Maharashtra News Updates 15 November 2022 : समीर वानखेडे बदनामी प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर उद्या वाशिममध्ये गुन्हा दाखल होणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Nov 2022 10:13 PM
Nawab Malik: समीर वानखेडे बदनामी प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर उद्या वाशिममध्ये गुन्हा दाखल होणार

एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी वाशिम सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 13 डिसेंबर 21 रोजी वाशिम न्यायालयात वानखडे कुटुंबीयांनी यासंबंधित याचिका दाखल केली होती.


 

Chandrapur : शेतात कापूस वेचत असलेल्या शेतमजूर महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

शेतात कापूस वेचत असलेल्या शेतमजूर महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. चंद्रपुरातील मूल तालुक्यातील जानाळा शेतशिवारातील ही घटना आहे. कांतापेठ येथील कल्पना लोनबळे (45) ही महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. दुपारच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरडा ऐकू आल्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत 41 जण वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात बळी पडलेत. 

जेजुरी आयएसएमटी कंपनीत अपघात, आठ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीक असणाऱ्या आय एस एम टी कंपनीत लोखंडाचा रस वाहून नेणाऱ्या लॅडलची साखळी ( वायर रोप ) तुटल्याने वितळलेला लोह रस अंगावर पडल्याने आठजण भाजून जखमी झाल्याची घटना घडली आहे. आय एस एम टी ही कंपनी लोखंडी रॉड, सळई बनवण्याचे काम करते. या कंपनीत बॉयलरमध्ये 1650 ते 1800 डिग्री सेल्सिअस ला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो. याच लोहरसा पासून वेगवेगळ्या आकाराचे रॉड, वा सळई बनवल्या जातात. काल सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यात क्रेन चालक जितेंद्र सिंग, सुजित विलास बरकडे, चुनेज भानुदास बरकडे, अरूनकुमार सिन्हा, आकाश यादव दुर्गा यादव, शिवाजी राठोड मनोरंजन दास हे  अंगावर वितळत्या लोखंडाचा रस  पडल्याने जखमी झाले आहेत. यातील चार जण गंभीर जखमी असून, क्रेन चालक जितेंद्र सिंग याला पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर इतर सात जनावर जेजुरी  येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  काल सकाळी सहा वाजता हा अपघात झाला. अपघातात वरून पडलेल्या लोह रसाने आठ जण जखमी झाले असले तरी सुदैवाने मोठा अनुचित प्रकार झाला नाही. मात्र लोखंडापासून बनवलेल्या लोहरसाने कामगार भाजले आहेत.  

मुंबई विद्यापीठ कालिना कॅम्पसच्या परीक्षा भवन मधील इंटरनेट सेवा मागील दहा दिवसापासून बंद

 


विद्यापीठातील परीक्षा भवनमधील इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत,त्याच्याकडून प्राप्त तक्रारींची दखल घेऊन युवासेनेने विद्यापीठ प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क करुन विद्यार्थ्यांची कैफियत मांडली आणि तातडीने इंटरनेट सेवा सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

आरबीआयकडून यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेचे बॅंकिंग लायसन्स रद्द 

आरबीआयकडून यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेचे बॅंकिंग लायसन्स रद्द 


११ नोव्हेंबरपासून बॅंकिंग व्यवहार बंद करण्याचे आरबीआयचे आदेश 


गेल्या काही महिन्यांपासून बॅंकेत आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती, त्यामुळे बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते 


८ नोव्हेंबर २०२१ रोजी कामकाज बंद झाल्यापासून सहा महिन्यांकरीता निर्बंध लागू केले होते, मात्र मे महिन्यात देखील परिस्थिती न सुधारल्यानं ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले होते 


बँकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्यामुळे बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेवर आरबीआयकडून ६ ऑगस्ट रोजी निर्बंध वाढवण्यात आले होते 


मात्र, आर्थिक परिस्थिती न सुधारल्याने अखेर ११ नोव्हेंबर रोजी आरबीआयनं बॅंकेचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला 


७९ टक्के ठेवीदारांना त्यांना त्यांचे सर्व पैसे परत मिळणार असल्याचं बॅंकेने आरबीआयला सुपूर्द केलेल्या अहवालात म्हंटलंय 


डीआयसीजीसीकडून १६ आॅक्टोबर २०२२ पर्यंत २९४ कोटी रुपये ठेवीदारांना परतवले आहेत

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. याच प्रकरणातील सहआरोपी कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.  

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ


सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला


28 नोव्हेंबरपर्यंत देशमुखांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश


याच प्रकरणातील सहआरोपी कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ

आमदार जितेंद्र आव्हाड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

आमदार जितेंद्र आव्हाड आज रात्री उशिरा किंवा उद्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. जाणीवपूर्वक खोटी कारवाई केल्याच जितेंद्र आव्हाड यांचं म्हणण

Parbhani : परभणीत ओला दुष्काळ जाहीर करा; तात्काळ पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शिवसेनेचे धडक मोर्चा

परभणी जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी होऊन दोन महिने उलटले असताना ना दुष्काळ जाहीर केला जातो ना पिक विमा, ना नुकसान भरपाई दिली गेली. याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच सेना नेते रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर बेधडक मोर्चा काढण्यात आला.


परभणी शहरातील शनिवार बाजार मैदान येथे हजारो शेतकरी तसेच शिवसनेनेचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र जमले. या ठिकाणाहून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सेना नेते रवींद्र वायकर, खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा बेधडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसेनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच 50 खोके एकदम ओकेच्या घोषणांनी हा मोर्चा दणाणून गेला होता. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात सर्व नेत्यांनी भाषण केली आणि या भाषणामध्ये शिंदे गटावर जोरदार तोफ डागली.

होडगी रोड विमानतळावरून विमान सेवा सुरू व्हावी; सोलापुरात आठ ते दहा दिवसांपासून चक्री उपोषण

Solapur News Update : सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी मागील आठ ते दहा दिवसांपासून चक्री उपोषण सुरू आहे. मात्र या उपोषणानंतर देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे दुकानावर काळे झेंडे लावण्याचे लावण्याचे आवाहन सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आले आहे. सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सोलापूरच्या विमानसेवेसाठी आंदोलन केले जात आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा देखील मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक देखील लावली होती.  मात्र तरीदेखील सोलापूरच्या प्रशासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलली जात नसल्याने दुकानांवर काळे झेंडे लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी दिली.  

कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडीमध्ये गॅस्ट्रोची साथ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

Kolhapur News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडीमध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. जठारवाडी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलंय. आतापर्यंत गॅस्ट्रोमुळं गावातील दोघेजण दगावले असल्याचं समोर आलं आहे. तर गावातील अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे मोठी भीती पसरली आहे. वरातीमागून घोडं याप्रमाणे आरोग्य विभाग उशिरा खडबडून जागा झाला आहे. सध्या गावात आरोग्य विभागाचे सहा पथक कार्यरत असून गॅस्ट्रोची साथ रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. गावाला अस्वच्छ आणि दूषित पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व यंत्रणा प्रशासनाने थांबविल्या असून गावकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.  पण हे ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाला सुचलेलं उशिराच शहाणपण आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. 

ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या विरोधात शिवसेनेनं याचिका दाखल केली होती याचिका. निवडणूक योगाला अंतिम निर्णय तातडीने घेण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. 

2014 नंतर भारतात अमेरिकेच्या लोकसंख्येएवढी बॅंक खाती सुरू केली : पंतप्रधान मोदी  

अमेरिकेची लोकसंख्या जेवढी आहे तेवढी आम्ही बॅंक खाती 2014 नंतर सुरू केली आहेत. जवळपास 3 कोटी गरीबांसाठी घर बांधली. घर मिळाल्यानंतर व्यक्ती रातोरात लखपती होतो. गेल्या सात - आठ वर्षात 55 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले आहेत. इंडोनेशिया मधील बाली येथे भारतीय जनसमुदायाला संबोधित केले.  

हॅास्पीटलच्या भूखंडावरून दोन भाजपा आमदारांमध्ये जुंपली, मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात आरोप प्रत्यारोप

नवी मुंबईतील दोन भाजपा आमदारां मध्ये हॅास्पीटलच्या भूखंडावरून सद्या जुंपली आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. येत्या काही दिवसात नवी मुंबई महानगरपालिका निवडणूका होणार असून शहरातील दोन्ही आमदार आपआपसात भांडू लागल्याने कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. शहरात सुसज्ज असे हॅास्पीटल उभा करण्यासाठी नेरूळ येथे ९ ऐकराचा भूखंड आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा करून सिडको कडून मिळवला आहे. सिडकोने महानगर पालिकेला हा भूखंड दिला असून यापोटी ६० करोड रूपये सिडकोला भरायचे आहेत. गणेश नाईक यांनी मात्र हॅास्पीटलच्या जागी मैदान करा अशी मागणी करून हॅास्पीटल उभारणीत अडथळा आणला असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय. यावर उत्तर देताना सदर ठिकाणी मैदान कि हॅास्पीटल होणार याचा निर्णय जनतेच्या मागणीवर ठरेल असे सांगून अप्रत्यक्षपणे आपला विरोध असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे.. हॅास्पीटल वरून भाजपाचेच दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत..

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Jitendra Awhad:  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूरराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Maharashtra News : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्या निकटवर्तीयांवर आयकराचे छापे

Maharashtra News : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्या निकटवर्तीयांवर आयकराचे छापे


आभा गणेश गुप्ता यांच्या कार्यालयातील कमल मॅन्शन, अबू आझमी कार्यालय आणि त्याच इमारतीत असलेल्या निवासस्थानावर छापा टाकला.


वाराणसी, कानपूर, लखनौ, मुंबई आणि कोलकाता येथे 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले

Maharashtra समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्या निकटवर्तीयांवर आयकराचे छापे

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी यांच्या निकटवर्तीयांवर आयकराचे छापे


 आभा गणेश गुप्ता यांच्या कार्यालयातील कमल मॅन्शन, अबू आझमी कार्यालय आणि त्याच इमारतीत असलेल्या निवासस्थानावर छापा टाकला.


 वाराणसी, कानपूर, लखनौ, मुंबई आणि कोलकाता येथे 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले

Nashik News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाशिकमध्ये आगमन

Nashik News : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाशिक ओझर विमानतळ येथे आगमन झाले असून राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री 
दादा भुसे व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी पोहचणार आहेत. 


 

Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाचा तात्पुरता दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अजामानीपत्र वॉरंट बजावणार नाही

Naneet Rana: खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत, 19 नोव्हेंबरपर्यंत अजामानीपत्र वॉरंट बजावण्यात येणार नाही. 

खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाचा तात्पुरता दिलासा मिळाला

खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाचा तात्पुरता दिलासा मिळाला


19 नोव्हेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत, नवनीत राणा यांच्यावर अजामानीपत्र वॉरंट बजावणार नाही


राज्य सरकारतर्फे सरकारी वकिलांनी कोर्टात दिली हमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या जामिनावर ठाणे सत्र न्यायालय आज दुपारी दोन वाजता निकाल देणार

Mumbai News : मुंबई महापालिका गोवर संदर्भात ॲक्शन झोनमध्ये! 

Mumbai News : मुंबई महापालिका गोवर संदर्भात ॲक्शन झोनमध्ये! 


अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार यांची थोड्याच वेळात वॉर्ड ऑफिसर्ससोबत बैठक 


उपाययोजना आणि आढावा घेत लसीकरण वाढवण्यासाठी भर देण्याच्या सूचना 


बाळाचे लसीकरण न घेण्याचं काही ठिकाणी प्रमाण, अशा ठिकाणी पालिका प्रशासन मौलवींची आणि धर्मगुरुंची मदत घेत लसीकरण करण्यावर भर दिला जाणार

Wardha News: राज्य परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग उत्पन्नात राज्यात प्रथम, 21 दिवसात 6 कोटी रुपयांचे उत्पन्न

Wardha News: दिवाळी कालावधीत वर्दळ व गर्दी बघता 21 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने विभागनिहाय प्रतिदिन चालनिय किलोमीटर व प्रतिदिन उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार महामंडळातील प्राप्त उत्पन्नाची सर्व विभागाची प्रतवारी ठरविण्यात आली होती. वर्धा विभागाने महामंडळाच्या सर्व विभागातील प्रतवारीनुसार सर्वात जास्त उत्पन्न प्राप्त करुन राज्यात प्रथम क्रमांक  पटकाविला. 
सदर कालावधीत वर्धा विभागाने 11 लाख 11 हजार 578 प्रवाशांची  वाहतुक करुन 6 कोटी 8 लाख 52 हजार 291 रुपयाचे उत्पन्न प्राप्त केले.

Yavatmal News: चोरीच्या संशयावरून युवकास मारहाण; मारहाणीत युवकाचा मृत्यू; तिघे अटकेत

Yavatmal News: यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील मादणी या गावात चोरीच्या संशयातून एका तीस वर्षीय युवकाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. मंगेश लक्ष्मण डेहणकर (39,वर्ष रा. मादणी) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी निलेश गजानन जतकर (32), संतोष सुरेश चौधरी (28) आणि सागर गजानन जतकर (30) वर्ष सर्व (रा. मादणी) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांचे नाव आहे.

Ambernath News : अंबरनाथमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून गांधीगिरी

Ambernath News : अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानाच्या जागेत माता पिठोरीदेवी नावाचं हॉटेल अनधिकृतपणे उभारण्यात आलं आहे. याविरोधात शाळेने पालिकेकडे तक्रारी केल्या असून पालिकेने मात्र या हॉटेलवर कारवाई केली नव्हती. त्यामुळे बालदिनी मूक आंदोलन करण्याचा इशारा शाळेने दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात हॉटेल चालक न्यायालयात गेल्याचं समोर आल्यानंतर शाळेनं हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेत जाऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना गुलाबाचं फुल भेट दिलं आणि गांधीगिरी पद्धतीने आमचं खेळाचं मैदान वाचवा, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे आता पालिका याबाबतीत काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोल्हापुरात स्क्रॅपच्या गोदामाला आग, लाखोंचा स्क्रॅप जळून खाक

Kolhapur News : कोल्हापुरातील पट्टणकोडोलीत लिंगाप्पा माळी यांच्या स्क्रॅपच्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा स्क्रॅप जळून खाक झाला. स्थानिक, अग्निशामक दल, पोलीस यांच्या प्रयत्नाने आग विझवण्यात आली. आगीत लाखोंचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Ambernath Accident News : अंबरनाथमध्ये भरधाव कारचा भीषण अपघात एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ घडली घटना

Ambernath Accident News : अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. MH 05 EJ 1835 क्रमांकाची एक एर्टीगा कार भरधाव वेगात बदलापूरहून अंबरनाथकडे येत होती. मात्र सुदामा हॉटेलजवळ येताच या कारने आधी स्ट्रीट लाईटच्या पोलला, नंतर एका झाडं विक्रेत्याच्या झोपडीला आणि मग एका मोठ्या झाडाला धडक दिली आणि ही कार थेट पलटी झाली. यामध्ये कारमधील चौघांपैकी दोघे किरकोळ जखमी, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हा अपघात नेमका कशामुळे घडला? तसंच अपघातावेळी चालकानं मद्यपान केलं होतं का? या बाबत पोलीस तपास करतायत.

Bharat Jodo Yatra at Vidarbha : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल

Bharat Jodo Yatra at Vidarbha : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात दाखल


हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका वरून पैंनगंगा नदी ओलांडत भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशीम जिल्ह्यात दाखल झाली.


पुढची पाच दिवशी ही यात्रा विदर्भातील वाशीम, अकोला व बुलढाणा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे


7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या भारत जोडो यात्राने  7 नोव्हेंबरला तेलंगनातून देगलूर मार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता.


आज बिरसा मुंडा जयंती आहे त्यामुळे आदिवासी बांधव देखील मोठ्या संख्येने आज भारत जोडे यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.

Mumbai News : मुंबईत गोवरचा वाढता उद्रेक, गोवरचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय, गोवरची एकूण रुग्णसंख्या 126 वर

Mumbai News : मुंबईत गोवरचा वाढता उद्रेक, गोवरचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय, गोवरची एकूण रुग्णसंख्या 126 वर 


मागील दोन महिन्यातील आकडेवारी 99 वर, कस्तुरबा रुग्णालयात 61 रुग्णांवर उपचार सुरु 


सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व विभागात, तुलनेनं गोवंडीत सर्वाधिक रुग्णसंख्या 


केंद्रीय उच्चस्तरीय समिती गोवरसंदर्भात राज्य सरकारकडे सविस्तर अहवाल देणार


केंद्रीय पथकातील सदस्यांकडून ठिकठिकाणी आढावा घेतल्यानंतर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना 


उद्रेक असलेल्या विभागात सर्वेक्षणामार्फत दररोज ताप, पुरळ असलेल्या नवीन रुग्णांचा शोध घेण्याच्या सूचना 


लक्षणे असलेल्या रुग्णांना दुसऱ्या दिवशी पाठपुरावा करणे, अतिरिक्त लसीकरण सत्राचे आयोजन करणे, रुग्ण दाखल करण्याच्या सुविधा वाढविणे, आरोग्य सेविका आणि खासगी डाॅक्टरांना गोवरच्या उद्रेकाबाबत अवगत करणे, लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना 


कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या वयोगटातील विभागवारी 


0 ते 8 महिने : 8 रुग्ण 
9 ते 11 महिने : 5 रुग्ण 
1 ते 4 वर्ष : 31 रुग्ण 
5 ते 9 वर्ष : 14 रुग्ण 
10 ते 14 वर्ष : 0 रुग्ण 
15 वर्ष आणि त्यावरील : 3 रुग्ण 


ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या : 6

Bharat Jodo Yatra at Hingoli : भारत जोडो यात्रेचा आज नववा दिवस





Bharat Jodo Yatra at Hingoli : आज नवव्या दिवशी जेव्हा पहाटे सहा वाजता राहुल गांधी यांची यात्रा हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील फाळेगाव फाटा येथून सुरू झाली. तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. सकाळी सहा वाजता शेकडोचा जनसमुदाय या यात्रेत सहभागी झाला. सुरक्षेच्या दृष्टीने राहुल गांधी यांच्या यात्रेचा अत्यंत मजबूत सुरक्षा घेरा आहे. त्या घेऱ्याच्या आत काँग्रेस नेत्यांना, पदाधिकाऱ्यांन शिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. 






Mumbai Fire News : मुंबईतील चेंबूर परिसरात स्तित शिवाशीष कॉन्प्लेक्समध्ये लागली आग

Mumbai Fire News : आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. सुदैवानं, या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Pune News : पुण्यात आता पाळीव प्राण्यानं सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाकडून 500 रुपयांचा दंड

Pune News : पुण्यात आता पाळीव प्राण्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यस्थापनाला ही जबाबदारी सोपविण्यात आलीय. यामधे पाळीव कुत्री आणि मांजरांचा समावेश आहे. शहरात कुत्री आणि मांजरांची नोंद करणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर पुणे महापालिकेकडून हे पुढचे पाऊल उचलण्यात आलय. पाळीव प्राण्यांना त्यांचे मालक सकाळच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी आणि उद्यानांमधे घेऊन येतात आणि त्यामुळे सर्वत्र घाण पसरते अशा तक्रारी महापालिकेकडे येण्याच प्रमाण वाढल्यानंतर महापालिकेकडून हे पाऊल उचलण्यात आलय. पुण्यात अशाप्रचारचा पहिला दंड कोथरुड भागात आकारण्यात आलाय. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Nagpur Crime : गेल्या 24 तासात तिघांच्या हत्येच्या घटनेने नागपूर हादरले, गुन्हे कमी झाल्याचा पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह


Nagpur Crime : 24 तासात तब्बल तिघांच्या हत्येच्या घटनेने नागपूर (Nagpur) हादरले. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी मित्राची हत्या (Murder In Nagpur) केली आणि मृतदेह विहिरीत फेकून दिले. दुसरी घटना पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली, तर तिसरी घटना नागपूर शहर जवळच्या बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीसांच्या खबऱ्या असल्यामुळे दोघांनी सुनील भजे नामक इसमाची हत्या करण्यात आली. यात महत्वाची बाब म्हणजे तीनही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना (Nagpur Police) यश आले आहे. 


चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रिये विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी, लिखित स्वरूपात बाजू मांडण्याचे आदेश


धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रिये विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) याचिकेवर दिल्ली हायकोर्टात (High Court) उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे कोर्टाने आज आदेश दिले आहेत. तीन पानांमध्ये संक्षिप्तपणे आपला रिप्लाय देण्याचा कोर्टाने आदेश दिले आहेत. 


चिन्ह गोठवण्याच्या विरोधात  ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीत आज ठाकरे गटानं आपल युक्तिवाद केला. "निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीने नियमांचे पालन केलं नाही. दोन बाजूंमध्ये डिस्प्युट आहे, हे ठरवण्याआधी तो नेमका कशा पद्धतीचा आहे हे विचारात घ्यायला पाहिजे होतं. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असताना चिन्हाचा निर्णय कसा काय होऊ शकतो? हा माझा, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष. अपात्रते संदर्भात भविष्यात काही निर्णय विरोधात लागला तर दरम्यानच्या काळात आमचं भरून झालेले नुकसान कसं आणि कोण भरून देणार? पोटनिवडणूक तोंडावर होती म्हणून चिन्ह गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला. समोरचा पक्ष तेव्हा पोटनिवडणूक लढायची आहे असे सांगत होता‌. पण लढला नाही. आता ही पोटनिवडणूक संपली आहे, ज्या उद्देशाने तात्पुरता निर्णय दिला तो निकाली निघाली. आता निवडणूक आयोगाने स्थिती पूर्ववत करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात केली आहे.


ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात हाणामारी, किसन नगर येथील घटना


ठाण्यातील किसान नगर येथे शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाकडून ठाण्यात मेळावा घेण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मेळाव्याच्या ठिकाणी आल्याने दोन्ही गटात वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे हाणामारी करताना दिसत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, आज किसान नगर भागात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ठाण्यातील हा भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील भाग मानला  जातो. हा भाग शिंदे यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण येथूनच त्यांना सर्वाधिक मतदान होतं. याच ठिकाणी ठाकरे गटाने आज मेळावा घेतला. येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी हा मेळावा आयोजित केला होता. त्याठिकाणी अचानक शिवदे गटाचे काही माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते आले. यानंतर दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला. यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. ज्यावेळी ही हाणामारी होतं होती, त्यावेळी राजन विचारेही घटनास्थळी उपस्थित होते. यासोबतच या ठिकाणी केदार दिघे हे देखील उपस्थित होते. तसेच शिंदे गटाकडून माजी नगरसेवक योगेश जानकर येथे उपस्थित होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.