Preity Zinta on Los Angeles Wildfires : कॅलिफोर्नियातील जंगलात वणवा पसरला असून यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अभिनेत्री प्रीति झिंटा तिच्या कुटुंबासह यावेळी लॉस एंजेलिसमध्ये असल्याने चाहते तिच्यासाठी चिंतेत आहेत. लॉस एंजेलिसमधील भीषण आगीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने स्वतःच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. लग्नानंतर प्रीति झिंटा लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक आहे, ती कामासाठी वेळोवेळी मुंबईतही येते.
कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीत अडकली प्रीति झिंटा
90 च्या दशकात बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रीती झिंटाने 2016 मध्ये जीन गुडइनफशी लग्न केलं. त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर आहे. यादरम्यान, ती भारत आणि लॉस एंजेलिस असा प्रवास करत असते. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये आहे. अलीकडेच, तिने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना सांगितलं की, आगीने शहराला वेढा दिला असला, तरी ती आणि तिचं कुटुंब सुरक्षित आहे.
भीषण वास्तव सांगणारी पोस्ट चर्चेत
लॉस एंजेलिस शहरला जंगलातील वणव्याने वेढा दिला आहे. या संकटाच्या काळात, प्रीतीने तिची आणि तिथे राहणाऱ्या इतरांची कठीण परिस्थिती सोशल मीडियावर शेअर केली. तिने तेथील भीषण परिस्थितीचं वर्णन केलं आहे. त्याच्या आजूबाजूला झालेला विध्वंस पाहून तिने एक अपडेट शेअर केली आणि लिहिलं, "मी कधीही विचार केला नव्हता की, मी असा दिवस पाहेन जेव्हा लॉस एंजेलिसमधील आमच्या परिसरांना आग लागेल. सर्वांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. आमच्या आजूबाजूला होणारा विध्वंस पाहून मला खूप दुःख झाले आहे आणि आम्ही अजूनही सुरक्षित आहोत याबद्दल देवाचे आभार मानतो."
"...जर वारा शांत झाला नाही तर काय होईल"
प्रीतीने पोस्टमध्ये सांगितलं आहे की, "जर वारा शांत झाला नाही तर काय होईल याबद्दल इतकी भीती आणि अनिश्चितता असेल असे कधीच वाटले नव्हते, कारण आमच्यासोबत लहान मुले आणि आजी आजोबा असतील. माझ्या आजोबांच्या आजोबांची विध्वंस पाहून मला वाईट वाटते आणि मी देवाचे आभार की आपण आता सुरक्षित आहोत."
आगीत अनेकांनी सर्वस्व गमावलं
प्रीती झिंटाने पुढे सांगितलं की, "ज्यांना सर्वकाही सोडावे लागले किंवा आगीत सर्वस्व गमावले त्यांच्यासोबत माझ्या भावना आणि प्रार्थना आहेत. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी आशा आहे. अग्निशमन विभाग, अग्निशमन दलाचे आणि जीवित आणि मालमत्ता वाचवण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. सर्वांनी सुरक्षित राहा."
महत्त्वाच्या इतर बातम्या :