Nashik Accident : लोखंडी वस्तू भरलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक, सळ्या तरुणांच्या शरीरातून आरपार; नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 8 वर
नाशिक मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. इतर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर आयशर ट्रक आणि मालवाहतूक टेम्पोमध्ये चाललेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
नाशिक शहरातील सिडको येथील 20 ते 25 रहिवाशी निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते.
धार्मिक कार्यक्रम आटवून घरी परत असताना या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात घडला.
रविवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यावेळी स्थानिकांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केलं.
या अपघातात जागीच पाच जण ठार झाले असून, रुग्णालयात उपचारादरम्यान इतर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे.
याशिवाय, अपघातातील इतर तेरा जण गंभीर जखमी असल्याची देखील माहिती समोर येत आहे. या सगळ्या जखमींवर नाशिक जिल्हा रुग्णालय आणि नाशिक शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळ्याहून लोखंडी सळ्या घेऊन जाणारा आयशर ट्रक जात होता आणि या ट्रकच्या मागच्या बाजूने या भाविकांच्या वाहनाने जोरदार धडक दिली.
हा अपघात अतिशय भीषण होता. या अपघाताची तीव्रता फोटोमधून स्पष्ट पाहायला मिळत आहे.
अपघात स्थळाची पाहाणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन थोडयाच वेळात पोहचणार आहेत. यानंतर ते रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जखमींचीही भेट घेणार आहेत.