Maharashtra News Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव़डणुकांचं भवितव्य ठरवणारी सुनावणी तीन आठवडे लांबणीवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Satara Accident: कराड तासवडे येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. अपघातात चार गंभीर तर 23 जण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमीमध्ये दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी असून चौघांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर इतरांवर किरकोळ उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थी साताऱ्यातील कोरेगाव वाघोली येथील आहे. एसटीने पाठीमागून कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा प्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा आयोगाच्या समोर 21 ते 25 जानेवारी या दरम्यान चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरण घडलं त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक होते. त्याचसोबत हर्षली पोतदार आणि शिवाजी पवार यांची ही चौकशी होणार आहे. 21 ते 25 जानेवारी सह्याद्री अतिथीगृह येथे चौकशी होणार आहे
Mangalvedha Accidnt: देवदर्शनासाठी निघालेली ट्रॅव्हल्स मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा येथे पलटी झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 29 जण किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना आज सकाळी 6 वाजता मरवडे रोडवर येड्राव फाटा येथे घडली
Chembur Accident: चेंबूर सिंधी सोसायटी परिसरात हरीकुंज या इमारतीमध्ये काम सुरू असताना बाराव्या मजल्यावरून पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. चेंबूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन (Education) या कार्यालयात चोरी झाली आहे. यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ (Theft) उडाली आहे. परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारखे कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती आहे. 2007 ते 2019 या दरम्यानचे कागदपत्र चोरीला गेले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे.या कार्यालयातील जुने वसतिगृह येथील एका रेकॉर्ड रूममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात असून त्या ठिकाणी एक जुने बंद स्थितीत असलेले एक वसतिगृह आहे. या ठिकाणी एका खोलीचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव, पात्रता फॉर्म, पुनर्गुण मूल्यांकन अर्ज, फोटोकॉपीचे अर्ज असे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेले आहेत.
Raj Thackeray: परळी न्यायालयाकडे जाताना राज ठाकरे यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांकडून प्रचंड पुष्पवृष्टी करण्यात आली मनसे, राष्ट्रवादीकडून शक्तिप्रदर्शन करत राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आले.
पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या परिसरातून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडी कंटेनर मधून अज्ञात चोरट्याने एक लाख 42 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अगमपाल सुरजित सिंग धूपर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
बंडगार्डन मेट्रो स्टेशन या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी कंटेनर स्टोअर चे लॉक तोडून दहा इलेक्ट्रिक वायरचे बंडल, एक वेल्डिंग मशीन, तांब्याचे 16 लाइटनिंग अरेस्टर, दोन बटरफ्लाय, तांब्याचे पाईप्स, कटर मशीन, ड्रिल मशीन असा एकूण एक लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Parali News : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच बंद पडल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे.. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात 250 उमेदवार क्षमतेचे तीन नवीन संच सुरू करण्यात आले आहेत मात्र हे संच बंद असल्याने 750 मेगावॅट वीज निर्मिती बंद पडली आहे.. एक संच हा ट्रिप झाल्याने बंद पडला आहे तर दुसरा संच हा वार्षिक दृष्टीसाठी बंद ठेवण्यात आला असून हे नवीन तीनही संच दोन दिवसात सुरू होतील अशी माहिती परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे
Nawab Malik: नवाब मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या व्हिसाप्रकरणी फराज मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. ते थोड्याच वेळात बीडच्या दिशेनं रवाना होणार आहेत.
Nandurbar News: नंदुरबार शहराचे ग्रामदैवत असलेल्या दंडपाणेश्वर गणेश मंदिरात चोरट्यांनी चोरी करत गणेशाचा मूर्तीवरील दोन ते तीन किलो चांदीचे दागिने लंपास केले होते ग्रामदैवत मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतप्त वातावरण होते धार्मिक बाबीचा विचार करत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या चोरीच्या घटनेचा तपास जलद गतीने करण्यात आला अवघ्या 72 तासात चोरीच्या घटनेमध्ये सहभागी असलेल्या दोघे आरोपींना मध्य प्रदेश राज्यातून अटक करण्यात आले होते त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल आणि रोकड हस्तगत करण्यात आली मंदिरात झालेली चोरी उघड झाल्याने आणि ग्रामदैवत दंडपानेश्वर मंदिरातून चोरी झालेल्या दागिने मिळाल्याने मंदिर संस्थान आणि भाविकांच्या वतीने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गुन्ह्याचे तपास करणारे पोलीस अधिकारी यांचा सत्कार मंदिर परिसरात करण्यात आला पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक यावेळेस नंदुरबारकरांनी केले
Pune Fire: पुण्यातील जुन्या बाजारात असलेल्या दुकानांना भीषण आग लागली आहे. मंगळवार पेठ असलेल्या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकान आहे. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. अग्निशमन जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र नेमकी या कशामुळे लागली होती हे अद्याप कळाले नाही.
Raj Thackeray : अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहे. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2008 ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात राज ठाकरेंना हे समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी देखील सदर प्रकरणात राज ठाकरे यांना दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आलं होतं. अखेर आज राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स आहे...
India Pakistan Relation : भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील तणाव जगजाहीर आहे. अशात एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM) शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) भारतासोबत मैत्रीचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख (Ex-Pak Air Chief Marshal) भारतासोबत युद्धाची भाषा करताना दिसत आहेत. 'आम्ही भारताची एक नव्हे तर आठ लढाऊ विमानं पाडली असती', असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी एअर चीफ मार्शल यांनी केलं आहे.
Sindhudurga News: दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात तस्कर हत्ती परतला असून शेती आणि बागायती मध्ये धुडगूस घालत आहे. शेती, बागायतीचे नुकसान करत आहे. पावसाळ्यात घाटमाथ्यावर गेलेला हत्ती पुन्हा तिलारी खोऱ्यात परतल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी भयभीत झाले आहेत. २००२ मध्ये कर्नाटक मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात आलेले हत्ती गेली २० वर्ष याच भागात असून शेतीचं आणि बागायतीच नुकसान करत आहेत
Bhandara News: भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यांतील आष्टी परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढलाय. यामुळे आष्टीतील धीवर मोहल्यासह परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. मात्र वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यापासून धजावत आहेत. मात्र, शेतपिकांचे नुकसान होऊ नये म्हणून जीव मुठीत घेऊन शेतकरी शेतात राबत आहेत..
Nashik News: गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे. आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी नतमस्तक झाले राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक निवृत्तीनाथ महाराज समाधीची महापूजा केली.. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.
Ratnagiri News : रत्नागिरीतल्या शेट्येनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान दोन जण घरात अडकले असून दोघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या स्फोटात घराचं मोठं नुकसान झालंय
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. याबरोबरच महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सोहळा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. यंदा कोरोना निर्बंधमुक्तीमुळे मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून चारशे दिंड्या आणि जवळपास तीन लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरला मुक्कामी पोहोचले आहेत. जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राज ठाकरे बीडच्या परळी न्यायालयात हजर राहणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली राज ठाकरे यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल झाले होते. बीड जिल्ह्यात देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणी राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिले म्हणून परळी कोर्टाने दोन वेळा त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे राज ठाकरे आज परळी कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत.
मुंबईत महाविकास आघाडीची बैठक
महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
अमरावतीमधील तळेगाव दशासर येथे आज महिलांचा शंकरपट
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे 15 तारखेपासून चार दिवसीय शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दो-दाणी, सोमवार आणि मंगळवारी एकदानी आणि आज म्हणजे बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील शंकरपटाला सुरुवात झाली. 20 एकर जागेत हा पट आणि यात्रा भरली आहे. आज शेवटच्या दिवशी महिलांचा शंकरपट होणार असून महाराष्ट्रात सर्वात आधी याच तळेगाव दशासरच्या शंकरपटात महिलांना संधी देण्यात आली आहे.
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी
शिवसेना नेते संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाते नेते संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना मुंबइ सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करत ईडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच हा जामीन देताना पीएमएलए कोर्टानं आढलेले तीव्र ताशेरेही या निकालातून वगळण्याची मागणी तपासयंत्रणेकडून हायकोर्टात करण्यात आली आहे.
केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी
गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात शरद पावर यांनाही प्रतिवादी करण्यासाठी केतकीचा हायकोर्टात अर्ज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -