Maharashtra News LIVE Updates 14 December 2022: सीमावादाच्या चर्चेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई संसदेत दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Dec 2022 10:18 PM
बैठक संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी

बैठक संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी गेले होते. तिथं पंधरा ते वीस मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली.  त्यावेळी  कर्नाटकचे मुख्यमंत्री तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित विषयावर खलबतं झाल्याची शक्यता आहे. 

नंदुरबार: जिल्ह्यात नवापूर आणि शहादा परिसरात जोरदार पावसाला सुरुवात

नंदुरबार:- जिल्ह्यात नवापूर आणि शहादा परिसरात जोरदार  पावसाला सुरुवात...   अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता....


कापूस ,केळी ,मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता.....


जिल्ह्यात दोन दिवसापासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका

शरद पवार धमकी कॉल प्रकरण,  आरोपी नारायण कुमार सोनीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

शरद पवार धमकी कॉल प्रकरण, 


आरोपी नारायण कुमार सोनीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी


गिरगाव कोर्टात आरोपीला करण्यात आलं होतं हजर 


शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी गेल्या 4/5 महिन्यांपासून सतत धमकीचे फोन केल्याबद्दल अटक


मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे


मुंबई पोलिसांनी बिहारमधून आरोपी नारायण कुमार सोनीला ताब्यात घेतलं


तो मानसिकदृष्ट्या काहीसा विक्षिप्त असल्याची कोर्टात पोलिसांकडून माहिती

कर्नाटक महाराष्ट्र सीमवाद Update : जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये यावर कोणताही वाद घालणार नाहीत : अमित शहा

कर्नाटक महाराष्ट्र सीमवाद Update : जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये यावर कोणताही वाद घालणार नाहीत. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री एकत्रित बसतील आणि यावर चर्चा करतील. या दोन राज्यांतील लहानसहान मुद्द्यांवर चर्चा तीन मंत्री करतील. दोन्ही राज्यातील व्यापारी, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नयेत यासाठी एका सिनियर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करतील. अशी बैठकीत चर्चा झाली. 

अरुण भेलकेला पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने UAPA कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा

माओईस्ट नेता अरुण भेलकेला पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने UAPA कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा सुनावलीय.  देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल, देशाच्य अखंडतेला धोका निर्माण होईल असे साहित्याच्या प्रचार - प्रसार केल्याबद्दल भेलकेला विविध कलमांच्या अंतर्गत पाच वर्षांच्या चार, सात वर्षांची एक आणि दोन महिन्यांच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्यात.  या सर्व शिक्षा अरुण भेलकेला एकत्रच भोगायच्या आहेत.  अरुण भेलके हा 2014 मधे पुण्यातील कासेवाडी भागातून ए टी एस ने अटक केली होती.  अरुण भेलके हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील असुन तो आणि त्याची पत्नी खोट्या नावाने पुण्यात राहात होते. संजय कांबळे हे खोटं नाव त्याने त्यासाठी धारण केलं होतं. पुण्यातील कासेवाडीत त्याने देशभक्ती युवा मंच हे संघटन स्थापन केलं होतं आणि शहरातील तरुणांन नक्षलवादी चळवळीकडे वळवण्याचा, त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्याचा त्याचा प्रयत्न होता. 

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद Update: गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद Update: गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद Update: गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद Update: गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले

Basavraj Bommai : सीमावादाच्या चर्चेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई संसदेत दाखल

Basavraj Bommai : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून जो वाद रंगला होता. त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्लीत पोहोचले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही बैठक सुरु होणार असून पार्लिमेंटमधल्या लायब्ररी बिल्डींगमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. 

Wardha News: पोलीस उपनिरीक्षकाला 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

 आरोपीची बेल रद्द न होण्याकरता तसेच मालमत्ता जप्त न करण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात पत्नीला आरोपी न करण्याकरता तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे..वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विवेक जानराव लोणकर याला रंगेहात अटक केली आहे.. ही कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आरती चौकात असलेल्या नर्सरीच्या प्रवेशद्वारासमोर केलीय...

Indapur Rain Updates: इंदापूरमधील भाजीपाला सह फळे उत्पादक शेतकरी धास्तावले
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि तालुक्यात  गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तर रात्रीच्या दरम्यान काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने रब्बी हंगाम धोक्यात आलाय. तरकारी, पिके, फळे आणि फुले यावर वातावरण बदलाचा परिणाम झाला असून पिकांवर रोगराई वाढल्याने शेतकरी अडचणीत आलाय. अचानक वातावरणातील बदल आणि पावसामुळे  द्राक्षे, पेरु फळबागाधारक शेतकरी पुरता धास्तावलाय. वारंवार औषध फवारणी करावी लागत असून त्यातच अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने  बळीराजाला मोठा फटका सहन करावा लागतोय.

 
Hingoli Rain News: हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा भागात जोरदार पावसाची हजेरी 





Hingoli Rain News:   हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे . आज हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा जवळा-पांचाळ दिग्रस या गावांच्या शिवारामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी झालेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे .गहू हरभरा ज्वारी तूर यासह अन्य फळबागा यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे


 

 



 


Palghar Rain Update: पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

पालघर: पालघर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी


जव्हार मोखाडा विक्रमगड भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस


वीटभट्टी सह गवत पावली व्यापारी ही संकटात तर रब्बी पिकांना ही फटका बसण्याची शक्यता

Nashik Rain : नाशिक शहरात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ 

Nashik Rain : नाशिकमध्ये आज सकाळपासून हवामानात बदल जाणवत होता.. ढगाळ हवामानासह हवेत गारवा जाणवत असल्याने पावसाची शक्यता होती. अखेर साडे चार वाजेच्या सुमारास नाशिक शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आल्याने पाऊस सुरु झाल्याने नाशिककरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.  

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, सीमावादावर गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत होणार चर्चा

CM Eknath Shinde:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर गृहमंत्री अमित शाह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. 

Jalgaon जळगावात सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ; 24 तासात बाराशे रुपयांची वाढ

Jalgaon: जळगावात सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी 56 हजार 392 रुपयांचा भाव झाला आहे. सोन्याच्या भावांमध्ये गेल्या 24 तासात बाराशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.  

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज घरबडेसह तिघांना जामीन मंजूर

Pune News: चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या मनोज घरबडेसह तिघांना जामीन मंजूर. शनिवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती शाईफेक, तिघांना पोलिसांनी केली होती अटक. 


- शाईफेक करणाऱ्या तिघांवर 307 कलामासह इतर कलम लावण्यात आले होते,


- विरोधकांनी भाजपावर टीका केल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न (307) हे कलम काल मंगळावारी कमी केले होते, 


- राजकीय दाबापोटी हे कलम लावण्यात आल्याचे आरोपी चे वकील सचिन भोसले यांनी सांगितलं होतं,

महाविकास आघाडीच्या 17 तारखेच्या मोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचाही पाठिंबा

Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीच्या 17 तारखेच्या मोर्चाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा देखील पाठिंबा दिला आहे. विधानभवनमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा महाविकास आघाडीला समर्थनाचे पत्र मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

Delhi Cirme News: राजधानी दिल्लीत विद्यार्थीनीवर अॅसिड अटॅक; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार

पालघरमध्ये रिअॅक्टर टॅंक साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगारांचा गुदमरुन मृत्यू

Palghar News : रिअॅक्टर टॅंक साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या वाडामध्ये घडली आहे. सचिन बाळकृष्ण भोईर आणि सचिन यशवंत करले अशी मृत कामगारांची नावं आहेत. हे कामगार रिअॅक्टर टॅंक साफ करायला उतरले असताना त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. वाडा पोलीस ठाण्यात या घटनेनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत

Sanjay Raut: बेळगावात केंद्रीय यंत्रणा पाठवणे आवश्यक, मराठी बांधवांवर दडपशाही सुरू असल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप

Sanjay Raut: बेळगावात केंद्रीय यंत्रणा पाठवणे आवश्यक असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. कर्नाटक सरकारकडून मराठी बांधवांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 


पंढरपुरात ऊसतोड मजुरांना घेऊन जाणार ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडला, 5 जणांचा मृत्यू

Pandharpur Accident : पंढरपूर तालुक्यातील करकम्ब परिसरात ऊसतोड कामगारांना‌ घेऊन‌ जाणारा ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडला. या अपघातात तीन महिलांसह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. ऊसतोड मजुरांना ऊसाच्या फडात घेऊन जात असताना ट्रॅक्टरला मोठा अपघात झाला. ट्रॅक्टर उजनी कालव्यात पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तीन ऊसतोड मजूर महिलांसह दोन‌ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर जवळच्या करकंब परिसरात घडली. घटनेनंतर पोलिसांनी जखमी मजुरांना‌ करकंब येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस पुढील तपास करत असून अपघातात दोषी कोण यांचा शोध घेत आहेत.

Ambernath News: अंबरनाथमध्ये दुचाकीच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Ambernath News: अंबरनाथमध्ये दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झालाय. गेल्या 9 दिवसांपासून या तरुणीची मृत्यूशी झुंज सुरू होती. याप्रकरणी दुचाकी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर 5 डिसेंबर रोजी रात्री अनिकेत भडांगे हा तरुण त्याच्या इतर दोन मित्रांसह दुचाकीवरून भरधाव वेगात उल्हासनगरकडे जात होता. यावेळी रेश्मा गुरुनानी ही तरुणी गॅलेक्सी मॉलच्या समोर रस्ता ओलांडत असताना तिला अनिकेत याने भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात रेश्मा सोबतच अनिकेत आणि त्याच्या इतर दोन मित्रांनाही जबर दुखापत झाली. यानंतर या चौघांवरही रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अनिकेतविरोधात बेदरकारपणे वाहन चालवणे आणि दुखापत पोहोचवण्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र यातील जखमी रेश्मा गुरुनानी ही तरुणी मागील 9 दिवसांपासून कोमात होती. तिचा आज उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दुचाकीचालक अनिकेत भडांगे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

Badlapur News: बदलापुरात राष्ट्रवादीकडून कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 'शारदाई' पुरस्कार

Badlapur News: बदलापुरात राष्ट्रवादीकडून कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या महिलांना मातोश्री शारदाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


बदलापुरात अनेक महिलांनी स्वकष्टावर आपलं कर्तृत्त्व सिद्ध केलंय. अनेक महिलांनी स्वतः काबाडकष्ट करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देत मोठ्या पदांवर पोहोचवलंय. तर बदलापूर शहरात राहणाऱ्या अनेक परिचरिकांनी कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे जीव वाचवलेत. यात 26/11 च्या हल्ल्यात कामा हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या परिचारिका अलका कुलथे यांचाही समावेश होता. या सर्व कर्तृत्ववान महिला आणि मातांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसनं मातोश्री शारदाई पुरस्कार देत सन्मान केला. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड, जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, प्रमोद हिंदुराव यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Dhule Weather Updates: धुळे जिल्ह्यात हवामान बदलाचा परिणाम, तापमानातील बदलांमुळे जनजीवन विस्कळीत

Dhule Weather Updates: धुळे जिल्ह्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम हा जनजीवनासह रब्बी पिकांवर दिसून येत आहे. तापमानात सतत बदल होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाल असून, गहू पिकाची वाढ खुंटली आहे, तर हरभरा पिकावर किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. आठवड्याभरापासून तापमानात सतत बदल होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय. पाच अंशापासून तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे. दरम्यान ह्या बदलत्या वातावरणामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. 

Ambernath News: अंबरनाथची मुख्य स्मशानभूमी मृतावस्थेत!

Ambernath News: अंबरनाथ शहरातील हिंदू स्मशानभूमीची सध्या मोठी दुरवस्था झालीये. स्मशानभूमीतील लोखंडी दहन स्टँड तुटले असून त्यामुळे जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृताच्या नातेवाईकांवर आलीये. त्यामुळं अंबरनाथकरांचे मृत्यूनंतरही हाल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. 


अंबरनाथ पश्चिमेला पालिकेची मुख्य हिंदू स्मशानभूमी असून तिथे मृतदेह दहनासाठी सहा लोखंडी स्टँड होते. यापैकी 3 स्टँड तुटले असून उरलेल्या तीन स्टँडवर सध्या मृतदेहांवर अंत्यविधी करावे लागतायत. त्यात एकादिवशी 3 पेक्षा जास्त मृतदेह आले, तर उरलेल्या मृतदेहांवर जमिनीवरच अंत्यसंस्कार करावे लागतायत. तर आदल्या दिवशी अंत्यसंस्कार केलेल्यांच्या अस्थी लगेच दुसऱ्या मृतदेहाला जागा देण्यासाठी उचलाव्या लागतायत. गेल्या सहा महिन्यांपासून स्मशानभूमीची अशी दुरवस्था असताना अंबरनाथ पालिकेकडून मात्र याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. त्यामुळे 'विकासाचा अंबरनाथ पॅटर्न' अशी जाहिरात करणाऱ्या अंबरनाथ पालिकेने त्यांच्या स्मशानभूमीकडे लक्ष देण्याची मागणी अंबरनाथकर करतायत.

IPS Transfer: राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IPS Transfer: राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते (Sadanand Date) यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Argentina Vs Croatia FIFA World Cup 2022 Semifinal: लिओनेल मेस्सीची जादू कायम; अर्जेंटिनाचं पटकावलं तिकीट टू फिनाले

FIFA World Cup Argentina vs Croatia: लिओनेल मेस्सीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या अर्जेंटिनाच्या (Argentina) फुटबॉल संघानं फिफा विश्वचषक 2022 च्या (FIFA World Cup 2022) फायनल्समध्ये धडक दिली आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या विश्वचषकाच्या सेमीफायनल्समध्ये मंगळवारी रात्री उशिरा अर्जेंटिनानं क्रोएशियाचा (Croatia) 3-0 असा पराभव केला. अर्जेंटिनानं 2014 नंतर पहिल्यांदाच फिफाची फायनल गाठली आहे. आता अर्जेंटिना यंदाच्या विश्वचषकावर आपलं नाव कोरणारण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज दिल्लीमध्ये असणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई हे देखील आज दिल्लीत असणार आहेत. ते देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊ, 


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत असतील. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.


महामोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक
17 डिसेंबरला होणाऱ्या मोर्चा संदर्भात आज अजित पवारांच्या दालनात मविआच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.


पुण्यात आजपासून सवाई गंधर्व महोत्सव सुरू 
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 68वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav) आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवायचा मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर शाश्वती मंडल आणि रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. पहिल्या दिवशीची सांगता उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने मैफिल रंगणार आहे. 14 ते  18 डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार असून कार्यक्रम स्थळी सुमारे 7 ते 8 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.