Maharashtra News Updates 29 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Sep 2022 11:22 PM
सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांची पुन्हा आयुक्तपदी नियुक्ती

सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांची पुन्हा अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  कोविड काळात योग्य परिस्थिती हाताळली नाही म्हणून मंत्र्यांच्या तक्रारीनंतर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू काळे यांची  बदली केली होती. सत्तांतर  झाल्यानंतर पुन्हा काळे यांची त्याच विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

श्रीगोंदा येथे रस्त्यावर कांदा ओतून राष्ट्रवादीकडून रस्ता रोको

अहमदनगर : कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लिंपणगाव येथील शेतकरी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.  या उपोषणाला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुक्यातील ढोकराई येथे कांदा ओतून रास्ता रोको करण्यात आला आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधव पुरता अडचणीत आलाय. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी लिंपणगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली ढोकराई येथे नगर - दौंड रोड रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मोठी बातमी! औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील

Aurangabad News: केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडून सुद्धा या संघटनेवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद पोलिसांकडून पीएफआय कार्यालय सिल करण्यात आले आहे. सील केलेल्या नोटीसवर औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची सही आहे. कार्यालयाच्या तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे.

Beed Rain Update: बीडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे केज तालुक्यातील पापनाशी नदीला पूर, अठरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

बीडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे केज तालुक्यातल्या पापनाशी नदीला मोठा पूर आला होता यावर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच ही नदी दुधडी भरून वाहिल्याने अठरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे..या नदीवर वाघे बाभळगाव या ठिकाणी एक मध्यम प्रकल्पापासून तोदेखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी चा पाण्याचा प्रश्न सुटला आहे..

रश्मी ठाकरे या टेंभी नाका इथल्या देवीच्या दर्शनासाठी येतील तेव्हा कोणताही वाद होणार नाही, शिंदे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांची ग्वाही

Thane News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. यावेळी कोणत्याही प्रकारचे राजकारण आम्हाला करायचे नाही, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यापासून ही परंपरा ठाकरे घराण्याने सुरु ठेवली आहे, तीच परंपरा रश्मी ठाकरे देखील पुढे नेत आहेत, असे शिंदे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ज्यावेळी रश्मी ठाकरे येथील त्यावेळी कोणताही वाद होणार नाही, असेही केदार दिघे म्हणाले आहेत. 

Nashik Rain : नाशिकमध्ये चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार, भाविकांची तारांबळ 

Nashik Rain : नाशिकमध्ये ब्रेक घेतलेल्या पावसाने आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नवरात्रीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नाशिककरांची चागंलीच तारांबळ उडाली. शिवाय मुंबई नाका परिसरात कालिका मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पावसाने चांगलेच झोडपले. तर कालिका यात्रोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या दुकान दारांची, पाळणा मालकांची धावपळ झाली. 

राज्यमार्ग 6 वर धानोराजवळ पूल कोसळल्यानंतर गुजरातकडून येणारी वाहतूक निझर मार्गे वळवली

Nandurbar News : ग्रामीण भागातून गुजरातकडे जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून राज्यमार्ग क्रमांक 6 आहे. या महामार्गावरील धानोरा गावाजवळील रंका नदीवरील पूल कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने निझर मार्गे वळवण्यात आली आहे. तर नंदुरबारहून नवापूरमार्गे सुरतकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून घडलेल्या दुर्घटनेचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. एकूणच सरकारची वेळ असल्याने वाहतूक  कमी असल्याने मोठी जीवितहानी टाळली आहे. पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे

शिर्डीतील साई मंदिरावरील सुवर्ण कलशारोहणाला 70 वर्षे पूर्ण

Shirdi News : 29 सप्टेंबर 1952 रोजी डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते शिर्डीच्या साई मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात आले होते. आज या घटनेला 70 वर्षं पूर्ण झाली आहेत. साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या पुढाकारातून सुवर्ण कलश वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सुवर्णकलशाची प्रतिकृती बनवण्यात आली आणि साईबाबा कलशारोहणाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी साई संस्थानच्या सीईओ भागयश्री बानायत यांच्यासह शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त उपस्थित होते.

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा दणका

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना हायकोर्टाचा दणका


मेहता यांच्या मीरारोड येथील 7/11 क्लबमधील बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे निर्देश


क्लबला दिलेला वाढीव एफएसआय चुकीचा ठरवत ते 2 महिन्यात तोडण्याचे हायकोर्टाचे आदेश

उडाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर स्वच्छता मोहीम

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सिन्नरच्या उडाण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावरती पायथ्यापासून तर शिखरापर्यंत 25 कचरा बॅग लावून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच निसर्गाने नटलेल्या या ठिकाणाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी स्वच्छताविषयी फलक लावण्यात आले. नवरात्रीनिमित्ताने दरवर्षी लाखों भाविक कळसुबाईच्या दर्शनाला येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा होत असल्याने उडाण फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छतेचा उपक्रम राबवला जातो.

मेधा किरीट सोमय्या यांनी  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला

मेधा किरीट सोमय्या यांनी  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी 1 नोव्हेंबरला


याप्रकरणात 1 नोव्हेंबर पासून युक्तिवाद सुरू होणार 


संजय राऊत यांच्याविरोधाृ मेधा सोमय्या यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे

भाजपा नेते किरीट सोमय्या हे शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात पोहोचले 

भाजपा नेते किरीट सोमय्या हे शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात पोहोचले, संजय राऊत यांच्याविरोधात मेघा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात आज शिवडी कोर्टात सुनावणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांसोबत वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांसोबत दुपारी 2 वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक. बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार. बैठकीत आगामी काळातील महाविकास आघाडी बाबतच्या भूमिकेबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. आगामी निवडणुकांच्या तोंडावर लवकरच राष्ट्रवादी महाविकास आघाडीबाबतची आपली भूमिका जाहीर करणार. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यात दौरे करून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याबाबतचा अहवाल शरद पवार यांना सादर करणार

पुण्यातील लोहगाव भागात महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

Pune News: पुण्यातील लोहगाव भागात महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई, लोहगाव येथील सर्वे नंबर 66 जनार्दन नगर येथील अनाधिकृत बांधकामवर पुणे महापालिकेकडून हाथोडा, जनार्दन नगर लोहगाव येथे महापालिकेकडून  4 बांधकामांचे क्षेत्रफळ १३१०० चौरस फुट आर सी सी अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे  

Hingoli Rain Update: पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
काल हिंगोली जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणचे ओढे या पावसाने तुडूंब भरून वाहत होते. या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि झेंडू फुल शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर झेंडू फुलांची विक्री करता यावी अशा पध्द्तीने झेंडू फुल शेतीची लागवड करतो. परंतु कालच्या पावसाने झेंडू फुल शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सगळी झाडे मोडून पडली आहेत. ही झेंडूची फुले पुढील 2-3 दिवसात बाजारात विक्रीसाठी नेली जाणार होती. परंतु कालच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे
Satara Rain Updates: साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, एक तासभरापासून साताऱ्यात मुसळधार पाऊस

Satara Rain Updates: साताऱ्यात पावसाचा जोर वाढला,  एक तासभरापासून साताऱ्यात मुसळधार पाऊस

Navratri 2022 : आज नवरात्रीची चौथी माळ; देवीच्या चौथ्या रूपाची म्हणजेच, कुष्मांडा देवीच्या पूजेचा दिवस

Navratri 2022 : शारदीय नवरात्राच्या (Shardiya Navratri 2022) चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा (Kushmanda Devi Pooja) केली जाते, ब्रम्हांडाची जन्मदात्री म्हणून देवीची आख्यायिका सांगितली जाते. कसे आहे देवीचे रूप? आणि काय आहे तिची आख्यायिका? 


नवरात्रीतील आई भगवतीचे चौथे रूप कूष्माण्डा नावाने परिचित आहे. आपल्या स्मित हास्याद्वारे देवी कूष्माण्डा संपूर्ण जगताला मोहून घेते. तीच या ब्रह्मांडाची जन्मदात्री आहे, म्हणून तिला कूष्मांडा असे म्हटले जाते. कु म्हणजे छोटे, उष्म म्हणजे ऊबदार आणि अण्ड म्हणजे तिच्या दिव्य बीजातून ब्रह्माण्ड उत्पन्न झाले, म्हणून देवीला, कूष्मांडा हे नाव दिले गेले.


जेव्हा सृष्टीचे अस्तित्त्व नव्हते, चोहो बाजूंना अंध:कार होता, तेव्हा देवीने आपल्या `ईषत्' हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती.  म्हणून देवीला सृष्टीची आदि-स्वरूपा म्हटले जाते. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


टेंभी नाक्याच्या देवीची आजची आरती कोण करणार? 


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रश्मी उद्धव ठाकरे टेंभी नाक्यावरच्या देवीची आरती करायला जाणार आहेत.    यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी एकमेकांसमोर येऊ शकतात.  कारण मीनाक्षी शिंदे यांची आज आरतीची वेळ नियोजित आहे. अशात संध्याकाळी रश्मी ठाकरे पोहचल्यानंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या सूरत आणि भावनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध योजनांचा शुभारंभ करणार आहेत. सकाळी 8.30 वाजता दिल्लीहून रवाना होतील.   संध्याकाळी 7 वाजता 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे


तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार 


तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार आहे. मिलिंद नार्वेकर हे आज अंबाबाईला तिरुपतीचा शालू घेऊन येणार आहेत. या शालूला खूप महत्त्व असून नवरात्रीनंतर लिलावात लाखो रुपयांची बोली लागते.


केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर


केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात विविध कार्यक्रमात पदाधिकारी मेळाव्यासह व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता नेवासा येथे देवगड देवस्थान दर्शन करून श्रीरामपूर तालुक्यात दौरा करणार आहेत.


भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन


भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन आज नागपुरात होणार आहे. या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करणार असून समारोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत. देशातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचे हे संमेलन आहे. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 6 वाजता अमरावतीचे बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार हे बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. त्यानंतर नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातून जाणारी आगामी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या मार्गाची पाहणी आज करणार आहेत

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.