Maharashtra News Updates 21 November 2022 : कामाख्या देवीच्या दर्शनाचा मुहूर्त ठरला, येत्या 26-27 नोव्हेंबरला शिंदे गट गुवाहाटीच्या दौऱ्यावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Nov 2022 09:54 PM
मुंबईतील गोवर आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या 208 वर 

मुंबईतील गोवर आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २०८ वर, मुंबईतील एकूण गोवर आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या ३ हजार २०८ वर 


आज मुंबईतील रुग्णालयातून २२ जणांना डिस्चार्ज तर नव्याने २३ रुग्ण उपचारासाठी दाखल 


गोवर उपचाराकरीता सेव्हन हिल्स रुग्णालयातही पुढील दोन दिवसात ५० बेड्स उपलब्ध होणार 


संशयित रुग्णांपैकी २४ जणांना गोवरची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त


मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत एकूण ९ चिमुकल्यांचा मृत्यू 


९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण ताबडतोब करुन घेण्याचे महापालिकेचे आवाहन, पालिकेकडून सर्व वाॅर्डमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी अखेर बंद

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी अखेर बंद


एअर सुविधा फॉर्म भरण्याची आणि आरटीपीसीआर कोविड टेस्ट करण्याची अनिवार्यता केंद्र सरकारने बंद केली


कोरोना काळातून बाहेर येत असल्याचं आणखी एक निदर्शक, काही दिवसांपूर्वी फ्लाईट मधली मास सक्तीही सरकाने रद्द केली होती

महाजेनकोकडून सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या 590 पदाची रिक्त पदांच्या सरळ सेवा प्रवेशद्वारे जागा भरण्याकरिता जाहिरात

महाजेनको ने सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या 590 पदाची रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशद्वारे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती 


आता यामध्ये नमूद पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट बंधनकारक असणार आहे तशा प्रकारचे परिपत्रक विभागाकडून काढण्यात आला आहे 


महाराष्ट्रातील उमेदवारांना न्याय मिळावा व राज्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जावी यासाठी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व इतर उमेदवारांनी केली होती

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर १८.४९ कोटी रुपये जमा

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर १८.४९ कोटी रुपये जमा


सचिंद्र प्रताप सिंह


मुंबई, दि. २१ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १८.४९ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.


श्री सिंह म्हणाले,महाराष्ट्रातील लंपी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक आज  रोजी 3 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. राज्यामध्ये दि. 21.11.२०२२ अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3666 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 282595 बाधित पशुधनापैकी एकूण 205110 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 19077 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.


राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.97 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 98.61 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.


महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार विषयक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना  आवाहन करण्यात आले की त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.


नुकत्याच क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत  झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.सिंह यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, गेल्या तासभरापासून सुरु आहे चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या तासभरापासून या दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा सुरु आहे, इह अद्याप कळू शकलेलं नाही. 

कामाख्या देवीच्या दर्शनाचा मुहूर्त ठरला, येत्या 26-27 नोव्हेंबरला शिंदे गट गुवाहाटीच्या दौऱ्यावर

कामाख्या देवीच्या दर्शनाचा मुहूर्त ठरला, शिंदे गटातील सर्व आमदार-मंत्री, खासदार घेणार कामाख्या देवीचं दर्शन


येत्या 26-27 नोव्हेंबरला शिंदे गट गुवाहाटीच्या दौऱ्यावर

ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहेत अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहेत अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत, अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांचे विज जोडणी कापल्याच्या तक्रारी होत्या, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत

Buldhana: गुटखाबंदीसाठी बुलढाण्यात महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी व्हावी या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्या महिलांच्या जवळील पेट्रोलच्या बॉटल जप्त करत महिलांना ताब्यात घेतलं. बुलढाणा जिल्ह्यातील सुरू असलेली गुटखाबंदी बंद करण्याची या महिलांनी मागणी केली आहे.

सुषमा अंधारे यांच्या कणकवलीतील सभेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस

Sindhudurg News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा आज सिंधुदुर्गात होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस धाडल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कणकवलीतील सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटीस कणकवली पोलिसांनी बजावल्या आहेत.

राज्यपाल आणि शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात पुण्यात जोडे मारो आंदोलन


पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलनं राज्यपाल भगतसिंग कोशारींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन केलं.  राज्यपाल आणि शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात पुण्यात अलका टॉकीज चौकात शिवसेनेने आंदोलनं केलं. दोघांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याकडून राज्यपाल आणि सुधांशू यांच्या फोटोला जोडे मारले गेले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात पुण्यात हटके

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपालांच्या विरोधात पुण्यात हटके आंदोलन केले आहे.  प्रतीकात्मक धोतर नेसवून  डमी राज्यपाल तयार केले होते. सावरकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा राज्यपाल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच इतर राष्ट्रपुरुषांचा वारंवार अपमान करीत असतात, अशी टीका त्यांनी केली.

Wardha Crime : अत्याचार करून पेट्रोल टाकून जीवे मारण्याची धमकी

Wardha Crime : हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तीला पेट्रोल टाकून जीवे माराण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. आरोपीने अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्यासाठी तिचा पाठलाग करुन तिच्याशी मैत्री करुन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पिडीता ही आरोपीशी  बोलत नसल्याने पिडीतेला शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिली.  पुढील तपास अल्लिपूर पोलीस करीत आहेत.

पालघरमधील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा आज केंद्र आणि राज्य सरकारविरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा, आंदोलक रेल्वेने मुंबईकडे रवाना

Palghar News : पालघरमधील वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी डहाणू, पालघर भागातून शेकडो आंदोलक रेल्वेने मुंबईकडे रवाना होत आहेत. रायगड, वसई, डहाणूपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टी भागातून जवळपास पंचवीस हजार कार्यकर्ते मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.



Buldhana : 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस

Buldhana News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) नेते रविकांत तुपकर  (Ravikant Tupkar) यांना बुलढाणा पोलिसांच्या (Buldhana Police) वतीने नोटीस देण्यात आली आहे. अरबी समुद्रात होणारे जलसमाधी आंदोलन थांबवा, अन्यथा पोलीस कारवाई करू, असा इशारा या नोटीशीद्वारे तुपकर यांना दिला आहे. मध्यरात्री 12 वाजता बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस बजावली. तर कितीही नोटीस आल्या तरी मागे हटणार नाही, काहीही झाले तरी जलसमाधी आंदोलन होणारचं असं सांगत रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम असल्याचं दिसत आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी आज औरंगाबादमध्ये, असा असणार दौरा

Bharat Jodo Yatra : आज सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.


14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली यात्रा काल जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात पोहोचली. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. 


काल 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा जळगाव जामोद येथून निघून निमखेडी फाटा येथे ही पदयात्रा पोहोचली. निमखेडी फाटा येथे युनिटी ऑफ लाईट हा एक छोटेखानी कार्यक्रमपार पडला. त्यावेळी रंगीत विद्युत दिव्यांच्या सहाय्याने शानदार प्रदर्शन करण्यात आलं. त्यानंतर पदयात्रा मध्यप्रदेशात जाणार गेली. 

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचं मध्यप्रदेशात प्रस्थान

Rahul Gandhi In Maharashtra Aurangabad: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) राज्यातून मध्य प्रदेशात प्रस्थान केलं.  राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.  'राहुल गांधी आज औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव ते कोलाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे, रस्त्याची पुर्णतः चाळण..

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव ते कोलाड रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पुर्णतः चाळण झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करतांना प्रवाशांना रस्त्यावरील पडलेले खड्डे चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 

पार्श्वभूमी

Jitendra Awhad : सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी महाराजांची 'ती' पाच पत्रे दाखवावी, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल


छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) , यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी(Sudhanshu Trivedi)  यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. यावर माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे, 


सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?


एका खासगी वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय. ते म्हणाले, 'औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली', असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.


मोठे षडयंत्र, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न : जितेंद्र आव्हाड


जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, यामध्ये मोठे षडयंत्र आहे. याच बदलातून आणि वर्णभेदातून हर हर महादेव नवीन चित्रपट आणला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेले काही वर्षे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विशिष्ट पद्धतीने वेगळे दाखवले आहे. या घटनेला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही. इतिहासात अनेक माणसाने शूर कार्य केले आहे, त्यांना योग्य पद्धतीने दाखवा."


Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचं मध्यप्रदेशात प्रस्थान, तरीही राहुल गांधी महाराष्ट्रातच; आज औरंगाबादमध्ये


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) राज्यातून मध्य प्रदेशात प्रस्थान केलं.  राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.  'राहुल गांधी आज औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


असा असणार राहुल गांधींचा दौरा...


आज सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.


14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली यात्रा काल जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात पोहोचली. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.