Maharashtra News Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निव़डणुकांचं भवितव्य ठरवणारी सुनावणी तीन आठवडे लांबणीवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. याबरोबरच महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सोहळा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. यंदा कोरोना निर्बंधमुक्तीमुळे मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून चारशे दिंड्या आणि जवळपास तीन लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरला मुक्कामी पोहोचले आहेत. जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राज ठाकरे बीडच्या परळी न्यायालयात हजर राहणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली राज ठाकरे यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल झाले होते. बीड जिल्ह्यात देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणी राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिले म्हणून परळी कोर्टाने दोन वेळा त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे राज ठाकरे आज परळी कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत.
मुंबईत महाविकास आघाडीची बैठक
महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
अमरावतीमधील तळेगाव दशासर येथे आज महिलांचा शंकरपट
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे 15 तारखेपासून चार दिवसीय शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दो-दाणी, सोमवार आणि मंगळवारी एकदानी आणि आज म्हणजे बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील शंकरपटाला सुरुवात झाली. 20 एकर जागेत हा पट आणि यात्रा भरली आहे. आज शेवटच्या दिवशी महिलांचा शंकरपट होणार असून महाराष्ट्रात सर्वात आधी याच तळेगाव दशासरच्या शंकरपटात महिलांना संधी देण्यात आली आहे.
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी
शिवसेना नेते संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाते नेते संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना मुंबइ सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करत ईडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच हा जामीन देताना पीएमएलए कोर्टानं आढलेले तीव्र ताशेरेही या निकालातून वगळण्याची मागणी तपासयंत्रणेकडून हायकोर्टात करण्यात आली आहे.
केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी
गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात शरद पावर यांनाही प्रतिवादी करण्यासाठी केतकीचा हायकोर्टात अर्ज आहे.
Satara Accident: कराड तासवडे येथे एसटी बसचा अपघात
Satara Accident: कराड तासवडे येथे एसटी बसचा अपघात झाला आहे. अपघातात चार गंभीर तर 23 जण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमीमध्ये दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थी जखमी असून चौघांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर इतरांवर किरकोळ उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थी साताऱ्यातील कोरेगाव वाघोली येथील आहे. एसटीने पाठीमागून कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा प्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची होणार चौकशी
Koregaon Bhima : कोरेगाव भीमा प्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा आयोगाच्या समोर 21 ते 25 जानेवारी या दरम्यान चौकशी होणार आहे. कोरेगाव भीमा प्रकरण घडलं त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक होते. त्याचसोबत हर्षली पोतदार आणि शिवाजी पवार यांची ही चौकशी होणार आहे. 21 ते 25 जानेवारी सह्याद्री अतिथीगृह येथे चौकशी होणार आहे
Mangalvedha Accidnt: देवदर्शनासाठी निघालेल्या बसवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी; एकाच मृत्यू , 28 भाविक जखमी
Mangalvedha Accidnt: देवदर्शनासाठी निघालेली ट्रॅव्हल्स मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा येथे पलटी झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 29 जण किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना आज सकाळी 6 वाजता मरवडे रोडवर येड्राव फाटा येथे घडली
Chembur Accident: चेंबूरमध्ये बाराव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू
Chembur Accident: चेंबूर सिंधी सोसायटी परिसरात हरीकुंज या इमारतीमध्ये काम सुरू असताना बाराव्या मजल्यावरून पडून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. चेंबूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Pune News : पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन कार्यालयात चोरी; महत्वाचे कागदपत्र चोरी
पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतन (Education) या कार्यालयात चोरी झाली आहे. यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ (Theft) उडाली आहे. परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव यासारखे कागदपत्र चोरीला गेल्याची माहिती आहे. 2007 ते 2019 या दरम्यानचे कागदपत्र चोरीला गेले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात आहे.या कार्यालयातील जुने वसतिगृह येथील एका रेकॉर्ड रूममध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय दूर शिक्षण तंत्र निकेतनचे कार्यालय पुण्यात असून त्या ठिकाणी एक जुने बंद स्थितीत असलेले एक वसतिगृह आहे. या ठिकाणी एका खोलीचे कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी परीक्षा फॉर्म, मेरिट लिस्ट फाईल, संस्थेची संलग्नता प्रस्ताव, जुने शिष्यवृत्ती अर्ज, संस्थेचे एनओसी प्रस्ताव, पात्रता फॉर्म, पुनर्गुण मूल्यांकन अर्ज, फोटोकॉपीचे अर्ज असे महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेले आहेत.