Maharashtra News Updates 04 November 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Jalgaon news : एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारात गांजाची शेती एरंडोल पोलिसांनी उधळून लावली आहे. पोलिसांनी तब्बल 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा तसेच ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली. दरम्यान, दोन संशयित आरोपी हे शेतातून पसार झाले असल्याचे कळते. तर याबाबत पोलीस हवालदार विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नाशिकमधील सिडकोचे कार्यालय त्वरीत बंद करुन सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इतरत्र रिक्त पदांनुसार पदस्थापना तातडीने करण्याचे शासनाचे आदेश
- शहराचे नियोजन करुन ते विकसीत करण्याच्या उद्देशाने 1970 साली करण्यात आली होती नाशिकमध्ये सिडकोची स्थापना
- नाशिक सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सेवा सुविधा पूर्ण केल्यांनतर त्यांचे हस्तांतरण नाशिक महानगरपालिका यांचेकडे करण्यात आले असल्याने सिडको कार्यालय बंद करण्याचा निर्णय
नागपुरातील पॉश अशा रामनगरजवळील शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या इल्युजन रेस्टो लॉजमध्ये रात्री गुंडागर्दी आणि मारहाणीची घटना घडली आहे. दोन नोव्हेंबरच्या रात्री इल्युजन रेस्टो लॉजमध्ये आठ तरुण आत जाण्यास आग्रह करू लागले.मात्र तेथील बाउन्सरने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. आतमध्ये खाजगी पार्टी सुरू असल्याने आत जाता येणार नसल्याचे बाउन्सरने त्या तरुणांना सांगितले. यावरून बाऊन्सर आणि त्या तरुणांमध्ये वादावादी सुरू झाली. या आठ तरुणांमध्ये काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांनी बाउन्सरला मारहाणीस सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी बाउन्सरच्या चेहऱ्यावर जबर मारहाण केली. याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अविनाश शर्मा व सनी वाडे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर सिमेंट रोडवर घडलेल्या मारण्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक मात्र धास्तावलेले आहे
शरद पवार उद्या 9 वाजता महालक्ष्मी रेडकोर्स येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे निघतील आणि सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी शिर्डी येथे पोहोचणार आहेत. पुन्हा 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघतील आणि पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन दाखल होतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये जाऊन शिंदे पवारांना भेटणार
जळगावातील मुक्ताईनगरमधील सुषमा अंधारे यांच्या सभेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्यानंतर आता बघू, पोलिस मला जाऊ देतात की नाही अशी भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार, उद्या सकाळी डिस्चार्ज घेऊन शिर्डीला येणार आहेत
पक्षाकडून हेलिकॉप्टर साठी परवानगी मागितल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती
शरद पवार सकाळीं 10 वाजता शिर्डी येथे शिबिरासाठी उपस्थित राहणार
डॉक्टरांचा देखील शरद पवार यांच्या शिर्डी येथील उपस्थितीबाबतच्या वृत्ताला दुजोरा
पुन्हा महागाईचा भडका, महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. घरगुती पीएनजीच्या दरात दीड रुपये प्रति एससीएम (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर)ची वाढ झाली आहे.
मुंबईत पाच नोव्हेंबरपासून दरवाढ लागू होणार आहेत. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर ८९.५० प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर ५४ रुपये प्रति एससीएम
भिवंडी शहरात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी भिवंडी शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नारपोली चौक ते स्वर्गीय आनंद दिघे चौकापर्यत शेकडो बाईकसह रॅली काढण्यात आली. एकेकाळी भिवंडी शहर कॉग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र गटातटाच्या राजकारणामुळे कॉग्रेसमध्ये फूट पडून गेल्या महापालीकेतील महापौर पदाच्या निवडणुकीत उभी फूट पडून १८ नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. शिवाय शहरात भाजप - समाजवादीच्या दोन आमदारांमुळे कॉग्रेसचे अस्थित्व टिकून ठेवण्यासाठी कॉग्रेस पदधकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यातच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात १५ नोव्हेंबरला येत आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेचा प्रचार केला जात आहे. आज दुपारी नारपोली चौकातुन भिवंडी कॉगेसचे युवक अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोनिन, माजी खासदार सुरेश टावरे, महिला अध्यक्षा रेहाना अंसारी, जावेद फारुकी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बाईक रॅलीत सहभागी झाले होते.
बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आयपीओचा हंगाम पुन्हा पाहायला मिळतो आहे. इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज (IPOs) द्वारे निधी उभारण्यासाठी अनेक कंपन्या त्यांच्या सार्वजनिक ऑफरसह बाजारात दाखल होत आहेत. गेल्या महिन्यापासून आयपीओसाठी अनेक कंपन्यांनी अर्ज दाखल केले आहेत शिवाय पुढील आठवड्यात आणखी तीन कंपन्या त्यांचे प्रारंभिक शेअर्स विकण्यास सुरुवात करतील. फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल्स आणि केन्स टेक्नॉलॉजी या तीन कंपन्या आहेत ज्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी उघडतील.
Gujrat Opinion Poll : गुजरातच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. देशभर निवडणुकीची चर्चा होत असताना ओपिनियन पोलनुसार भाजपलाच सत्ता मिळणार का? तसेच कॉंग्रेसच्या जागा घटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Aurngabad : तासाभरापूर्वी परवानगी नाकारलेल्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. सिल्लोड मध्ये होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली असून, ठिकाण मात्र बदलण्यात आले आहे. ठाकरे गटाकडून शहरातील महावीर चौकात परवानगी मागितली गेली होती, मात्र पोलिसांनी आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या जागेत आदित्य ठाकरे यांना सभा घेण्यास परवानगी दिली आहे
आजची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बैठक वादळी ठरली. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात बैठकीच्या सुरवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्याला कारण होत ते जिल्हा नियोजनची सभा कोण चालवतं असा प्रश्न खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियोजन बैठकीत सभेच्या अजेंड्यावर असलेले विषय घेऊन बैठक घ्यावी असं म्हटलं. यावर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनीही माध्यमांशी बोलताना एकमेकांवर टीका केली. तर विनायक राऊत माध्यमांशी बोलताना भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.
Beed News : आत्महत्या करण्यासाठी घराबाहेर निघालेल्या एका गर्भवती तरुणीचे प्राण बीडच्या शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. सायंकाळच्या वेळी एक गर्भवती तरुणी प्रियकराने धोका दिल्यामुळे विषाची बाटली घेऊन आत्महत्या करण्यासाठी घराच्या बाहेर पडली. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या तरुणीचा तपास सुरू केला आणि तब्बल 70 किलोमीटर तरुणीचा पाठलाग करून परिसरातून यात्रेला रात्री बाराच्या सुमारास ताब्यात घेऊन तिचा जीव वाचवला.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी तर नाशिक पदवीधरची जागा काँग्रेस लढणार
तर कोकण शिक्षक मतदार मतदार संघाची शेकापलाचं मिळणार
अजित पवार यांची शिर्डी येथील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माहिती
नागपूर शिक्षक मतदार संघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघाच्या जागेबाबत देखील लवकरच महाविकास आघाडीची बैठक घेऊन निर्णय घेणारं- पवार
नागपूर आणि अमरावती साठी आपल्याकडे उमेदवार तयार माञ मिञ पक्षांसोबत बातचीत करूनच निर्णय घेणार
सुधीर सुरी अमृतसरमधील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते, असं सांगितलं जातंय. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला.
दमणच्या दाभेळ भागातील गणेश पॅकेजिंग नावाच्या कंपनीत भीषण आग
कंपनीच्या प्लांट आणि स्टोरेज विभागात लागली आग
प्लास्टिक थर्माकोलची सीट बनवणारी कंपनी
आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही
अग्निशमन दलाच्या 8 हून अधिक गाड्या घटनास्थळी
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
मुंबईतील दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती.... पुढील सुनावणीपर्यंत मराठी पाट्या नसल्यास कारवाई नाही...
Mumbai Shop Marathi Signboard : मुंबईतील दुकानांच्या, आस्थापनांच्या मराठी पाट्या करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकानांच्या आस्थापनाच्या नामफलक (नावाच्या पाट्या) ठळक मराठीत करणे अनिवार्य केले होते. या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात गेले होते आता या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे दुकानांचे फलक ठळक अक्षरात मराठी नसल्यास कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही
Mumbai Shop Marathi Signboard : मुंबईतील दुकानांच्या, आस्थापनांच्या मराठी पाट्या करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकानांच्या आस्थापनाच्या नामफलक (नावाच्या पाट्या) ठळक मराठीत करणे अनिवार्य केले होते. या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात गेले होते आता या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे दुकानांचे फलक ठळक अक्षरात मराठी नसल्यास कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील घरकुलाच्या बांधकामा दरम्यान शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शौर्य गणेश इंगळे अस मृत्यू झालेल्या बालकाचं नाव असून घराच्या अंगणात खेळत असताना शौर्य खड्ड्याजवळ गेला आणि खड्ड्यात पडला. आई घरकामात व्यस्त असताना तर वडील कामावर गेले असताना ही घटना घडली. बराच वेळ झाल्यावर शौर्य दिसत नसल्याचं आईच्या लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. शौर्य याला खड्ड्यातून बाहेर काढून मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. महत्त्वाचं म्हणजे कालच या बालकाचा वाढदिवस साजरा झाला होता.
Santosh Bangar : आमदार संतोष बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ प्रकरणी अहवाल अप्पर मुख्य सचिव गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवला
ज्या पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली ते माजी सैनिक असल्याची माहिती
झालेल्या सर्व घटनेची नोंद पोलीस डायरीत केल्याने बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी बोर्डाकडून मुदत वाढ
दहावी बोर्डाचे फॉर्म भरण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत तर बारावी बोर्डाचे फॉर्म भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत
राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आले आहे
त्यानुसार बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार
दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार
सोलापूरमधील येथील बार्शी येथे उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. राज्यात नैसर्गिक शेतीचं मिशन राबवायचं आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. केमिकल फर्टिलायझर न वापरता त्याच्या तिप्पट उत्पादन घेणं सुरु केलं आणि त्याच्यामध्ये गायीचं शेण, गोमूत्र यामध्ये गूळ आणि इतर पदार्थ मिसळून त्यापासून वैज्ञानिक पद्धतीने पूर्णपणे नैसर्गिक शेती काही शेतकरी करत आहेत. येत्या काळात आपल्याला राज्यात नैसर्गिक शेतीचं मिशन राबवायचं आहे. शेतकरीचं आपल्या शेतीकरता आव्यक सगळ्या गोष्टी आपल्या शेतीवरच तयार करेल, शेतकऱ्याला बाहेरून काहीही आणावं लागणार नाही आणि याचा त्याचा शेतीच्या उत्पादकचेवर परिणाम होणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
SSC, HSC Exam Application : दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दहावी बोर्ड परीक्षेसाठी आवेदन पत्र 25 नोव्हेंबरपर्यंत बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. तर बारावी बोर्डाच्या परीक्षेचे आवेदन पत्र विलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक याआधीच जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.
राज्यात नैसर्गिक शेतीचं मिशन राबवायचं आहे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह
Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी फोनवरुन देण्यात आली आहे. दरम्यान, हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Uday Samant : उद्योगमंत्री झाल्यानंतर उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित केलेल्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्या तत्काळ सोडवण्यासाठी या वेळेला सामंत यांनी प्राधान्य दिले आहे. यावेळी जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक जनता दरबारला उपस्थित असल्याचे चित्र दिसलं. रिफायनरी समर्थकांनी देखील यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांचे निवेदन देखील यावेळी सामंत यांनी जनता दरबारामध्ये स्वीकारले.
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात ऊस तोडणी मजुराच्या तीन वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विरु पवार हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री आपल्या पालात हे कुटुंब झोपले असताना साडेबारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने आईसोबत झोपलेल्या विरुला उचलून नेले. दरम्यान, आईने आरडा ओरड केल्यानं आजूबाजूचे लोक जागी झाले. त्यामुळं बिबट्यानं विरुला रस्त्यावर टाकून पळ काढला. परंतू या घटनेत विरुला गंभीर दुखापत झाली आहे.
Maharashtra News : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक चकमक
जिल्हा नियोजन बैठक कोण चालवतय? असा खासदार विनायक राऊत यांनी बैठकीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना प्रश्न केलाय
शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर जिल्हा नियोजनची ही पहिलीच बैठक आहे आणि याच बैठकीत राणी राऊत यांच्यात शाब्दिक चकमक रंगल्याचे चित्र पाहायला मिळालं
Sangli News : डोक्यावर भारतीय पद्धतीची पांढरी टोपी घालून एकत्र येऊन कार्यकर्ते बाईक रॅलीने निवेदन देण्यास रवाना होणार होते. मात्र आता मोजक्या कार्यकर्त्यासोबत संभाजी भिडे निवेदन देण्यास रंवाना होणार
टिपू सुलतानाची जयंती साजरे करणाऱ्यांना शासनाने आणि प्रशासनाने समज देउन त्याची जयंती साजरी करण्यावर प्रतिबंध घालावा म्हणून संभाजी भिडे आज सांगली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देणार आहेत.
राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण तसेच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra Politics : भाजपाचा आमदार नसलेल्या विधानसभेवर आता भाजपचं विशेष लक्ष
भाजपाचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदार संघात विधान परिषदेचे आमदार, राज्यसभा खासदार यांचा निधी खर्च करणार
विधान परिषद, राज्यसभेच्याच्या सर्व आमदार, खासदारांचा निधीचा खर्च आता पक्षाच्या माध्यमातून
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवी रणनीती
भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि विधान परिषदेतील आमदार यांना मिळणारा निधी आता पक्षाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे. ज्या मतदारसंघात भाजपचा प्राबल्य नाही अशा मतदारसंघात हा निधी खर्च केला जाणार आहे.
हा निधी कसा आणि कुठे खर्च करायचा याचा प्राधान्यक्रम पक्षाची तीन सदस्यीय समिती ठरवेल. त्यासाठी श्रीकांत भारतीय, खा. डॉ. अनिल बोंडे आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती निश्चित करण्यात आली आहे.
Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता वारसदारांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. कारण एकाच दिवशी एकाच मतदारसंघात ही दोन्ही युवा नेते शक्तिप्रदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे बहुचर्चित राहणारे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं होमपीच समजल्या जाणाऱ्या सिल्लोडमध्ये हा सामना रंगणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबावर सतत टीका करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात 7 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याची घोषणा होताच अब्दुल सत्तार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा त्याच दिवशी सिल्लोडमध्ये सभा होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून आपापल्या नेत्याच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सभेला की श्रीकांत शिंदे यांच्या सभेला अधिक गर्दी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Mumbai News : मुंबईतील जेजे रुग्णालयात आढळली ब्रिटीशकालीन भुयार
ही भुयार 130 वर्ष जुनी, ब्रिटीशांनी बनवली होती भुयार
डॉ. अरुण राठोड हे राऊंडवर असताना त्यांना आढळून आली ही भुयार
जेजे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला कळवणार
ही भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रेन वॉर्ड असल्याची रुग्णालयाची माहिती
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. त्याचबरोबर गेली 50 वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गेली 50 वर्ष ते पंढरपूरची वारी करत आहेत.
फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा
फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Facebook India Head Ajit Mohan) यांनी आज अचानक राजीनामा दिला. वृत्तानुसार, अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. याआधी उमंग बेदी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. ज्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये पद सोडले. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटा प्लॅटफॉर्मने जाहीर केली आहे. मोहन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मेटा इंडियाचे संचालक आणि भागीदारी मनीष चोप्रा हे त्यांच्या जागी कंपनीचा अंतरिम कार्यभार स्वीकारणार आहेत.
राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याविरोधात मुंबईतील मुलुंड येथील कनिष्ठ न्यायालयाने समन्स जारी केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले नागरिक असा भेदभाव करणारे आदेश जाहीर केल्याबद्दल त्यांच्याविरोधात याचिका करण्यात आली होती. ज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51(ब) सह 54, आणि 55 अंतर्गत त्यांना दोषी ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या खटल्याच्या पुढील सुनावणीदरम्यान तिघांनाही प्रत्यक्ष किंवा वाकिलांमार्फत कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत राष्ट्रीय प्राधिकरणानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची जाणूनबुजून अवहेलना आणि उल्लंघन करून निव्वळ लस तयार करणाऱ्या कंपन्यांना फायदा करून देण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार आणि इतर सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याच्या हेतुनं हे लसीकरण सक्तीचं केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अंबर कोईरी यांनी ही तक्रार दाखल केली होती. याशिवाय या तिघांविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करणारी याचिकाही दाखल केली होती. त्यात तिघांनाही प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. त्या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकेची दखल घेत त्यावर 11 जानेवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -