Maharashtra News Updates 13 January 2023 : सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही : नाना पटोले...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jan 2023 11:43 PM
पन्नास लाखांसाठी तिघांचे अपहरण, आरोपी जेरबंद






पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातून पन्नास लाख रुपयांच्या खंडणीसाठी तीन इसमांचे अपहरण करण्यात आले होते.  या गुन्ह्यातील आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत अपहरत इसमांची सुखरुप सुटका केलीये... हर्षप्रताप राजपुत, प्रतिष जगदाळे आणि किसनकुमार गुप्ता यांचे अपहरण झाले होते... खंडणीचे पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देवुन आरोपींनी त्यांना मारहाण केली होती... याबाबत पुण्याच्या मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता... याबाबत पुणे पोलीस तपास करत असताना आरोपींनी अपहरत केलेल्या व्यक्तींना दौंडमार्गे-अहमदनगरचे दिशेने नेल्याची माहिती मिळाली होती...दरम्यान याबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही अपहरण झालेल्या व्यक्तींचा शोध घेत होतं...स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्रीगोंद्याच्या काष्टी येथील हॉटेल राजश्रीच्या रुममध्ये काही इसमांना डांबून ठेवण्यात आले आहे...या माहितीच्या आधारे पथकाने संशयीत आरोपींचा पाठलाग करुन त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. विशाल मदने, विजय  खराडे , प्रविण शिर्के अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नाव आहेत.






नंदुरबार तालुक्यातील करणखेडा येथील व्यापारी संकुलला भीषण आग...
नंदुरबार तालुक्यातील करणखेडा गावाजवळ आसलेल्या व्यापारी संकुल ला लागलेल्या आगीत दोन ते तीन दुकाने जळून खाक झाली असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आगीची घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळ वर धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.नंदुरबार नगरपालिकेच्या आग्निशामक दलाच्या बंबानी आगीवर. नियंत्रण मिळवले.या व्यापारी संकुलात चहाचे हॉटेल आणि कापूस खरेदी करणारे दुकाने आसल्याने आगीने भीषण रूप धारण केले होते आगीत दोन ते तीन दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे .मात्र आगीचे कारण अजून अस्पष्ट असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
इक्बालसिंह चहल यांना ईडीचं नोटीस

मुंबई बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीचं नोटीस, सोमवारी चौकशीसाठी बोलवण्यात आलेय. 

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात जाऊन घेतली भेट  

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. अपघातानंतर आठवड्याभरापासून मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात मुंडेवर उपचार सुरु आहेत. मुंडेची प्रकृती सध्या सुधरत असल्याची माहिती मिळत आहे.  

शरद पवारांनाही प्रतिवादी करा, केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती

शरद पवारांनाही प्रतिवादी करा, केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती


गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवारांना प्रतिवादी करण्याची मागणी केतकीचा नव्यानं अर्ज


या अर्जावर 18 जानेवारीला हायकोर्ट सुनावणी होणार


शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल केतकीविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल


मात्र त्यापैकी शरद पवारांनी एकही तक्रार स्वत: दिलेली नाही, त्यामुळे त्यांनाही यात प्रतिवादी करण्याची केतकी चितळेची मागणी

दहा वर्षांपूर्वी कोयत्याने वार करून हत्या करणाऱ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पुण्याच्या हडपसरमध्ये 2013 साली कोयत्याने वार करून, हत्या झालेल्या प्रकाश गोंधळे प्रकरणातील दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. दहा वर्षांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं असतं तर आज कोयता गॅंग उदयास आली नसती. अशी प्रतिक्रिया मयत प्रकाश गोंधळेचे भाऊ राजू गोंधळे यांनी दिलीये. दहा वर्षाने का होईना अखेर न्याय मिळाल्याने त्यांनी पोलीस प्रशासन आणि न्यायालयाचे आभार मानले आहेत. आरोपींना जन्मठेपेची मिळालेली शिक्षा हीच प्रकाश गोंधळेना मिळालेली खरी श्रद्धांजली असल्याची भावना त्यांनी राजू गोंधळेनी व्यक्त केली.

मुंबईची पश्चिम उपनगरी जोडली गेली मेट्रोने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 तारखेला मेट्रो सेवन चा दुसरा टप्पा आणि मेट्रो टू ए चा दुसरा टप्पा देखील लोकर्पित केला जाणार आहे. आज मेट्रो टू ए म्हणजेच येल्लो लाईनच्या अंधेरी पश्चिम या स्थानकाची पाहणी एमएमआरडी आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास यांनी केली. या पाहणीच्या वेळी त्यांनी अंधेरी पश्चिम स्टेशन त्याचबरोबर या मार्गावर धावणारी मेट्रो आणि इतर सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी देखील खास बातचीत केली. 2023 या वर्षात एमएमआरडीए कडून हे पहिले गिफ्ट असून असे अनेक गिफ्ट मुंबईकरांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

शरद पवारांनाही प्रतिवादी करा, केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती

शरद पवारांनाही प्रतिवादी करा, केतकी चितळेची हायकोर्टाला विनंती


गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवारांना प्रतिवादी करण्याची मागणी केतकीचा नव्यानं अर्ज


या अर्जावर 18 जानेवारीला हायकोर्ट सुनावणी होणार


शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल केतकीविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल


मात्र त्यापैकी शरद पवारांनी एकही तक्रार स्वत: दिलेली नाही, त्यामुळे त्यांनाही यात प्रतिवादी करण्याची केतकी चितळेची मागणी

Aaditya Thackeray : स्वत:ला ओके आणि महाराष्ट्राला धोके अंसच हे सरकार पुढे जातंय : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोघलाई आली आहे असं वाटतं. गणपती मिरवणुकीत फायरिंग करण्यात आली. आमदाराच्याच बंदुकीतून गोळी चालवण्यात आली होती. तरी देखील आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळसारखे अनेक प्रकार राज्यात झाले आहेत. परंतु, कोणावरच कारवाई झालेली नाही. गेल्या सहा महिन्यात आम्ही सतत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहे. परंतु, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके असे सध्या राज्यात सुरू आहे. याबरोबरच अनेकवेळा महापुरूषांचा अपमान दरून देखील राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे अनेक मुद्दे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले. 

सातपुड्याच्या दुर्गम भागात शिक्षणाचा खोळंबा,  शाळेला कुलूप लावून शिक्षकच गायब 

शाळांना सुट्टी नसतानाही थेट कुलूप लावून शिक्षकच शाळेतून गायब राहत असल्याचा प्रकार अतिदुर्गम भागातून समोर येत आहे. चिमलखेडीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील हे प्रकरण आला समोर आलंय. शिक्षक फक्त सोमवार ते गुरुवार याच कालावधील शाळेला येतात. त्यामुळे आठवड्यातील चारच दिवस शाळा भरत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर आपण शाळेत राहत असून शिक्षक परिषदेसाठी गेल्याने शाळेला कुलूप असल्याचे शिक्षक सांगत आहेत. परंतु, शिक्षक परिषदेला जातानाही पोषण आहार देवूच यायचे असल्याचे शासनाचे पत्रक असताना असे झालेले नसल्याचं उघड होत आहे. याबाबत शिक्षण विभागही बोलण्यास नकार देत असल्याने या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे. 
 

राज्यातील पहिला मतदार राहत असलेल्या गावाला अद्याप रस्ता नाही, सातपुड्यातील मनीबेली गावचे नागरिक त्रस्त 

राज्यात समृद्धी महामार्ग आणि अनेक विकासाच्या मॉडेलच्या गप्पा होत आहेत. मात्र, आजही सातपुड्याच्या दुर्गम भागात राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार राहतो त्या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्ते आणि विकास फक्त शहरी भागासाठी का असा प्रश्न उपस्थित होत आहे. धडगाव तालुक्यातील मनीबेलीला रस्ता कधी मिळणार आणि हे गाव कधी विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार? असा प्रश्न आता गावकरी उपस्थित करत आहेत.


 राज्यातील पहिलं गाव म्हणून नंदुरबारच्या मणिबेलीची ओळख आहे. याच मणिबेलीतून राज्यातील मतदाचे पहिल बूथ सुरु होते आणि राज्यातील पहिला मतदार देखील येथेच राहतो. मात्र स्वातंत्र्याच्या पंच्यातरीनंतर देखील या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना आजही मरण यातना भोगाव्या लागत आहेत. रस्ताच नाही, त्यामुळे विकासगंगा पोहचली नसल्याने लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा साऱ्याच समस्या येथील नागरिकांना भेडसावत असून याबाबत कधी उपयायोजना होणार? असा प्रश्न या ठिकाणेच स्थानिक करत आहेत.  

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना चार दिवस त्यांना कोणाला ही भेटू दिलं जाणार नाही...

ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना उपचारासाठी पुण्यात आणलं गेलंय. दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दुपारी बारा वाजता ते पोहचले आहेत. आज सकाळी फलटण येथील आश्रमात त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर आता पुण्यात आणलं गेलं असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बंडा तात्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी माहिती दिलीये. मात्र पुढील चार दिवस त्यांना कोणाला ही भेटू दिलं जाणार नाहीये. भेटायला येणाऱ्या व्यक्ती पासून त्यांना संसर्ग होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली गेलीये.

बेकायदा बांधकामाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या कारवाई पथकास धक्काबुक्की, निळजे गावामधील धक्कादायक घटना

कल्याण ग्रामीणमधील निळजे परिसरात अराक्षित भूखंडावर बेकायदा गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली  महापालिकेच्या कारवाई पथकास धक्काबूकी करुन घेराव घालण्यात आला. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी 17 जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील पिक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड





हिंगोली जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचा पिक विमा परतावा देण्यास वारंवार टाळाटाळ करत आहे काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये कृषी अधीक्षक कार्यालयात मोर्चा काढण्यात आला होता तेव्हा पंधरा दिवसाचे लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं परंतु कृषी विभागाने दिलेल्या आश्वासनाची वेळ संपूनही पिक विमा परतावा न मिळाल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमण झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सेनगाव येथील पिक विमा कंपनीचा कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे पिक विमा कंपनी वारंवार आश्वासन देत आहे परंतु पिक विमा परतावा देण्यास पीक विमा कंपनीकडून टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आज सेनगाव मध्ये आक्रमक झाली आहे. 





कार आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार, एक गंभीर जखमी

अकोला नांदेड महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील  मेडशी गावा जवळ कार आणि  कंटेनरची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर  एक जण गंभीर जखमी झाला आहे.  मालेगाव कडून अकोल्याकडे जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला समोरासमोर जबर धडक झाली यात कार मधील एकजण  जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला दवाखान्यात उपचार्थ नेत्यात आले आहे. अपघातग्रस्तांची नावे अजून कळू शकली नाहीत

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पतंग आणि मांजा विक्रीतून दीड ते दोन कोटींची उलाढाल

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा गुजरातच्या सीमावर्ती भागात असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो. संक्रांत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पतंगप्रेमी युवक पतंग खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून पतंग खरेदीमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. संक्रांतीच्या काळात नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये पतंग आणि मांजा विक्रीतून जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी पतंग आणि मांजाच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. संक्रांतच्या एक दिवस आधी आणि नंतर नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जात असते. त्यासाठी तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाल्याचे चित्र समोर आले आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार


सत्यजित तांबे यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची परवानगी मिळण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची हाय कमांड कडे विनंती


यासंदर्भात काँग्रेस नेते महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची चर्चा करणार


त्यानंतर महाविकास आघाडीचा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष  उमेदवाराला पाठिंबा दिल्याची घोषणा करण्यात येणार


डॉ. सुधीर तांबे यांनी माघार घेतल्यानंतर आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरल्यानंतर काँग्रेसची कोंडी


ही कोंडी फोडण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार

Amravti News: अमरावती पदवीधर निवडणूक, एका जागेसाठी 33 उमेदवार रिंगणात

अमरावती पदवीधर निवडणूक, एका जागेसाठी 33 उमेदवार रिंगणात


अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली


एकूण 34 उमेदवारांपैकी 33 उमेदवारांची उमेदवारी अर्ज वैध


गजानन नेहारे या एका उमेदवाराचे वय 30 पेक्षा कमी असल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले


16 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत

Sindhudurg News : तळकोकणात अनधिकृत वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई; 28 डंपर, 3 मोटरसायकल आणि वाळू जप्त

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत वाळू वाहतूकीवर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची महसूल विभाग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून मध्यरात्री 1 च्या सुमारास देवली सडा येथे कारवाई करण्यात आली. रेडी रेवस सागरी महामार्गावरून आतील कच्च्या रस्त्यावर देवली सडा येथे कारवाई झाली. 28 डंपर, 3 मोटरसायकल आणि डंप केलेला वाळू साठा ताब्यात घेतला. डंपर ड्रायव्हर पळून गेले तर जेसीबीही पळून गेली. मार्गावर अनेक ठिकाणी वाळू डंप केलेली दिसून आली आहे. डंपर आणि डंप वाळू साठा यांचा पंचनामा सुरू झाला आहे. 

 एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची अजित पवारांनी घेतली आंदोलनाचा दखल

 एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची अजित पवारांनी आंदोलनाचा दखल घेतली आहे. अजित पवारांनीपाठिंबा दर्शवला आहे.  विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घ्या, असा अजित पवारांचा अंकुश काकडेंना फोन केला आहे. त्यांच्या फोननंतर अंकुश काकडे आंदोलनस्थळी दाखल झाले आहे.

Mpsc Protest : दोन परिक्षार्थींना आंदोलनातून बाहेर

Mpsc आंदोलनातील दोन परीक्षार्थी तीव्र होण्यासाठी चिथावत होते. थेट अलका चौकात ठिय्या मांडून रास्ता रोको करू, अशी भूमिका ते मांडत होते. त्यावेळी त्या दोन परिक्षार्थींना आंदोलनातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे काही काळ गोंधळ झाला, पण नंतर लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू झालं.

पुण्यात MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर!

Pune MPSC Protest : एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी(MPSC) आज राज्यभर आंदोलन करत आहेत. युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आहे. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्याच्या शेजारच्या शहरातील विद्यार्थीही यात सहभागी झाले आहेत. 

Gondia News : वाळूची वाहतूक करणाऱ्या 21 ट्रॅक्टरवर कारवाई; 1 कोटी 27 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Gondia News : गोंदिया पोलिसांनी तिरोडा तालुक्याच्या महालगाव वाळू घाटावर कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे 21 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, महालगाव घाटातून दिवसाढवळ्या वाळूचे उत्खनन आणि वाहतूक होत असताना महसूल प्रशासन गप्प का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. गोंदिया पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत महसूल विभागाची पोलखोल झाली असून या कारवाईत 21 वाळू तस्करावर गुन्हे नोंद करत त्यांना अटक केली आहे. या कारवाईत 1 कोटी 27 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध दवनिवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंदिया पोलिसांची मागील काही दिवसातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. या कारवाईने वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Beed News : गैरव्यवहार प्रकरणी चर्चेत आलेल्या बीडमधील द्वारकादास मंत्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांची आज होणार निवड

Beed News : गैरव्यवहार प्रकरणी चर्चेत आलेल्या बीडमधील द्वारकादास मंत्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांची आणि पदाधिकाऱ्यांची आज निवड करण्यात येणार आहे. मंत्री बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, आता याच बँकेच्या संचालक मंडळाची निवड झाली असून यामध्ये आज अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये बँकेचे अध्यक्ष म्हणून आदित्य सारडा यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Beed News: बीडमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे खरीप पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

Beed News: बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे खरीप हंगामातील पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम जाणू लागला आहे यामध्ये ज्वारी हरभरा आणि इतर पिकांवर धुक्यामुळे अनेक रोगांचं प्रमाण वाढला असून कडाक्याच्या थंडीमुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणू लागला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि थंडीमुळे ज्वारी आणि इतर पिकावर अळीचा प्रादुर्भाव जाणू लागलाय तर भाजीपाल्यावर देखील मोठ्या प्रमाणात करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पिकांचं नुकसान होत आहे. 

Amravati News: खासदार नवनी राणा आणि आमदार रवी राणा यांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची धडक कारवाई
Amravati News: खासदार नवनी राणा आणि आमदार रवी राणा यांच्या कृषी महोत्सवावर पोलिसांची धडक कारवाई. आचार संहितेचा भंग केला असल्याचा कारण पुढं आलं आहे.

 

अमरावती येथील सायन्स कोर मैदानात 12 ते 16 जानेवारी पर्यंत युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवामुळे पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करत संपूर्ण बॅनर काढण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्याने ही कारवाई करण्यात आली. युवा स्वाभिमान पार्टीच्या कृषी महोत्सव मधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे बॅनर पोलिसांच्या उपस्थितीत हटवले. आज सकाळपासून सायन्स कोर मैदानावर जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी सायन्सकोर मैदानावर दाखल झाले आहे. 
Latur News: लॉकर तोडताना सायरन वाजला आणि चोरटे पळाले; बुधोडा येथील प्रकार

Latur News: लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथे मध्यरात्री बँक फोडण्याचा प्रयत्न झाला .. मात्र सुरक्षा यंत्रणा योग्य प्रकारे काम करत असल्यामुळे सायरन सुरू झाला आणि चोरटे पळून गेले. काल मध्यरात्री बुधोडा येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरट्यांनी प्रवेश केला. लॉकर तोडण्याचा पर्यास करत असताना सायरण सुरू झाले. यामुळे चोरट्यांना पळून जावे लागले. ग्रामस्थांना सायारन आवाज आल्यावर पोलिसांना सूचना करन्यात आल्या. औसा पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.  

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही : नाना पटोले

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसला धोका दिला आहे. त्यामुळं सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. 

Lisa Marie Presley Died: अमेरिकन गायिका लिसा मेरी प्रेस्ली यांचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Lisa Marie Presley Died: मनोरंजन विश्वातून एक दुखःद बातमी. प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचं निधन झालं आहे. 54 वर्षीय गायिका लिसा यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिसा यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथेच त्यांचा उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एएनआयनं यासंदर्भात माहिती दिली. 

उद्या भोगी निमित्त राज्यभरातील येणाऱ्या हजारो महिला भाविकांना पहाटे चार ते साडेपाच या काळात रुक्मिणी मातेस भोगी करता येणार , पुरुषांनी उद्या मुखदर्शन घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

भोगी आणि मकर संक्रांत हा महिलांचा सण असतो आणि भोगी दिवशी राज्यभरातील हजारोंच्या संख्येने महिला रुक्मिणी मातेस भोगी करण्यासाठी येत असल्याने पुरुषांनी मंदिरात आल्यास केवळ मुखदर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भोगी दिवशी राज्यभरातील महिला रुक्मिणीला भोगी करण्यासाठी येत असतात . ज्यांना मातेला भोगी करायची आहे त्यांनी पहाटे चार ते साडेपाच या वेळेतच रुक्मिणी मातेला भोगी करावी असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. भोगी निमित्त रुक्मिणीच्या नित्योपचारात देखील बदल करण्यात आला असून महिलांची भोगी झाल्यावर पहाटे साडेपाच नंतर रुक्मिणी मातेस अलंकार व पोशाख केला जाणार आहे . यानंतर पहाटे सहा वाजलेपासून राज्यभरातून आलेल्या महिला भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरु होणार आहे . दरम्यान या महिलांसोबत आलेल्या पुरुष भाविकांनी उद्या विठ्ठल रुक्मिणीचे पायावर दर्शन घेण्यापेक्षा मुखदर्शन घ्यावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. राज्यभरातील हजारो महिला भाविक मंदिर परिसरात जमा होणार असल्याने पोलिसांनी सध्या वेशातील पुरुष आणि महिला पोलिसांची पथके मंदिर परिसरात तैनात ठेवण्याचे नियोजन केले आहे. महिला भाविकांना चोरट्यांचा अथवा इतर कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीनेही नामदेव पायरी आणि इतर द्वारावर मोठ्या प्रमाणात महिला सुरक्षा रक्षक नेमल्याची माहिती मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

Nashik Accident : नाशिकमधील अपघातात 10 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

Nashik Accident :  नाशिकमधील पाथरेजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघाताच्या चौकशीची मागणी देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


 


 

उर्फी जावेद आज राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार 

उर्फी जावेद आज राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार 


गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात वादाच्या ठिणग्या 


अभिनेत्री उर्फी जावेद आज महिला आयोगात जाणार


सकाळी साडे अकरा पर्यंत महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती


भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात


भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मागील काळात सार्वजनिक ठिकाणीं मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तक्रार करण्याची शक्यता

Nashik Accident : सिन्नर- शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात

Nashik Accident : सिन्नर- शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहििती मिळतेय. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जातेय. मुंबईहून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसची आणि समोरुन येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसली. दरम्यान या अपघातात बसमधील प्रवासीही जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस अखेर संपला, महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे मैदानात

Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी संपला. महाविकास आघाडीकडून सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सत्यजित तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे अपक्ष लढणार आहेत. भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही, त्यामुळे या जागेवरील निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या निमित्तानं भाजप कॉग्रेसला धक्का देणार का? असा सवाल उपस्थित होतोय.

Nashik News: नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावर पाथरेजवळ भीषण अपघात, खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक

Saudi Arabia Citizenship Rules Change: सौदी अरेबियानं बदलले नागरिकत्वाचे नियम; भारतीयांवर काय परिणाम होणार?

Saudi Arabia Citizenship Rules Change: सौदी अरेबिया (Saudi Arabia) सरकारनं देशातील नागरिकत्वाबाबत (Citizenship Rules) मोठा बदल केला आहे. मात्र, हा बदल कोणाचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व बहाल करण्यासंदर्भातील आहे. नव्या नियमांनुसार, आता सौदी वंशाच्या सर्व महिलांची मुलं ज्यांनी परदेशी लोकांशी विवाह केला आहे, ते सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia News) नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Siddheshwar Maharaj Yatra: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस

Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा (Siddheshwar Maharaj Yatra) आज मुख्य दिवस असून आज नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषक सोहळा पार पडणार आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात. श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही सोलापूरमध्ये गड्डा यात्रा म्हणून ओळखली जाते. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Pune Fire : पुण्यातील सिंहगड रोडवर गॅसची पाईपलाईन फुटली

Pune Fire : पुण्यातील (Pune) सिंहगड रोडवरील दांडेकर पुलाजवळ MNGLची गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. ही घटना रात्री 12 वाजण्याच्या घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळं जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत आहेत. अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्यानं आग आटोक्यात येत नाही. या घटनेमुळं सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने वाहने जात आहेत.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Nashik News: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं

Nashik News: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. मंजिर संवर्धनाच्या कामासाठी हे मंदिर 5 जानेवारीपासून बंद होतं. याकाळात शिवलिंगला वजर्लेप लावणे, गर्भगृहला चांदीचा दरवाजा बसवणे, सभामंडपमध्ये स्टेनलस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यात आले.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो... 


13th January Headlines: एमपीएसीची तयारी करणारे विद्यार्थी आज राज्यभर आंदोलन करणार आहेत. एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीला घेऊन मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांचे आंदोलन असणार आहे.


त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले होणार


त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले होणार आहे, सकाळी 7 वाजल्यापासून. 5 जानेवारीपासून मंदिर संवर्धनाच्या कामासाठी बंद होते. शिवलिंगला वजर्लेप लावणे, गर्भगृहला चांदीचा दरवाजा बसवणे, सभामंडपमध्ये स्टेनलस स्टीलचे रेलिंग बसविण्याचे काम करण्यात आले आहे.


नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आग दुर्घटनेची आजपासून उच्चस्तरीय चौकशी


नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आग दुर्घटनेची आजपासून उच्चस्तरीय चौकशी सुरु होणार आहे. 1 जानेवारीला ही घटना घडली होती. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू तर 22 कामगार यात जखमी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी पाहणी करत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असे जाहीर केले होते. सकाळी 11 वाजता ही समिती कंपनीत दाखल होणार आहे.


भायखळा जिल्हा कारागृह राज्यात पहिली नर्सरी सूरू होणार


मुंबई – मुंबईतील महिला कारागृहात लहान मुलांसाठी भायखळा जिल्हा कारागृह राज्यात पहिली नर्सरी सूरू होणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 12.45 वाजता सुरू होणार आहे. 


नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी
 
मुंबई – राष्ट्रावादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी दिलंय हायकोर्टात आव्हान.


बाईक टॅक्सीसंदर्भात हायकोर्टात सुनावणी


मुंबई – बाईक टॅक्सीसंदर्भात हायकोर्टात सुनावणी. राज्यात बाईक टॅक्सीबाबत धोरण निश्चिती करण्यात चालढकल करणाऱ्या राज्य सरकारवर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलीय. धोरण आणि नियमावली कधी तयार होणार याची निश्चित माहिती नसताना, परवानगी नाकारणं अयोग्य आहे. असं मत हायकोर्टानं व्यक्त केलंय. राज्यात बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांची माहिती शुक्रवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश होते. 


महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धां,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार
 
पुणे – 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धांच्या समारोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे, दुपारी 4 वाजता.


सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस


श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. आज यन्नीमज्जन, तैलाभिशेक सोहळा पार पडणार आहे. सकाळी 8 नाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. पूजा झाल्यानंतर नगरप्रदिक्षणेस सुरुवात होते. यावेळी श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ सरकारतर्फे आहेर केला जातो.  हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे. तेथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात 68 लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांचा गदगीस तैलाभिषेक घालून विधीवत पूजा केली जाते. पुढे हे नंदीध्वज सोलापुरातील सर्व 68 लिंगास प्रदक्षिणा घालून रात्री हिरेहब्बूंच्या वाड्यात परत येतात.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.