Maharashtra News Updates 20 December 2022 : लक्झरी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार, सिन्नर - शिर्डी महामार्गावरील घटना; महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Dec 2022 06:43 PM
 लक्झरी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार, सिन्नर - शिर्डी महामार्गावरील घटना

भरधाव खासगी लक्झरी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार झाल्याची दुर्दैवी घटना सिन्नर - शिर्डी महामार्गावर आज सकाळच्या सुमारास घडलीय. संजय शंभू जाधव आणि महेश शंकर सिंग अशी मयत तरुणांची नावे आहेत. संजय आणि महेश हे मुंबईच्या साई संस्कृती फाऊंडेशन व राज प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डीसाठी काढण्यात आलेल्या पायी पालखी यात्रेत सहभागी झाले होते. पालखी मुसळगाव शिवारात आली असता पाठीमागून आलेल्या लक्झरी बसने धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. मित्रांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार बसचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

पुण्यात सिंहगड रस्त्यावर टेम्पोला आग

सिंहगड रस्त्यावर बिग बाजार समोर मालवाहतुक करणाऱ्या टेम्पोला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्याचं काम आहे.  आगीचे कारण समजले नसून जखमी कोणी नाही.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे स्वीय सचिव संजिव पलांडे यांना जामीन मंजूर

संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा,


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव, 


मनी लॉन्ड्रीग प्रकरणात मुंबई  उच्च न्यायालयातून जामीन मंजूर,


मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्याकडून जामीन मंजूर,


संजीव पालांडे यांना दोन लाखांच्या जातमुचलक्यावर  जामीन मंजूर.

Live Update : फेविक्विक प्रकरणामुळे लिंबागणेशची मतमोजणी लांबणीवर

Live Update : मतदान यंत्रात फेविक्वीक टाकण्याच्या प्रकारामुळे चर्चेत आलेल्या लिंबागणेश ग्रामपंचायतची मतमोजणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे आता या गावाची मतमोजणी शेवटच्या फेरीत होऊ शकते. नियोजित कार्यक्रमानुसार ही मतमोजणी 11 व्या फेरीत होणार होती. लिंबागणेशमधल्या मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. निवडणूक आयोगाचा निर्देश आल्यानंतरच या संदर्भात फेर मतदान घ्यायचं किंवा नाही याच्यावर निर्णय होऊ शकतो

Anil Deshmukh Bail Update : अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी

Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी


22 डिसेंबरपर्यंत दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआय हायकोर्टात


सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यानं 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती

Solapur News : सोलापुरात सिद्धेश्वर कारखान्याचे प्रमुख धर्मराज आमदार विजयकुमार देशमुखांविरोधात रणशिंग फुंकण्याचे संकेत

सोलापुरात सिद्धेश्वर कारखान्याचे प्रमुख धर्मराज कडादी शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी कारखाना बचाव आणि विमानसेवेसाठी झालेल्या सभेत काडादी यांनी माजी पालकमंत्री तथा उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता सडकून टीका केली. समाजाने ज्यांना चार वेळा नेतृत्व दिले त्यांनी विकासाचे काय काम केले हे सांगावे. समाजासाठी काम करणाऱ्या संस्था अडचणीत आणून त्या बंद पाडण्याचे काम लोकप्रतिनिधी करतायेत. त्यांचा व्यक्ती द्वेष मी समजू शकतो, असं वक्तव्य धर्मराज यांनी केलं आहे.

Kalyan : श्री स्वामी समर्थ मठाच्या मोडक महाराजांच्या अपघाती निधनाने हजारो भक्तांवर शोककळा

Kalyan : कल्याणसह मुंबई आणि कोकण परिसरात श्री स्वामी समर्थांच्या 17 मठांची स्थापना करत अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या नवनित्यानंद मोडक महाराज यांच्या अपघाती निधनाने हजारो भक्तांवर शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी कोल्हापूर महामार्गावर हा भीषण कार अपघात झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हजारो भक्तगण काल रात्रीपासूनच कल्याण पश्चिमेतील श्री स्वामी समर्थ मठामध्ये दाखल झाले आहेत. 

Palghar Dhamni Dam Leakages : सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाला गळती

पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाला सध्या पाणी गळती लागली आहे . धरणाच्या काही भागातून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू असून यामुळे दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विक्रमगड मध्ये धामणी येथे असलेल्या या धरणाच्या पाण्यावर पालघर मधील 14 हजार हेक्टर वरील रब्बी हंगामातील शेती, जिल्ह्यातील नगर परिषदा, बोईसर - तारापूर सारखी मोठी औद्योगिक वसाहत आणि वसई विरार - मीरा भाईंदर सारख्या मोठ्या महानगरपालिका अवलंबून आहेत . या धरणाची पाणी क्षमता 299 दशलक्ष घन मीटर इतकी आहे . मागील दोन वर्षांपूर्वी याच धरणातील पाणी गळती रोळण्यासाठी 40 कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला मात्र अजूनही पाणी गळती सुरूच असल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचं झाल्याचं उघड झाल आहे.

Gondia : ग्रामपंचायत मतमोजणी इमारतीच्या काही अंतरावर लागली आग, एकच खळबळ

Gondia Fire : गोंदियामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना तालुक्यातील पॉलिटेक्निक कॉलेज जवळील एका फर्निचर गोडाऊनला अचानक आग लागली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल असल्याने शेकडो जन या ठिकाणीं उपस्थित होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदिया नगर परिषद येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पाचारण करण्यात आले आहे. सध्या आग विझविण्याचे कार्य सुरू आहे

BMC Ward : बीएमसी प्रभाग संख्या आणि पुर्नरचनेवरील काम तूर्तास जैसे थेच

BMC Election Ward : बीएमसी प्रभाग संख्या आणि पुर्नरचनेवरील काम तूर्तास जैसे थेच


3 जानेवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत यावर कोणताही निर्णय घेणार नाही


राज्य सरकारची हायकोर्टात हमी


मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब


शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकरांची याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यास हायकोर्टाची तयारी


मविआनं 236 वर नेलेली प्रभागसंख्या शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा 227 केल्याचा विरोध करत याचिका

Janardan Patil MNS Entry : सामजिक कार्यकर्ते जनार्दन पाटलांसह शेकडो युवकांचा मनसेत जाहीर प्रवेश

Raj Thackeray :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पेण विधानसभा आमदार यांच्या विभागातील सामजिक कार्यकर्ते जनार्दन पाटील आणि शेकडो युवकांचा मनसे मध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत MIG क्लब मुंबई येथे जाहीर प्रवेश केला आहे. सदर प्रवेश रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदिप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.सोबत पेण शहर अध्यक्ष सुदेश संसारे आदी उपस्थित होते.

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच; NIA चा आरोपपत्रात दावा

Umesh Kolhe Murder Case: अमरावतीतील (Amravati News) केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच झाल्याचा दावा एनआयएनं (NIA) आपल्या आरोपपत्रातून केला आहे. कट्टरपंथीय लोकांच्या टोळीनं केलेली ही हत्या हे एक दहशतवादी कृत्य असल्याचं एनआयएनं आपल्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे.

Maharashtra Gram Panchayat Result 2022 : तुमच्या गावचा 'कारभारी' कोण? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Gram Panchayat Result 2022 : तुमच्या गावचा 'कारभारी' कोण? पाहा एका क्लिकवर.  ग्रामपंचायतींच्या निकालात महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात काँटे की टक्कर,

Akola Crime : बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या सैनिकाची आत्महत्या

अकोला : पातूर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एका सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलिस् स्टेशनच्या हद्दीत आज सकाळच्या सुमारस समोर आला आहे. चिखलगाव येथील रहिवाशी कपिल गुलाबराब तायडे असे मृतकाचे नाव आहे. आपली झालेली बदनामी सहन न झाल्याने कपिलने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

National Education Policy : आता शाळेत मिळणार श्रीमद् भगवद्गीता आणि वेदांचे ज्ञान! संसदेच्या स्थायी समितीची केंद्राला शिफारस

National Education Policy : संसदेच्या स्थायी समितीने शालेय अभ्यासक्रमात (Education News) बदल करण्याची शिफारस केंद्र सरकारला (Central Government) केली आहे. शालेय पुस्तकांमध्ये सर्व धर्मातील महापुरुषांचा समावेश करण्यात यावा, अशी शिफारस समितीने केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, धार्मिक शिकवणीमुळे मुलांना त्यांच्या धर्माची आणि संस्कृतीची माहिती मिळते. ही समिती शिक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदेची स्थायी समिती आहे. जिने केंद्र सरकारला अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस केली आहे.

Sangola Gram Panchayat : शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे आघाडीने 4 सरपंच पदावर मिळविला विजय 

Sangola Gram Panchayat : शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंखे आघाडीने 4 सरपंच पदावर मिळविला विजय 


चिणके, बलवडी , शिवणे आणि पाचेंगाव येथे आमदार शहाजीबापू यांची सत्ता 


तर शेकाप चे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी चिंचोली आणि अनकढाळ येथे मिळविली सत्ता

Gold Silver Price : सोने दरात घसरण तर चांदीच्या किंमतीत वाढ

 Gold Silver Price : आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीं कालच्या तुलनेत घसरण झाली आहे तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत अंदाजे 350 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 49,750 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे 54260 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या किंमतींमध्ये आज वाढ झाली आहे. सराफा बाजारात आज मंगळवारी चांदीच्या किंमती 69,500 रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. 

Weather News : परभणीत थंडीचा जोर वाढला, शेकोट्या पेटल्या, दोन दिवसांपासून तापमान 10 अंशाखाली

Parbhani : हवामान विभागाच्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून जिल्ह्यातील तापमान 9.04 अंशावर गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान 10 अंशाखाली गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी परतली असून सर्वत्र थंडीचा कडाका दिसून येत आहे.

Navi Mumbai News: कॅालेज मधील प्रवेश रद्द करूनही भरलेली फी परत करण्यास व्यावस्थापनाची टाळाटाळ

Navi Mumbai News: सिव्हील इंजिनिअरींगच्या प्रवेश घेण्यासाठी मुंबईतील सरदार पटेल कॅालज ॲाफ इंजिनिअरींग मध्ये वैष्णवी मैनकर हिने प्रवेश घेतला होता. मात्र यानंतर कॅप राऊंडमध्ये तिला VGTI ला नंबर लागताच वैष्णवीने सरदार पटेल कॅालेजमधील आपला प्रवेश रद्द करीत VGTI कॅालेज मध्ये अर्ज भरला. यानंतर सरदार पटेल कॅालेज मध्ये भरलेली 82 हजार रूपयांची फी परत मागण्यासाठी गेली असता ती देण्यास कॅालेज व्यवस्थापन टाळाटाळ करीत आहे. 82 हजार पैकी फक्त 500 रूपये वैष्णवीच्या खात्यात पाठवले आहेत. याबाबत वैष्णवीने कॅालेजमध्ये जाऊन विचारले असता तुम्ही उशीरा ॲडमिशन रद्द केल्याने भरलेली फी परत करू शकत नाही, असे सांगण्यात आले. पैसे परत हवे असतील तर सीईटी सेल कडे जावून दाद मागा असा सल्ला देण्यात आला. दुसरीकडे सीईटी सेलकडे जावून विचारले असता ते कॅालेज कडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे वैष्णवी मैनकर ने भरलेले हजारो रूपये परत मिळण्यास अडचण झाली आहे. अशाच पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांचे पैसे कॅालेजने परत करण्यास नकार दिलाय. 

Nashik Gram panchayat Result : नाशिकच्या चांदवड तालुक्यात चार निकाल हाती, जिल्ह्यातील आतापर्यंतचा निकाल 

Nashik Grampanchayat Result : नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी पहिल्या फेरीचे सर्व निकाल हाती आले असून चार जागांवर भाजप तर एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये  आडगाव - लताबाई घुले - भाजप,  शेलू - अमोल जाधव - भाजप, पाटे कोलटेक - रंगनाथ सूर्यवंशी - महाविकास आघाडी, निंबाळे - रविना विष्णू सोनवणे - भाजप, चिचोले - पवन साहेबराव जाधव - भाजप असे विजयी उमेदवार आहेत. नाशिक  जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत १९६ पैकी ०८ ग्रामपंचायत बिनविरोध आहेत. दरम्यान आज सकाळपासून एक एक ग्रामपंचायत निकाल हाती येत असून आतापर्यतच्या निकालानुसार भाजप - ११ जागांवर विजयी, शिंदे गट - ०४, ठाकरे गट - ०३, राष्ट्रवादी काँग्रेस - ०७, काँग्रेस - ००, मनसे - ००, इतर पक्षांना ०२ जागांवर विजय मिळवला आहे. 

Sinnar Accident : सिन्नर शिर्डी मार्गावर साईभक्तांवर काळाचा घाला, बसचालक फरार 

Sinnar Accident : नाशिकच्या सिन्नर नजीक पुन्हा एक भीषण अपघात झाला असून भरधाव खासगी लक्झरी बसच्या धडकेत पादचारी साईभक्तांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महेश शंकर सिंग, संजय जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर जवळील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत आज पहाटे 6 वाजता हा अपघात झाला.हे दोघेही राहणार मुंबईचे असून मुबंई-शिर्डी सिन्नर मार्गे पायी जात होते. दरम्यान अपघातांनंतर बसचालक पहाटेच्या फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाल्याचे  समजते. 


 

LPG Cylinder : 500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

LPG Gas Cylinder Price : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मोठी घोषणा केली आहे. 500 रुपयांत LPG गॅस सिलेंडर (LPG Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा अशोक गेहलोत यांनी सोमवारी केली आहे. राजस्थान सरकार दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) देणार असल्याची मोठी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. 

Share Market Opening Bell : शेअर बाजारात घसरगुंडी; नफावसुली जोरात, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. शेअर बाजारात (Share Market) नफावसुलीचे संकेत दिसत असून बाजारातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारासाठी एसजीएक्स निफ्टी निर्देशांकाकडून (SGX Nifty) नकारात्मक संकेत मिळत होते. अमेरिकन शेअर बाजारदेखील घसरणीसह बंद झाला होता. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. 

Hingoli Crime News : आमदाराच्या घरी चोरट्यांचा डल्ला, हिंगोली जिल्ह्यातील घटना

Hingoli Theft : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांच्या औरंगाबादच्या निवास्थानी चोरीची घटना ताजी असतानाच, आता हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांच्या  घरी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मुटकुळे यांच्या आडगाव येथील घराचे कुलूप तोडून आतमधील कागदपत्रे व साहित्य फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी इतर चार ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न केला असल्याचे समोर आलंय.  याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Karnataka School Case : चौथीच्या विद्यार्थ्याला आधी बेदम मारहाण, नंतर पहिल्या मजल्यावरून खाली फेकलं

Karnataka Teacher Beaten Student : चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक कर्नाटकमधून घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा जागीत मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या उत्तरेकडील आदर्श प्राथमिक शाळेतील ही धक्कादायक घटा उघडकीस आली आहे. शिक्षकाने चौथीच्या विद्यार्थ्याला आधी लोखंडीं रॉडने मारहाण केली आणि नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली ढकलून दिले. या घटनेत चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भरत असे या मुलाचे नाव असून भरत हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याच्या आईलाही शिक्षकाने मारहाण केल्याचा आरोप आहे.

Mumbai Crime News : तीन महिने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

Mumbai Crime News: राज्यात (Maharashtra News) महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाहीत. मुंबईच्या (Mumbai News) वांद्रे (Bandra) पूर्वेकडील संजीवनी नगर (Sanjivani Nagar) भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणार्‍या 40 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक नागरिकांनी या नराधमाला पकडून निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पोलीस स्थानकात (Police Station) दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. मुनाव्वर मलिक (40 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, मविआ आक्रमक पवित्र्यात

Maharashtra Assembly Winter Session: राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोमवारी, पहिल्या दिवशी सीमा प्रश्नाबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली होती. सोमवारी बेळगावात कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) कार्यकर्त्यांवर दडपशाही करत अटक केली. त्याचे पडसादही आजच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. आज सकाळी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे मार्गदर्शन करणार आहेत.

S. Jaishankar On Bilawal Bhutto : 'भारताला पाकिस्तानकडून जास्त अपेक्षा नाहीत', परराष्ट्र मंत्र्यांनी पाकला झापलं

S. Jaishankar Reaction On Bilawal Bhutto : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी आक्षेपार्ह वक्टव्य केलं. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला (Pakistan) सुनावलं आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी यावेळी म्हटलं की, भारताला पाकिस्तानकडून जास्त अपेक्षा नाहीत. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु असून भारताला लक्ष केलं जात आहे.

Vikhroli News: विक्रोळी मध्ये एनजीओ मध्ये 17 जणांना विषबाधा

Vikhroli News: विक्रोळी कन्नमवार नगर मध्ये मैना फाउंडेशन नावाच्या संस्थेत काल (सोमवारी) दुपारी जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आलं आहे. 13 मुली आणि 4 पुरुषांना ही विषबाधा झाली आहे. या सर्वांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महिलांच्या आरोग्य आणि रोजगारावर काम करणारी ही फाउंडेशन असून विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आहे. आज दुपारी त्यांच्या कार्यालयामधील स्वयंपाक करणारी व्यक्ती सुट्टीवर असल्यानं एक केटरिंगमधून बिर्याणी मागवली होती. या बिर्याणीमधून इथल्या सर्वाना विषबाधा झाली आहे. यातील 17 जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची तब्येत स्थिर आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे.  18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे. 


Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणूक निकाल   


राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे.  18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे.
 
Winter Assembly Session : विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस
महाविकास आघाडीची सकाळी 9 वाजता अजित पवारांच्या निवास्थानी बैठक होणार आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करणार आहेत. 


वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार


राज्यातील दहा वारकरी संघटना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्यासोबतच महापुरूषांवरील अक्षेपार्ह वक्तव्याबाबत ही भेट असणार आहे. 


नागपुरातील रामटेक येथे  माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
 नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आवारात आज माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.  


मनसेची बैठक


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.  


भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी  प्रदर्शित केली जाणार


भारतात 13 जानेवारी पासून सुरु होत असलेल्या हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी आज भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर प्रदर्शित केली जाणार आहे. 13 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान ओडिसातील कलिंगा, भुवनेश्वर आणि राहुरकेला येथे हॉकी विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. 


 ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेवर सुनावणी  


 भाजप नेते चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राम कदम यांच्यासह मुंबई पोलिस आयुक्तांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंकडून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टासमोर सुनावणी होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.