Maharashtra News Updates 31 October 2022 : दिंडीतील वरकाऱ्यांवर काळाचा घाला, पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सात वारकऱ्यांचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दिंडीतील वरकाऱ्यांवर काळाचा घाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जुनोनीजवळ पायी दिंडीमध्ये कार घुसल्याने सा वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहेत. तर 8 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत.
Solapur News Update : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 25 हजार रुपयांची लाच घेताना किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजर रुपये देण्याचे ठरले होते. आज ही रक्कम घेताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतले.
आकड्यांचा खेळ करुन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा असल्याचंही ते म्हणाले. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा असून 2020 साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातून बाहेर जात असलेल्या प्रकल्पांवर मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होतं. परंतु, त्याचं उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेरच्या राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला फक्त मोठ्या प्रकल्पांचं गाजर दाखवलं जात आहे.
राज्यातून दोन महत्वपूर्ण प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातून प्रकल्प बाहेर का गेले, यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, असं ते म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते असं म्हणाले आहेत.
आमच्या सरकारविरोधात फेक नॅरेटिव्ह तयार केले जात आहे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
रिफायनरी प्रकल्प आम्ही करणाच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. हा प्रकल्प राज्यातच पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सॅफ्रॉन प्रकल्प 2021 मध्येच हैदराबादमध्ये गेला. सॅफ्रॉन कंपनीचे ट्वीटदेखील आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही प्रकल्प राज्याबाहेर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Dharavi Fire: धारावीत एका बसला अचानक आग लागली. बसमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीचा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बसला आग लागल्याने धारावीत वाहतूक कोंडी झाली.
CM in Satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी दाखल झाले आहेत. गावातील हेलिपॅडवर त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी, एसपी, आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा हा खाजगी दौरा आहे.
Pune : पुण्याजवळ रांजणगाव (Ranjangaon) येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची (Electronic Manufacturing Cluster) घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Rajiv Chandrashekhar) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या योजनेतंर्गत दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर पाच हजार रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येत आहे.
Sharad Pawar Admitted in Hospital : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुढील तीन दिवस मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
Mumbai News : बच्चू कडू 'सागर' बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार नाहीत - सूत्र
रवी राणा यांच्या पत्रकार परिषदेनंतर बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार
आज संध्याकाळी अमरावती येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन उद्या दुपारी अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार
रवी राणा माफी मागणार का याकडे बच्चू कडू यांचं लक्ष
Belgaon News : चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला बस चालकाने चांगला चोप देऊन अद्दल घडवली. बेळगावमध्ये ही घटना घडली. ट्रॅक्टर चालक ऊस कारखान्याला पोहोचवून निघाला होता. त्यावेळी त्याने एका बसला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसचा अपघात होणार होता पण बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे हा अपघात टळला. अपघात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. मिरज चिकोडी ही कर्नाटक डेपोची बस जात असताना कागवाड चिकोडी मार्गावर ही घटना घडली. यावेळी संतप्त झालेल्या बस चालकाने बस थांबवून ट्रॅक्टर चालकाला चांगला चोप दिला. ट्रॅक्टर चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो आरडाओरडा करत होता. प्रसंगावधान राखून अपघात टाळल्याबद्दल बसमधील प्रवाशांनी बस चालकाला धन्यवाद दिले. सध्या गळीत हंगाम सुरु झाला असून ऊसाची वाहतूक ट्रॅक्टरमधून करण्यात येत आहे. अनेक ट्रॅक्टर चालक बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवत असतात. नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे पोलीस आणि आरटीओ विभागाने ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Nanded : सध्या जिल्हाभरात सोयाबीन काढणीला वेग आला असून सोयाबीन काढणी,कापणी,ढीग लावण्याची कामे शेतकरी करत असल्याचे चित्र आहे.दरम्यान अतिवृष्टीने व परतीच्या पावसाने उरले सुरले सोयाबीन,उडीद,मूग,कापूस ही पिके शेता बाहेर काढून रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दरम्यान अतिवृष्टी,ओला दुष्काळ, परतीचा पाऊस या गरकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचा मागावर आहेत. ज्यात काही समाजकंटक शेतकऱ्यांचे सोयाबीनवर कटीपेटी टाकून पिके जाळत असल्याचे सर्रास प्रकार जिल्ह्यात पहावयास मिळत आहेत.
हदगाव तालुक्यातील वडगाव येथील गजानन ताटीकोंडलवार याच्या शेतातील 5 एक्कर वरील काढणी केलेले आणि ढीग मारलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलं आहे. यात शेतकऱ्यांचे मात्र मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीविरुद्ध तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिह्यातील देऊळगाव राजा जवळील जाम्भोरा पुलावरून कार नदीत कोसळली.
जालना - खामगाव महामार्गावरील जाम्भोरा पुलावर भीषण अपघात.
अपघातात पाच जण गंभीर जखमी तर तिघांची प्रकृती चिंताजनक.
सकाळी पाच वाजता झाला अपघात.
भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकून नदीत कोसळली
गेल्या चार महिन्यात याच पुलावर चार अपघात होऊन चौघांचा झाला आहे मृत्यू
Maharashtra Politics : माजी राज्यमंत्री आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईला आपल्या 'वर्षा' निवासस्थानी बोलावले होते. त्या संदर्भात आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या संदर्भात वर्षावर तब्बल अडीच तास बैठक झाली, मात्र काय निर्णय झाला? याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास सर्व नेत्यांनी नकार दिल्याचे समजते. आज दोन्ही नेते आपापली भूमिका मांडणार आहेत. या बैठकीमध्ये मंत्री गिरीश महाजन सुद्धा होते. तर आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या मधला वाद मिटला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. आज हा या दोन्ही नेत्यांकडून वाद मिटल्याचं जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे दोन्ही नेते आज सकाळी 9 वाजता 'सागर' बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून वाद मिटल्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
Chhath Puja 2022 : भिवंडीत छठचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर, निर्जला व्रत ठेवल्यानंतर गुरुवारी पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठ उत्सवाची मोठ्या थाटामाटात सांगता झाली. या उत्सवानिमित्त भिवंडी शहरातील प्रसिद्ध वरळा देवी तलावासह शहरातील इतर तलाव, कामावरी नदी आणि खाडीकिनारी हजारो छठ भक्त एकत्र येऊन हा उत्सव पूर्ण भक्तिभावाने साजरे केले आणि कोरोना सारख्या जीवघेण्या साथीचे संकट पूर्णपणे दूर करण्यासह कुटुंब, समाज, शहर आणि देशाच्या समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या नवसाच्या पूर्ततेसाठी छठी मातेकडे वरदान मागितले.
यावेळी छठ प्रतिष्ठानने उभारलेल्या व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करताना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी यांनी नगरसेवक मनोज काटेकर यांच्या सहकार्याने भिवंडी शहरातील छठ देवी माता मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
मुंबई- गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
PM Modi at Gujrat : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून सोमवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिन सोहळ्यात सहभागी होणार.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून सोमवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. ते केवडिया येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता दिन सोहळ्यात सहभागी होणार.
गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
मुंबई- गोदावरी सिनेमाच्या ट्रेलर लॉंचिंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
किशोरी पेडणेकर आज दादर पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार
एसआरएच्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलिस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेते गुजरातला जाणार
गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजप नेत्यांची मोठी फौज गुजरातला जाणार आहे. आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपा नेत्यांची टीम गुजरातला जाणार आहे , अशी माहिती मिळत आहे. या टीममध्ये 12 आमदार आणि पदाधिकारी अशा एकूण 50 जणांचा समावेश आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत चार कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सकाळी 7 वाजता पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. सकाळी 7.15 वाजता मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथून रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवतील. सकाळी 10.30 वाजता संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित करतील. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील कार्यक्रमात असतील. दुपारी 12 वाजता लोधी रोड येथील सरदार पटेल शाळेत सरदार पटेल जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत.
इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी, दिल्लीत आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाला खर्गे आणि सोनिया गांधी राहणार उपस्थित
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये प्रियांका गांधी यांची जाहीर सभा
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज हिमाचल प्रदेशातील मंडी येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. दुपारी 1.30 वाजता पॅडल ग्राउंड.
केजरीवाल यांचा हरियाणामध्ये रोड शो
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज दुपारी 3 वाजता हरियाणातील बालसमंद, आदमपूर येथे रोड शो करणार आहेत. आदमपूर पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे.
भारतीय नौदलाची चार दिवसीय नौदल कमांडर्स परिषद आजपासून
हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची चार दिवसीय नौदल कमांडर्स परिषद आजपासून सुरू होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -