Maharashtra News Updates 18 November 2022 : देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Nov 2022 11:28 PM
देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या अनिल हरपळेंच्या विरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिल हरपळे हे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. कलम 153 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

औरंगाबाद : गंगापूर रोडवरील कायगावजवळ  दोन कारचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

औरंगाबाद : गंगापूर रोडवरील कायगावजवळ  दोन कारचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू


स्विफ्ट आणि वॅग्नर कारचा भीषण अपघात


 अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती


अपघातामध्ये दोन्हीही कारचा चुराडा


स्विफ्ट औरंगाबाद मधील बजाज नगर येथील तर वॅग्नर अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती


मृत आणि जखमींना गंगापूर येथील घाटी दवाखान्यात  करण्यात आले दाखल

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गांवर बंद गाडीत आढळला मृतदेह

मुंबई गोवा महामार्गावर एका ऑडी कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी गाडीची काच फोडून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली असता मृतदेहाजवळ ओळखपत्र सापडले आहे. मृत व्यक्तीचे नाव संजय कार्ले असून सदर व्यक्ती यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथील राहणारा आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून उद्या देशव्यापी बँक संप मागे, उद्याला देशभरातील बॅंका सुरु राहणार

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने उद्या देशव्यापी बँक संप मागे, उद्याला देशभरातील बॅंका सुरु राहणार


कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाचा होणार  


मुख्य कामगार आयुक्तां(केंद्र) सोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीत निर्णय 


आऊटसोर्सिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बॅंकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही


सोबतच बॅंकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीनं करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा होता बॅंकिंग संघटनांचा आरोप 


काही बॅंकांचे कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या वादावर देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांचा पुढाकार

मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भिवंडीत फुटली
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भिवंडीतील मानकोली ओवळी गावच्या परिसरात गुरुवारी फुटली आहे.या पाईपलाईन फुटल्यामुळे मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

 

मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनला दोन दिवसांपासून गळती सुरू होती गुरुवारी ही गळती मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाणी गळती पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून मुंबई ला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनचे रात्री उशिरापर्यंत  दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 176 वर, तर संशयित रुग्णांची संख्या 2860

मुंबईत गोवर आजाराच्या रुग्णांची संख्या 176 वर, तर संशयित रुग्णांची संख्या 2860


गोवरमुळं आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू


रुग्णालयात दाखल झालेली रुग्णसंख्या वयोगट १ ते ४ वर्षातील सर्वाधिक, ६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु 


ऑक्सिजन उपचारावर असलेल्या रुग्णांची संख्या ७ वर तर दोन रुग्णांवर व्हेंटिलेटरवर लावत उपचार सुरु


४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४६ रुग्णांना डिस्चार्ज


मुंबई महापालिकेकडून मौलवींची मदत घेत लसीकरणासाठी आवाहन, सोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जनजागृती


गोवरचा उद्रेक असलेल्या भागात देखील नागरिकांकडून लसीकरणासाठी प्रतिसाद 


गोवंडीतील काही मशिदीत लसीकरणाचे कॅम्प्स

इक्बाल सिंह चहल यांना हायकोर्टाचा दिलासा

इक्बाल सिंह चहल यांना हायकोर्टाचा दिलासा


मुलुंड कोर्टानं जारी केलेल्या समन्सला हायकोर्टाची स्थगिती


कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले नागरिक असा भेदभाव करणारे आदेश जाहीर केल्याचा आरोप


कोरोना लसीकरणासंदर्भातील तक्रारीवरून कनिष्ठ कोर्टानं चहल यांच्यासोबत सुरेश काकाणी आणि सिताराम कुंटे यांनाही जारी केलं आहे समन्स


अंबर कोईरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मुलुंड कोर्टानं समन्स जारी करत तिघांना 11 जानेवारीला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत

मुंबई वाहतूक पोलिसांनी सीटबेल्ट न लावल्याबद्दल सुमारे 9010 वाहनचालकांना व प्रवाशांना दंड ठोठावला

 सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबई वाहतूक पोलिसांनी सीटबेल्ट न लावल्याबद्दल सुमारे 9010 वाहनचालकांना व प्रवाशांना दंड ठोठावला आहे. 


 ट्रॅफिक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सीट बेल्ट न घातल्याने सुमारे 3842 वाहनचालक तर सुमारे 5168 प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्याने ई-चलानद्वारे दंड करण्यात आले आहे. 

  15 नोव्हेंबरपासून संपूर्ण मुंबईत सुरू झालेली ही मोहीम मध्ये चालक आणि प्रवाशांना सीटबेल्ट घालणे आता सक्तीचे व बंधनकारक करण्यात आले आहे.


मुंबई वाहतूक पोलिस 1 नोव्हेंबरपासून सीट बेल्टविरोधात मोहीम सुरू करणार होते. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी याला उशीर झाला आणि आता संपूर्ण मुंबईत ही मोहीम सुरू झाली आहे.


 प्रत्येक जंक्शनवर वाहतूक पोलीस आता वाहनचालक आणि सीटबेल्ट न लावणाऱ्या चालकांवर कारवाई करत आहेत.  दरम्यान, दंड मारल्या नंतर ते आता वाहनचालकांमध्ये सीटबेल्ट लावणे सक्तीचे असल्याचे जनजागृती ही करत आहेत.

Rahul Gandhi: राहुल गांधी शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला, पारंपरिक पद्धतीने स्वागत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज बुलढाण्यात असून राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेतलं. यावेळी मंदिर प्रशासनाकडून पारंपरिक पद्धतीने राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आलं. 


 

ईडीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर

ईडीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर


सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा


सचिन वाझे यांनी सीआरपीसी कलम 88 अंतर्गत जामीनाचा अर्ज दाखल केला होता


सचिन वाझे यांच्या जामीन अर्जाला ईडीनं विरोध दर्शवला होता


मात्र जामीन मिळूनसुद्धा  इतर  प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्यानं वाझे यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे

Shraddha walker Murder Case : श्रद्धा हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांची टीम वसईत दाखल

Shraddha walker Murder Case : देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. अशातच दिल्ली पोलिसांच्या पथकातील दोन पोलीस वसईत दाखल झाले आहेत. माणिकपूर पोलिसांना सोबत घेऊन दिल्ली पोलीस तपास करत आहेत. वसईत श्रद्धा प्रकरणाशी निगडीत काही महत्त्वपूर्ण धागेदोरे सापडतात का? याचा तपास दिल्ली पोलीस करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या दिल्ली पोलिसांचा तपास सुरु आहे. 

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसवर लोणावळ्याजवळ दगडफेक, एक प्रवासी जखमी

Pune News : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक


लोणावळ्याजवळ ही घटना घडल्याचे समजत आहे 


दगडफेकी दरम्यान एका प्रवाशाच्या डोक्याला दगड लागल्याने प्रवासी जखमी


रेल्वे धावत असताना ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत


यात अनेक प्रवाशांना जखमी व्हावे लागले आहे मात्र या घटना अद्यापपर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीत


यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाय योजना अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही


रेल्वे स्थानकावर जखमी प्रवाशाला प्रथम उपचार करण्यात आले असून या घटनेबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत

Urban Naxalism Case : शहरी नक्षलवाद प्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना दिलासा

अंबाजोगाईच्या सुधाकर देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

Beed News : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोद्याच्या सुधाकर देशमुख यांना महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी कोणासरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सुधाकर देशमुख हे वृक्ष मित्र असून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनामध्ये त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

परळीला पाणीपुरवठा करणार वाण धरण तुडूंब तरीही परळीकरांची पाण्यासाठी वणवण

Beed News : परळी शहराला पाणीपुरवठा करणार वाण धरण पूर्ण क्षमतेने भरलेल असतानाही परळीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेने जर चार दिवसाला पाणीपुरवठा करण्याचा वेळापत्रक जारी केला असला तरी धरणात पाणी असतानाही परळीकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात या इशारा दिला आहे.

पुण्यातील 28 'रुफ टॉप हॉटेल'वर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई, मंजूर जागे व्यतिरिक्त जागांवर मद्य विक्री होत असल्याचं आढळलं

Pune News : पुण्यातील 28 'रुफ टॉप हॉटेल'वर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई


खराडी, बाणेर, कॅम्प, कोंढवा, कोरेगाव पार्क या भागात असणाऱ्या हॉटेलवर कारवाई


पुण्यात परवानाकक्षाबाहेर सुरु असलेल्या परमिट रुम तसेच रुफ टॉप हॉटेलवर काल उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली


मंजूर जागे व्यतिरिक्त जागांवर मद्य विक्री होत असल्याचे आढळून आलेल्या या आस्थापनांवर कारवाई


शहरात गेल्या काही दिवसांपासून रुफ टॉप हॉटेलमध्ये आगीच्या घटना होत आहेत. यातील काही हॉटेलमध्ये अनाधिकृतरित्या बांधकाम देखील करण्यात आले आहे.

वाशिष्टी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत



रत्नागिरी जिल्ह्यातील दूध संकलन बंद पडल्यानंतर कोकणात पुन्हां चिपळूणातील प्रशांत यादव आणि स्वप्ना यादाव यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मे.वाशिष्टी मिल्क ॲण्ड प्रोडक्ट्स प्रायवेट लिमिटेड प्रकल्प पुर्णत्वास गेला असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. या प्रकल्पात दररोज 10 हजार लिटर दूध संकलन केले जाणार आहे. 



Konkan Refinery : कोकणातील रिफायनरला विरोध दर्शवण्यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्याचा प्लॅन

Konkan Refinery : कोकणातल्या राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरचा मुद्दा अद्यापही चर्चेत आहे. दरम्यान या रिफायनरला विरोध दर्शवण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी जनजागृती मेळाव्यासाठी परवानगी मिळावी असं म्हटलं आहे. रिफायनरी प्रकल्प हा रेड कॅटेगरीमध्ये मोडतो, त्यामुळे याला विरोध असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Measles Disease : मागील तीन वर्षात सहा वेळा गोवरचा उद्रेक, यंदा मात्र कहरच! आतापर्यंत 26 उद्रेक, सध्याची परिस्थिती काय?


गोवर (Measles Disease) हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवरचा संसर्ग मुख्यत्वे 5 वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. यावर्षी 2022 मध्ये गोवर संक्रमित बालकांची संख्या तब्बल 6 पटीने वाढली असून 26 वेळा संसर्गाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील गोवरच्या संख्येतील वाढ पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. आहे.  या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असेही सांगितले आहे. तसेच, जनमानसात लसीकरणाबाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणावर लोक प्रबोधन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 


Mumbai Police: पश्चिम बंगालच्या सीआयडी अधिकाऱ्यासह चार जणांना मुंबईत अटक, व्यापाऱ्याकडून पैसे उकळल्याचा आरोप


पश्चिम बंगाल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) एका अधिकाऱ्यासह चार जणांना आज मुंबई पोलिसांनी अटक केली. कुलाब्यातील वादग्रस्त व्यापारी जीतू नवलानी यांच्याकडून पैसे उकळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 


दक्षिण मुंबईत डर्टी बन्स नावाचा पब चालवणारा जितेंद्र चंदरलाल नवलानी उर्फ ​​जीतू (वय 49) हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जवळचा असल्याचं सांगण्यात येतंय. नवलानी याने या प्रकरणी वरळी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिस तक्रारीत त्याने सांगितले आहे की, कोलकाता येथील सीआयडी अधिकाऱ्याने आपल्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. तसेच आपल्या कुटुंबाला, पत्नीला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव टाकला.


विकास आराखड्यावरुन पंढरपूरचे नागरिकांचा संताप! आता स्थानिक लोक शासनाला 15 दिवसात देणार आराखडा, पालकमंत्री म्हणाले...


ABP माझाच्या बातमीनंतर माऊली कॉरिडॉर आणि विकास आराखड्याबाबत बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनविण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून राबविला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिली. दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या 15 दिवसात देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांना दिल्यावर शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हे दोन्ही समोर ठेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.