Assembly Election: निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रकिया सुरू केली आहे. अशातच निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची रिघ लागली आहे. आज मुंबईमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यावेळी माजी आमदार पप्पू कलानी आणि सून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं दिसून आलं आहे.


माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ओमी कलानी आणि पंचम कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या भेटीसाठी दाखल. लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी महायुतीचे कल्याण आणि डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीवेळी ते तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत.


ओमी कलानी आणि पंचम कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात जयंत पाटील (Jayant Patil) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. लोकसभा निवडणुकीत ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी महायुतीचे कल्याण आणि डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी संधी मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेत ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी एक वेगळी भूमिका घेतली होती आणि विधानसभा निवडणुकीसाठी माविआ मधून इच्छूक आहेत. 


आधी घेतली शरद पवारांची भेट


माजी आमदार पप्पु कलानी, त्याचे पुत्र ओमी कलानी, आणि सून पंचम कलानी यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, विधानसभा उमेदवारांबाबत चर्चा केली होती. महाआघाडीकडून तुतारीवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यावेळी ओमी कलानी यांनी दिली होती, त्याच अनुषंगाने आज ते मुंबईत सुरू असलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीसाठी आले असल्याची चर्चा देखील रंगली. तरदुसरीकडे महाविकास आघाडीकडून उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासाठी एकमेव कलानी कुटुंबाचे नाव पुढे चर्चेत आले आहे. ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कलानी यांच्या नावाला मुकसंमती दिल्याच्या देखील चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत.