Maharashtra News LIVE Updates :  सोलापुरात एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 28 Jan 2023 11:45 PM
Mahim Fire: माहीम मधील मारीनगरमध्ये इमारतीला आग

माहीम मधील मारीनगरमध्ये नित्य सहाय इमारतीला रात्री आग लागली. या इमारती च्या दुसऱ्या मजल्यावर एका घराच्या एसीला ही आग लागली आणि आग संपूर्ण घरात पसरली. या घरात आग लागली तेव्हा विविध जातीचे महागडे कुत्रे होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या आगीतून कुत्र्यांची आणि या कुत्र्यांच्या मालकीनीची सुखरूप सुटका केली. तर या तीन मजली इमारतीच्या खाली एक छोटे रुग्णालय ही आहे. तिथल्या रुग्णाना ही सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र आगीने घरातील सर्व साहित्य खाक केले.

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अटकेपासून दिलासा 

मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा मिळालाय. अटक झाल्यास एक लाख रूपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाने निर्देश दिले आहेत. वरळी एसआरए कथिक घोटाळा प्रकरणात पेडणेकर यांना कोर्टाने दिलासा दिलाय. 

 सोलापुरात एकाचवेळी तब्बल 12 काळविटांचा मृत्यू

 सोलापुरात एकाचवेळी तब्बल 12  काळविटांचा मृत्यू झाला आहे. तर 3 काळवीट जखमी झाले आहेत. नव्याने झालेल्या सोलापूर विजापूर बायपास रोडवरील अंडरपासवर ही घटना घडली आहे. काळविटाच्या कळपाला अंडरपासचा अंदाज न आल्याने साधारणपणे पस्तीस फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडला. त्यामुळे ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस प्रशासन आणि वन विभागाचे अधिकारी दाखल झाले  आहेत. 

Mumbai News : मोदींवरील माहितीपट आम्ही दाखवू देणार नाही : भाजप कार्यकर्ते

Mumbai News : पंतप्रधान मोदींवरील माहितीपट मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये दाखवला जाऊ नये, याचं कोणतंही स्क्रिनिंग करू नये यावरून भाजपाच्या युवा नेत्यांनी आंदोसन केलं आहे. माहितीपट आम्ही दाखवू देणार नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

Nanded: नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृह बांधणीसाठी माजी विद्यार्थी सरसावले,माजी विद्यार्थी उभारणार सहा कोटींचा निधी

आपण ज्या होस्टेलमध्ये राहून शिकलो अन् घडलो, हा भाव मनात ठेवून अद्यावत सोयी सुविधा असणारे हॉस्टेल यशवंत महाविद्यालयात उभारण्याचा संकल्प यशवंतच्या माजी विद्यार्थ्यांनी केलाय. जवळपास सहा कोटी रुपये खर्चून वसतिगृह उभारले जाणार असून, त्यासाठी आजपर्यंत 52 लाख रुपयांचा भरगच्च निधी जमा झालाय.

एटीएम कार्ड सक्रिय करण्याच्या नावाखाली महिला शिक्षिकेला गंडा, मालाड पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

मुंबईतील मालाड पोलिसांनी नालासोपारा परिसरातील एका लॉजमधून दोन संशयितांना अटक केली आहे. एका ज्येष्ठ महिला शिक्षिकेचे एटीएम कार्ड सक्रिय करण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली तिच्या खात्यातून या दोघांनी लाखो रुपये काढून घेतले होते. दोन्ही आरोपींनी बँकेत ग्राहक असल्याचे भासवून संधी साधून ज्येष्ठ नागरिकांना मदतीच्या नावाखाली दुसऱ्या एटीएम केंद्रात घेऊन जात होते. मालाड व्यतिरिक्त इतर अनेक पोलिस ठाण्यांमध्ये आरोपींविरुद्ध असे 50 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक केलेल्या पैशातून दोघेही पब आणि लॉजमध्ये जाऊन आय्याशी करत असत.  मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना नालासोपाऱ्यातून अटक केली आहे.  

Crime News: गाडीची काच फोडून महागडा कॅमेरा चोरला, अंबरनाथच्या कृष्णा पॅलेस हॉटेलबाहेरची घटना

अभिषेक सोनावणे हा तरुण फोटोग्राफर नाशिक इथून अंबरनाथला एका लग्नाचे फोटो काढण्यासाठी त्याच्या टीमसह आला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो लग्नाच्या ठिकाणी अंबरनाथच्या कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये पोहोचला. त्यानंतर त्याच्या टाटा अल्ट्रोझ गाडीत असलेल्या कॅमेराच्या दोन सेटपैकी एक सेट घेऊन तो नवरी मुलीचे फोटो काढण्यासाठी गेला. मात्र एक दीड तासाने तो दुसरा कॅमेरा घेण्यासाठी गाडीजवळ आला असता गाडीची मागची काच फोडून कुणीतरी त्याच्या कॅमेराची अख्खी बॅगच चोरून नेल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. या बॅगमध्ये सोनी कंपनीचा कॅमेरा आणि लेन्स असं तब्बल दीड लाख रुपयांचं साहित्य होतं. याप्रकरणी अभिषेकने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या चोरट्यांचा शोध घेतायत.

...तर आशांना पायाखाली तुडवू, गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार बांगर यांची पहिली प्रतिक्रिया 
Santosh Bangar : आया बहिणीची इज्जत जर कोणी रस्त्यावर आणत असेल तर आशांना पायाखाली तुडवू असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बांगर यांनी  पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय ती काही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. परंतु मला त्यांना एवढाच जाब विचारायचा आहे की दहा दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. दहा दिवस तुम्ही झोपी गेले होते का? दहा दिवसानंतर एक छोटा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यानंतर बोंबाबोंब केली जात आहे असे बांगर म्हणाले. 

 

 

 

Raigad Fire : महाड येथील MIDC मधील कंपनीत आग, अग्नीशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल

Raigad Fire : रायगड जिल्ह्यातील महाड येथील एमआयडीसीमधील कंपनीत आग लागल्याची घटना घडली. एमआयडीसीतील प्रिव्ही स्पेशालीटी कंपनीमध्ये युनिट दोनमध्ये हीआग लागली आहे. कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकराची जीवीतहानी झाली नाही. अग्नीशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Yavatmal News : यवतमाळमध्ये दोन गटात हाणामारी, 12 जण गंभीर जखमी, चार जणांवर गुन्हा दाखल

Yavatmal News : गावातील दोन गटात झालेल्या हाणामारीत तब्बल 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुल्लक कारणावरुन झालेल्या वादात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देऊरवाडी बुटले इथं रात्री दोन गटात हाणामारी झाली. लाठ्याकाट्याने ही मारहाण करण्यात आली. यामध्ये सर्वचजण गंभीर जखमी झाले आहेत. यवतमाळसह काहींना उपचारासाठी नागपूर हलवले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जखमींणध्ये महिलांचाही समावेश आहे. 

Bhandara Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, भंडाऱ्यातल्या पिंपळगाव येथील घटना, ग्रांस्थानी केला रास्तारोको

Bhandara Accident : सासुरवाडीत शंकरपट बघण्यासाठी मुक्कामी आलेले जावई सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर फिरायला गेले होते. यावेळी महामार्ग ओलांडत असताना भरधाव आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र श्रावण रामटेके (50) रा. दिघोरी नान्होरी ता. लाखनी असे मृताचे नाव आहे. हा अपघात भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव येथे घडला. सासऱ्याच्या घरासमोरच जवयाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी डीव्हायडर ओपन करावा, या मागणीला घेवून संताप व्यक्त करताना सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला असून ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर आता महामार्ग सुरू झालेला आहे. मागील सहा महिन्यात झालेल्या अपघातात पिंपळगाव येथील दहा जणांना आपला जीव गमावावा लागला आहे.

PM Kisan : शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार? शेतकऱ्यांना किती होणार फायदा?  

PM Kisan Samman Nidhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) म्हणजे बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्प नेमकं काय असणार, नवीन काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक आनंदांची बातमी मिळण्याची शक्यता आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ही मदत आता आठ हजार रुपये होणार असल्याची माहिती मिळत आहे.  

Pandharpur Maghi Wari : पंढरपूरची माघी यात्रा चार दिवसांवर, पायी दिंड्यांनी दिवसा प्रवास करावा, पोलिस प्रशासनाचं आवाहन 

Pandharpur Maghi Wari : पंढरपूरची माघी यात्रा (Pandharpur Maghi Wari) चार दिवसांवर आली आहे. त्यामुळं विठुरायाच्या भेटीसाठी राज्याच्या विविध भागातून पायी दिंड्या (Payi Dindi)  सध्या पंढरीची वाट चालत आहेत. मात्र, या सर्व पायी येणाऱ्या दिंड्यांनी दिवसा प्रवास करावा असं आवाहन सोलापूर पोलिस प्रशासनाच्या (Solapur Police Administration) वतीनं करण्यात आलं आहे. अपघात (Accident) टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली. वाढतं अपघातांचं प्रमाण लक्षात घेता पोलिस प्रशासन सतर्क झालं आहे

Beed Accident : बीडमध्ये कार आणि दुचाकीच्या भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू
Beed Accident : बीडच्या गेवराई येथील गढीच्या उडान पुलाजवळ झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये एका महिलेच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर ही कार एका विद्युत रोहित्राला जाऊन धडकली आहे. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढला आहे. त्यामुळं वाहन चालकांनी अति वेगाने वाहन चालू नयेत अस आवाहन पोलिसांनी केल आहे.

 
Akola News : अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर, अकोला पुर्व शहरप्रमुखपदी आक्रमक शिवसैनिक राहुल कराळे यांची नियुक्ती

Akola News : आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटानं पक्षसंघटनेत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या संपुर्ण नियुक्त्यांवर आमदार नितीन देशमुख यांची छाप दिसत आहे. अकोला पुर्व शहरप्रमुखपदी आक्रमक शिवसैनिक असलेल्या राहुल कराळे या तरूणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवासी उपजिल्हाप्रमुखपदी सध्याचे पुर्वचे शहरप्रमुख अतुल पवनीकरांची नियुक्ती करण्यात आली. इतर उपजिल्हाप्रमुखांमध्ये अजय पागृत, मुकेश मुरुमकार, मंगेश काळे, गजानन बोराळे, संजय शेळके यांचा समावेश आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आक्रमक चेहरा देण्याचा प्रयत्न सेना नेतृत्वाने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नियुक्त्या रखडल्या होत्या.

Buldhana News: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा रात्री अकरानंतरही झिंगाट डान्स

 Buldhana News: बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा संकुलाच्या मैदानावर मागील दोन तीन दिवसांपासून सुरू आहेत. मात्र रात्री दहा नंतर लाऊडस्पिकर किंवा डी जे वाजविण्यास बंदी असतानाही या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी लाऊडस्पिकर लावून झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे.  जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी या गाण्यावर रात्री अकराच्या नंतर ही नाचताना पाहायला मिळाले. यामधे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते. आता यावर कोणती कारवाई होते, पहावे लागेल.

Amravati News:  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन

Amravati News:  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन झाले आहे. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या दुःखद निधनाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. कुलगुरू म्हणून रुजू झाल्यानंतर विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांनी जो पुढाकार घेतला आणि अमरावती विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याकरिता जी धोरणे आखलीत, ती सर्वांकरिता दिशादर्शक ठरली आहेत.

Mumbai Traffic: महालक्ष्मी रेसकोर्स येथील वाहतुकीत बदल, प्रवासासाठी या मार्गाचा करा वापर

Mumbai Traffic:  महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 28 ते 29 जानेवारी दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत वाहनांची गर्दी होणार आहे. जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.



  •  केशवराव खाडे दिशेच्या जाणारा रस्ता वाहतुकीस बंद

  • केशवराव खाडे मार्गावरील वेलिंग्डन क्लबचे गेट वाहतुकीकरता बंद

  • केशवराव खाडे मार्गावर, हाजीअली जंक्शन ते महालक्ष्मी स्टेशन दरम्यान यु टर्न घेण्यास प्रतिबंध

  • महलक्ष्मी रेसकोर्स परिसर, सेनापती बापट मार्ग, केशवराव खाडे मार्ग नो पार्किंग झोन





क्रेनच्या हुकचा फटका लोकल ट्रेनच्या काचेला बसून मोटरमन जखमी, नायगाव रेल्वेस्टेशनवरील घटना

नायगाव रेल्वेस्टेशनवर रेल्वेच्या  कामासाठी उभ्या असलेल्या एका क्रेनच्या हुकचा फटका लोकल ट्रेनच्या काचेला बसून यात मोटरमन जखमी झाला आहे. ही घटना रात्री 12.50 च्या दरम्यानची आहे.
नायगाव रेल्वे स्टेशन फ्लॅट फॉर्म क्रमांक 1 येथे चर्चगेट विरार ही गाडी  येताच रेल्वेच काम करण्यासाठी स्टेशन जवळील पटरी जवळ उभ्या असलेल्या क्रेनच्या हुकचा फटका  गाडीच्या समोरील काचेला लागला. त्यामुळे काचेचा तुकडा उडून मोटरमन एम.डी. आरिफ याच्या डोळ्याला आणि डोक्यावर लागला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून रक्तस्राव होवू लागल्याने. ती गाडी दुसरा मोटरमनने यार्डमध्ये घेऊन गेला.  या गाडी मधील सर्व प्रवाशांना फ्लॅट क्रमांक 3 वर येणाऱ्या लोकल ट्रेनने रवाना केले. त्यामुळे रात्री थोडा गोंधळ झाला होता. वास्तविक काल रात्री नायगाव रेल्वे स्टेशनवर ब्रीजच काम होणार होत.  त्यासाठी रात्री  एक नंतर फ्लॅट फॉर्म क्रमांक 1 जवळ ब्लॉक घेतला होता. मात्र क्रेन च्या ड्रायव्हरने आगोदरच क्रेन आणून ठेवली होती आणि तो ती क्रेन मागे पुढे करत होता. त्यामुळे क्रेनच्या हुकचा फटका लोकल ट्रेन च्या मोटारमनच्या काचेला बसला होता.

आमदार संतोष बांगर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

Santosh Bangar: प्राचार्याला मारहाण करणे आमदार बांगर यांना भोवले आहे.  प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी कळवणुचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


 

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांची रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात रवानगी

Pradeep Sharma : माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी रात्री रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलचा अहवाल न्यायालयात पाठवण्यात आला. ज्यामध्ये शर्मा आता तंदुरुस्त असून त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. एनईएने विशेष समिती स्थापन करून शर्मा यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याची मागणी केली होती. जी एनईए विशेष न्यायालयाने फेटाळली होती. न्यायालयाने ससून रुग्णालयाच्या डीन शर्मा यांना प्रकृतीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. डीनने हा अहवाल न्यायालयाला दिला, त्यानंतर न्यायालयाने शर्मा यांना पुन्हा तुरुंगात नेण्याचे आदेश दिले आहेत. एनआयएने मनसुख हिरेन आणि अँटिलिया प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक केली होती.

वरळी एसआरए घोटाळा प्रकरणी किशोर पेडणेकर आणि कुटुंबियांना अटकेपासून दिलासा

Worli SRA Scam : वरळी एसआरए घोटाळा प्रकरणी माजी महापौर किशोर पेडणेकर आणि कुटुंबियांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईप्रसाद यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे. अटक झाल्यास एक लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे मुंबई सत्र न्यायालयानं निर्देश दिले आहेत. याप्रकरणातील अन्य तीन आरोपींनाही कोर्टाकडून अंतरिम संरक्षण दिले आहे. सर्व आरोपींना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच कोर्टाच्या परवानगीनं परदेशात जाण्याची मुभा

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Headlines 28 January : विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना उघड पाठींबा दिलेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.  ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.  


विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस
 
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने अद्याप सत्यजित तांबे यांना उघड पाठींबा दिलेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.  


बीबीसीची डॉक्युमेंट्री इंडिया-द मोदी क्वेश्चनचे आज मुंबईतील टाटा इन्स्ट्ट्यूटमध्ये सक्रीनिंग


बीबीसीची डॉक्युमेंट्री इंडिया-द मोदी क्वेश्चनचे आज मुंबईतील टाटा इन्स्ट्ट्यूटमध्ये सक्रीनिंग आहे. टाटा इन्स्टिट्यूट मधील काही विद्यार्थ्यांच्या गटाकडून संध्याकाळी सात वाजता डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलंय. 
 
 शरद पवार  कोल्हापूर दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.


 नितीन गडकरी  कोल्हापूर दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी ते अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते करवीर पिठाच्या शंकराचार्य मठाला भेट देणार आहेत.  
 
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या द इंडिया वे या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत भारत मार्ग या पुस्तकाचे प्रकाशन


परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या द इंडिया वे या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत भारत मार्ग या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात प्रकाशन होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांची या वेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरियम येथे हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 


सोलापुरात काँग्रेसची निदर्शने


काँग्रेसच्या 'हात से हात जोडो' या अभियानाच्या नियोजनासाठी सोलापुरात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, सोलापुरचे समन्वयक माजी मंत्री आमदार रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सोनालीत मारणे यांच्या उपस्थित बैठक पार पडणार आहे. याबरोबरच सुरक्षा काढल्याने राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दोन दिवस थांबविण्यात आली आहे. या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने सोलापुरात निदर्शने करण्यात येणार आहेत.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भीलवाडा येथील भगवान देवनारायणाच्या 1111 व्या अवतरण महोत्सवात सहभागी होणार 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या भीलवाडा येथील भगवान देवनारायणाच्या 1111 व्या अवतरण महोत्सवात सहभागी होणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजता हा महोत्सवर होणार आहे. 


पंतप्रधान मोदी करियप्पा ग्राउंडमधील एनसीसीच्या रैलीला संबोधित करणार 


पंतप्रधान मोदी आज करियप्पा ग्राउंडमधील एनसीसीच्या रैलीला संबोधित करतील.. यावर्षी एनसीसीच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.  


गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर 
 
गृहमंत्री अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. अमित शहा कर्नाटकातील हुबळी, धारवाड, बेळगावमधील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.