसची मागणी केली होती. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंह टाक, भारतीय कामगार कर्मचारी मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे, लेबर फ्रंटचे अध्यक्ष दिपक दाभाने, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी 22 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करुणा जुईकर, कामगार नेते चरणसिंग टाक, दिलीप थोरात, राधाकृष्ण साठे, दिपक दाभणे यांच्या उपस्थितीत पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण देत अखेर 15 हजार 500 रुपये दिवाळी बोनस देण्याबाबत निर्णय झाला. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर 3 कोटी 50 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे.

नंदुरबारमध्ये एक जखमी अवस्थेतील मादी हरिण आढळून आलं

नंदुरबार शहरालगत असणाऱ्या स्वामी समर्थ प्रकल्पाजवळ एक जखमी अवस्थेतील मादी हरिण आढळून आलं होतं. ग्रामस्थांनी याबाबत नंदुरबार वनक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना माहीती देत हे त्यांच्या ताब्यात दिले. सदरचे हरिण हे कुत्र्यांच्या हल्यात जखमी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणाच्या जखमेची गभिरता लक्षात घेत एका खाजगी पुश वैद्यकीय डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार करुन घेतला. व पुढील उपचारासाठी त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीने या हरणाला जीवनदान मिळाले आहे.  देशभरात 1 ते 07 ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताह साजरी केला जात असतांनाच योगायोगाने का होईना एका हरणाचा जीव वाचला आहे.

Maharashtra Rain Updates : सततधार पावसामुळे पिकाचे नुकसान; वातावरणात गारवा वाढला

Maharashtra Rain Updates : काल रात्री पासून लातूर शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाउस पडत होता. सकाळी काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आहे. या सततच्या पावसामुळे सोयाबीन सारखी काढणीला आलेली पीक धोक्यात आली आहेत. वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे लातूर शहर, लातूर ग्रामीण, किल्लारी, औसा तसेच निलंगा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. 

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हळव्या भात पिकाचं नुकसान

Palghar Rain : पालघर जिल्ह्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हळव्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. पिकून आलेलं हळवे, भात पीक रात्री झालेल्या अचानक पावसामुळं पूर्णपणे आडवं झालं असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. डहाणू, वाडा, विक्रमगड, जव्हार भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Andheri East by-Poll : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद?

काँग्रेसनं अंधेरी पोटनिवडणूकीकरता शिवसेनेला पाठींबा जाहिर केसा असला तरी मुंबईतील काही काँग्रेस नेत्यांचा नाराजीचा सूर


अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस सेनेला मदत करणार असली तर आगामी बीएमसी निवडणूकीत सेना काँग्रेसला मदत करणार का असाही सवाल


अंधेरी पोटनिवडणूकीत काँग्रेसची वोटबॅक शिवसेनेकडे वळली तर आगामी बीएमसी निवडणूकीत फटका बसण्याची भीती


काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला असतांना बीएमसीआधी काँग्रेसला वोट बॅक मजबूत करण्याची संधी असतांना शिवसेनेला मदत का? असाही सवाल


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या  निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे. 


या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  


मात्र, स्थानिक काँग्रेसचे इच्छुक उमेदवार, मुंबईतील काही काॅग्रेस नेते हे वेगळ्या मतप्रवाहाचे आहेत.


गेल्या विधानसभा निवडणूकीत  काॅग्रेसच्या जगदिश आमिन कुट्टी या काॅग्रेस उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची 27 हजार मते मिळाली होती.

Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा 120 किमी राहणार; अधिसूचना जारी

Maharashtra Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा 120 किमी राहणार असून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महामार्गावरील कमाल वेगमर्यादेसंदर्भात वाहतूक विभाग अप्पर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी कोणत्याही वाहनांना संचार करण्याची परवानगी नसणार आहे. 

एसटी महामंडळाच्या अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली, दुपारी 1 वाजता मंत्रालयात बैठकीचं आयोजन

Mumbai News : एसटी महामंडळाच्या अडचणींबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक


दुपारी 1 वाजता बैठकीचं मंत्रालयात आयोजन


कर्मचाऱ्यांचे पगार, तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबात बैठकीत चर्चा होणार


एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार आज होणार का याकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष


मागील 3 महिन्यांपासुन सरकारकडून पगारासाठी केवळ 100 कोटी मिळतं असल्याने पीएफचा हफ्ता देखील रखडला. 


कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारासाठी महामंडळाला 250 कोटी रूपयांची गरज सध्या शासनाकडून केवळ 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

Maharashtra News : एसटी महामंडळाच्या अडचणींबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

Maharashtra News : एसटी महामंडळाच्या अडचणींबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक


दुपारी 1 वाजता बैठकीच मंत्रालयात आयोजन


कर्मचाऱ्यांचे पगार, तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबात बैठकीत चर्चा होणार


एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार आज होणार का याकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष


मागील 3 महिन्यांपासून सरकारकडून पगारासाठी केवळ 100 कोटी मिळतं असल्याने पीएफचा हफ्ता देखील रखडला. 


कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारासाठी महामंडळाला 250 कोटी रूपयांची गरज सध्या शासनाकडून केवळ 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध 

Thackeray vs Shinde : चिन्हाच्या कायदेशीर लढाईसाठी शिवसेना ठाकरे गट दुपारी एक वाजता निवडणूक आयोगात आपलं प्राथमिक उत्तर दाखल करणार

Thackeray vs Shinde : शिवसेना ठाकरे गट दुपारी एक वाजता निवडणूक आयोगात आपलं प्राथमिक उत्तर दाखल करणार


चिन्हाच्या कायदेशीर लढाईसाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल


पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑक्टोबर आहे, त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष

रायगडमध्ये सावरोली खारपाडा मार्ग विचित्र अपघात, ट्रेलरवरील लोखंडी कॉईल रस्त्यावर कोसळल्याने 12 दुचाकींचं मोठं नुकसान

Raigad News : रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळच्या सावरोली खारपाडा मार्ग विचित्र अपघात घडला. वनिवली गावनजीक ट्रेलरवरील लोखंडी कॉईल रस्त्यावर कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात कंपनीजवळील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या 12 मोटारसायकलचं नुकसान झालं. तर लोखंडी कॉईलमुळे आठ मोटारसायकलचा चक्काचूर झाला. गुरुवारी (6 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरुन पसार झाला.

रायगडमध्ये सावरोली खारपाडा मार्ग विचित्र अपघात, ट्रेलरवरील लोखंडी कॉईल रस्त्यावर कोसळल्याने 12 दुचाकींचं मोठं नुकसान

Raigad News : रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळच्या सावरोली खारपाडा मार्ग विचित्र अपघात घडला. वनिवली गावनजीक ट्रेलरवरील लोखंडी कॉईल रस्त्यावर कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात कंपनीजवळील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या 12 मोटारसायकलचं नुकसान झालं. तर लोखंडी कॉईलमुळे आठ मोटारसायकलचा चक्काचूर झाला. गुरुवारी (6 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रेलरचालक घटनास्थळावरुन पसार झाला.

Buldhana News : रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे खाजगी लग्झरी बसचा अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

Buldhana News : महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे खामगाव शेगाव दरम्यान लासुरा फाटा येथे एक खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. अपघात इतका भीषण होता की, खाजगी प्रवासी बसणे तीन पलट्या खाऊन ही बस बाजूच्या नाल्यात पडली आहे. ही खाजगी बस शेगावहून उज्जैन येथे जात होती. सकाळी सकाळी हा अपघात झाल्यानं या ठिकाणी मदतीसाठी कोणी धावून आलं नाही. रस्त्यानं जाणाऱ्या प्रवाशांनी वाहनं थांबून सदर बसमधील प्रवाशांना बाहेर काढले आणि खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. सकाळी अंधार असल्यानं आणि पाऊस सुरू असल्यानं महामार्गावरील अपूर्ण काम चालकाला दिसलं नाही आणि ही बस सरळ खड्डयात जाऊन पलटी झाली आणि बाजूच्या नाल्यात जाऊन कोसळली, याबस मध्ये एकूण 13 प्रवासी होते.

कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे पळालेला बिबट्या घरात घुसला, साताऱ्यातील कोयना हेळवाक इथली घटना

Satara News : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सातारा जिल्ह्यातील कोयनेचे जंगल हे महत्त्वाचे मानले जाते. अनेक हिंसक प्राणी या भागात आहेत. काल रात्री आठच्या दरम्यान याच कोयनेच्या जंगलातील बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात या भागातील हेळवाक गावात घुसला. शिकारीचा थरार ग्रामस्थांनी पाहिला. कुत्रा मात्र जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका घरात घुसला. तरीही बिबट्याने पाठलाग थांबवला नाही. घरमालक सुधीर कारंडे यांनी घराच्या दाराला बाहेरुन लगेचच कडी लावली आणि वन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. वन विभागाने पिंजरा लावून त्यात बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला पिंजर्‍यात कैद करण्यात यश आले. सर्व थराराच्या वेळी गाव मात्र भयभीत झाले होते. या बिबट्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : धनुष्यबाणासाठी राजकीय लढाईत आज महत्त्वाचा दिवस, शिवसेना, शिंदे गटाला कागदपत्रांसाठी आयोगाने दिलेली मुदत संपली

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेतल्या (Shiv Sena) ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) दसरा मेळाव्याची लढाई संपली असलीय. मात्र आता धनुष्यबाण या चिन्हासाठी दोन्ही गटातील राजकीय सामना केंद्रीय निवडणूक आयोगात रंगणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाला या संदर्भात कागदपत्रं सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपलीय. दोन्ही गटांना आज निवडणूक आयोगासमोर कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्रं सादर करावी लागणार आहेत. त्यातच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होतेय. त्यामुळे शिवसेनेतल्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचं काय होणार याची उत्सुकता वाढलीय. शिंदे गटाची कागदपत्रं आपल्याला आधी पाहायला मिळावीत हा मुद्दा ठाकरे गटानं आधी मांडला होता. त्यामुळं ठाकरे गटाकडून आपली कागदपत्रं आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून आणखी अवधी मागितला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय.. याबाबत शिंदे गटाने 4 ऑक्टोबरला आयोगाला पत्र लिहिलंय.

Maharashtra Politics : सत्तांतरानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या युतीतील सरकार येऊन आज 100 दिवस पूर्ण झालेत. 

बुलढाण्यात रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे खासगी बसचा अपघात, सहा प्रवासी गंभीर जखमी

Buldhana News : महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे खामगाव-शेगाव दरम्यान लासुरा फाटा येथे एक खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की तीन पलट्या खाऊन ही खाजगी प्रवासी बस बाजूच्या नाल्यात पडली. ही खाजगी बस शेगावहून उज्जैन इथे जात होती. सकाळी हा अपघात झाल्याने या ठिकाणी मदतीसाठी कोणी धावून आलं नाही. रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी वाहने थांबून या बसमधील प्रवाशांना बाहेर काढलं आणि खामगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. सकाळी अंधार असल्याने आणि पाऊस सुरु असल्याने महामार्गावरील अपूर्ण काम चालकाला दिसलं नाही. त्यामुळे ही बस सरळ खड्डयात जाऊन पलटी झाली आणि बाजूच्या नाल्यात जाऊन कोसळली. या बसमध्ये एकूण 13 प्रवासी होते.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


धनुष्यबाण चिन्हं कोणाचं, निवडणूक आयोग आज निर्णय देणार?


धनुष्यबाण चिन्हं कोणाचं यावर निवडणूक आयोगाची  अंतीम टप्प्यात सुनावणी आली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी  सात ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधीच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चिन्हासाठी आजचा दिवस महत्वाचा मानला जातोय. निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.


मानची मुलगी कॅनडाची कॉन्सुल जनरल म्हणून काम करणार 


15 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून साजरा केला जातो.  याप्रसंगी आज मान येथील एक मुलगी अॅथलीट मुंबईत कॅनडाची कॉन्सुल जनरल म्हणून एक दिवस काम करणार आहे. ज्याप्रमाणे एक दिवसाचा मुख्यमंत्री असतो.  एक दिवसाचे कॉन्सुल जनरल बनण्यासाठी काही प्रक्रिया असते.  


शीना बोरा हत्याकांड सुनावणी 


शीना बोरा हत्याकांड खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. इंद्राणीचा सावत्र मुलगा आणि शीनाचा प्रेमी राहुल मुखर्जीची साक्ष आजही सुरू राहणार. इंद्राणीचे वकील राहुलची उलटतपासणी आजही सुरूच ठेवणार आहेत. गेल्या दोन सुनावणीत राहुलने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 


नारायण राणेंची पत्रकार परिषद 


केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे शुक्रवार  दिनांक  सात ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता भाजप प्रदेश पक्ष कार्यालय,नरिमन पॉईंट, मुंबई येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. दसरा मेळ्यात झालेल्या टीकेला नारायण राणे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. 


भाजपकडून दीडशे पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण 


राज्यात भाजप सरकार आल्यानंतर भाजपकडून आता राज्यातील प्रमुख दीडशे पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आजपासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात भाजपचे कोर कमिटीचे सर्व सदस्य, प्रमुख मंत्री आमदार उपस्थित असतील येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने हे प्रशिक्षण आहे. 


उपमुख्यमंत्री फडणवीस अकोला दौऱ्यावर 


उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 


अमित शाह आज गंगटोकमध्ये एनसीडीएफआयच्या राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन करणार 


सहकार मंत्री अमित शाह आज सिक्किमची राजधानी गंगाटेकमध्ये भारतीय राष्ट्रीय सहकारी डेयरी महासंघाच्या (एनसीडीएफआय) राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्किम, बिहार, पश्चिम बंगाल, मिजोरम, नगालँड, मणिपुर, त्रिपुरा, ओडिशा आणि झारखंड येथील तब्बल 1200 प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. 


जेपी नड्डा आसाम दौऱ्यावर 


भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा असेल. या दौऱ्यामध्ये आसाम येथील भाजपच्या कार्यलायचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. 


भारतीय गुणवत्ता परिषद आपला रौप्य महोत्सव साजरा करणार;  या सोहळ्याला पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार


भारतीय गुणवत्ता परिषद आज नवी दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विशेष कार्यक्रमाद्वारे आपला रौप्य महोत्सव  साजरा करणार आहे.  गुणवत्ता उंचावत  भारताने साधलेली  प्रगती सामायिक करणे हा यामागचा उद्देश आहे. गुणवत्ता आणि सातत्यामध्ये मूळ असलेल्या भारताच्या उत्कृष्टतेची प्रशंसा करण्यासाठी  धोरणनिर्मिती,प्रशासन आणि गुणवत्तेतील दिग्गज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  सुरेश प्रभू, जी-20 मधील भारताचे प्रतिनिधी  अमिताभ कांत, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव  अनुराग जैन, आणि भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि माजी वाणिज्य सचिव  बी. व्ही. आर सुब्रह्मण्यम आणि इतर मान्यवर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.


वाराणसी आणि ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी 


ज्ञानवापी मशीद प्रकरणी आणि वाराणसी येथील प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.  या सुणावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.


महिला टी20 आशिया कप: भारताचा सामना पाकिस्तानसोबत


महिला टी20 आशिया कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आशिया चषकामध्ये सात संघाचा सहभाग आहे. 15 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना होणार आहे.  
 
प्रो कबड्डीच्या नव्या हंगामाचा शुभारंभ 


मुंबई प्रो कबड्डी लीग (पीकेएल) च्या नवव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोनानंतर दर्शकांना येण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.