Maharashtra News Live Updates : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यात मुसळधार पाऊस

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 05 Oct 2022 04:32 PM
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्यात मुसळधार पाऊस

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालूक्याला पावसानं झोडपलंय. तेल्हारा तालूक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. 

Shirdi News : शिर्डी साईबाबा पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भिक्षा झोळी परंपरा

Shirdi News : शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव आज पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातोय. कालपासून सुरू झालेला हा उत्सव चार दिवस साजरा केला जाणार आहे. आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. साईबाबा आपल्या हयातीत भिक्षा मागत असे आजही तीच परंपरा साईसंस्थान आणि ग्रामस्थांनी जपली आहे. विजयादशमीच्या दिवशी गावातून भिक्षा मागितली जाते ही परंपरा कायम असून साईभक्त आणि ग्रामस्थ गावातून निघालेल्या भिक्षा झोळीत धान्य टाकतात आणि झोळीतील साईभक्‍त यातील धान्य आपल्या घरी प्रसाद म्हणून घेऊन जातात.

Nagpur Rains : नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

नागपूरः परतीचे वेध लागलेल्या मॉन्सून जाता जाता पुन्हा गोंधळ घालण्याचा हवामान खात्याचा अंदाज खरा होताना दिसत असून बुधवारी सकाळी शहरातील काही भागात दुपारपर्यंत नंदनवन, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, रामदासपेठ, सिव्हील लाइन आदी भागात जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे.

Nashik News : नाशिकमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या नवरात्रोत्सव मंडळात राडा, एकाचा मृत्यू 

Nashik News : नाशिक शहरात दांडिया दरम्यान डीजे ऑपरेटरचा शॉक लागून मृत्यू झाल्यानंतर आता मधून धक्कादायक घटना समोर येत आहे.  काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या नवरात्रोत्सव मंडळात राडा झाला असून यात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

KCR National Party Launch : तेलंगणा सीएम केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश; 2024 साठी नेमकी रणनीती आहे तरी काय?

KCR National Party Launch : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे (Telangana Rashtra Samiti)  अध्यक्ष के. चंद्रशेखर राव आज विजयादशमीचा मुहूर्त साधत आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. केसीआर हे केंद्रात भाजपसमोर एक मजबूत विरोधक उभे करण्यासाठी अनेक दिवसांपासून नियोजन करत होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर ते 'भारतीय राष्ट्र समिती' या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत. यानंतर वर्षअखेरीस राजधानी दिल्लीत जाहीर सभा घेण्याचा प्लॅन त्यांनी तयार केला आहे. अलीकडेच केसीआर यांनी बिहार, कर्नाटकसह अनेक राज्यांना भेटी दिल्या आणि मुख्यमंत्र्यांसह मोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Maharashtra political Shivsena : आज दोन खासदारांसह पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करणार, खासदार कृपाल तुमानेंचा दावा

Maharashtra Political Shivsena :  राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांच दोन दसरा मेळावे होते आहे. शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फूटीनंतर आज शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. दरम्यान, यापूर्वीच शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) यांनी ठाकरेंना धक्का देणारा दावा केला आहे. बीकेसी (BKC) मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्यात आज आणखी दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. त्यामुळं ते दोन खासदार आणि पाच आमदार कोणते अशी राजकीय वर्तळात चर्चा सुरु आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Shashi Tharoor : मी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी मैदानात, अध्यक्षपदाचा अर्ज मागे घेणार नाही, शशी थरुरांचं स्पष्टीकरण

Congress National President : सध्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election) लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) आमने सामने आहेत. दरम्यान, या निवडणुकीबाबत शशी थरुर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. त्यामुळं अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज मागे घेणार नसल्याचे शशी थरुर यांनी स्पष्ट केलं आहे.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात भक्तीचा महापूर, 23 लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन

Ambabai Mandir Navratri : तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम मोडित निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा  प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील अशा अंदाजाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी भेट दिली.

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रात होणार्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता या परीक्षा दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले आहे. विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, हे सत्र उशीरा सुरू झाल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नसल्याची तक्रार करत विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ही मागणी आता मुंबई विद्यापीठाने मान्य केली आहे.
Nandurbar Bus Issue : ऐन सणासुदीच्या दिवशी बस सेवा प्रभावित, नागरिकांचे हाल
नंदुरबार जिल्ह्यातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी 120 बसेस बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटीच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एसटी सेवा प्रभावित झाल्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नंदुरबार बस आगारातून सुटणाऱ्या अनेक बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवशी बसची वाट पाहत तात्काळत बसावे लागत आहे, तर दुसरीकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून अचानक भाडेवाढ करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. 
Andheri East Bypoll Election: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार उतरवणार? नाना पटोले यांची मोठी घोषणा

Andheri East Bypoll Election: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) आता शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सरळ सामना होणार आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीत शिवसेनेला (Congress Support Shivsena) पाठिंबा दिला आहे.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मित निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला आपला उमेदवार देणार नसून महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) याआधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीविरुद्ध भाजप-शिंदे गट अशी होणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Andheri Bypoll 2022: अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

Andheri Bypoll 2022: अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली आहे.

Petrol Diesel Price Today: दसऱ्याच्या निमित्ताने पेट्रोल-डिझेलच्या दरात घट? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Today 5th October 2022: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी कायम आहे. कच्च्चा तेलाच्या उत्पादनात घट केली जाणार असल्याची चर्चा आहे. उत्पादनात घट होण्याच्या चर्चेने क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरू होती. आर्थिक मंदीची भीती आणि मागणीत घट झाल्याने ही घसरण झाली होती. मात्र, पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊ लागली आहे. तर, दुसरीकडे इंधन कंपन्यांनी आज  पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर (Petrol Diesel Price Today) केले आहेत. दसऱ्याच्या दिवशीदेखील ग्राहकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Dasara 2022 : साईभक्तांसाठी खूशखबर! शिर्डीतील मंदिर आज रात्रभर खुले राहणार

शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर (Saibaba Mandir) हे आज साईभक्तांसाठी रात्रभर खुले राहणार आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दसरा (Dasara) आणि पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यत आला आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Encounter in Jammu Kashmir : शोपियानमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार

Encounter in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या (Jammu kashmir) शोपियानमधील द्रास भागात मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी चकमक सुरू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियांच्या द्राचमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही तासांनी ही चकमक झाली असल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Jio 5G : आजपासून चार शहरांत सुरु होणार जिओ 5G

युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने भारतात 5G सेवा (5G Service) सुरू करण्याची घोषणा केली आहे. जिओ आज दसऱ्याच्या मुहूर्तावर जिओ 5G (Jio 5G) सेवा सुरु करणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ चार शहरांमध्ये Jio 5G इंटरनेट सुरु करण्यात येणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या देशातील चार शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. आजपासून जिओच्या True 5G सेवेची बीटा चाचणी सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही सेवा केवळ निवडक युजर्सना वापरता येणार आहे सध्याच्या जिओ युजर्सपैकी काही निवडक युजर्सना Jio True 5G सेवा वापरण्यासाठी आमंत्रण पाठवले जाईल. केवळ त्याचं ग्राहकांना ही सेवा वापरता येणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

मध्य रेल्वेवर पूर्ण क्षमतेने लोकल धावणार, दसरा मेळाव्यानिमित्त महत्त्वाचा निर्णय

मध्य रेल्वे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कमी लोकल फेर्‍या (1460 फेर्‍या ) चालविते. मात्र आज मध्य रेल्वे संपूर्ण 1810 फेर्‍या चालविणार आहे. आज दसरा मेळाव्यानिमित्त दसरा मेळाव्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक लाखोंच्या संख्येने मुंबईत येतात. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे पूर्ण क्षमतेने लोकल चालवणार आहे.


 


 

फडणवीस यांनी बदलला ठाकरे सरकारचा निर्णय, पोलिसांना खासगी बँकामार्फत मिळणार गृहकर्ज

राज्यातील पोलिसांना घरबांधणीसाठी खासगी बँकांच्या माध्यमातून कर्ज घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदादारांना पूर्वीप्रमाणेच खासगी बँकांमार्फत घर बांधण्यासाठी कर्ज घेता येणार आहे.

सांगली : म्हैसाळमध्ये खासगी सावकारीतून महिलेस मारहाण, दोन्ही गटातील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाख

म्हैसाळमध्ये खासगी सावकारीतून महिलेस मारहाण, दोन्ही गटातील 16 जणांविरुद्ध गुन्हा दाख

Maharashtra Rain : राज्यात पावसाची उघडीप, आज विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता

सध्या राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिला आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) काल मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज दिला होता. मात्र, पावसानं दांडी मारली आहे. सध्या परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागानं सांगितेल आहे. दरम्यान, आजही राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

Worli Sea Link Accident Update : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, तिघांची प्रकृती चिंताजनक

Worli Sea Link Accident Update : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती चिंताजनक असून तीन जण गंभीर जखमी आहेत.

Worli Sea Link Accident : वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, बारा जण जखमी

मुंबई :  वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात बारा  जण जखमी झाले आहेत.  वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे.  एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. 






सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

पार्श्वभूमी

 ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.


उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा


उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. हा वाद कोर्टात असला तरी दोन्ही नेत्यांमध्ये दसऱ्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार? कुणावर टीका करणार? भाषणामध्ये कळीचा मुद्दा कोणता असणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.