Maharashtra News Updates 05 December 2022 :  नाशिकच्या दिंडोरीत अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Dec 2022 11:31 PM
बार्शीतील चिखर्डे येथील दिव्यांग मुलाचे मृत्यू प्रकरण, गट विकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर मृत मुलावर अंत्यसंस्कार

बार्शीतील चिखर्डे येथील दिव्यांग मुलाचे मृत्यू प्रकरण


गट विकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर मृत मुलावर अंत्यसंस्कार


रात्री 10 वाजता गावातील स्म्शान भूमीत पार पडले अंत्यसंस्कार


जवळपास 30 तासानंतर मृत संभव कुरुळेचे अंत्यविधी झाले

Nashik News Update :  नाशिकच्या दिंडोरीत अवकाळी पावसाची हजेरी

नाशिकच्या दिंडोरीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडलाय. आधीच थंडीचा सामना करत असताना अचानक पावसाने हजेरी लावंल्यानं द्राक्ष पिकावर रोग पसरण्याची शक्यता आहे. दिंडोरीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय.  

Pune News Update : मांजाने गळा कापल्याने दौंडमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू

नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने दौंड शहरामध्ये एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. पन्नालाल यादव असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. यादव हे आपल्या दुचाकीवरून कामाला निघाले असताना दौंड शहरामधील नगर मोरी चौकात कोणीतरी व्यक्ती नायलॉनच्या मांजाने पतंग उडवत होती. दुचाकी चालवताना पन्नालाल यादव यांना तो मांजा दिसला नाही. त्यामुळे त्यांचा गळा कापला गेला. नगरमोरी चौकापासून जवळच असलेल्या दौंड उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले. यादव यांची श्वसननलिका या मांजामुळे कापली गेली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.   

Gujarat Exit Poll Live: भाजपला गुजरातमध्ये स्वबळावर सत्ता, 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता, आपला 11 पर्यंत जागा

भाजपला यंदाच्या निवडणुकीत 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. आपला गुजरातमध्ये 3 ते 11 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  त्यामुळे भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता मिळणार असल्याची शक्यता आहे. 

Coronavirus in India : आज राज्यात 22 नवीन कोरोना रूग्णांची नोंद; सक्रिय रूग्णांची संख्या 278

Coronavirus in India : आज राज्यात 22 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 37 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण 79,87,314 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील बरे होण्याचे प्रमाण 98.17% इतके झाले आहे.  राज्यात आज एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% इतका आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 278 वर पोहोचली आहे. तर, सर्वाधिक रूग्ण  पुण्यात आहेत. पुण्यात कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या 100 आहे.  

Nashik Crime News : नाशिकमध्ये पुतण्याकडून काकाचा खून, पोलिसांकडून आरोपीला बेड्या 

Nashik Crime News : नाशिकमध्ये पुतण्याकडून काकाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आलीय. नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील एक्सलो पॉइंटजवळ 25 नोव्हेंबरला बच्चू कर्डेल या वृद्धाचा खून करत घरातील दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या खूनाचा उलगडा करण्यात अंबड पोलिसांना यश आले असून या वृद्धाच्या पुतण्यानेच एका अल्पवयीन मुलाला सुपारी देऊन त्यांना संपवल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झालीय. स्वतःची ओळख पटू नये म्हणून बालकाने बुरखा परिधान करत कोयत्याने वार करून वृद्धाचा खून केला होता आणि मुद्देमालाची कोठी जवळीलच विहिरीत फेकून दिली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात काकांच्या संपत्तीवर डोळा असल्याने हा कट रचण्यात आल्याचं समोर आलं असून आरोपी पुतण्या सागर कर्डेलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय. मुद्देमालाची कोठी आज पोलिसांना विहिरीत मिळून आली असून त्यात बुरखा, कोयता, दागिने आणि इतर वस्तूही मिळून आल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

हनुमान चालीसा प्रकरणी आमदार रवी राणा यांची मुंबई सत्र न्यायालयात हजेरी

हनुमान चालीसा प्रकरणी आमदार रवी राणा यांची मुंबई सत्र न्यायालयात हजेरी, 5 हजार रुपयांचा बेल बॉण्ड, पोलीस ठाण्यात सादर करून, वॉरंट का नाही रद्द केलं? कोर्टाचा सवाल , 17 डिसेंबरला दोघांनाही कोर्टात हजर राहण्याचे निर्देश, रवी राणा यांचं जामीन पात्र  वॉरंट रद्द करण्याची विनंती कोर्टानं नाकारली

नवनीत राणा यांना दिलासा , पुढील सुनावणी 9 डिसेंबरपर्यंत तहकूब

Navneet Rane News: खासदार नवनीत राणा जात पडताळणी प्रकरण, नवनीत राणा यांच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयातील स्टे ऑर्डर आज मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली


जात पडताळणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला असल्याचं ऑर्डरमध्ये म्हटल्याचं वकिलांनी सांगितलं


कोर्टानं याची नोंद घेत नवनीत राणा यांना दिलासा कायम ठेवत पुढील सुनावणी 9 डिसेंबरपर्यंत तहकूब

 भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात जालन्यात पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा 

Jalna News Update : जालना येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. पडळकर समर्थकांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मारहाण केली होती. याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी संबंधित पोलिस आधीकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शेकडो आंदोलक पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडकले आहेत.  यावेळी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. पोलिस प्रशासनाच्या कारवाईच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 

Gopichand Padalkar : जालन्यात गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

जालना येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पडळकर समर्थकांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ठाण्यात मारहाण केली होती याचाच निषेध म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शेकडो आंदोलक पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या कारवाईच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त जयंती सोहळ्यासाठी सज्ज

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरामध्ये  दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होईल. दत्त जयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरातमधून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शनाच्या सोयीसाठी श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवसंस्थान आणि ग्रामपंचायतीकडून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दत्त जयंतीला मंदिरात काकड आरती, शोडषोपचार पूजा, पंचामृत अभिषेक, श्रींचे चरणकमलावर महापूजा, पवमान पंचसुक्तांचे पठण होईल. सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होईल. 

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, दोन तास सुरू होती चर्चा

Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, दोन तास सुरू होती चर्चा

Nandurbar News : ग्रंथ महोत्सवानिमित्त नंदुरबार शहरातून भव्य शोभायात्रा; दोन दिवस रंगणार ग्रंथप्रदर्शनाचा कार्यक्रम

Nandurbar News : राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन संस्कृती वाढावी म्हणून नंदुरबार येथील इंदिरा संकुल परिसरात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथ प्रदर्शनात विविध प्रकाशन आणि संस्थांनी आपल्या पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावले आहेत. या ग्रंथ प्रदर्शनाची सुरुवात भव्य शोभायात्रेने करण्यात आली. शहरातील नेहरू चौकातून या शोभा यात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेमध्ये पारंपारिक नृत्यासह ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमाला खासदार हिना गावित नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी जिल्हाधिकारी मनीषा खत्री पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत या ग्रंथ प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमातील विविध प्रकारचे परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहेत.

Solapur News: सोलापूर:  बार्शीतील चिखर्डे गावातील दिव्यांग निधीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात दुसऱ्या मुलाचा मृत्यू

Solapur News:  दिव्यांग निधीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात आंदोलनादरम्यान दिव्यांग मुलाचा मृत्यू झाला. मागील तीन महिन्यापूर्वी याच आंदोलनात  दिव्यांग मुलीलादेखील प्राण गमवावे लागले होते. आंदोलन करत असताना एकाच घरातले दोघे दिव्यांग बहिण-भाऊ मृत्यू पावल्याने खळबळ उडाली आहे. दिव्यांग मुलांच्या मृत्यूनंतरदेखील प्रशासनाला जाग येईना म्हणून ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे. 

Beed News: बीडमध्ये उपोषणकर्त्या आंदोलकाचा मृत्यू, दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Beed News: बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरकुलाच्या जागेसाठी आमरण उपोषण करणाऱ्या आप्पाराव पवार यांचा काल आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर भांदवि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजाच्या संघटनांनी ठिय्या मांडला आहे.

Beed News: बीडमधील पिंपळवंडी येथे असलेल्या गोविंदगड संस्थांनचे मठाधिपती गोविंद महाराज यांचं निधन

Beed News: आष्टी तालुक्यातील पिंपळवंडी येथे असलेल्या गोविंदगड संस्थानचे मठाधिपती गोविंद महाराज यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी गोविंद महाराज यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

Beed News: बीडमधील पिंपळवंडी येथे असलेल्या गोविंदगड संस्थांनचे मठाधिपती गोविंद महाराज यांचं निधन

Beed News: आष्टी तालुक्यातील पिंपळवंडी येथे असलेल्या गोविंदगड संस्थानचे मठाधिपती गोविंद महाराज यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. काही दिवसांपूर्वी गोविंद महाराज यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

Sanjay Raut: निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही, अशी लोकांची भावना: संजय राऊत

Sanjay Raut: निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही, अशी लोकांची भावना असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले. गुजरात निवडणुकीत पंतप्रधानांसह संपूर्ण नेत्यांना, मंत्र्यांना उतरावे लागले यातच लोकांचा किती संताप आहे, हे दिसून येत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

Gujarat Election 2022 : मी देशातील जनतेचे, निवडणूक आयोगाचे आभार मानतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Gujarat Election 2022 : गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीतील लोक लोकशाहीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. मला देशातील जनतेचे आभार मानायचे आहेत. तसंच निवडणुका शांततेत पार पाडल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. यानंतर मोदी दिल्लीला रवाना होणार आहेत.

Mumbai Police : लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलीस हवालदाराची हकालपट्टी, गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही रॅकेटमध्ये सामील

Mumbai Police : तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस (Mumbai Police) हवालदाराची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी मिळत आहे. या बातमीने मुंबई पोलिसांत खळबळ निर्माण झाली आहे. तसेच गुप्तचर विभागाचे (Intelligence Bureau) दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे

G20 Summit 2023: जी 20 समिटसाठी आज केंद्र सरकारची सर्व पक्षीय बैठक, रणनीती निश्चित होणार

G20 Summit 2023: भारत (India) पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. बैठकीत सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. यावर चर्चा देखील केली जाणार असून याबाबतची रणनीती निश्चित केली जाईल. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वतीने सुमारे 40 पक्षांच्या प्रमुखांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे.

Gujarat Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Gujarat Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Beed News: बीड: महाराष्ट्र केसरी सईद चाऊसवर आष्टीत गुन्हा दाखल, तरुणावर चाकू हल्ला केल्याचा प्रयत्न

Beed News: जुना राग मनात धरून आपल्याच तालमीतील एका मल्लावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सईद चाऊस आणि त्याच्या 20 साथीदारांवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अजित पवारांनी राष्ट्रवादीत येण्याचं आमंत्रण दिलं, मनसे नेते वसंत मोरे यांचा दावा

Pune News : मनसे नेते वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचं अजित पवारांकडून आमंत्रण 


पुण्यातील एका लग्न समारंभावेळी हे दोघे ही उपस्थितीत होते 


यावेळी अजित पवारांनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिले असल्याचा दावा स्वतः मोरे यांनी केला आहे


मात्र राष्ट्रवादीकडून या गोष्टीला आद्याप दुजोरा दिला गेलेला नाही

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये रंगणार अश्व क्रीडा स्पर्धा

Nandurbar News : अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये यावर्षी पहिल्यांदाच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारी धावपट्टी आणि इतर तयारी अंतिम टप्प्यात असून आयोजकांच्या वतीने चेतक फेस्टिवल ची तयारी करण्यात येत आहे. फेस्टिवलमध्ये यावर्षी अश्व सौंदर्य स्पर्धा, अश्व नृत्य स्पर्धा, घोड्यांची रेस, तसेच अश्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत घोडेबाजाराची तयारी पूर्ण झाली असून देशभरातून 900 पेक्षा अधिक घोडे आतापर्यंत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यावर्षी घोडे बाजारात तीन हजारांपेक्षा अधिक घोडे दाखल होण्याचा अंदाज जयपालसिंह रावल यांनी व्यक्त केला आहे. घोड्यांच्या कसरती आणि रुबाबदार घोडे पाहायचे असल्यास दत्त जयंतीपासून सुरु होणाऱ्या सारंगखेडा घोडे बाजाराला हजेरी लावणे आवश्यक आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज गुहागर दौरा
Ratnagiri News : गुहागरमधील मनसेच्या पहिल्या संपर्क कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच गुहागर दौऱ्यावर

 

गुहागरमधील श्रुंगारतळी शहरात निघणार राज ठाकरे यांची भव्य रॅली.

 

आमदार भास्कर जाधव यांच्या मतदार संघात राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

 

कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरे आज गुहागर चिपळूण आणि खेड भागात करणार दौरा

 

स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी राज ठाकरे साधणार संवाद
रागाच्या भरात तरुणावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्र केसरी सईद चाऊसवर आष्टीत गुन्हा दाखल

Beed News : जुना राग मनात धरुन आपल्याच तालमीतील एका मल्लावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी महाराष्ट्र केसरी ठरलेल्या सईद चाऊस आणि त्याच्या 20 साथीदारांवर आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज रामदास पवार हा पैलवान सईद चाऊस याच्या तालमीमध्ये कुस्ती शिकण्यासाठी होता. मात्र काही दिवसापूर्वी त्याने तालीम सोडली आणि शहीद चाऊस यांच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या काही महिलांचा पराभव केल्याचा राग मनात धरुन सईद चाऊस याने मनोज पवार याला मारहाण करून त्याच्यावर चाकू हल्ला केला.

आमदार वैभव नाईक आज चौकशीसाठी रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात हजर राहणार

Ratnagiri News : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आज एसीबी कार्यालयात हजर राहणार आहे. सकाळी 11 ते 12 या दरम्यान वैभव नाईक रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयात पोहोचतील. 2020 ते 2022 यादरम्यान मालमत्ता वाढीबाबत वैभव नाईक यांची एसीबी चौकशी करणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; 93 जागांवर आठशेच्यावर उमेदवार रिंगणात


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या जिल्ह्यातील हे 93 मतदारसंघ आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.


उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची पहिली बैठक आज


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज सकाळी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. अशावेळी आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला ठाकरे गटातील नेते उपस्थित राहणार का हा देखील एक सवाल आहे. कारण वंचित बहुजन आघाडी सोबत ठाकरे गट गेल्यास महाविकास आघाडीचे काय असा देखील सवाल उपस्थित होत आहे. 


महाविकास आघाडीची आज बैठक


दरम्यान, आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. अधिवेशन काळात मांडायच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच 19 तारखेला राष्ट्रवादीच्या शेतकरी मोर्चाबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.


सासू विरुद्ध सून, जळगाव दूधसंघाच्या निवडणुकीत मंदाताई खडसे यांच्याविरोधातील प्रचार मेळाव्यात खासदार रक्षा खडसे सहभागी


जळगाव दूध संघ निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत म्हटली तर मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे (Manda Khadse) आणि भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यात होत आहे. रक्षा खडसे (Raksha Khadse) या भाजपाच्या खासदार असल्याने साहजिकच त्यांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. याचाच अर्थ रक्षा खडसे यांनी सासू मंदाताई खडसे यांच्याविरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजय करण्याचा आवाहन मतदारांना केलं आहे. त्यांचे हे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार मंदाताई खडसे यांच्याविरोधात असल्याने सासू आणि सुनेमधील ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.