Maharashtra News Updates 03 November 2022 : एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Nov 2022 11:52 PM
उद्योगपती अविनाश भोसले  सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल

उद्योगपती अविनाश भोसले  सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल


न्यायालयीन कोठडीत असलेल्या अविनाश भोसले यांना झाली कोरोनाची लागण..


न्यायालयाच्या आदेशानुसार 10 दिवसांपूर्वी भोसले यांना नियमित तपासणीसाठी नेण्यात आले होते.  तपासणीदरम्यान त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.


अविनाश भोसले यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात कोव्हिड झाल्याने दाखल करण्यात आलय.


भोसले यांना आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने केली आहे अटक.

सामाजिक न्याय विभागाच्या कामांना दिलेली स्थगिती उठवली

सामाजिक न्याय विभागाच्या कामांना दिलेली स्थगिती उठवली


सन 2022 आणि 23 पूर्वीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्या कामांच्या संदर्भात पालकमंत्री निर्णय घेणार


त्यामुळे स्थगिती जरी उठवली असली तरी कोणती काम मान्य करायची किंवा कोणती रद्द करायची हे पालकमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून राहणार


शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात घेतलेल्या कामांना दिली होती स्थगीती

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक





एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी अडीच वाजता बैठक

 

एसटी कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता आणि ४ हजार गाड्यांना घेण्यासाठी मंजुरी मिळणार 

 

मागील आठवड्यात होणारी नियोजित बैठक रद्द झाली होती, त्यानंतर या आठवड्यात बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं 

 

सीएनजीऐवजी २ हजार डिझेल गाड्या तर २ हजार इलेक्ट्रीक गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील 

 

यातील ७०० डिझेल गाड्या नव्या रुपात त्वरीत एसटीच्या ताफ्यात येणार 

 

महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याच्या निर्णयाला देखील मंजुरीची शक्यता आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना हाती अधिकचे पैसे पडतील 

 

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या जागा भाडेतत्वावर देण्यात येणार 

 

नाशिक महापालिकेला शहर वाहतुकीसाठी जागा देणार 

 

७५ वर्ष आणि त्यावरील नागरिकांसाठी वेगळ्या तिकिटांची छपाई करणार 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खाते असल्यानं तेच अध्यक्ष, त्यामुळे एसटी महामंडळाला मुख्यमंत्री संप आणि कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी कोणती संजिवनी देतात? हे बघणं महत्त्वाचे


 

 



 


Nashik crime : नाशिकमध्ये भरदिवसा जबरी दरोडा, एसबीआय बँक आवारातून 17 लाख लांबवले

Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी परिसरात भरदिवसा लुटीची घटना घडली असून तब्बल 17 लाख रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे. एसबीआय बँकेच्या आवारात ही घटना घडली असून कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Dhule News: सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन देखील जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र घटले
धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे मात्र तरी देखील रब्बी हंगामाचे प्रस्तावित क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले असून यंदा 90 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाने दमदार हजेरी लावली आहे, गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात 100% पेक्षा अधिक पाऊस होत आहे एकीकडे या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कापूस सोयाबीन मका यासह विविध पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे यंदा जिल्ह्यात  721 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे समाधान एकीकडे व्यक्त केले जात असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामाचे प्रस्तावित क्षेत्र गेल्या वर्षाच्या तुलनेत घटले आहे यावर्षी 90 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे तर गेल्या वर्षी 96 हजार 649 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती, रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या गहू हरभरा या पिकांसाठी पाण्याची पुरेशा प्रमाणात सोय झाली आहे

 

धुळे तालुक्यात 17 हजार 500,साक्री तालुक्यात 20 हजार 738, शिंदखेडा तालुक्यात 32 हजार 178 तर शिरपूर तालुक्यात 19 हजार 708 हेक्टर क्षेत्रभर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे पुरुषा प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाही शेतकऱ्यांचा कल हा गहू हरभरा मका या पिकांच्या लागवडीकडे आहे...

 

 
मनसेकडून दीड हजार शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे वितरित 

विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी चांगलं बियाणं देण्याचा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काढला होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासाठी 4 हजार पोते बियाणं खरेदी केली असून आज मनसेचे नेते राजू उंबरकर  यांनी दीड हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना बियाणं वाटप केले आहे . कृषी विद्यापीठाकडून मनसेने हे बियाणे खरेदी केले असून प्रति एकरी 20 किलो प्रमाणे रब्बीसाठी चण्याचं बियाणं वाटप केले आहे . यवतमाळ जिल्ह्यातील पूरपीडितांना बियाणं वाटण्यात आले आहे . राज ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.हे सर्व बियाण गरजू शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले. बियाण पेरून त्यापासून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं, असा मनसेचा प्रयत्न आहे. यातून शेतकरी आत्महत्येची धग थोडीफार का होईना कमी होईल, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. शिवाय यावेळी आज पासून मनसे च्या राजू उंबरकर यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याना दिलासा म्हणून शर्मिला ठाकरे अल्पभूधारक शेतकरी कन्यादान योजना सुद्धा जाहीर केली पूरग्रस्त अल्पभूधारक कुटूंबातील शेतकरी कन्येचे कन्यादान मनसे कडून करण्यात येणार असून लग्नाचा सम्पूर्ण खर्च मनसे करणार आहे असे ही उंबरकर यांनी यावेळी सांगितले

Baramati News: बारामती एसटी आगारातील चार चालक, चार वाहक आणि वाहतूक नियंत्रक अशा नऊ जणांना निलंबित केलं

बारामती एसटी आगारातील चार चालक, चार वाहक व वाहतूक नियंत्रक अशा नऊ जणांना आगार व्यवस्थापक मनीषा इनामके यांनी काल निलंबित केले. ठरलेल्या मार्गावर बस न नेता ती अर्ध्या रस्त्यातून परत आणल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली त्यासाठी जबाबदार धरून ही कारवाई करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी बारामती ते नीरा या ठिकाणी जाणारी एसटी बस वडगाव निंबाळकर या बस स्थानकातूनच परत आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बारामतीमधून निघाल्यानंतर वडगाव निंबाळकर येथूनच या चार बसेस माघारी फिरवल्या.  त्यामुळे वडगाव निंबाळकर येथून नीरा बाजूकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या बाबत तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने निलंबनाची कारवाई झाली.

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार, पायाला जखम

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. यावेळी इम्रान खान यांच्या पायाला ही गोळी लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

शीना बोरा जिवंत असल्याचा  इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांचा मुंबई सत्र न्यायालयात दावा 

शीना बोरा जिवंत असल्याचा  इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांचा मुंबई सत्र न्यायालयात दावा 


राहुल मुखर्जीच्या मोबाईल मधील संभाषण आणि मेसेज यावरून सिद्ध होतं की शीना अजूनही जिवंत आहे - इंद्राणीचे वकील


या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार राहुल मुखर्जीची उलटतपासणी दरम्यान अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळाटाळ 


शीना बोरा जिवंत असल्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांनी केली आहे


शीना बोरा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात विशेष सीबीआय कोर्टात सुरू आहे साक्षीदार राहुल मुखर्जीची उलटतपासणी 


यापूर्वीदेखील इंद्राणी मुखर्जीतर्फे शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत चौकशी करण्याची मागणी करत सीबीआय कोर्टात अर्ज केला होता

भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड

भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी


भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड


यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केला आहे


गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे

Nagpur Airport : मस्कट ते बॅंकॉक जाणाऱ्या विमानाची नागपुरात इमरजन्सी लॅंडिंग

Nagpur News : मस्कट ते बॅंकॉक जाणाऱ्या विमानाची नागपुरात इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आली. ओमान एअरवेजचा 787 हा विमान मस्कट ते बॅंकॉकसाठी निघाला होता. या विमानात 246 प्रवासी होते. दरम्यान एका 47 वर्षीय प्रवाशाचा छातीत दुखू लागले. त्याला उलटीही झाली. त्यानंतर विमानाची नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. विमानतळावर प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्या प्रवाशाला किंग्सवे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्री कार्यालयात फक्त दुपारी 2 ते 4 पर्यंत नागरिकांना प्रवेश, मुख्यमंत्री कार्यालयाचे चारपैकी तीन दरवाजे बंद

Mantralay : मंत्रालयातील वाढती गर्दी रोखण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आता 2 ते 4 याच वेळेत नागरिकांना भेटता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी चार दरवाजापैंकी तीन दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तर एका दरवाजातून प्रवेश आहे मात्र तिथे ही अधिकारी आणि मुख्यमंत्री यांनाच प्रवेश आहे. मंत्रालयाच्या गेटवरती ही आता कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे 

कार्तिकी यात्रा: विठुरायाच्या दर्शनासाठी लागत आहेत 12 तास

परतीच्या पावसाचा फटका कार्तिकी यात्रेला बसला असला तरी दर्शनाची रांग गोपाळपुराच्या पत्राशेडमध्ये असून भाविकांना दर्शनाला तब्बल 12 तासांचा वेळ लागत आहे . प्रत्येक यात्रेला देवाच्या लांबच लांब दर्शन रांग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो . यंदा परतीच्या पावसाच्या फटाक्याने यात्रेकरूंच्या संख्येत निम्म्याने घट झाली आहे . तरीही देवाच्या दर्शनासाठी भाविक 12  तास रांगेत उभारत आहेत

Bombay High Court: बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

Bombay High Court:  बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. बॉम्बे हायकोर्टाचं नाव महाराष्ट्र हायकोर्ट  करण्याची  मागणी केली होती

रत्नागिरीत जागोजागी मंत्री उदय सामंत यांचे जनता दरबाराचे बॅनर

Ratnagiri News:  शिंदे गटात गेलेले रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत पहिल्यांदाच जनता दरबार घेणार आहेत. पण या जनता दरबाराची चर्चा सध्या बॅनरच्या माध्यमातून जोरात सुरु आहे.  शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला...पण याच बालेकिल्यात जनता दरबार होण्यापुर्वीच मंत्री उदय सामंत यांनी जनता दरबाराचे बॅनर्स झळकवलेत. उद्या हा जनता दरबार होतोय.त्यामुळे या जनता दरबाराची माहिती कळावी यासाठी बॅनर्स झळकवण्यात आलेत.पहिल्यांदाच अशा पद्धतीने जनता दरबाराचे बॅनर्स जिल्ह्यातील तालुक्यामध्ये झळकल्याने रत्नागिरीकरांनाकडून आश्चर्य व्यक्त होतंय.रत्नागिरीच्या हद्दीच्या सुरवातीपासून ते शहरातील मुख्य ठिकाणी हे बॅनर्स लावले गेलेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे विविध विभागांत 75 हजार नियुक्त्या

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत विविध विभागांत 75 हजार नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ म्हणून राज्य शासनाच्या, तसेच महामंडळाच्या आस्थापनेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रम अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात पार पडला. यात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातील 109 उमेदवारांना नोकरीचे नियुक्तीचे आदेशाचे वितरण देण्यात आले.

महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष, नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांची दूरवस्था

देशात एकीकडे नव नवे  महामार्ग निर्मितीचा विक्रम होत असताना महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्ह्यातील शहादा - शिरपूर आणि शहादा - दोंडाईचा या दोन रस्त्यांची दूरवस्था झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. शहादा तालुक्यातुन जाणार्या  बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शेतकरी देखील आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला असून, पोलीस प्रशासन आणि महामार्ग प्रशासन आंदोलकांना दडपशाही करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांच्या भुमिकेचाही यावेळी  निषेध नोंदवला गेला. महामार्ग खड्डे असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डेमुळे ऊस वाहतूक वेळेवर होत नाही. वाहतूक ठेकेदार शेतकऱ्यांचा तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत न्यायला तयार नाही. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

Gujrat: गुजरात विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान



राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, डॉक्टरांची 'एबीपी माझा'ला माहिती

Sharad Pawar Hospital Discharge:   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज देखील डिस्चार्ज मिळणार नाही. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी 'एबीपी माझा'ला माहिती आहे. शरद पवार यांना पूर्णपणे बरं होण्यास आणखी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. 

Andheri Gokhale Bridge: अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा महत्त्वपूर्ण गोखले पूल वाहतुकीसाठी बंद

Andheri Gokhale Bridge: अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा महत्त्वपूर्ण गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे . पूल बंद केल्यानंतर वाहतुकीच्या नियोजनासाठी आज पालिका आणि वाहतूक पोलिसांनी गोखले पूल परिसरात पाहणी केली

Centrl Railway:  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत , मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प

Centrl Railway:  मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. अप मार्गावर मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कर्जतहून मुंबईसाठी निघालेली मालगाडी नेरळ स्थानकावर बंद पडली.  डाऊन मार्गावर वाहतूक सुरळीत तर अप मार्गावर अर्ध्या तासापासून वाहतूक ठप्प आहे. मालगाडीच्या दुरुस्तीसाठी रेल्वेचे कर्मचारी नेरळ स्थानकात दाखल झाले आहेत. मालगाडी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचलनालय ताबा घेणार

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचलनालय ताबा घेणार 

ठाण्यातील दोन फ्लॅट्स आणि मीरा रोडमधील प्लॉटवर लवकरच जप्ती येणार

एनसईएल घोटाळ्यामधे गेल्या काळात इडी ने या संपत्तीवर तात्पुरती जप्ती आणली होती

मात्र संपूर्ण तपासानंतर आता या संपत्तीचा ताबा घेण्याचा इडीचा मार्ग मोकळा

या विरुद्ध सरनाईक अपील करु शकतात

Maharashtra News : परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील 2 निलंबित पोलीस पुन्हा सेवेत

Sachin Tendulkar Meets Goa CM : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.  प्रमोद सावंत यांची भेट

Sachin Tendulkar Meets Goa CM : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने  घेतली गोव्याचे मुख्यमंत्री डॉ  प्रमोद सावंत यांची भेट घेतली.  मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत सचिन तेंडुलकर आणि डॉ प्रमोद सावंत यांच्यात अनौपचारिक चर्चा झाल्या.



Pratap Sarnaik: प्रताप सरनाईकांच्या 11 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच

Pratap Sarnaik:  शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांच्या 11 कोटींच्या संपत्तीचा ताबा सक्तवसुली संचलनालय घेणार आहे.  ठाण्यातील दोन फ्लॅट्स आणि मीरा रोडमधील प्लॉटवर लवकरच जप्ती येणार आहे. 

NCP:  शिर्डीजवळ राहता येथे उद्यापासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अभ्यास शिबिर

Shirdi:   शिर्डीजवळ राहता इथं उद्यापासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय अभ्यास शिबिर होणार आहे. या शिबिरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. तर पक्षाध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर या शिबीरात उद्या सहभागी होतील असं सांगण्यात येतंय. 

Kartiki Ekadashi:  कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर

Kartiki Ekadashi:  कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. कोर्टी ते वाखरी बायपासचं भूमीपूजन आणि संध्याकाळी पंढरपूर विकास आराखड्याबाबत बैठक घेणार आहे

Kolhapur:  कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील अल्पवयीन मुलगी अखेर सापडली

Kolhapur:  कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील अल्पवयीन मुलगी अखेर सापडली आहे. सीमाभागातील संकेश्वरमध्ये मुलगा आणि मुलगी दोघेही सापडलेत. पोलीस दोघांनाही आज कोल्हापुरात आणणार आहेत. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणावरून कोल्हापुरात काल हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. मुलीचा शोध घ्या अन्यथा शांत बसणार नाही असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल मोर्चामध्ये दिला होता. त्यानंतर कालच पोलिसांनी या दोघांचा छडा लावला.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेत विश्वजित कदम होणार सहभागी

Bharat Jodo Yatra:  राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल होतेय . या पदयात्रेत महाराष्ट्रतील कॉंग्रेस नेते सहभागी होणार आहेत. या यात्रेत राहुल गांधी दिवसाला  25 किमी चालत असल्याने अनेक कॉंग्रेस नेते  जास्तीत जास्त चालण्याचा सराव करत आहेत. विश्वजीत कदम ही या यात्रेत सहभागी होणार असून ते जास्त काळ राहुल गांधीसोबत चालणार आहेत.

Nashik Fire:  नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात मध्यरात्री भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

Nashik Fire:   नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात मध्यरात्री भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती  अग्निशमन विभागाने दिली आहे.  तीन साडेतीन नंतर अचानक आग लागल्याने स्थानिकांची धावपळ उडाली.  8 ते 9 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी  आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अंधार असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या.  पुठ्ठे आणि इतर भंगार साहित्य असल्याने आग वाढत होती, आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


 





Red Chilli Price Hike:  दिवाळीनंतर लाल मिर्चीच्या बाजारात तेजी, गेल्या 50 वर्षांतील सर्वाधिक दर असल्याची माहिती

Red Chilli Price Hike:  दिवाळीनंतर लाल मिरचीच्या बाजारात चांगलीच तेजी आलीये. नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या 50 वर्षातील सर्वाधिक दर लाल मिरचीला मिळत असून सहा हजार पासून ते दहा हजार प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हा दर मागील वर्षाच्या दुप्पट असून मिरचीचे हे दर कायम राहण्याचा अंदाज असल्याने चटणीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे

Election Commission :  केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद

Election Commission :  केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आज गुजरात निवडणुका जाहीर होणार का याची उत्सुकता आहे. 


 





Aaditya Thackeray : 'अन्यायाने पेटून उठतो सेनेचे युवराज', आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लॉन्च

Aaditya Thackeray : युवासेना (Yuva Sena) प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यात अनेक शहरात दौरे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अनेक तरुण शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले.  'शिवसेनेचा युवराज' या नावाने आदित्य ठाकरे यांच्यावरील गाणे लाँच करण्यात आले आहे. 


शिवसेनेचा युवराज' असे शीर्षक असलेल्या गीताचे आज लॉन्चिंग करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमांमध्ये या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय कदम यांनी हे गीत तयार केले आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Andheri East By Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

Andheri East By Election : महाराष्ट्र विधानसभेच्या '166-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य ज़रुर पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी केले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


विधानसभेच्या '166-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य ज़रुर पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांनी केले आहे. 


संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस


संभाजी भिडे यांचं एक वादग्रस्त वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात आले होते. या भेटीनंतर केलेल्या वक्तव्यामुळे संभाजी भिडे वादात सापडले आहेत. त्यांना या वक्तव्यानंतर महिला आयोगानं नोटीस देखील बजावली असून सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरुन टीकेची झोड उठवण्यात आली आहे. 


महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी  दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे.


भारतीय कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू नाही? गँम्बिया सरकारचा यू-टर्न


गँबियात (Gambia) कफ सिरपच्या (Cough syrup) सेवनामुळे 66 मुलांना आपला जीव गमवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याप्रकरणी भारतामधील कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीवर आरोप जाले होते. आता याप्रकरणात गँबिया सरकारनं यु टर्न घेतला आहे. भारतीय कंपनीच्या कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं गँबिया सरकारनं सांगितलं आहे. गँबियातील मेडिसिन कंट्रोल एजन्सीनं रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. 


गेल्या महिन्यातील असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, गँबियाचे हेल्थ डायरेक्टर मुस्तफा बिट्टाये यांनी मुलांचा मृत्यू हा किडनीच्या आजारामुळे झाल्याचं सांगितलं होतं. सुत्रांच्या मते, भारताने या प्रकरणाच्या सिरपला मंजुरी देण्यावरुन गँबिया सरकारच्या नियमांवर बोट ठेवलं होतं.  भारत सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 66 मुलांचा मृत्यूचा उलगडा पोस्ट मार्टममध्ये झाला आहे. त्यामधून असं समोर आलेय की, 66 मुलांना ई-कोलाई आणि डायरिया झाला होता. तर त्यांना कफ सिरप का दिलं. 


ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात अडीच लाख सदस्यत्वाचे अर्ज दाखल


शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आज अडीच लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून एकूण दहा लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर करण्यात आले आहेत. यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी बुथप्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत. 


ठाकरे गटाने याआधी साडेआठ लाख आणि आज अडीच लाख सदस्यत्व अर्ज दाखल केले आहेत. सोबत एकूण 2 लाख 62 हजार शपथपत्र देण्याचा इरादा आहे. त्यापैकी आतापर्यंत 70 हजार शपथ पत्र दाखल करण्यात आली आहेत. 


शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट, दोन्हीकडूनही आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात येत आहेत. मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.