Maharashtra News Updates 02 October 2022 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे निधन

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Oct 2022 10:52 PM
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते  मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे निधन झाले आहे. नाशकातील कराड रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  गेल्या एक महिन्यापासून ते उपचार घेत होते. 


 


 

गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू

पूर्ण मुंबईत जल्लोषात नवरात्री उत्सव सुरू आहे.मात्र काल रात्री मुलुंड मध्ये गरबा खेळत असताना हृदय रोगाचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऋषभ लहरी मंगे भानुशाली असे मयत 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे.तो डोंबिवली चा रहिवासी होता.एमबीएचे शिक्षण घेतले होते.मुलुंड मधील कालिदास नाट्यगृह येथे भाजप तर्फे आयोजित दांडिया मध्ये ही घटना घडली आहे.गरबा खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागले.त्याला मुलुंड च्या आदिती हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शहापूर मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने चार ग्रामपंचायतींवर फडकवला झेंडा
शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची यावर निर्णय व्हायचा असला तरी दावे प्रतिदावे जोरदार सुरू असतानाच 16 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शहापुर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीचे निवडणूक असून त्यापैकी चार ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे.तालुक्यातील कावडे,ढुने,पाषाणे,साठगावं या चार ग्रामपंचायती मध्ये सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत.त्यांनी आपल्या निवडी नंतर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील यांनी या सर्व बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच सदस्य यांचे पक्षात स्वागत करतानाच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोल्हापूर : कसबा बावड्यात महिलेचा कोयत्याने गळा चिरला, संशयित हल्लेखोरास पोलिस अधिकाऱ्याने थरारक पाठलाग करून पकडले 

Kolhapur Crime : कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची धामधूम सुरु असतानाच कसबा बावड्यात धक्कादायक घटना घडली. बावड्यातील शहाजीनगरमध्ये कविता प्रमोद जाधव (वय 44, रा. तारळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) या महिलेचा कोयत्याने गळा चिरून खून करण्यात आला. खून करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीगर, कसबा बावडा) याला पोलिस अधिकारी किरण भोसले यांनी हल्लेखोराचा पाठलाग करून ताराराणी पुतळ्याजवळ पकडले. 

नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरातील दुकानांना भीषण आग, लाखोंचं नुकसान

Nanded News : नांदेड शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात नवा मोंढा परिसरातील ट्रेडिंग कंपनीच्या दोन दुकानांना काल रात्री सव्वा बारा वाजता भीषण आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. विवेक एजन्सी आणि मंगलम ट्रेडर्सला ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. या दुकानामध्ये शेतीसाठी लागणारे साहित्य ( ढिबकचे बंडल, स्प्रिंकलर, तुषार पाईप, PVC  पाईप, ईतर साहित्य) व मंगलमय ट्रेडर्स मध्ये ( ताडपत्री, PVC  नळ फिटींग पाईप, नायलॉन दोरी,नारळाची रस्सी, पत्रवाळी, द्रोण व ई. प्लास्टिक साहित्य ) असल्यामुळे आग ही पसरत होती. 

उल्हासनगर अज्ञात इसमानं तीन गाड्या जाळल्या, घटना सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरमध्ये कॅम्प क्रमांक चार येथील लाल चक्की चौकात सकाळी पाच वाजता अज्ञात इसमाने तीन गाड्या जाळल्याची घटना घडली आहे. येथील रघुनंदन अपार्टमेंटमध्ये माथा इलेक्ट्रिकल दुकानाबाहेर दोन मोटारसायकल आणि एक रिक्षा या इसमाने जाळव्या. या घटनेत दोन मोटारसायकल जळून खाक झाल्या असून या घटनेने परिसरात खळखळ माजली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली असून पोलीस आरोपीचा तपास करीत आहेत. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.



नवी मुंबईला स्वच्छ सर्वेक्षणात टॅाप पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांचा मोठा सहभाग 

नवी मुंबई शहराला अव्वल बनविण्यात शहरातील नागरिकांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. महानगर पालिकेकडून स्वच्छतेबाबत करण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करून त्या अंमलात आणल्या जात असल्यानेच आज यशाच्या शिखरावर नवी मुंबई शहर पोहोचले आहे. देशात तिसरा आणि राज्यात पहिला नंबर नवी मुंबईला मिळाला आहे. याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून पुढील वर्षी पहिला नंबर येण्यासाठी सर्वेतोपरी मेहनत घेणार असल्याचे सर्वसामान्यांनी स्पष्ट केलंय.. टॅाप थ्री मध्ये नंबर आल्याबद्दल लोकांनी सफाई कर्मचाऱ्यांना कपडे वाटप करीत आनंद व्दिगुणित केला

चंद्रपूर-घुग्गुस महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, 2 तरुणांचा जागीच मृत्यू

चंद्रपूर-घुग्गुस महामार्गावरील चिंचाळा येथे ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर सिदूर आणि चिंचाळा गावातील संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून  हायवे जाम केला आहे. फ्लाय ऐश वाहतूक करणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत सिदूर गावातील अंकित मत्ते (18) आणि संकेत झाडे (24) यांचा मृत्यू झाला आहे. मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि नोकरी देण्याची गावकऱ्यांनी केली आहे.

चित्रकार अक्षय मेस्त्रीनं नारळावर साकारली देवीची चित्र

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गवाणे मधील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारळावर देवीची चित्र साकारली आहेत. भारतीय सणांमध्ये नारळाला महत्वाचे स्थान आहे. नऊ देवीची नऊ वेगवेगळ्या नारळावर चित्रे साकारली आहेत. 3 इंच x 5 इंच अश्या प्रकारे ही चित्र साकारली आहेत. अक्षय मेस्त्री यांनी यापूर्वी झाडाच्या खोडावर आणि साडीवर देवीची सर्वात छोटे चित्र काढले होती.

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मोठी गर्दी

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर मोठी गर्दी झालीय. 

ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरु

ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरु आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी केली जात आहेत यासाठी विविध संकल्पना राबवली जातायत. ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांच्याकडून वेगळ्या पद्धतीनं आयोजन करण्यात आलं आहे. मातोश्री ते शिवाजी पार्कपर्यंत विविध क्षेत्रातील लोक पायी चालत जाणार आहेत. यामध्ये भजनी मंडळी, वारकरी, रक्तदाते, डॉक्टर  देखील यामध्ये सहभागी होणार आहेत. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं देखील आवाहन यामाध्यमातून केलं जाणार आहे. याची रंगीत तालीम आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर कलानगर येथील सिग्नलवर होत आहे.

....अन शरद पवारांच्या हाती धनुष्यबाण

Sharad Pawar : शरद पवार यांच्या उपस्थितीत जुन्नरमधील लेण्याद्री गडाच्या पायथ्याशी आदिवासी समाज प्रबोधन मेळावा संपन्न होत आहे. या कार्यक्रमात आदिवासी समाजाकडून शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं.  यावेळी पवारांच्या हातात धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पवारांनी सुद्धा धनुष्यबाण उंचावून सन्मानाला दाद दिली.

देवीचा नवस फेडण्यासाठी जाणारा पिकअप टेम्पो पलटी, 25 जण जखमी

Nanded Accident :  नांदेड जिल्ह्यातील आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 जण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट हिमायतनगर -नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील 25 ते 27 नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. दरम्यान अचानक किनवट तालुक्यातील शिवनीच्या पुढे जाताच रस्त्याचा अंदाज न आल्याने पिकअप टेम्पो पलटी झाला. यात एकाच कुटुंबातील 12 ते 13 जण व इतर गावातील नागरिक असे एकूण 25 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 13 जण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारसाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे. तर इतर किरकोळ जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पायाभूत सुविधाचा विकास, सुप्रिया सुळेंनी केलं नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केलं आहे. देशात नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पायाभूत सुविधाचा विस्तार, विकास होत असल्याचे सुळे यांनी म्हटलं आहे. लहानपणी माझ्या कोल्हापूरमधील मावशीकडे जाताना बराच वेळ जायचा, आता गाडी हायवेवर आली की लगेच कोल्हापूरला पोहोचते असेही सुळे म्हणाल्या.


 

नांदेड: आडेली देवीला नवस फेडण्यासाठी जाणारा टेम्पो पलटून 25 जण जखमी
Nanded News: हदगाव तालुक्यातील हस्तरा बोरगाव येथील 25 ते 27 नागरिक तेलंगणा राज्यातील आडेली देवीचा नवस फेडण्यासाठी जात होते. दरम्यान अचानक किनवट तालुक्यातील शिवनीच्या पुढे जाताच रस्त्याचा अंदाज न आल्याने  टेम्पो पलटी झाला. यात एकाच कुटुंबातील 12 ते 13 जण व इतर गावातील नागरिक असे एकूण 25 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 13 जण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारसाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.तर इतर किरकोळ जखमींवर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
वर्धा येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे आज उद्घाटन होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Wardha : वर्धा येथील  नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नियोजन भवनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काहीच वेळातच पार पडणार आहे. नव्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत.

सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर 100 कोटी रुपये पाठवायचा, खासदार प्रतापराव जाधवांचा प्रहार

MP Prataprao Jadhav : सचिन वाझें दर महिन्याला मातोश्रीवर 100 कोटी रुपये पाठवायचा असा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. राज्यात नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच बुलडाणा जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसेना खासदार आणि आमदार यांनी मेहकरमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांची शहरातून रॅली काढत जोरदार स्वागत केलं. यावेळी आयोजित हिंदू गर्वगर्जना कार्यक्रमात शिंदे गटात गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मातोश्रीवरच गंभीर आरोप केले. 50 खोके एकदम ओके म्हणताना "शंभर खोके मातोश्री ओके" तेही दर महिन्याला जात असत. सचिन वाझे पैसे जमा करून मातोश्री वर पाठवात होता. त्यातील अनिल देशमुख आणि वाझे कुठे आहेत? ,असं म्हणत थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच गंभीर स्वरूपाचा आरोप केला. मातोश्रीला दर महिन्याला शंभर खोके जात असल्याचा खळबळजनक दावा, प्रतापराव जाधव यांनी केला. 

साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धशक्तीपिठ असलेल्या नाशिकमधील वणीच्या नांदुरी गडावर राज ठाकरे सपत्नीक दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर आज साडेतीन शक्तीपिठापैकी अर्धशक्तीपिठ असलेल्या नाशिक मधील वणीच्या नांदुरी गडावर राज ठाकरे सपत्नीक दाखल झाले आहेत. गडावड पायी चालणाऱ्या भाविकांना बाजूला करत ताफा कसाबसा गडावर पोहोचलाय. त्यांच्यासोबत नाशिकमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असून काही मिनिटातच सप्तशृंगी देवीचे ते दर्शन घेणार आहेत. आज सप्तमी तसेच रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत पहाटेपासूनच भाविकांनी हजारोंच्या संख्येने मंदिराबाहेर रांगा लावल्या आहेत.

Mumbai Bomb Rumor : मुंबई विमानतळावर धमकीचा ईमेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई विमानतळावर धमकीचा ईमेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला. हे विमान रात्री मुंबईहून अहमदाबादला जाणार होते. पण तपासादरम्यान फ्लाइटमध्ये काहीही आढळून आले नाही, त्यानंतर रात्री फ्लाइटने उशिरा उड्डाण केलं. हा ईमेल कोणी आणि का केला याचा मुंबई पोलीस तपास करत आहेत.

#BREAKING : चांदणी चौकातून अखेर वाहतूक सुरु, एका बाजूने वाहतुकीला सुरुवात

Gandhi Jayanti : गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन, राजघाटावर पोहोचून केलं गांधीजींना वंदन

तुळजाभवानीच्या मानाच्या पलंगाचं आणि पालखीचं आष्टीमध्ये जंगी स्वागत

भक्ती आणि परंपरेचा ऐतिहासिक वारसा असलेला तुळजापूरच्या तुळजाभवानीचा मानाचा पलंग आणि पालखी आष्टी शहरामध्ये आली असता मोठ्या भक्तीमय वातावरणात या पलंगाचं आणि पालखीचं भक्तांनी स्वागत केलं. जुन्नर मधून निघालेला हा पालखी, पलंग पुणे आणि नगर जिल्ह्यातून आज बीड जिल्ह्यामध्ये आला. यावेळी आष्टी शहरात या पालखी मार्गावर फुलांची आरास करण्यात आली होती. तर या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष सामील झाले होते.. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही देवीच्या भक्तांनी कायम ठेवली असून जुन्नर पासून ते तुळजापूरपर्यंत या पालखी पलंगाचं पायी यात्रा काढली जाते आणि ज्या मार्गावरून ही यात्रा जाते त्या मार्गावर पालखी पर्यंत मोठ्या उत्साहात स्वागत केले जातं..

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये बापू कुटीला पोहोचले

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये बापू कुटीला पोहोचले.  शशी थरूर यांनी काल नागपुरात पोहोचून दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन केले होते तर आज ते वर्ध्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक ग्राम आश्रम मध्ये पोहोचले आहेत

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतील हे काही लोक चोरुन पाहतील, नीलम गोऱ्हेंचा टोला
Neelam Gorhe : महाभारतातील अर्जुनाप्रमाणे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाचा डोळा म्हणजे जनतेच्या प्रश्नावरती लक्ष ठेवून काम करण्याचा आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेला नेहमीच लाखो जनतेचा जनसागर उसळतो. या दसरा मेळाव्यालाही लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर येतील. पण काही लोक उद्धव ठाकरेंचे भाषण चोरून पाहतील अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी केली. या दसरा मेळाव्यास महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक येतील. एवढेच नाही तर अंधजन सुद्धा उद्धव ठाकरेंना ऐकण्यास मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यामुळं ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी आली आहे. पण ज्यांना दृष्टी होती त्यांची दृष्टी गेलीय अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. सकाळी 7 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अभिवादन केले.

गांधी जयंतीनिमित्त पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची महात्मा गांधी यांचं वास्तव्य असलेल्या मणि भवनाला भेट

गांधी जयंतीनिमित्त पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची महात्मा गांधी यांचं वास्तव्य असलेल्या मणि भवनाला भेट


लोढांकडून गांधीजींच्या वस्तू संग्रहालयाची पाहाणी


मुंबई विद्यापीठाच्या पार्किंग वादावरुन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे भाष्य 


गाड्या रस्त्यावर लावण्याऐवजी पार्किंगची व्यवस्था झाली असेल तर चांगलंच, विरोध होऊ नये

काँग्रेसचे बडे नेते आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

congress : बाळासाहेब थोरात, आशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भारत जोडो यात्रेसाठी रस्त्याची पाहणी हे नेते करणार आहेत.  त्यानंतर हिंगोली शहरात ही नेते मंडळी दाखल होतील. शासकीय विश्रामग्रहावर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संदीप पाटील विरुद्ध आशिष शेलार सामना होण्याची शक्यता, एमसीएची निवडणूक 20 ऑक्टोबरला

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील विरुद्ध आशिष शेलार एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर येण्याची शक्यता, एमसीएची निवडणूक 20 ऑक्टोबरला, तब्बल 11 वर्षांनंतर क्रिकेटर विरुद्ध राजकारणी असा सामना होऊ शकतो.,यापूर्वी दिलीप वेंसळकर विरुद्ध विलासराव देशमुख यांच्यात असा सामना झाला होता.  शेलार यांची एमसीएने बीसीसीआयमध्ये एमसीएचे प्रतिनिधी म्हणून यापूर्वीच निवड केली आहे

Raj Thackeray News: राज ठाकरे यांचा ताफा वणीकडे रवाना, आज घेणार सप्तश्रृंगी देवीचं दर्शन

Raj Thackeray News: राज ठाकरे यांचा ताफा वणीकडे रवाना, आज घेणार सप्तश्रृंगी देवीचं दर्शन

सणासुदीच्या काळात दुचाकी वाहनांच्या विक्रीत तेजी

सणासुदीच्या काळात दुचाकी वाहनांच्या विक्रीत तेजी, सप्टेंबर महिन्यात चारचाकी वाहनांच्या विक्रीसोबतच मोटारसायकल आणि मोपेडच्या वाहन विक्रीतही मोठी वाढ


ऑक्टोबरमध्ये वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता 


हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या वाहनविक्रीत सर्वाधिक वाढ, सप्टेंबर २०२२ मध्ये हिरो मोटोकॉर्पकडून ५ लाख २० हजार वाहनांची विक्री 


सुझुकी मोटारसायकल कंपनीच्या वाहन विक्रीत देखील २७ टक्क्यांची वाढ, ८६ हजार ७५० वाहनांची सप्टेंबरमध्ये विक्री 


टीव्हीएसच्या वाहन विक्रीत ९ टक्क्यांची वृद्धी, टीव्हीएसकडून ३ लाख ४७ हजार वाहनांची विक्री 


बुलेटच्या विक्रीत दुप्पटीहून अधिक विक्री, रॉयल एनफिल्डकडून ८२ हज़ार वाहनांची विक्री, मागच्या वर्षी रॉयल एनफिल्डनं ३३ हजार ५२९ वाहनांची विक्री केली होती

Navi Mumbai Updates:  नवी मुंबईमधील बोनकोडे गावात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, सकाळी अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु  

Navi Mumbai Updates:  नवी मुंबईमधील बोनकोडे गावात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, सकाळी अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु  

Navi Mumbai Updates : कोपरखैरणे इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

Navi Mumbai Updates : कोपरखैरणे इमारत कोसळली 


नवी मुंबईमधील बोनकोडे गावात कोसळलेल्या इमारतीमध्ये एका इसमाचा मृत्यू


सकाळी अग्निशमन दलानं सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ढिगऱ्यात सापडला मृतदेह 

सणासुदीच्या काळात दुचाकी वाहनांच्या विक्रीत तेजी 

सणासुदीच्या काळात दुचाकी वाहनांच्या विक्रीत तेजी 


सप्टेंबर महिन्यात चारचाकी वाहनांच्या विक्रीसोबतच मोटारसायकल आणि मोपेडच्या वाहन विक्रीतही मोठी वाढ


ऑक्टोबरमध्ये वाहनांच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता 


हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या वाहनविक्रीत सर्वाधिक वाढ, सप्टेंबर 2022 मध्ये हिरो मोटोकॉर्पकडून 5 लाख 20 हजार वाहनांची विक्री 


सुझुकी मोटारसायकल कंपनीच्या वाहन विक्रीत देखील 27 टक्क्यांची वाढ, 86 हजार 750 वाहनांची सप्टेंबरमध्ये विक्री 


टीव्हीएसच्या वाहन विक्रीत 9 टक्क्यांची वृद्धी, टीव्हीएसकडून 3 लाख 47 हजार वाहनांची विक्री 


बुलेटच्या विक्रीत दुप्पटीहून अधिक विक्री, रॉयल एनफिल्डकडून 82 हजार वाहनांची विक्री, मागच्या वर्षी रॉयल एनफिल्डनं 33 हजार 529 वाहनांची विक्री केली होती

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस, 11 लाख 27 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ 

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस, 11 लाख 27 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ 


दसऱ्याच्या आधीच रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात येणार 


रेल्वे प्रशासनावर 1 हजार 832 कोटी रुपयांचा बोजा पडणार 


प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनसच्या माध्यमातून 17 हजार 951 रुपयांची रक्कम अदा केली जाणार 


मागच्या वर्षी देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर झाला होता

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस, 11 लाख 27 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ 

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस, 11 लाख 27 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ 


दसऱ्याच्या आधीच रेल्वेकडून कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात येणार 


रेल्वे प्रशासनावर १ हजार ८३२ कोटी रुपयांचा बोजा पडणार 


प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनसच्या माध्यमातून १७ हजार ९५१ रुपयांची रक्कम अदा केली जाणार 


मागच्या वर्षी देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर झाला होता

फुटबॉलच्या मैदानात 'जीवघेणा खेळ'! इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान दोन क्लबचे समर्थक भिडले

Indonesia Football Match Violence : इंडोनेशियाच्या (Indonesia) मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली. यात 127 जणांचा मृत्यू झाला. तर 180 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंडोनेशियातील एका स्टेडियममध्ये दोन संघांमध्ये सामना सुरु होता. एका संघानं सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. एएफपी वृत्तसंस्थेनं पोलिसांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केल्यानं सामना पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेनं पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंटाच्या हवाल्यानं सांगितलं की, स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला असून इतर जणांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत. सेवाग्राम येथील बापू कुटीला जाऊन महात्मा गांधी यांच्या स्मृतीला वंदन करणार आहे आहेत.  


महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळचे राज्यस्तरीय महाअधिवेशन


महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळचे राज्यस्तरीय महाअधिवेशन आज दुपारी 1 ते 2 वाजता सांगली येथील धनंजय गार्डन मध्ये होणार आहे. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया,  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत.


मुंबईत आरे वाचवा अभियानातील कार्यकर्त्यांचा मोर्चा


आरे कारशेडप्रकरणी गांधी जयंतीचा मुहूर्त साधत आरे वाचवा अभियानातील कार्यकर्ते  दुपारी 3 वाजता मोर्चा काढणार आहेत. 


गांधी जयंतीनिमित्त मुंबईत 'द्वेष छोडो, भारत जोडो' रॅली


महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत 'द्वेष छोडो, भारत जोडो' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत विविध सामाजिक संघटनांसह विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.  


महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत  राजघाटावर अभिवादन


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंती निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री सकाळी 7.30 ते 8.30 दरम्यान राजघाटावर अभिवादन करतील.
 
मल्लिकार्जुन खरगे यांची पत्रकार परिषद 


कॉंग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
 
गुवाहाटी येथे भारत आणि दक्षिण आफ्रिकेत टी 20 सामना 


भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरू असलेल्या टी 20 मालिकेत भारत आज सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत, संध्याकाळी 7 वाजता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.