Maharashtra News Updates 28 September 2022 : लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 वितरण समारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Sep 2022 08:00 PM
लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 वितरण समारंभ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 वितरण समारंभ कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित आहेत.  

Vasai Fire : वसईत एका कंपनीला भीषण आग, तीन ते चार कामगार अडकल्याची भीती

वसईत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीच्या धुराचे कल्लोळ  आजूबाजूच्या 4 ते 5 किलोमीटर परिसरातून दिसत आहेत. कंपनीत स्फोट होऊन आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात असून यात 3 ते 4 कामगार अडकल्याची शक्यता आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग जवळ वसई जूचंद्र वाकीपाडा परिसरातील कंपनीत आज दुपारी अडीच वाजताची घटना आहे. वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे गाड्या घटनास्थळावर पोहचण्यासाठी निघाल्या असल्याची माहिती मुख्य अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी दिली आहे

Aurangabad: भगर विषबाधा प्रकरणी पोलिसांची कारवाई

Aurangabad: नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. तर आता याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबादच्या वैजापूर पोलिसांनी 8 किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई केली आहे.


 


 

यवतमाळमध्ये मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, 25 किरकोळ जखमी
Yavatmal News : यवतमाळच्या बाभूळगाव जवळील नायगाव येथील बोलेरो पिकप वाहनाला अपघात झाला असून एक ठार तर 25 किरकोळ जखमी झाले. यात यदु जाधव(रा. नायगाव) याचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला. चंद्रपूरवरुन बुलढाणा येथे बोलेरो मॅक्स पिकअप या वाहनातून मजूर घेऊन जात होते. सकाळी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दिली धडक दिली. यावेळी हे वाहन पुलाच्या खाली कोसळले. घटनेची माहिती पोलीस आणि ग्रामस्थांना मिळताच जखमींना वाहनातून काढून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करणं आले. सर्व मजुरांची प्रकृती ही धोक्याबाहेर आहे. 
PFI Ban : पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

PFI Ban : देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे.


पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. दहशतवादी कारवाया तसेच त्याला  अर्थ पुरवठा करणे, भीषण हत्या, देशाच्या घटनात्मक व्यवस्थेचा अवमान करणे, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, देशाची अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला बाधा आणण्यासाठी ही संघटना सक्रिय झाली होती. या संघटनेचा महाराष्ट्रातही घातपात घडविण्याच्या कट असल्याचे समोर आले आहे.


महाराष्ट्रातील पुण्यासारख्या महानगरात त्यांच्यावरील कारवाईविरोधात आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो वेळीच हाणून पाडला. देशविघातक कृत्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे राज्यात कधीच यशस्वी होणार नाही, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पीएफआय वरील बंदीचे पुन्हा एकदा स्वागत केले आहे.

Hingoli News : तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील दुधाळा गावाच्या शेत शिवारामध्ये शंकर जाधव या शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे  शाखेने काल या गांजाच्या शेतीवर कारवाई केली त्यात तीन लाख रुपये किमतीची 63 गांजाचे झाडे आढळून आले आहेत. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केले आहेत आणि आरोपी शंकर जाधव चे विरोधामध्ये औंढा नागनाथ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिंगोलीत गांजाच्या शेतीवर पोलिसांची कारवाई, तीन लाख रुपये किंमतीची 63 गांजाची झाडे जप्त

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील दुधाळा गावाच्या शेत शिवारामध्ये शंकर जाधव या शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने काल या गांजाच्या शेतीवर कारवाई केली. त्यात तीन लाख रुपये किमतीची 63 गांजाचे झाडे आढळून आली आहेत. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केली आहेत आणि आरोपी शंकर जाधव याच्याविरोधात औंढा नागनाथ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेन्सेक्स 542 अंकांनी कोसळला तर निफ्टी देखील 179 अंकांनी खाली 
सेन्सेक्स 542 अंकांनी आपटला तर निफ्टी देखील 179 अंकांनी खाली 

 

आशियाई बाजारातील पडझडीचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम, मागील 6 दिवसांपासून अमेरीकी बाजारात घसरण सुरुच 

 

रुपया आतापर्यंतच्या सर्वोच्च निच्चांकी पातळीवर, रुपयाची वाटचाल 82 प्रति डाॅलरकडे

 

निफ्टीच्या निर्देशांकावरील 50 पैकी 48 समभागात घसरण, हिंदाल्को, रिलायन्स, हिरो मोटोकॉर्प, टीसीएस, जेएसडब्लूसारख्या कंपन्यांच्या समभागात घसरगुंडी
संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अणि टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांचं प्रदीर्घ आजाराने निधन
Mumbai News : संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अणि टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांचं मंगळवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन

 

वयाच्या 55 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

 

मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात सुरु होते मागील ५ महिन्यांपासून उपचार 

 

कोरोना काळात खासगी रुग्णालयांसोबतच कस्तुरबा रुग्णालयात जात देखील बजावली होती रुग्णसेवा 

 

एप्रिल महिन्यात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुरु होते उपचार

 


रुपयाची 82 प्रति डॉलरकडे वाटचाल, डाॅलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी कमकुवत होत 81.90 वर उघडला 

आरबीआय पतधोरण समितीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच रुपयाची 82 प्रति डॉलरकडे वाटचाल 


डाॅलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी कमकुवत होत 81.90 वर उघडला 


काल रुपया डाॅलरच्या तुलनेत 81.58 वर बंद 


आरबीआयकडून कमकुवत होत असलेल्या रुपयावर काय भाष्य होतं याकडे अर्थविश्वाच्या नजरा

हायकोर्टापाठोपाठ आता मुंबई महापालिकेकडूनही शिवसेनेला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी

Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी 


शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीची लढाई न्यायालयात जिंकल्यानंतर शिवसेनेला अखेर मुंबई महापालिकेने परवानगी दिली. 


न्यायालयाच्या आदेशानुसार ही परवानगी देण्यात आली. 


2 ते 6 ऑक्टोबर अशा पाच दिवसांसाठी परवानगी देण्यात आली आहे. 


त्यामुळे शिवसैनिक आता दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.


शिवसेनेने 20 हजार रुपये अनामत रक्कम आणि 1475 रुपये भाडे भरुन दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित केले आहे

दसरा मेळाव्याच्या तयारीबाबत शिंदे गटाची आज दुपारी वर्षा बंगल्यावर बैठक

Shinde Group Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरु, 


आज चार वाजता शिंदे गटाची दसरा मेळावा तयारीबाबत बैठक 


वर्षा बंगल्यावर होणार बैठक


शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर होणार मेळावा

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेला सुरूवात

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून (28 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर

खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत.  लाखेवाडी येथे  भोंडल्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी निमगाव या ठिकाणी  शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हायकोर्टानं यावर तातडीनं सुनावणी सुरू केली आहे. मंगळवारच्या सुनावणीत देशमुखांच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. आज ईडीच्यावतीनं एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानं हायकोर्ट यावर लवकर निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी 6 वाजता पु.ल.देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

Bhiwandi : भिवंडीत धोकादायक इमारतीची भिंत कोसळली, तीन चिमुरड्यांसह 3 जण जखमी

Bhiwandi : भिवंडी (Bhiwandi) शहरातील चव्हाण कॉलनी परिसरात एका मंगल कार्यालयाची धोकादायक संरक्षक भिंत शेजाऱ्याच्या घरावर कोसळल्याने 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत रस्त्यावर खेळत असलेल्या तीन चिमुरड्या मुलांसह दोन वृद्ध, एक तरुणी असे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने पाडकाम सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Ban On PFI: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षांची बंदी

Ban On PFI: दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे (Ban On PFI) . केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), ईडी (ED) यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर 22 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Politics : आगामी निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीनं कंबर कसली

Maharashtra Jalgaon News : आगामी निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर राजकीय  वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra News) प्रबळ पक्ष म्हणून ओळख असलेली शिवसेना (Shiv Sena), शिंदे गट (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांमध्ये विभागली गेली आहे. तर एकीकडे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीही (Aam Aadmi Party) आता मैदानात उतरली आहे. काल (मंगळवारी) आम आदमी पार्टीचा उत्तर महाराष्ट्रातला पहिला मेळावा जळगावात पार पडला.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन


भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या सायंकाळी 6 वाजता पु.ल.देशपांडे कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज ईडी हायकोर्टात आपला युक्तिवाद करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हायकोर्टानं यावर तातडीनं सुनावणी सुरू केली आहे. मंगळवारच्या सुनावणीत देशमुखांच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. आज ईडीच्यावतीनं एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद करतील. सर्वोच्च न्यायालयानं या अर्जावर तातडीनं सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानं हायकोर्ट यावर लवकर निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.


खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर


खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती असणार आहेत.  लाखेवाडी येथे  भोंडल्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी निमगाव या ठिकाणी  शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 


भारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेला सुरूवात


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला आजपासून (28 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.