Maharashtra News Updates 11 October 2022 : ठाकरे गटाच्या महाप्रबोधण यात्रेतील नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलील ठाण्यात गुन्हा दाखल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Oct 2022 08:19 PM
ठाकरे गटाच्या महाप्रबोधण यात्रेतील नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलील ठाण्यात गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या महाप्रबोधण यात्रेतील नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलील ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


  बीडमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ, पिकांचं नुकसान  

Beed News Update : बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. बीडसह माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. बीड तालुक्यातील नागझरी येथून उगम पावणाऱ्या बिंदुसरा नदीला देखील या पावसानं पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागझरी येथील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

सातारा जिल्ह्यातील बोरखळ गावच्या सरपंचाची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा जिल्ह्यातील बोरखळ गावच्या सरपंचाने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  आमोल नलवडे असं आत्महत्या करणाऱ्या सरपंचाचं नाव आहे. शेतातील पोल्ट्री फार्महाऊसमध्ये या सरपंचाने आत्महत्या केलीय. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह ; निवडणूक आयोगाचा निर्णय

शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिलाय.  

Sangli News : जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्प सलग चौथ्या वर्षी ओव्हरफ्लो

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील 30 ते 35 गावातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला आणि त्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणारा संख मध्यम प्रकल्प सलग चौथ्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. 


संख मध्यम प्रकल्प 2018 पासून दरवर्षी भरला जात आहे. यंदाही सुरवातीचा मान्सून, अवकाळी आणि परतीचा पाऊस या भागात चांगला झाला आहे. शिवाय तुबची योजनेचे ओव्हरफ्लो पाणी देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने हा तलाव शंभर टक्के भरला आहे. गेल्या चार दिवसात संख परिसरात सतत मोठा पाऊस पडत आहे. त्यानंतर रविवारी सकाळी हा प्रकल्प सलग चौथ्या वर्षी ओसंडून वाहू लागला. येथील मनमोहक दृश्य टिपण्यासाठी आनेक लोक या मध्यम प्रकल्पावर येत आहेत.

Maharashtra News : इगतपुरीत शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी चिमरुड्यांचं आंदोलन

Maharashtra News : शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी चिमरुड्यानी शेळ्या घेऊन जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला, दप्तर घ्या, शेळ्या द्या या घोषणांनी जिल्हा परिषदेचे आवर चिमुकल्यांनी दणाणून सोडले.


इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा शिक्षण विभागाने  बंद करून दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. महिना भरापासून शाळा बंद आहे, या निर्णयाला स्थानिकांनी विरोध करून आहे तिथेच शाळा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.  तरीही प्रशासन दखल घेत नसल्यानं दप्तर घ्या शेळ्या द्या आशा घोषणा देत 43 विद्यार्थी सामाजिक कार्यकर्त्यासह  जिल्हा परिषदेवर पोहचले

Bhandara News : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची तुफान हजेरी; परतीच्या पावसाने शेतकरी त्रस्त

Bhandara News : सलग दुसऱ्या दिवशीही परतीच्या पावसानं भंडारा जिल्ह्यात हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळा गणला जात असून त्यानंतर पाऊस निरोप घेतो आणि हिवाळ्याची सुरुवात होते. मात्र, यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस बरसल्यानंतरही अद्याप भंडारा जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून बसला असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे धान पिकाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात हलक्या धानाची काही ठिकाणी कापणी झाली आहे. कापलेलं धन शेतात असताना हा अवकाळी पाऊस आल्यानं धान पाण्याखाली आलं आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले धानाचे उत्पादन हिरावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Akola News : अकोला जिल्ह्यात ढगफुटीसदृष्य पाऊस

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात आज सकाळी ढगफुटीसदृष्य पावसानं होत्याचं नव्हतं झालंय. 1965 नंतर आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा मोठा फटका बोर्डी गावाला बसलाय. या पावसामुळे गावाच्या बाजूनं वाहणाऱ्या  गोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात शिरलंय. सध्या बोर्डी गावाला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. गावात आलेल्या पुराच्या पाण्यानं शेतकऱ्यांच्या दुधाच्या कॅन, दुचाकी आणि लोटगाडी वाहून जात असल्याचं दृष्यांमध्ये दिसतं आहे. बोर्डी परिसरातील कासोद-शिवपूर, शहापूर, रहाणापूर, उमरा, मक्रमपूर, बोर्डी, पिंप्री, पिंप्री जौनपुर या गावांत या पावसानं थैमान घातलं आहे. कालपासूनच बोर्डी परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. कापूस आणि सोयाबीनचा हंगाम अक्षरश: वाया गेल्याची स्थिती निर्माण झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे.

Nandurbar News : पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी नंतर आता उपसरपंच निवडीची लगबग सुरू

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 149 ग्रामपंचायतीच्या सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्यात आली आहे. आता ग्रामपंचायत उपसरपंचाच्या निवडणुकीची चुरस वाढली असून अनेक गावात लोकनियुक्त सरपंच एका पक्षाचा आणि बहुमत दुसऱ्या पक्षाचे असे चित्र असल्याने विरोधी गटातील उपसरपंच निवडून येत असल्याचे चित्र आहे. 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान उपसरपंच पदाच्या निवडणुका घेण्याच्या आदेश देण्यात आल्याने आज आणि उद्या सर्वोच्च ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अनेक ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच बिनविरोध निवड करण्यात आलेला आहे तर शेवटचे दोन दिवस राहिल्याने मोठ्या संख्येने आज आणि उद्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला गेला असल्याने त्यामुळे आता प्रत्येक गटाकडून आपला उपसरपंच कसा निवडता येणार यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

नाथजोगी भटक्या जमातीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नाथजोगी हा समाज नाथ संप्रदायी असून यांचा कोणताही परंपरागत व्यवसाय नाही. हा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षुकी करीत भारतभर भ्रमण करीत असतो आणि आपलया कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. त्यामुळे मुलं चोरी करणारी टोळी या आशा अफवेमुळे यांच्यावर संशय घेऊन जमावद्वारे हत्या आणि मारपीट केली जाते. त्यामुळे यांचे देशभर फिरणं बंद झालं आहे. या समाजावर उपासमारीची पाळी येत आहे. या सारख्या विविध मागण्यांकरीता जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोष मोर्चा  काढण्यात आला. आपल्या मागण्यांमध्ये या समाजाच्या संरक्षण करीता सर्व गृह विभागास सूचीत करावे की, गावोगावी सरपंच, पोलीस पाटील यांच्यावर जबाबदारी द्यावी की, गावात कोणताही फेरीवाला, साधू किंवा अज्ञात व्यक्ती आल्यास त्याची विचारपूस करावी आणि संशयीत असल्यास पोलीसांच्या हवाली करावं. हत्या आणि मारपीट करु नये. 


नाथजोगी भटक्या जमातीस अनुसूचित जमाती प्रमाणे सोई सवलती द्याव्यात, अनुसूचित जाती दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेप्रमाणे नाथजोगी भटक्या जमातीस 5 एकर जमिनीचे वाटप करावे, भटक्या जमाती व चे आरक्षण 2.5 टक्केचे वाढवून 5 टक्के करावे.


भटक्या विमुक्त/ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, भिक्षूकी भटक्या जमाती करीता संत गोरखनाथ विकास महामंडळ तयार करुन बेरोजगार तरुणांना 10 लाख रुपये पर्यंत कर्ज वाटप करावे,  या समाजाकरीता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत याजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. बेघर झोपडी आणि पालात राहणारे कुटूंबास त्वरीत घरकुले मंजूरी ध्यावी. अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. 

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा झोड उठवली आहे. या परतीच्या पावसामुळे भात कापणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. भात कापणीमध्ये पावसाचा अडथळा कायम असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्याने भात कापणीत अडथळे येत आहेत. मुसळधार पावसामुळे उभं पीक आडवं होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांचे पुत्र सलील अनिल देशमुख यांनाही मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

अनिल देशमुखांचे पुत्र सलील अनिल देशमुख यांनाही मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा


सलिल हा अनिल देशमुख यांचा मोठा मुलगा 


सलीलला मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची परवानगी


विशेष PMLA कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सलिलचा अर्ज मंजूर केला


ईडीच्या प्रकरणात सलील देशमुख हे आरोपी क्रमांक 17


याप्रकरणी, ईडीनं सलिलला  कोर्टात हजर राहण्यासाठी दोनवेळा समन्स बजावलं होतं

ST Workers : ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार?

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार?


एसटी महामंडळातील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार रखडले


महिन्याची 10 तारीख उलटली तरी कर्मचाऱ्यांचे अद्याप पगार नाहीत


पगार नसल्याने कर्मचाऱ्यांचे पीएफ, विमा, घराचे हफ्ते रखडले


पगार न झाल्यास कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात


एसटी कामगारांच्या पगारासाठी दर महिना ३६० कोटी रुपयांची गरज


राज्य शासनाकडून केवळ १०० कोटींची तरतूद


सलग दोन महिन्यांत ५२० कोटी रुपयांची थकबाकी

Beed Crime : भाजप बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या

Beed Crime : भाजप बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या. भगीरथ बियाणी यांनी स्वतःवर गोळी झाडून राहत्या घरी केली आत्महत्या, जागीच झाला मृत्यू

Akola Rain Update : अकोल्यात पावसाचा हा:हाकार

Akola Rain Update : अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यात आज पावसामुळे अक्षरशः हा:हाकार उडालाय. तालुक्यातील बोर्डी परिसरात पावसानं घातलेल्या थैमानान पार होत्याचं नव्हतं झालंय. 1965 नंतर आलेल्या सर्वात मोठ्या पुराचा मोठा फटका बोर्डी गावाला बसलाय. या पावसामूळे गावाशेजारून वाहणार्या गोगा आणि लेंडी नाल्याचं पाणी गावात घुसलंय. सध्या बोर्डी गावाला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. पोपटखेड येथील धरणातील निसर्गाचे पाणी अकोलखेड गावात घुसल्याने गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहेय. यासोबतच बोर्डी परिसरातील कासोद-शिवपुर, शहापूर, रहाणापूर, उमरा, मक्रमपूर, बोर्डी, पिंप्री, पिंप्री जौनपुर अडगाव,या गावांत या पावसानं थैमान घातलंय. पूर परिस्थितीमुळे अकोट हिवरखेड मार्ग सध्या बंद आहेय. कालपासूनच्या पावसामूळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहेय. कापूस आणि सोयाबीनचा हंगाम अक्षरश: वाया गेल्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी 19 ऑक्टोबरला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी 19 ऑक्टोबरला


92 नगरपरिषदांनाही ओबीसी आरक्षण लागू होणार का, नव्या प्रभाग पद्धतीचं काय होणार, थेट नगराध्यक्ष होणार की नाही याचा फैसला सुनावणी दरम्यान


चिन्हा ची लढाई संपल्यानंतर आता निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याचे उत्तर लवकरच कोर्टात मिळणार

बीडमधील माजलगावात इसमाकडून पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या
Beed News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील मंजरथपासून जवळच असलेल्या काळे वस्तीवर पांडुरंग दोडतले या इसमाने आपली पत्नी लक्ष्मी आणि मुलगा पिल्या या दोघांची झोपेत असताना तीक्ष्ण हत्याराने वार करुन निर्घृण हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पहाटच्या तीनच्या सुमारास घडला. या घटनेनंतर स्वतः पांडुरंग दोडतले याने या घटनेची माहिती माजलगावच्या ग्रामीण पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पांडुरंगला अटक केली आहे. त्याने आपल्या पत्नी आणि मुलाची हत्या का केली याची चौकशी पोलीस करत आहेत.
Breaking News : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट 

आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट 


मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने (सीआययू) सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती  आणि निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली


भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खैराती खान यांच्या विरोधात 37 व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्ट) सीआयुतर्फे 500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं


ज्यात भारती आणि फटांगरे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत आणि एफआयआरमध्ये या दोघांविरुद्धचे लावलेले आरोप हे चुकीच्या हेतूनं  केले गेल्याचं मान्य


रेश्मावर बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून भारतीय  पासपोर्ट प्राधिकरणाला दिल्याचा आरोप आहे 


मात्र तपासानंतक ती बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप खोटा असून ती बिहारचीच असल्याची माहिती स्पष्ट


मालवणी पोलिसांनी डिसेंबर 2021 मध्ये भारती, रेश्मा आणि फटांगरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध  कलमांखाली गुन्हा दाखल केला होता


देवेन भारती त्यावेळी सह पोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) होते


त्यांच्यावर विशेष शाखेच्या एका पोलीस निरीक्षकावर रेश्मा विरुद्ध प्रकरणाचा पाठपुरावा न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती


केंद्र सरकारनं जारा केली अधिसूचना


30 सप्टेंबरच्या बैठकीत सर न्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली न्यायवृंदानं केला होती शिफारस

शिंदे गटाचं चिन्ह ठरलं, तळपता सूर्य हे शिंदे गटाचं चिन्ह, सूत्रांची माहिती

सत्यवाडी गावात वीज पडून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Beed News : बीडच्या वडवणी तालुक्यातील सत्यवाडी गावात एका 14 वर्षाच्या मुलीचा अंगावर विज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. सत्यवाडी येथील सीमा धर्मराज पवार ही 14 वर्षाची मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शेतात काम करत असताना सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि यावेळी सीमाच्या अंगावर वीज पडून तिचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. 


सीमा पवार ही दयानंद माध्यमिक विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.. तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं वडवणी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सत्यवाडी गावात वीज पडून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Beed News : बीडच्या वडवणी तालुक्यातील सत्यवाडी गावात एका 14 वर्षाच्या मुलीचा अंगावर विज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.. सत्यवाडी येथील सीमा धर्मराज पवार ही 14 वर्षाची मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत शेतात काम करत असताना सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि यावेळी सीमाच्या अंगावर वीज पडून तिचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. 


सीमा पवार ही दयानंद माध्यमिक विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.. तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं वडवणी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Beed News : अडीच कोटींची फसवणूक करणारे चेअरमन आणि लिपिका चार महिन्यानंतर पोलीस ठाण्यात हजर

Beed News : बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या मातोश्री पतसंस्थेत अडीच कोटींचा भ्रष्टाचार करणारे चेरमन योगेश स्वामी आणि लिपिका जयश्री मस्के तब्बल चार महिन्यानंतर बीडच्या शहर पोलीस ठाण्यात हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


बीड शहरातील मातोश्री या पतसंस्थेने ग्राहकांना ज्यादा व्याजदराच आमिश  दाखवून ठेवी ठेवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर 12 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक करून चेअरमन आणि लिपिका दोघेही फरार झाले होते.. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर या पतसंस्थेने ग्राहकांची तब्बल अडीच कोटींची फसवणूक केल्याचं उघड झालं होत.


ही फसवणूक करून फरार असलेले योगेश स्वामी आणि जयश्री मस्के हे दोघे मंगळूर मध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच ते बीडच्या शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

Baramati News : बारामतीमधील माळेगांवात खिल्लार, गायीचं डोहाळे जेवण
Baramati News : बारामती तालुक्यातील माळेगांवात धंगेकर कुटुंबाने चक्क खिल्लार गायीचे डोहाळे जेवण केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हौसा असे डोहाळे जेवण झालेल्या गायीचे नाव आहे. योगिता व नानासाहेब राणे यांनी आपली मुलगी सोनियाच्या विवाह प्रसंगी धंगेकर कुटुंबास खिल्लार गाईचे वासरु भेट दिले. या वासराची धंगेकर कुटूंबियांनी वासराची मुलीप्रमाणे जोपासना केली. तिचे हौसा असे नाव ठेवले.
Shivsena Symbol : शिंदे-ठाकरे गटाची नावं ठरली, आज शिंदे गटाचं चिन्ह ठरणार

Shivsena Symbol : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला काल 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं. दरम्यान, शिंदे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायापैकी एकही चिन्ह त्यांना मिळालं नाही. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. यावर  आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


आज उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्ताने देशभरातील शिवालयामध्ये पूजा करण्यात येणार आहे. देशभरातील महादेवाच्या 500 हून अधिक मंदिरांमध्ये पूजेचे आयोजन करण्यात आलं आहे. 

























उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्यावर आज दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार केलं जाणार आहे. त्यापूर्वी सकाळी 10 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव सैफईच्या मेला ग्राऊंडमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  त्यांच्या या अंतिम संस्कारावेळी देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. 


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते 'नेताजी' या नावाने प्रसिद्ध होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये 1300 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस असून ते आज अहमदाबादमध्ये 1300 रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. 


पंतप्रधान उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ते उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेणार आहेत आणि पूजा करणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर कार्तिक मेला ग्राऊंडवर आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत आणि सभेला संबोधन करणार आहेत. 


महाकाल पथावर 108  स्तंभ आहेत. या स्तंभांवर शंकराच्या आयुष्यावर आधारित विविध शिल्प साकारण्यात आली आहेत.  मोदी जेव्हा उद्घाटनासाठी पोहचतील तेव्हा 600 साधू मंत्रोच्चार आणि शंखनाद करतील. कॉरिडोरच्या प्रवेशद्वारावर 20 फूट उंच धाग्यापासून शिवलिंग तयार करण्यात आलं आहे. 


शिंदे गटाला उद्या चिन्ह मिळण्याची शक्यता 


आज उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. पण शिंदे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायापैकी एकही चिन्ह त्यांना मिळालं नाही. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. 


अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस 


आज बीग बी अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस आहे. महानायक अमिताभ बच्चन आज 80 वर्षांचे होणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.