Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Feb 2024 10:39 PM
20 फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबर सेवा राहणार बंद

Pune News : 20 फेब्रुवारीपासून पुण्यात ओला, उबर सेवा राहणार बंद


पुण्यातील प्रवशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता


20 फेब्रुवारी पासून पुणे आणि चिंचवड मधील कॅब चालकांचे काम बंद आंदोलन


कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने


जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेले दर लागू करण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचा चालकांचा आरोप


येत्या २० फेब्रुवारी पासून RTO पुणे येथे तीव्र निदर्शने व बेमुदत बंद आंदोलन करण्यात येणार

Ashok Chavan : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

Ashok Chavan Resigns : अशोक चव्हाण  (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं. 


राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असं वाटतं अशं ते म्हणाले. 

Praniti Shinde : भाजपने दबाव टाकला, ईडीची भीती दाखवली, त्यानंतरच अशोक चव्हाणांचा राजीनामा; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Praniti Shinde : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर, महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. 'भाजपने ईडीची (ED) भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे. 


अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलतांना प्रणिती शिंदे म्हणाल्यात की, "वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे. पण ही भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

Chandrashekhar Bawankule : 'काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस, आणखी मोठे नेते भाजपाच्या संपर्कात'; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला राम राम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  


चंद्राशेखर बावनकुळे म्हणाले की, मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपाच्या (BJP) संपर्कात आहेत. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Ashok Chavan : अशोक चव्हाणांसोबत तुम्हीही भाजपमध्ये जाणार का? वडेट्टीवार म्हणाले, मी चिल्लर नेता आहे का?

Ashok Chavan : अशोक चव्हाण  (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तुम्हीही भाजपमध्ये जाणार का असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना विचारल्यानंतर त्यांनी आपण काही चिल्लर नेता आहे का? असा प्रतिसवाल विचारला. 


अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय माजी आमदार अमर राजूरकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विश्वजीत कदम, अंतापुरकर जवळगावकर, अमित पटेल आणि इतर दोन-तीन मोठे नेते तात्काळ राजीनामा देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मी काही चिल्लर नेता आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

Ashok Chavan resignation news : नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अशोक चव्हाणांसोबत 6-7 आजी-माजी आमदार काँग्रेस सोडणार?

मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan resigns) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची पत्र एबीपी माझाच्या हाती लागली आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये  (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  अशोक चव्हाण हे नांदेडचे (Nanded) आमदार आहेत. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मात्र ही भेट नार्वेकरांच्या वाढदिवसानिमित्त असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही मोठे नेते आणि आजी- माजी आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही राजीनामा दिला आहे. याशिवाय माजी मंत्री नसीम खान (Naseem Khan) आणि चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांच्या नावाचीही चर्चा आहे.  

काँग्रेसला घरघर? मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाणांचा राजीनामा; चव्हाणांच्या राजीनाम्यामागे 'ही' कारणं

Ashok Chavan Resigns: नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींदरम्यान महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी आणि काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पाठवलेल्या पत्रात अशोक चव्हाणांनी काँग्रेससोबतच विधानसभेच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंना दिलेल्या पत्रात अशोक चव्हाणांनी पेनानं स्वतःच्या नावासमोर ‘माजी’ असं लिहिलं आहे. 

Devendra fadnavis :  काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात, आगे आगे देखिए, होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

Ashok chavan resignation news :  अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे. 
 

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार कोण?

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार कोण?


नसीम खान, माजी आमदार, चांदिवली


चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार, चेंबूर
राजू पारवे, आमदार, उमरेड
विकास ठाकरे, आमदार, पश्चिम नागपूर
मोहन हंबर्डे,नांदेड दक्षिण
जितेश अंतापूरकर, देगलूर (नांदेड)
सुभाष धोटे, राजुरा, चंद्रपूर
अमित झनक, रिसोड, वाशिम
अशोक चव्हाण यांना राज्य

Ashok Chavan Resign : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले?

Ashok Chavan Resign : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा  राजीनामा दिला आहे. अशोच चव्हाणांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनामा कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा झाल्यचे स्पष्ट झाले आहे. हा  राजीनामा त्यांना काँग्रसे अध्यक्ष नाना पटोले  यांच्याकडे दिला आहे. आता अशोक चव्हणांची पुढील राजकीय दिशा काय असणार यकडे सर्वांचे लक्ष लगले आहे. 

Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले?

Ashok Chavan Resign :  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा  राजीनामा दिला आहे. अशोच चव्हाणांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनामा कॉपी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.  पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या कॉपीमध्ये विधानसभा सदस्याचा पुढे माजी हा शब्द लिहण्यात आलेला आहे. या वरून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा झाल्यचे स्पष्ट झाले आहे. हा  राजीनामा त्यांना काँग्रसे अध्यक्ष नाना पटोले  यांच्याकडे दिला आहे. आता अशोक चव्हणांची पुढील राजकीय दिशा काय असणार यकडे सर्वांचे लक्ष लगले आहे. 

Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी दिला राजीनामा

Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

Akola : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव आज कामगाराच्या आंदोलनामुळे बंद
Akola : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव आज कामगाराच्या आंदोलनामुळे बंद पडलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या 400 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने लिलाव बंद पडलेयेत. बाजार समितीमधील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या पुरुष आणि महिला कामगारांना कामगार परवाना मिळावा आणि वेतन वाढावं यासाठी कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलंय. तर काही कामगार आजपासून बाजार समितीत आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेय. शेतमालाचे लिलाव बंद पडल्याने विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय.

 
Akola : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव आज कामगाराच्या आंदोलनामुळे बंद
Akola : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव आज कामगाराच्या आंदोलनामुळे बंद पडलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या 400 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने लिलाव बंद पडलेयेत. बाजार समितीमधील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या पुरुष आणि महिला कामगारांना कामगार परवाना मिळावा आणि वेतन वाढावं यासाठी कामगारांनी हे काम बंद आंदोलन सुरू केलंय. तर काही कामगार आजपासून बाजार समितीत आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेय. शेतमालाचे लिलाव बंद पडल्याने विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागलाय.

 
Wardha Rain : समुद्रपूर तालुक्यातील गिरड शिवारात गारपिटीने शेती, पिकांचे नुकसान
Wardha Rain : वर्ध्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील शेतकऱ्यांच्या शेती पिकाला गारपिटीचा तडाखा बसला आहे. देवळी तालुक्यानंतर आता ही गारपिट समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, कारंजा, सेलू तालुक्यात देखील झाली आहे. काही भागात कमी तर काही भागात जास्त असे या अवकाळी पावसातील गारपिटीचे प्रमाण आहे. समुद्रपूर तालुक्यातील पिपरी, चिखली, सालापुर, मारडा, कळमना परिसरात शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला आहे. गिरड परिसरातील पिपरी येथील अनिल दुरगे यांच्या शेतात गव्हाचे नुकसान झाले आहे, येथे गहू जमीनदोस्त झाला आहे तर चिखली येथील रंगनाथ सालवटकर यांच्या शेतात चना पिकाचे नुकसान झाले आहे. गिरड परिसरातील पिपरी येथील अनिल दुरगे यांच्या शेतीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.

 
Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार? प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले...

Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे. ते विधानभवनात राजीनामा देण्यासाठी गेल्याची माहिती आहे, पण अधिकृत माहिती नाही. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही. ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो, असं भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात असंही चिखलीकरांनी सांगितलं.

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी तीन नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता - सूत्र

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी तीन नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, लवकरच अशोक चव्हाण यांच्यासोबत या तीन नेत्यांचाही प्रवेश होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

Ashok Chavan: अशोक चव्हाण राजीनामा देऊन आजच भाजपमध्ये प्रवेश करणार? नार्वेकरांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना 
पुन्हा एकदा उधाण आले आहे. 

Election Duty : मुंबईतील जवळपास 1000 शिक्षकांना 'इलेक्शन ड्युटी, शिक्षक संघटनांचा विरोध, परिपत्रक रद्द करण्याची मागणी

Election Duty : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC), खाजगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांना निवडणुकीचे काम म्हणजेच 'इलेक्शन ड्युटी' लावण्यात आली आहे. मात्र राज्यातील शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील परिपत्रक मागे घेण्याचा आणि कामावर रुजू होण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे. 


 

Election Duty : मुंबईतील जवळपास 1000 शिक्षकांना 'इलेक्शन ड्युटी, शिक्षक संघटनांचा विरोध, परिपत्रक रद्द करण्याची मागणी

Election Duty : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC), खाजगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांना निवडणुकीचे काम म्हणजेच 'इलेक्शन ड्युटी' लावण्यात आली आहे. मात्र राज्यातील शिक्षक संघटनांनी याला विरोध दर्शविला आहे. या संदर्भातील परिपत्रक मागे घेण्याचा आणि कामावर रुजू होण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे. 


 

Farmers Protest : शेतकऱ्यांचं 'आंदोलन 2.0' उद्या दिल्लीत धडकणार! दिल्लीत कलम 144 लागू, हरियाणा, पंजाब, यूपीच्या सीमेवर सतर्कता वाढवली

Farmers Protest 2.0 : देशातील शेतकरी (Farmers) पुन्हा किसान आंदोलन 2.0 साठी सज्ज झाले आहेत. पंजाब, हरियाणा, यूपी, राजस्थानसह अनेक राज्यांमधून शेतकरी दिल्लीला (Delhi) कूच करण्याच्या तयारीत आहेत. या आंदोलनाला 'चलो दिल्ली मार्च' (Chalo Delhi Mrach) असे नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांची दिल्लीकडे जाण्याची तयारी लक्षात घेता पोलिस आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.  


 

Sovereign Gold Bond 4th Series: स्वस्तात सोनं करण्याची सुवर्णसंधी; सरकारी विकतंय किफायतशीर किमतींत सोनं, कसं खरेदी कराल?

Sovereign Gold Bond 4th Series: नवी दिल्ली : आधीपासूनच महागाईन पिचलेला सर्वसामान्य माणूस वाढलेल्या सोन्याच्या किमतींनीसुद्धा हैराण झाला आहे. तरीदेखील तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, तर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची एक संधी तुमच्याकडे आहे. ही संधी म्हणजे, सॉव्हरिन गोल्‍ड बॉन्‍ड (Sovereign Gold Bond). रिझर्व्ह बँकेच्या सॉव्हरिन गोल्‍ड बॉन्‍ड (Gold Bond) योजनेची चौथी सीरिज (Sovereign Gold Bond 4th Series) आजपासून सुरू होत आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकार बाजारभावापेक्षा कमी किमतीत शुद्ध सोनं विकतं. या योजनेंतर्गत सोनं खरेदी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, तुम्हाला स्वस्तात सोनं खरेदी करता येतंच, पण त्यासोबतच मोठा परतावाही मिळतो. केंद्र सरकारची योजना गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून उत्तम पर्याय ठरते. 

7th Pay Commission: EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक 'गुड न्यूज'

7th Pay Commission: पीएफ खातेधारकांना (PF Account Holder) मोठं गिफ्ट देत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees Provident Fund Organisation) शनिवारी व्याजदरात मोठी वाढ करण्याची घोषणा केलेली. त्या घोषणेनुसार, पीएफच्या व्याजदर (PF Interest Rate) 8.25 टक्के करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष आहे, या वर्षात पीएफवरील व्याज वाढ झाल्यानंतर आता सरकार महागाई भत्त्यात (DA Hike) वाढीची घोषणा कधी होणार याची अनेकजण वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार मार्च 2024 मध्ये महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतं. असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी असेल, कारण त्यांना येणारा महागाई भत्ता तब्बल 50 टक्के होईल. 

Narendra Patil : शिंदे समितीच्या सर्वेक्षणात 'मोठी चूक'; नरेंद्र पाटलांकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Narendra Patil : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु असून, यासाठीच सरकराने शिंदे समितीचे (Shinde Committee) स्थापना केली आहे. मागील दोन महिन्यापासून या शिंदे समितीच्या वतीने काम करण्यात येत आहे. मात्र, याच शिंदे समितीच्या सर्वेक्षणाच्या कामकाजावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. शिंदे समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख करण्यात आला असून, सरकराने यात तात्काळ सुधारणी करावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे. 

Crime : चक्क लेडी 'सिंघम'लाच फसवलं; खोटा IRS अधिकारी बनून बांधली लग्नगाठ

Uttar Pradesh Crime : मेट्रोमोनियल साईटवरुन अनेकदा खोटी माहिती टाकून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांत तैणात असणाऱ्या महिला पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकुर (Shrestha Thakur) या फसवणुकीची शिकार झाल्या आहेत. श्रेष्ठा ठाकुर (Shrestha Thakur) यांना एका व्यक्तीनं खोटा आयआरएस अधिकारी होऊन गंडवलेय. त्या व्यक्तीने श्रेष्ठा ठाकुर यांच्याकडून लाखो रुपयेही लुबाडले केले. लग्नानंतर एसपी श्रेष्ठा ठाकुर यांना फसवणूक झाल्याचं समजलं. श्रेष्ठा ठाकुर यांनी घटस्फोट घेतला, पण तो पत्नीच्या नावाने अजूनही लोकांकडून पैसे लुबाडतो. यामुळे वैतागलेल्या श्रेष्ठा ठाकुर यांनी गाजियाबादच्या कौशांबी स्थानकात पूर्वाश्रमीचा पतीविरोधात तक्रार दाखल केली

Nagpur Crime : गृहमंत्र्यांच्या नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, दहा दिवसात आठ जणांची हत्या

Nagpur Crime : उपराजधानी नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या (Nagpur Crime News) झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा (Police) धाक उरलेला नाही का? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


उपराजधानी नागपूर शहरात (Nagpur Crime News) एकापाठोपाठ एक हत्यांचे (Nagpur Crime News)सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यातील पाच दिवसांत चार खुनाच्या घटनेने नागपूर शहर हादरले होते. फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दहा दिवसांत आठ जणांची हत्या झाली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी (Crime News) विश्वात कायदा आणि पोलिसांचा (Nagpur Police) धाक संपला आहे का, असा प्रश्न या उपस्थित झाला आहे.

Weather Update : देशभरासह राज्यातील हवामानाचे बदलते रूप! काही ठिकाणी थंडी गायब, तर 'या' भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, जाणून घ्या

Weather Update : गेले काही दिवस राज्यातील हवामानात (Maharashtra Rain) सातत्याने बदल होताना दिसत आहे, काही भागात आता थंडी गायब होत असून काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शक्यतो 13 फेब्रुवारीपासून राज्यातील थंडी कमी होत होईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तर देशातील हवामानाची स्थिती पाहता सध्या उत्तर भारतात सकाळी थंडी जाणवत असली तरी दिवसा कडक सूर्यप्रकाशानंतर ती कमी होते. तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या देशभरासह राज्यातील हवामानाची स्थिती

Indian Ex Navy Officers Released: भारतीय मुत्सुद्देगिरीला मोठं यश! कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका

Indian Ex Navy Officers Released From Qatar Jail: नवी दिल्ली : भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे. कतारमध्ये (Qatar) हेरगिरीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा (Death Penalty) सुनावलेल्या सर्व आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची (Naval Officers) सुटका झाली आहे. आठपैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत. कतार कोर्टानं मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अल दाहरा ग्लोबल प्रकरणात आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.  


भारताच्या (India) विनंतीवरून, कतारच्या अमीरनं आठ नौदल अधिकाऱ्यांची शिक्षा आधीच कमी केली होती आणि त्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं होतं. आता परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, त्या आठही नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली असून यापैकी सात माजी नौदल अधिकारी भारतात परतले आहेत.

Spicejet Layoff: जागतिक आर्थिक मंदीचं सावट; स्पाईसजेटमधील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ

Airline Spicejet Layoff: नवी दिल्ली : सध्या जगभरात पुन्हा एकदा मंदीची लाट आली आहे. जगभरातील टाळेबंदीच्या (Layoffs) लाटेमध्ये भारतही होरपळून निघत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जगभरातील टाळेबंदीचा परिणाम भारतीयांच्या नोकऱ्यांवरही होऊ लागला आहे. आधीपासूनच आर्थिक संकटाचा सामना करत असलेली बजेट एअरलाईन्स स्पाईसजेट (SpiceJet Airlines) आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. आर्थिक चणचणीमुळे त्रस्त असलेली कंपनी स्वतःवरील बोजा कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याची माहिती मिळत आहे. 

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून क्रीडा पुरस्कार, अजित पवारांची घोषणा

पुणे : राष्ट्रीय क्रीडा पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडू आणि संघटनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय आता राज्य सरकारबरोबर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून घेण्यात आला आहे. या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेने एमओए क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याबाबतची घोषणा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने रविवारी केली. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या बोट क्लब येथे पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त राजेश देशमुख यांच्यासह राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. 

Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचे संकट कायम, नांदेड जिल्ह्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांच मोठं नुकसान

Unseasonal Rain In Marathwada : राज्यात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. मराठवाड्यात (Marathwada) देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत असून, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) गारांचा जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. तर, मराठवाड्यावर आणखी आठ दिवस म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत ढगाळ स्थिती, अवकाळी पावसाचे संकट कायम असेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; एकाच दिवशी चार 'सभा'

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Election) निमित्ताने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) जनतेशी संवाद साधण्यासाठी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोकणाचा दौरा केला होता आणि आता ते मराठवाड्याचा (Marathwada) दौर करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यात ते गंगापूर -रत्नपुर, वैजापूर, कन्नड- सोयगाव, छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut),  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve), मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी,  राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार; उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) अमरण उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या तीन दिवसांत पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.