Tribute to Ratan Tata In Solapur MNS : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा याचं निधन झालं (Ratan Tata passed away) आहे. त्यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज थेअटरमध्ये एक नंबर (Ek Number) चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा देण्यात आल्या. 


मनसेकडून 'एक नंबर' चित्रपटाचा पहिला शो मोफत दाखवण्यात येतोय


एक नंबर चित्रपटाचा शो सुरु होण्यापूर्वी मनसेकडून रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज मनसेकडून 'एक नंबर' चित्रपटाचा पहिला शो मोफत दाखवण्यात येत आहे. यावेळी मनसेकडून चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मनसैनिकांनी रतन टाटा अमर रहेच्या घोषणा दिल्या. 


रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला


भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच, सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे. भारताचा कोहिनुर, एन्ड ऑफ इरा, प्राईड ऑफ इंडिया, वुई मिस, द ग्रेटेस्ट... या हॅशटॅगसह सोशल मीडिया भावुक झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून रतन टाटा यांचे फोटो आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत.


 रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र


रतन टाटा यांच्या निधनानंतर आता त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पुन्हा सुरू झाली आहे. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रतन टाटांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करणारा प्रस्ताव संमत केला आहे. आता, मनसे राज ठाकरे यांनी देखील  (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार  (Bharatratna) देण्याची मागणी केली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच; राज ठाकरेंचं मोदींना पत्र