Maharashtra News Live Updates : टिपरच्या धडकेत यवतमाळमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Dec 2022 11:02 PM
भाजपा आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह एकूण 7  जणांची निर्दोष सुटका

भाजपा आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह एकूण 7  जणांची निर्दोष सुटका


त्रिपुरातील हिंसाचाराविरोधात मालेगावमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या   हिंसाचाराच्या निषेधाचं प्रकरण


गिरगांव महानगर दंडाधिकारी न्यायाधीश एन.ए. पटेल यांचा निर्णय 


मात्र त्या हिंसाचाराविरोधात मुंबईत भारतीय जनता पार्टीच्यावतीनं एक आंदोलन करण्यात आलं होतं


या आंदोलन प्रकरणी   आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा


या गुन्ह्यातून शनिवारी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं पुराव्यांअभावी 7 आरोपींची केली निर्दोष सुटका 


मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान हिंदू लोकांवर करण्यात आली होती दगडफेक


त्या निषेधार्थ आझाद मैदानात झालेल्या आंदोलनादरम्यान बॅरिकेट हटवण्यात आल्याविरोधात दाखल केला गेला होता गुन्हा 


यात प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आकाश पुरोहित, अतुल शहा, राजेश शिरवळकर, शरद चेतनकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता


या सर्व आरोपींविरोधात आयपीसी कलम 269, 447, 37(1) (3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम; उदय सामंतांची टीका 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. विक्रमी मोर्चा होईल असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. परंतु, महाविकास आघाडीच्या मोर्चात गर्दीच नव्हती. 

टिपरच्या धडकेत यवतमाळमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गुंज येथे रेतीची वाहतूक करणाऱ्या टिपरने दुचाकीस्वारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सुनील धानोरकर ( वय 42 रा. मधुकर नगर, पुसद ) असे टिप्परच्या धडके ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे.  

पायाखालची वाळू सरकल्यानेच लोकांना वेठीस धरून महामोर्चा: खासदार डॉ श्रीकांत शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 5 महिन्यात विकासाचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यामुळे विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच लोकांना वेठीस धरून महामोर्चा काढले जात असल्याची टीका आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चावर खासदार डॉ. एकनाथ शिंदे यानी केली. कल्याणात महाराष्ट्र शासन आणि श्रीकांत शिंदे फाऊडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते.

माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक पदी नेमणूक

पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना पुण्यात मोक्का किंग म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक मोक्का कारवाया केल्या आहेत. मात्र आता त्यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

Indapur News : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Indapur News : इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. सुभाष ब.भिटे, उद्धव कुंडलिक गरगडे, संजीवनी गरगडे अशी भांडणे करणा-या शिक्षकांची नावे आहेत. भिटे आणि संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी भिटे आणि संजीवनी गरगडे यांची कुरबूर झाली. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द भांडणे सुरु झाली. घरी जाणा-या विद्यार्थ्यांसमोर हाणामारीचा प्रकार घडला. झालेल्या प्रकाराबद्दल पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.

Mumbai Fire News: मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला लागलेल्या आगीत एक व्यक्तीचा मृत्यू
शिरुर तालुक्यातील एआयएम कंपनीला आग

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एआयएम कंपनीला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. 


 

Jalgaon News: महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे आपली ताकद दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न: गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Jalgaon News: महाविकास आघाडीची अतिशय बिकट अवस्था झाली असून ते आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजप नेते, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. त्यांच्याकडे मोर्चे काढण्या एवढेच काम उरलेले आहे. मुंबई ऐवजी त्यांनी नागपुरात मोर्चा काढला असता तर बरे झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Mumbai Fire News: मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकनजीक असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग, हॉटलेला आग लागल्याची माहिती

Mumbai Fire News: मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानकनजीक असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या इमारतीला आग लागली आहे. ही आग इमारतीत असलेल्या हॉटलेला लागली असल्याची माहिती आहे.

Buldhana News: बुलढाणा: बेताल वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचा भाजपने पुतळा जाळला

Buldhana News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो याने केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात चिखली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केलेल्या या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुत्तोचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

BJP Protest: अहमदनगर: पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांविरोधात शिर्डीत आंदोलन; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

BJP Protest: अहमदनगर: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात शिर्डीत आंदोलन...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध...बिलावल भुट्टो यांच्या फोटोला पायाखाली तुडवत केले दहन... पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा...महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन 

BJP Protest: अहमदनगर: पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांविरोधात शिर्डीत आंदोलन; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

BJP Protest: अहमदनगर: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात शिर्डीत आंदोलन...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध...बिलावल भुट्टो यांच्या फोटोला पायाखाली तुडवत केले दहन... पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा...महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलन 

Mumbai News: भाजपकडून 'माफी मांगो' आंदोलन, कांदिवलीत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Mumbai News: महाराष्ट्रातील संतांचा अपमान करणाऱ्या शिवसेना प्रवक्त्या सुषमा आणि संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई विभागाच्यावतीने कांदिवली पूर्व भागात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनात वारकरीदेखील सहभागी झाले होते. भाजप खासदार गोपाळ शेट्टी,आमदार अतुल भातखळकर व योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

Traffic Updates: रायगड: मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर दोन्ही दिशेने वाहनांच्या रांगा, मुंबईतील मोर्चा आणि वीकएंडने वाहनांची गर्दी

Traffic Updates: रायगड:  मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर वाहनांची रांग लागली आहे. खालापूर टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग असून सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली आहे. तर, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे 500 मीटरच्या वाहनाच्या रांगा आहेत. 

Belgaum News: बेळगाव: चोर्ला घाटात अपघातात एक ठार, बारा जखमी

Belgaum News: गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात  एक जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. हा अपघात चोर्ला घाटात झाला. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे  शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी ) असे  नाव आहे. 

Prasad Lad : भाजपा आमदार प्रसाद लाड यांनाही दिलासा

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनाही दिलासा


सोमय्या, दरेकरांपाठोपाठ आर्थिक गुन्हे शाखेकडून आणखीन एक तपास बंद


मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि इतर आरोपींविरोधात साल 2014 मध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास बंद 


सी समरी अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला


आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते आहेत

Ahmednagar Gram Panchayant Election : अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींची निवडणूक

अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींची निवडणूक लागल्यानंतर यातील पंधरा सरपंच पद आणि 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रचाराचा तोफा आता थंडावल्या असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील 190 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होईल अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता अहमदनगर जिल्ह्यात अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या ग्रामपंचायत निवडणुकीत पणाला लागली आहे आजी-माजी महसूल मंत्री यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार भाजपचे राम शिंदे या नेत्यांचा यात समावेश आहे.

Nanded Gram Panchayat Election : नांदेड जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 181 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जिल्हा असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात 13 तालुक्यातील 181 ग्रामपंचायतसाठी उद्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचयतसाठी मतदान होणार असून किनवट माहूर मतदारसंघातील 79 ग्रामपंचायतसाठी निवडणुका होणार आहेत. किनवट माहूर या आदिवासी बहुल भाग असणाऱ्या या विधानसभा मतदार संघात भाजप आमदार भीमराव केराम आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दरम्यान जिल्ह्यात सगळ्यात जास्त माहूर व किनवट तालुक्यातील 79  ग्रामपंचतसाठी उद्या मतदान होणार आहे. तर लोहा कंधार मतदारसंघातील 44 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नांदेड, माहूर, हिमायतनगर, किनवट, अर्धापुर, हदगाव, उमरी, नायगाव धर्माबाद, बिलोली, मुखेड, लोहा, कंधार या 13 तालुक्यातील 181 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान होणार असून मतदानासाठीची पूर्व तयारी आता पूर्ण झालीय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांची या ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

BJP Protest : भाजपचे माफी मांगो आंदोलन 

आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघत असताना दुसरीकडं भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातमुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून हे माफी मांगो आंदोलन केलं जाणार आहे.

MVA Mumbai Morcha : आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. रिचर्ड्स अँड क्रूडास मिल पासून सकाळी 10.30 वाजता मोर्च्याला सुरूवात होईल. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल.


सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन


सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन करणार आहे. आज भाजप नेते अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार अहेत. तर अमित साटम, आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आंदोलन करणार. मनोज कोटक, राम कदम, निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व येथे आंदोलन करणार.


हिंदुत्ववादी संस्थांकडून आज ठाणे बंद


हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आलीय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही आज बंदची हाक देण्यात आलीय.


18 तारखेच्या ग्रामपंचायत मतदानासाठी तयारी


धुळ्यात रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. 119 ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अकोल्यात  होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलीये. मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील. वाशिम जिल्ह्यात 18 डिसेंम्बर रोजी होऊ घातलेल्या  287 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलीये.  मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील. 


नौदलात सामील होणार शक्तिशाली INS मुरमुगाव


INS Mormugao : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर मुरमुगाव (INS Mormugao) भारतीय नौदलात दाखल करतील. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव रविवारी (18 डिसेंबर) भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.