एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 30 October 2022 : रवी राणांनी माफी मागितलीच पाहिजे, बच्चू कडू यांची मागणी कायम

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 30 October 2022 : रवी राणांनी माफी मागितलीच पाहिजे, बच्चू कडू यांची मागणी कायम

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 

किरीट सोमय्यांची पत्रकार परिषद
आज किरीट सोमय्या एसआरए घोटाळ्याची कागदपत्रे प्रसिद्ध करण्यासाठी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.  
 
रॉबर्ट वाड्रा शिर्डी आणि सिद्धिविनायक दर्शनाला

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज शिर्डीच्या दर्शनाला सकाळी 11 वाजता आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दुपारी दीड वाजता जाणार आहेत.    

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा
 राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात मेळावा होणार आहे.  खासदार सुप्रिया सुळे या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. 
 
 संभाजीराजे छत्रपती  नाशिक दौऱ्यावर
 संभाजीराजे छत्रपती नाशिक दौऱ्यावर आहेत. गाव तेथे शाखा व घर तेथे स्वराज्य अभियानांतर्गत छत्रपती संभाजीराजे सकाळपासून ईगतपुरी तालुक्यात 26 शाखांचे उदघाटन करणार आहेत.
 
नाशिकमध्ये छटपूजेचे आयोजन 
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर रामकुंड परिसरात छठपूजेचे आयोजन करण्यात आले असून संगीत कार्यक्रम देखील पार पडणार आहे. जवळपास ३० हजार भाविक हजेरी लावतील असा आयोजकांनी अंदाज व्यक्त केलाय, संध्याकाळी 5.30 वाजता. 
 
अंबादास दानवे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते कैलास पाटील यांचीही भेट घेणार आहेत. 
 
खासदार विनायक राऊत  रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरच्या दौऱ्यावर
 
खासदार विनायक राऊत आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. एक दिवसीय दौऱ्यात राऊत संगमेश्वर तालुक्यातील दोन ठिकाणी विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.  

मन की बात

पंतप्रधान मोदी आज मन की बात करणार आहेत. सकाळी 11 वाजता मन की बात का कार्यक्रम होईल.  

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या  प्रकल्पाची आज गुजरातमध्ये मोदींच्या हस्ते पायाभरणी 
 
आज दुपारी अडीच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची (manufacturing plant) पायाभरणी करतील. वडोदरा येथे सी २९५ मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना
 
टी- 20 विश्व चषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे. दोन सामने जिंकत भारतीय संघ आपल्या गटात पहिल्या स्थानावर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरू होणार आहे. 

23:34 PM (IST)  •  30 Oct 2022

Bachchu Kadu : रवी राणांनी माफी मागितलीच पाहिजे, बच्चू कडू यांची मागणी कायम

खोक्यांच्या आरोपावरुन आपली बदनामी होत असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे, त्यामुळे रवी राणा यांनी माफी मागितलीच पाहिजे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी कायम ठेवली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. 

22:17 PM (IST)  •  30 Oct 2022

Morbi Cable Bridge Collapses: मोरबी पूल दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू, बचाव कार्य अद्याप सुरुच

Gujarat Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबीत झुलता पूल कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. पूल नदीत कोसळला तेव्हा तिथे जवळपास पाचशे लोक उपस्थित होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

22:15 PM (IST)  •  30 Oct 2022

हे सरकार फक्त शेतकरीविरोधी नाही तर महाराष्ट्रद्रोहीही, राष्ट्रवादीच्या प्रतिक पाटील यांचा घणाघात 

एकामागून एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रतीक पाटील यांनी राज्य सरकारला महाराष्ट्रद्रोही म्हणत घेरलं आहे. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबसनंतर आता सॅफ्रॉन कंपनीचा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याने तरुण वर्गातून मोठा संताप व्यक्त होत आहे. यावरून प्रतीक पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. 

प्रतीक पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'राज्यातून पाच पाच प्रकल्प बाहेर जाणे ही मोठी दुर्देवी बाब आहे. सरकार ढिम्म असल्याने सरकारविरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. हे सरकार शेतकरी विरोधी तर होतेच मात्र आता महाराष्ट्रद्रोहीही आहे हे स्पष्ट होत आहे.'

22:01 PM (IST)  •  30 Oct 2022

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळेंवर टीका

राज्यातील प्रकल्प बाहेर जाण्यावरून राजकारण तापलं असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पक्षीय नेत्यांनी चर्चा करायला हवी असं मत मांडलंय...यावर बोलताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा करायला कुणाचाच नकार नाहीये...फक्त त्यामागे जे राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचं विखे पाटील म्हणाले...सोबतच माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही एकदा श्वेतपत्रिकाच काढा...मागील अडीच वर्षात तुम्ही उद्योगमंत्री असताना काय तुमचे कर्तृत्व या महाविकास आघाडीने करून दाखवलं...आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील कामं यात काय फरक वाटला हे त्यांनी सांगावं असं विखे पाटील म्हणाले.

21:54 PM (IST)  •  30 Oct 2022

राहुल गांधींची १८ नोव्हेंबरला शेगावात जंगी सभा ,सभेला सहा लाख लोक येण्याची अपेक्षा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे , यात्रेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी ही यात्रा येणार असून शेगावात याची दिवशी सायंकाळी राहुल गांधींनी जंगी सभा होणार आहे , सभेच्या व यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , चंद्रकांत हंडोरे , यशोमती ठाकूर अशा बड्या नेत्यांसह अनेक नेते शेगावात तळ ठोकून यात्रेच व सभेच नियोजन करताना दिसून येत आहेत.बुलढाणा जिल्ह्यात ही पदयात्रा तीन दिवस असणार आहे त्यामुळे सभेच्या नियोजनासाठी सभास्थळाची पाहणी करणे , आगमन व निर्गमन रस्त्यांची पाहणी करणे यासाठी राहुल गांधींच्या पदायात्रे आधीच या नेत्यांची पदयात्रा शेगाव परिसरात दिसत आहे. या यात्रेला जवळपास सहा लाख लोकं येणार असल्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget