Maharashtra News LIVE Updates : नागपुरातील संघ मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पोलिस कंट्रोल रूमला फोन
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नववर्षाची सुरुवात होत असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्ह्यात दोन विद्यार्थी डोहात बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली. मोहित घोरे (वय 18) परतवाडा आणि कृष्ण कोठेकर (वय 19) नागपूर असे मृतकाचे नाव आहे
Teachers Constituency Nagpur : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक नागपूर जिल्ह्यामध्ये घेण्याकरीता प्रस्तावित मतदान केंद्राची यादी आज 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगर पालिका कार्यालय, नागपूर जिल्हा परीषद कार्यालय तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालयामध्ये याठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या यादीवर ज्यांना दावे व हरकती सादर करावयाचे असतील त्यांनी आपले दावे व हरकती लेखी स्वरुपात मतदान केंद्राच्या यादी प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाचे आत म्हणजेच दिनांक 7 जानेवारी, 2023 च्यापूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षल्यांचा हैदोस सुरुच असून शुक्रवार रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा-गट्टागुडा मार्गावरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केली. यावेळी नक्षल्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. गुरुवारी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांनी गट्टा-गट्टागुडा मार्गावरील पुलाच्या बांधकामावरील मिक्सर मशीनची जाळपोळ केली. शिवाय जेसीबी व अन्य काही वाहनांची तोडफोडही केली. दरम्यान घटनास्थळापासून गट्टा पोलिस ठाणे जवळच असल्याने पोलिस सतर्क झाले. ते घटनास्थळाकडे कूच करु लागताच नक्षल्यांनी पळ काढला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील नवेझरी येथे शुक्रवारी सांयकाळी रानटी हत्तीचा कळपाने गावात शिरकाव करीत गावातील चार घराची तसेच घरातील अन्नधान्य व इतर वस्तूंची मोठी नासधूस केली. मागील काही दिवसापासून तालूक्यात मुक्कामाने असलेले हत्ती प्रचंड दहशत माजवत आहेत. नवेझरी येतील शंकर तोफा, बारीकराव कोडाप, मानिक तोफा,विजय तोफा यांच्या घरी हत्तीनी प्रवेश करुन राहत्या घरातील धान व वस्तूंचे प्रचंड नुकसान करीत घराचीही मोड तोड केल्याने शेतकरी व मजूरी करणाऱ्या व्यक्तीवर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती ओडावली आहे. नुकसान भरपाई वन विभागाने तात्काळ भरून द्यावी अशी मागणी होत आहे.
राज्यात आज 30 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज 38 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,88,082 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
ठाण्यातील गुन्हे शाखा घटक 5 ने गेल्या काही दिवसांपूर्वी 3 नायजेरीयन व्यक्तींसह 27 लाखांचा कोकिन आणि मोफेड्रीन ड्रग्ज हस्तगत केले होते. या प्रकरणी या 3 नायजेरीयन व्यक्तींचा एक साथीदार फरार होता. त्याला देखील अटक करण्यास युनिट 5 चा पोलीस अधिकाऱ्यांना यश आले आहे. या पडलेल्या चौथ्या आरोपींकडून पोलिसांनी 16 ग्राम वजनी 6 लाख 53 हजार रुपयांचे कोकिन, दोन फोन, आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिवंडी इथला एक नवरदेव नेरळला लग्नासाठी गेला होता. तिथे लग्न करून पत्नीला घेऊन तो भिवंडीकडे परतत असताना अंबरनाथच्या लादी नाका परिसरात या नवरदेवाच्या एर्टिगा गाडीला अपघात झाला. या भागात एका दुचाकीवरून तीन मद्यपी ट्रिपल सीट येत असताना त्यांना वाचवायच्या नादात नवरदेवाच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात नवरदेव जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर दुचाकीवरील तिघांनाही किरकोळ इजा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दीड वर्षांपासून मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चिन्मया परांजपे असे मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीचे नाव आहे. चिन्मयाची आई ठाण्यात क्राईम ब्रांचमध्ये पोलीस कर्मचारी आहे. मानसिक रुग्ण असल्यामुळे चिन्मयावर उपचार सुरू होते.
गावाला जोडणारा 3 किलोमीटरचा रस्ता पूर्णतः उखडलेला असून अनेकदा अपघात झालेले आहेत. त्यामुळे अगोदर रस्ता करा, नंतरचं ग्रामपंचायतचा पदभार स्वीकारू, असा निर्वाणीचा इशारा भंडारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे. हा इशारा दिला आहे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच आणि सात सदस्यांनी.
औरंगाबादमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. वृद्ध महिलेवर चोरांनी चाकू हल्ला केलाय. वाळूज भागातील येसगाव येथे ही घटना घडली आहे. घराची भिंत तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि वृद्ध महिलेवर हल्ला केला. गंभीर जखमी महिलेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात राहणारे प्रकाश कुमार त्यांच्या आई सोबत बँगलोरला गेले होते. 25 डिसेंबर रोजी ते पुन्हा डोंबिवलीत परतले. डोंबिवली पूर्व भागातील स्टेशनहून त्यांनी घरी जाण्याकरीता रिक्षा पकडली. त्यांच्याकडील बँगेत दागिने आणि रोकड होती. घरी गेल्यावर त्यांची दागिने व रोकड असलेली बँग रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले . प्रकाश कुमार हे रिक्षाच्या मागे पळाले. मात्र रिक्षा चालक निघून गेला. दागिने रिक्षात राहिल्याची तक्रार प्रकाश यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दिली. अखेर पाच दिवसानंतर रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचीन सांडभोर आणि पोलिस कर्मचारी शिवाजी राठोड आणि विशाल वाघ यांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने ती रिक्षा शोधून काढली. रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षा चालकाच्या घरी दागिन्याची बॅग सापडली. पोलिसांनी प्रकाश कुमार यांना पाच लाख 4 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड परत केली आहे. पोलिसांच्या या कामागिरीचे सर्वच थरातून कौतूक होत आहे.
परभणी शहरासह जिल्हाभरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती यावर पोलिसांनी आळा घालत तब्बल 341 मोबाईल जप्त केलेत. ज्यात परभणी सायबर सेलने महत्त्वाची भूमिका बजावली असून हे सर्व मोबाईल संबंधित मोबाईल मालकांना वितरित करण्यात आले आहेत.
नागपुरातील संघ मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी देण्यात आलीय. नागपूर पोलिस कंट्रोल रूमला निनावी फोन करून ही धमकी देण्यात आलीय. त्या पार्श्वभूमीवार संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली असून पोलिस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. नागपूर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
Mumbai Crime News : नवी मुंबईतील पामबिचवर एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनीच आयआयटीतील मुलीचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीने तक्रार देऊनही याबाबत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला नाही.
Raj Thackeray: केंद्रीय मंत्री नारायण राणे सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरे आणि नारायण राणेंचे मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नारायण राणे आणि राज ठाकरे भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येत आहे. याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी निवासस्थानी भेट घेतली होती
Thane News: ठाण्यात भाजप आणि शिंदे गटात वाद झाला आहे. भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केल्याचा शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर आरोप झाले आहेत. हल्ल्यात भाजप वागळे मंडळ सरचिटणीस प्रशांत जाधव जखमी झाले आहे. फलक लावण्यावरुन वाद झाल्याची माहिती समोर आले आहे.
Alandi Mask: देहू संस्थान पाठोपाठ आळंदी देवस्थानकडूनही मंदिरात मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. परदेशात सुरू असलेल्या कोरोना लाटेमुळं खबरदारीचे उपाय आहे. सक्ती नाही मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं पत्रकात आवाहन करण्यात आले आहे.
Kokan News: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल होत आहेत.सकाळपासून रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.मुंबईमधून येणारे चाकरमानी कोकण रेल्वे कोकणामध्ये दाखल होत आहेत. रेल्वेमधून चाकरमानी आल्यानंतर आपापल्या गावाकडे जाण्याच्या प्रवासाला लागले आहेत.पारंपारिक सगळे सण आणि उत्सव साजरी करणारा कोकणी माणूस नववर्षाच्या स्वागतासाठी देखील गावी येत आहे.त्यामुळेच रेल्वे स्थानकात प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते आहे.त्या गर्दीचा आढावा घेतला आहे
Kokan News: नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची तळकोकणाला पसंती दिली आहे. समुद्र पर्यटनासोबत खाडीतील कांदळवन सफरीला पर्यटक पसंती देत आहेत. शास्वत पर्यटन हे निसर्गाच्या सान्निध्यात राहून पर्यटनाचा आनंद घेता येतो. यासाठी शांत आणि समृद्ध वातावरण असलेल्या तळकोकणाला पर्यटक पसंती देत आहेत. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले मांडवी खाडीत पर्यटक कांदळवन सफारी करत आहेत.
Pune Accidnt: पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. वारजे गावाजवळ ट्रकची आणि दुचाकीला धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी बुलढाण्यातील प्रसिद्ध अशा ज्ञानगंगा अभयारण्यातील निसर्गरम्य झाडी, दऱ्या, डोंगर,व धरणातील बोटिंग आणी वनभोजनाचा मनमुराद आनंद लुटत नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक आता गर्दी करत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्याचा जंगलातून फिरताना रस्त्याच्या कडेला गवतात नीलगाय, बिबट्या, रोहि, हरण,मोर,सिंकारा, सांभर,आस्वल, कोल्हा असे अनेक जंगली प्राणी सफारी दरम्यान पर्यटकांना दिसत असल्याने दिवसेंदिवस याठिकाणी गर्दी वाढत आहे. अभयारण्यातील पलढग तलावात दिवसभर बोटिंगचा आनंद पर्यटक घेत असून बोटिंग करताना अनेक जंगली प्राणी दिसत असल्याने पर्यटक आनंदी आहेत. शिवाय या वन विभागाच्या वन भोजनाचा देखील आनंद पर्यटकांना मिळत असल्याने आता नववर्षाच्या स्वागतासाठी अभयारण्यात पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
Doctor Strike: आपल्या विविध मागण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'ने सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय... १ हजार ४३२ पदांची भरती, महागाई भत्ता, प्राध्यापक भरती, वसतिगृहांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आलीये... मागण्या मान्य न केल्यास अतिदक्षता विभाग वगळता बाह्यरुग्ण विभाग आणि अन्य सर्व सेवा बंद करण्यात येतील, असं ‘मार्ड’कडून स्पष्ट करण्यात आलंय
Doctor Strike: आपल्या विविध मागण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'ने सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिलाय... १ हजार ४३२ पदांची भरती, महागाई भत्ता, प्राध्यापक भरती, वसतिगृहांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी संपाची हाक देण्यात आलीये... मागण्या मान्य न केल्यास अतिदक्षता विभाग वगळता बाह्यरुग्ण विभाग आणि अन्य सर्व सेवा बंद करण्यात येतील, असं ‘मार्ड’कडून स्पष्ट करण्यात आलंय
नववर्षाची सुरुवात होण्यास काही तास शिल्लक असतानाच केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना नववर्षाची भेट दिली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून काही योजनांच्या व्याजदरामध्ये वाढ करुन छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. पाच वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजना, राष्ट्रीय बचत खाते , मासिक परतावा ठेव या योजनांच्या व्याजदरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. टक्के ते 1.1 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
Maharashtra Police: नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झालेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.. पोलिसांकडून मद्यपींची ब्रेथ अॅनलायझरनं चाचणी करण्यात येणार आहे... नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय..
Beed News: माजलगाव नगर परिषदेने पाणी फिल्टरचे बिल थकवल्याने महावितरण कार्यालयाकडून पाणी फिल्टरचा वीज पुरवठा बंद करण्यात आला असून शहरातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. नगरपालिकेकडे महावितरणची पाच कोटी रुपयांची थकबाकी असून चालू महिन्यातील दहा लाख रुपयांची देयके महावितरणला न मिळाल्याने त्यांनी हा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.. माजलगाव नगर परिषदेचा कार्यकाळ संपला असून नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत त्यामुळे प्रशासकांनी तात्काळ बनवलेला पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करत आहेत..
Washim News: समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे. नागपूरवरून शिर्डीकडे जाणाऱ्या बलेनो कारचा कारंजाजवळ अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. मार्गात आलेल्या निल गायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर धडकल्याने हा अपघात झाला.
Washim News: समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाला आहे. नागपूरवरून शिर्डीकडे जाणाऱ्या बलेनो कारचा कारंजाजवळ अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. मार्गात आलेल्या निल गायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर धडकल्याने हा अपघात झाला.
Dhule News: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील उमरपाटा गावाला घराच्या बांधकामासाठी नंदुरबार तालुक्यातील खांदेपाडा आणि बिजादेवी गावातील मजूर पिकअप गाडीतून कामासाठी गेले होते रात्री परत येत असताना अकरा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील खोकसा घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात 30 ते 40 फूट खोल दरीत पलटी झाली. गाडी पलटी झाल्याने गाडीत बसलेले मजूर गाडीखाली दाबले गेलेत यात दोन महिला जागीच ठार झाले असून 11 जण गंभीर जखमी आहेत अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. पण अपघात इतका भीषण होता की मजूर गाडी खाली दाबले गेले होते शेवटी जेसीबीच्या साह्याने गाडी बाजूला करून मजुरांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले त्यातील अकरा गंभीर रुग्णांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
Accident News: सहलीसाठी औंरगाबाद आणि शिर्डीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. इचकरंजीतील सागर क्लासेसची आठ ते दहा मुलींची सहल औरंगाबाद अन शिर्डी अशी आयोजित केली होती. शिर्डी येथून परत इचलकरंजी येथे जाताना यशोदा ट्रॅव्हल्सची बस बारामती पुढे पाहुणेवाडी गावच्या हद्दीत बसला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियत्रन सुटल्याने अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी आहेत एकूण 48 मुली व 5 शिक्षक आहेत. जखमीवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये येणार आहेत. सकाळी व्यसनमुक्ती रॅलीचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल.
अकोल्यात 'महाबीज'ची वार्षिक आमसभा
आज 'महाबीज'ची वार्षिक आमसभा आहे. यात संचालक, लाभधारक शेतकरी उपस्थित राहतील. गेल्या वर्षभरात खरीपात महाबीज बियाण्यांचे वाढलेले भाव यावरून लाभधारक शेतकरी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. महाबीजचे अध्यक्ष आणि राज्याच्या कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले या आमसभेला उपस्थित असणार आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत
आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला असते. गोव्यात दरवर्षी थर्टीफर्स्टचा माहौल असतो. यंदा देखील पर्यट गोव्यात पोहोचले आहेत. याबरोबरच मुंबईत न्यू इअर सिलिब्रेशनसाठी सर्वच हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, नाइट क्लबमध्ये कुठलेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी अगदी पहाटे पर्यंत पाहायला मिळणार आहे. यासाठी हॉटेल मालकांनी सुद्धा विशेष तयारी केलीय.
मुंबईत स्थळी अतिरिक्त गाड्या
नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत.
पुण्यात पोलिसांकडून वाहनांची तपासणी
ड्रंक आणि ड्राईव्ह रोखण्यासाठी ब्रेथ अनालायझर द्वारा प्रत्येक वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी होणार आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता पुणे पोलिसांकडून युज अँड थ्रो पाईपचा होणार वापर. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबत वाहन जप्तीची येऊ शकते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -