Maharashtra News Live Updates : अभिनेते शरद पोंक्षेंनी शरद पवार यांची भेट घेतली 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 26 Nov 2022 11:55 PM
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौंळकर यांच्यावर हल्लाप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक



उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वाशिम शहर महिला प्रमुख रंजना पौंळकर  यांच्यावर  झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक...




अभिनेते शरद पोंक्षेंनी शरद पवार यांची भेट घेतली 

अभिनेते शरद पोंक्षे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही भेट असून नाट्य परिषदेत सुरु असलेल्या वादाबाबत भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पोंक्षे यांच्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या प्रमूख कार्यवाह पदावरून हकालपट्टी प्रश्ननी वाद सुरु असताना पोंक्षे यांनी ही भेट घेतली आहे. यावेळी निर्माता प्रसाद कांबळी उपस्थित होते.  

सोलापूर विमानतळ संदर्भात सुरु असलेल्या आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची, काडादी यांनी चक्क खिशातून रिव्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवलं 


सोलापूर विमानतळ संदर्भात सुरु असलेल्या आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची


धक्कादायक बाब म्हणजे संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवलं 


उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी


धर्मराज काडादी आणि केतन शाह यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल 


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संध्याकाळी 6 च्या सुमारासची घटना


गुन्हा दाखल करायचा कि नाही या संदर्भात विचार सुरु - केतन शाह यांची माझाला माहिती


तर धर्मराज काडादी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही

जिंतुरच्या शेवडी येथे मधमाशांचा शेतकऱ्यांवर हल्ला, 10 जण जखमी

परभणीच्या जिंतुर तालुक्यातील शेवडी येथे शेतकरी व शेतमजूर सोयाबीन काढत असताना अचानक मधमाश्यानी हल्ला केल्याने 10 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पहिल्यांदा जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यातील दरम्यान तिघांची तब्यत गंभीर असल्याने त्यांना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
जिंतुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सुरक्षित ठेवलेलं सोयाबीन काढणी शेतकरी सध्या करतोय.शेवडी येथील शेतकरी सोयाबीन मळणी यंत्रातून काढत असताना शेवडी येथील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन मळणी यंत्रातून सोयाबीनचा भुस्सा उडून  बाजूला लिंबाच्या झाडांवर असलेल्या अग्या मोहळावर गेला आणि असंख्य मधमाश्यांनी काम करत असलेले शेतकरी, शेतमजूरांवर हल्ला केला या हल्ल्याने सर्वजण गोंधळून गेले होते शेवटी काही जणांनी जाळ लावून धुर निर्माण केला यामुळे मधमाश्यांनी पळ काढला मात्र या हल्ल्यात भानुदास सानप,गणेश मुंडे, उर्मिला सानप,बालाजी सानप,शोभा मुंडे, पंढरी घुगे,शंकर खाडे,रंजना नागरे, नारायण सानप,बाळू घुगे, यांना ग्रामस्थांनी तातडीने खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉ.अनिफ खान यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केले मात्र भानुदास सानप,गणेश मुंडे,उर्मिला सानप यांना उलट्या होत असल्याने त्यांना नातेवाईकांनी तात्काळ परभणीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे..

Uddhav Thackeray : गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : दसऱ्याला ठरवलेलं मुंबईबाहेर पहिली सभा बुलढाण्यात घेणार. गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊंचा आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : जुने चेहरे फसवे निघाले, गद्दार निघाले : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : बुलढाण्यात आल्यानंतर काही जुने चेहरे दिसत नाहीत. पण जुने चेहरे फसवे निघाले, गद्दार निघाले. त्यांना असं वाटलं की बुलढाणा त्यांची मालमत्ता आहे. पण तुम्हाला पाहिल्यानंतर धगधगत्या मशाली असल्यासारखं वाटतेय. आपलं सरकार व्यवस्थित चाललं होतं. पण यांनी सरकार पाडलं. पण यांची पाडायची पद्धत कशी आहे.

Uddhav Thackeray : ज्याला स्वत:चं भविष्य माहित नाही, तो आपलं भविष्य ठरवणार; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : आपल्याला हुकूमशाही हवी की लोकशाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. काही जण 40 रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. 40 रेडे मी नाही म्हटलं, त्यांच्याच मंत्र्याने म्हटले आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवतिर्थावरच शपथ घेतली. आमची कुलस्वामीनीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आयोध्येला गेलो होतो. हे आज तिकडे गेलेत नवस फेडायला. गेल्या आठवड्यात गेले होते, स्वत:चा हात दाखवायला. ज्याला स्वत:चं भविष्य माहित नाही, तो आपलं भविष्य ठरवणार. तुमचं भविष्य जे आहे ते कुरमुडे ज्योतिषाला विचारून जमत नाही. तुमचं भविष्य दिल्लीमध्ये बसणाऱ्यांना विचारा. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं बस म्हटलं की बसायचं. अन् हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघाले, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 

Uddhav Thackeray : दसऱ्यालाच ठरवलेलं मुंबईबाहेर पहिली सभा बुलढाण्यात घेईन : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : पुढची वाटचाल लोकशाही वाचविण्याच्या हिशोबाने करावी लागेल. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावात शिवसेनेचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. 

आमदार सुरेश धस यांची सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात देवस्थानची जमीन बळकावल्या चा आरोप करीत राम खाडे यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात सुरेश धस यांच्यासह इतर 13 जनावर गुन्हे दाखल करण्या चे आदेश हायकोर्टाने अँटी करप्शन ला दिले होते या विरोधात सुरेश धस यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेऊन गुन्हा दाखल होऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळी आहे.

 

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील कथित देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात अगोदर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यानंतर तपास करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत होते..

 

देवस्थान जमिनी प्रकरणी राम खाडे यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी जमिनी विकत घेतल्याचा आरोप केला होता..

 

आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात देवस्थानची जमीन हडप करण्यात आली असून या विरोधामध्ये सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने संबंधित लोकांवर राम खाडे यांची तक्रार फिर्याद म्हणून नोंदवून घ्या आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तपास करा असे आदेश दिले होते आता सुप्रीम कोर्टाने सुरेश धस यांची याचिका फेटाळल्याने लाचलुचपत विभागाला सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागणार आहे.
शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांची तळोजा जेल मधून सुटका

शहरी नक्षलवादाच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांची तळोजा जेल मधून सुटका करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला होता.
या पार्श्वभूमीवर मुंबईतील विशेष न्यायालयानेही तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश काढले होते. आज तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका झालेय. तेलतुंबडे हे एप्रिल २०२० पासून अटकेत होते.
बाहेर आल्यावर तेलतुंबडे यांनी आनंद व्यक्त केलाय. तेलतुंबडे यांचे तळोजा जेल बाहेर कुटुंबीयांतर्फे स्वागत करण्यात आले. आमदार कपिल पाटील देखील यावेळी उपस्थित होते.

कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगले दिवस यावेत यासाठी देवीचं दर्शन घेतलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगले दिवस यावेत यासाठी देवीचं दर्शन घेतलं. आसाम आणि महाराष्ट्राचं खास नातं आहे. येथील जनतेने आमचं स्वागत केलं, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

सीबीआय, ईडी आणि आरबीआय मधील सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाही साठी मारक - श्रीपाल सबनीस यांचे रोखठोक मत

लोकशाहीचे महत्व अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेबांनी घटना लिहिली मात्र आज लोकशाहीचे चारही स्तंभ पवित्र राहिलेले नसून यामुळे लोकशाहीची तिरडी निघण्याची भीती निर्माण झाली आहे. स्वायत्त संस्थेमधील सरकारचा  हस्तक्षेप वाढत आहे. स्वायत्त संस्था असलेल्या सीबीआय, इडी, आरबिआय या मधील सरकारचा वाढता हस्तक्षेप वाईट असून तो लोकशाही साठी मारक असल्याचे रोखठोक मत श्रीपाल सबनीस यांनी मांडले. ते संविधान दिनानिमित्त डोंबिवलीत  आयोजित करण्यात आलेल्या संविधान दीन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कोल्हापूर महानगरपालिकेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

कोल्हापूर : संविधान दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.  या कार्यक्रमास उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, वरिष्ठ लेखा परिक्षक मिलींद कुभार, उपशहर अभियंता नारायण भोसले, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशम अधिकारी तानाजी कवाळे, नगरसचिव सुनिल बिद्री, इस्टेट आफिसर सचिन जाधव, आस्थापना अधिक्षक राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राम्बरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंघ रजपुत, रवका अधिकारी प्रशांत पंडत, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी यांच्यासह महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kolhapur Crime : किटवाड धबधब्यात बुडून बेळगावमधील 3 महिलांचा दुर्दैवी अंत; एका महिलेची प्रकृती गंभीर

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या किटवाड धबधब्यात बेळगावमधील 3 महिलांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत एक महिला गंभीर आहे. मृत महिला मुस्लीम कुटुंबातील असल्याचे समजते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 30-35 महिला फिरण्यासाठी किटवाड धबधब्यावर आलेल्या होत्या. दरम्यान, पाण्यात खेळत असताना एकूण 5 महिला बुडाल्या. त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात यश आले. धबधब्याच्या ठिकाणी अंघोळीसाठी गेल्या असताना एकमेकींना ओढणी लागून चौघींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर तरुणींना बेळगाव येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. 

Ramdev Baba News: नागपूर: रामदेव बाबा यांच्याविरोधात युवक काँग्रेसचे सक्करदरा भागात आंदोलन, पोस्टरवर काळी शाई फेकली

Ramdev Baba: योग गुरु रामदेव बाबा यांच्या महिलांच्या पेहराव्या संदर्भातल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नागपूरातील सक्करदरा भागात युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पतंजली मेगा स्टोअर समोर आंदोलन केले. पतंजली मेगा स्टोअर वर लागलेल्या रामदेव बाबांच्या फोटोवर काळी शाई फेकून काळे फासण्याचा प्रयत्न केला. रामदेव बाबा यांनी ज्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य केले, त्या ठिकाणी इतर महिलांसह उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांचे ही रामदेव बाबा यांनी अपमान केले असा दावा युवक काँग्रेसने केला. 

Amravati Navneet Rana : नवनीत राणाच्या राजीनाम्यासाठी चर्मकार संघाचे आंदोल
मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच असलेलं अनुसूचित जातीच जात प्रमाणपत्र रद्द केलं त्यामुळे नवनीत राणा यांनी तातडीने आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने आज संविधान दिनानिमित्त अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन आंदोलन करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर असलेल्या नवनीत राणा यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
Latur News : वानराची गावात दशहत, 50 लोकावर हलला, गावात फिरणं मुश्किल

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सोनखेड गावात वानराची दहशत आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मागील चार ते पाच दिवसापासून एका वानराने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. 50 पेक्षा अधिक गावकऱ्यांना या वानराने चावा घेतला आहे. वन विभागाची टीम गावात दाखल झाली आहे. मात्र हे वानर काही केल्या कोणाच्याही हाती लागत नाहीय.

Sangali : सांगली येथे दगडफेक करून कर्नाटक बसची काच फोडली
कर्नाटकने महाराष्ट्रात बससेवा सुरू केल्या नंतर अथणी सांगली या कर्नाटकच्या बसवर सांगली येथे दगडफेक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसला दौंड येथे काळे फासल्यवर कर्नाटकने महाराष्ट्रातील बस सेवा शुक्रवारी दुपारनंतर स्थगित केली होती.पण शनिवारी सकाळी अकरा वाजता कर्नाटकने आपली महाराष्ट्रात बस सेवा सुरू केली. के ए 23 एफ 1004 क्रमांकाची अथणी डेपोची बस अथणी येथून पुण्याला निघाली होती त्यावेळी सांगली येथे काहींनी बसवर दगडफेक करून बसच्या समोरील भागाची काच फोडली.कर्नाटकच्या बसवर दगडफेक करून बसची काच फोडल्यामुळे  कर्नाटकची बस सेवा पुन्हा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे.
नांदेड : शिक्षकाने विद्यार्थ्याला मारलं, पालकाकडून शिक्षकाला बेदम बदडलं
शिक्षकाने शाळेत मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकाने चक्क शिक्षकाला बेदम मारहाण केलीय. दरम्यान ही घटना नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये घडलीय. ज्यात पालकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. किशोर शंकरराव विधाते असे शिक्षकाचे नाव असून माळाकोळी येथील जिल्हा परिषद हायस्कूलवर ते शिक्षक आहेत. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते वर्गात विद्यार्थ्यांना शिकवित असताना, शाळेत मधुकर सीताराम राठोड हे पालक वर्गात येऊन धडकले,ज्यांनी,माझ्या मुलाला मारहाण का केली, म्हणून जाब विचारत शिक्षक विधाते यांना मारहाण केलीय.
Constitution Day : संविधान दिनानिमित्त पाथर्डीत रॅली

संविधान दिनानिमित्त अहमदनगरच्या पाथर्डी शहरात संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील हिंद वसतीगृह, संत गाडगे महाराज कन्या छात्रालयसह सात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान उद्येशिका वाचन करण्यात आले. या संविधान रॅलीत 350 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्साहाने घोषणा देत सहभागी झाले होते. भारत माझी माऊली संविधान त्याची सावली, वंदे मातरमच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Bengal Fox : चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड () ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात मृत्यू
चंद्रपूर-मूल महामार्गावर खोकड ह्या प्राण्याचा रस्ते अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय. ही घटना मूल येथील सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना लक्षात आली. मराठीत खोकड आणि इंग्रजीत Bengal Fox असं नाव असलेला भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. दिवसेंदिवस अधिवास नष्ट होत चालल्याने खोकडच्या संख्येत घट होत असतांना दिसत आहे. हा महामार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून जातो. त्यामुळे मार्ग ओलांडताना अनेक वन्यजीवांचा नाहक बळी गेलेला आहे, तरीही या मार्गावर वन्यजीवांसाठी अंडरपास करण्याची योजना रखडली आहे.
नवी मुंबई : आफ्रिकेतील मलावी देशातील हापूस आंबा एपीएमसीत दाखल, किलोला हजार ते दीड हजार रूपयाचा दर

आंबे खवय्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. आफ्रिकन देश मलावी या ठिकाणावरून मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक सुरू झाली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी असून मागील पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होतेय. पंधरा वर्षांपूर्वी कोकणातील झाडांच्या काट्या आफ्रिकन देश मलावीमध्ये घेऊन जाऊन साडेचारशे एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्याने या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन हजार रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत असून आज 800 बॉक्सची आवक एपीएमसी बाजारात झाली आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा, सदावर्तेंच्या अंगावर शाईफेक..

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा...


सदावर्तेंच्या अंगावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याकडून शाईफेक...


 





ISRO Launch PSLV : इस्रोनं रचला इतिहास... 8 नॅनो सॅटेलाइट आणि ओशनसॅट-3 चं उड्डाण

ISRO Launch PSLV : इस्रोकडून आज Oceansat 3 आणि आठ नॅनो उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे.






 

उद्धव ठाकरे बुलढाण्याला रवाना, चिखलीमध्ये आज आज शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा

Uddhav Thackeray Rally : उद्धव ठाकरे बुलढाण्याला रवाना झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी मुंबईतील मातोश्री निवासस्थानाहून उद्धव ठाकरे निघाले. बुलढाण्यातील चिखलीमध्ये उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसंच त्यानंतर त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

Karnataka Border Dispute : कर्नाटकच्या बसला काळी शाई फासल्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

Basavaraj Bommai : कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्र लिहिल्याबद्दल आणि काळी शाई फासल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी कर्नाटक बस अडवून त्यावर घोषणा लिहून काळे फासण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे.

परभणीत संविधान दिनानिमित्त समता रॅली 
परभणी : नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने परभणीत संविधान दिनानिमित्त आज समता रॅलीचे आयोजन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. शहरातील राजगोपालाचारी उद्यानातून या रॅलीस सुरुवात झाली. यामध्ये पोलीस अधिक्षक आर रागसुधा, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अनेक अधिकारी, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. पहिल्यांदा संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं. त्यानंतर ही रॅली प्रमुख मार्गावरून जायकवाडी वसाहती पोहोचली येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.
Jalna Ram Murti : राम मूर्ती पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान
जालना जिल्ह्यातील समर्थ रामदासांच्या देवघरातील मूर्ती अखेर पुन्हा एकदा गाभाऱ्यात विराजमान झाल्या आहे. काल मोठ्या उत्साहात राम मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढत आज अखेर सकाळच्या मुहूर्तावर राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि मारुतीच्या मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान झाल्या आहेत.
Beed Crime : जमिनीच्या वादातून पुतण्याचा वृद्ध दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला

बीड तालुक्यातल्या मुळूकवाडी येथे पुतण्यानेच जमिनीच्या वादातून वयोवृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. रोहिदास निर्मळ याने वृद्ध बळीराम आणि केसरबाई निर्मळ यांच्यावर जमिनीच्या वादातून कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तुमच्यासाठी दाखल करण्यात आलं आहे. दोघांच्याही डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Nanded ATM Theft : चोरट्यांनी सहा मिनिटांत एटीएम मशीन लांबविली

नांदेड शहर आणि परिसरातील चोरट्यांनी गेल्या काही दिवसांत एटीएम फोडण्याचा सपाटाच लावला आहे. शुक्रवारी संध्याकाळी शहरातील भावसार चौक भागात चोरट्यांनी चक्क एसबीआय बँकेचे एटीएम मशीनच लंपास केलेय.नेहमी वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या भावसार चौकातील हे एटीएम मशीन  अवघ्या सहा मिनिटात  चोरट्यांनी कारच्या साहाय्याने लंपास केलेय,ज्यात 25 लाख 90 हजार रुपयांची रक्कम होती. या घटनेमुळे शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

Shraddha Murder Case : जंगलात सापडलेला मृतदेहाचा अवशेष श्रद्धाचाच असल्याच डीएनए चाचणीत स्पष्ट - सूत्र

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण... जंगलात सापडलेला मृतदेहाचा अवशेष श्रद्धाचाच असल्याच डीएनए चाचणीत स्पष्ट - सूत्र





भक्तीभावाने कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जात आहोत : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde : महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार आलं आहे, त्यासाठी कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळं कोणाला काही वाटण्याची गरज नाही. आमची श्रद्धा आहे. आमदार उत्साहात आहेत. त्यांची श्रद्धा आहे. भक्तीभावाने आम्ही तिथे जात आहोत असेही शिंदे म्हणाले. राज्यावर संकट येऊ नये, राज्यातील जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल घडावा हाच आमचा अजेंडा असल्याचे ते म्हणाले. जनता सुखी व्हावी हीच इच्छा आहे. कामाख्या देवीनं आमची इच्छा पूर्ण केली आहे. आणखी काही मागण्याची गरज नसल्याचे शिंदे म्हणाले. दलित पँथरने आम्हाला पाठिंबा दिला असल्याचेही शिंदे म्हणाले.  

राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी कामाख्या देवीचे सरकारला बळ मिळो : श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde : महाराष्ट्रात सरकार चांगलं काम करत आहे. लोकहिताची कामे होत आहेत. कामाख्या देवीचे बळ या सरकारला मिळो असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचे काम सरकार करत आहे. त्यासाठी कामाख्या देवीचे आशिर्वाद घेण्यासाठी जात असल्याचे शिंदे म्हणाले. 

संविधान दिनानिमित्त अजित पवार यांनी बारामतीमधील कृषी महाविद्यालयात संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली




Baramati News :विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळपासून बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी सुरु केली आहे. बारामतीतील कृषी महाविद्यालय अजित पवारांनी भेट दिली. त्यावेळी आज संविधान दिन असल्याने अजित पवारांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. यावेळी उपस्थितांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली. यावेळी विद्यार्थी, खेळाडू, शिक्षक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

 



 


26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्यांना मानवंदना

26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिपक केसरकर उपस्थित होते. 

हिंगोली : दोन गटामध्ये दगडफेक, वसमत मधील शहरपेठ भागातील घटना 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील शहरापेठ भागात किरकोळ कारणावरून दोन गटात भांडण झाले आहेत. यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली असून तलवारी सुध्धा फिरवण्यात आल्याची माहिती आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास हा राडा झाला असून यात दोघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. यातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.

Aurangabad : नऊ वर्षाच्या मुलीच्या हुशारीमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला

औरंगाबादेत एका नऊ वर्षाच्या मुलीने दाखवलेल्या हुशारी मुळे तिच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने नऊ वर्षांच्या मुलीला नावाने हाक मारीत 'तुला घेण्यासाठी पप्पांनी पाठवले आहे, तू माझ्यासोबत चलं'. त्यावर मुलीने तुम्हाला ओळखत नाही. मला घेण्यासाठी पप्पा नव्हे तर आई येते. तेव्हा त्या व्यक्तीने 'तुझ्या पप्पाला फोनवर बोलं' असे म्हणून फोन लावला. फोनवर बोलल्यानंतर मुलीने 'हा माझ्या पप्पांचा नंबर नाही अन् आवाजही त्यांचा नाही', असे म्हणून शाळेच्या गेटकडे धाव घेतली. मुलीच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला या प्रकरणी सिडको ठाण्यात अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि या आरोपीचा शोध सुरू आहे. अपहरणाच्या प्रयत्नाचा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Nashik Theft : नाशिक शहरात पुन्हा सशस्त्र दरोडा, 65 वर्षीय वृद्धाला संपवलं! 

नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरूच असून शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात 65 वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला येऊन दरोडेखोरांनी पोबारा केला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Kolhapur Breaking : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बस सेवा बंद

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बस सेवा बंद


कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी बस सेवाही बंद


तणावाचे वातावरण निवळेपर्यंत बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय


शुक्रवारी कोल्हापुरात शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर केलं होतं आंदोलन

Ambernath Murder : तुषार गुंजाळ हत्या प्रकरण, मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अंबरनाथमधील तुषार गुंजाळ हत्या प्रकरणात पोलिसांनी तब्बल चार महिन्यांनी मुख्य आरोपी संजय पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथ एमआयडीसीत पैसे घेण्यासाठी आलेला असताना संजय पाटील याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अंबरनाथमध्ये 29 जुलै 2022 रोजी तुषार गुंजाळ या तरुणाची दिवसाढवळ्या भरचौकात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. तुषार गुंजाळ याचे एका पुनर्विकास प्रकल्पातील इमारत निष्कासित करण्याचं काम घेण्यावरून स्थानिक गुंड संजय पाटील याच्यासोबत वाद सुरू होते. याच वादातून ही हत्या झाल्याचा गुंजाळ कुटुंबीयांचा आरोप होता.

Raigad Accident : उरण-पनवेल बायपास मार्गावर चिर्ले गावानजीक अपघात

रायगड : उरण- पनवेल बायपास मार्गावर चिर्ले गावानजीक अपघात...


उरणकडे येणाऱ्या मार्गावर केमिकल कंटेनर ट्रेलरचा अपघात... 


 कंटेनर ट्रेलरची दुसऱ्या कंटेनर ट्रेलरला धडक, सुमारे तीन किलोमीटर वाहनांची रांग..

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या दरात घसरण कायम, पेट्रोल डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today 26th Nov. 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहचले होते. मात्र, त्यानंतर आता, कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू असताना दुसरीकडे केंद्र सरकार आणि इंधन कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. इंधन कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले असून त्यात कोणताही बदल झाला नाही. तर, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करातही कपात केली नाही. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रायगडमधील उरण पनवेल बायपास मार्गावर चिर्ले गावानजीक कंटेनर आणि ट्रेलरचा अपघात, सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा

Raigad Accident : रायगडमधील उरण पनवेल बायपास मार्गावर चिर्ले गावानजीक अपघात झाला. उरणकडे येणाऱ्या मार्गावर केमिकल कंटेनर आणि ट्रेलरची धडक झाली. यानंतर कंटेनर ट्रेलरची दुसऱ्या कंटेनर ट्रेलरला धडक बसली. अपघातानंतर सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागली आहे.

जालन्यातील जांबसमर्थमधील राम मंदिरात आज मूर्तींची पुर्नप्रतिष्ठापना

Jalna News : जालन्यातील जांब समर्थ इथल्या राम मंदिरात राम मूर्तीची आज पुन्हा प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठीचे विधी पूर्ण होत असून सकाळच्या शुभ मुहूर्तावर मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व देवांची प्रतिष्ठापना होईल. मूर्ती चोरीच्या घटनेचा छडा लावल्यानंतर पोलिसांनी काल मंदिर विश्वस्त आणि ग्रामस्थांना मूर्ती सुपूर्द केल्या. त्यानंतर काल मोठ्या जल्लोषात वाजत गाजत समर्थांच्या या देवांची मिरवणूक काढण्यात आली. सध्या विधिवत पूजा आणि अनुष्ठान सुरु असून पुढच्या काही वेळात या मूर्ती गाभाऱ्यात आपल्या मूळ जागी विराजमान होतील.

26/11 Mumbai Attack : 26/11 दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण

Mumbai Terror Attacks : 26 नोव्हेंबरचा दिवस अनेकांसाठी इतर दिवसांप्रमाणे सामान्य होता. 2008 साली मात्र मुंबईकर आणि संपूर्ण देशासाठी हा काळा दिवस ठरला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. 14 वर्षांनंतरही आज 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उद्धव ठाकरे यांचा आज बुलढाण्यातील चिखलीमध्ये शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा

Uddhav Thackeray Rally : आज उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली इथे दुपारी तीन वाजता शेतकरी मेळावा आणि जाहीर सभा आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विदर्भात शिवसेनेचा सर्वात मोठा गड म्हणून बुलढाणा जिल्हा ओळखला जातो. मात्र याच जिल्ह्यातील दोन आमदार आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता याठिकाणी उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. सभेच्या पूर्वसंध्येला शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांनी या सभेवर टीका केली. राज्यात आणि बुलढण्यात सुद्धा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात अनेक ठिकाणी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या सभेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली येथे दुपारी शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सभा सुरु होईल. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत. याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.


बाळासाहेबांची शिवसेना गुवाहाटीत


आज सकाळी 26/11 च्या वीरांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीसाठी रवाना होतील. सकाळी 8 वाजता सगळे आमदार, खासदार विमानतळावर दाखल होतील. सकाळी 10.30 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानानं मुख्यमंत्री आमदार, खासदार, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी मुंबईहून उड्डाण करतील.  4 वाजता सगळे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाईल. संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे. 


सर्वोच्च न्यायालयात 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी




 



पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. संविधान सभेने 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानिमित्त हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचा प्रारंभ करतील. हा प्रकल्प न्यायालयांच्या आयसीटी अर्थात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान  सक्षमीकरणाद्वारे याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.


26/11 घटनेला 14 वर्षे पूर्ण, विविध कार्यक्रमांचं आयोजन


मुंबई- पोलीस आयुक्त कार्यालयात 26/11  रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी "अभिवादन संचलन कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थिती राहून आदरांजली वाहणार आहेत, सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.


इस्रो आज 8 नॅनो उपग्रह आणि ओशनसॅट-3 प्रक्षेपित करणार 


श्रीहरीकोटा- आज इस्रोचं थर्ड जनरेशन ओशनसॅट 3 सह 8 नॅनो सॅटलाईट लॉन्च होणार आहेत. हे सॅटेलाईट सकाळी 11.46 वाजता लॉन्च केले जातील.


शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन


मुंबईत शिवसेनेकडून आयोजित रोजगार मेळाव्याला आदित्य ठाकरे, सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत. बोरिवली येथे सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


संविधान दिवस निमित्त विविध कार्यक्रम 


मुंबई- काँग्रेसतर्फे संविधान दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.


पुणे- संविधान दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संविधान दौड आयोजित करण्यात आलीय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.