Maharashtra News Updates 02 December 2022 : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये; मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Dec 2022 11:43 PM
शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा दणका

मविआच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि वर्क ऑर्डर झालेल्या कामांना स्थगिती देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती


संबंधित कामांचं बजेट मंजूर असताना आणि सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली असताना अशी कामं थांबवता येणार नाहीत - हायकोर्ट


महाविकास आघाडीच्या काळात मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) निघालेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती दिली होती 


मात्र राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला हायकोर्टानं आज स्थगिती दिलीय


शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर ग्रामविकास विभागाने 19 जुलै आणि 25 जुलै रोजी मविआ काळात मंजूर झालेली तसंच वर्क ऑर्डर निघालेल्या कामांनाही थेट स्थगिती दिली होती


1 एप्रिल 2021 पासून मंजूर झालेली हजारो कोटींची काम यामुळे रखडणार होती


या निर्णयाविरोधात काही ग्रामपंचायतींनी हायकोर्टात दाद मागितली होती


12 डिसेंबर रोजी याप्रकरणी हायकोर्टात पुढील सुनावणी होईल

यवतमाळ- तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात लागला विजेचा शॉक

यवतमाळ- तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात लागला शॉक,, विजेचा शॉक लागण्याने महिलेची प्रकृती गंभीर , निशा आनंद इंगोले असे जखमी महिलेचे नाव , दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिला तपासणी साठी गेली होती तिथं असलेल्या एका पाईप मध्ये विजेचा करंट होता त्या पाईपच्या आधाराने महिला चालत असताना एकदम विजेचा धक्का महिलेला लागला असून ती जागीच कोसळली,  तिला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे


 

राजकारणात अजातशत्रू कसा असावं याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी - नाना पाटेकर

नागपुरात आज खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं थाटात उदघाटन पार पडलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सहावे वर्ष असून सांस्कृतिक मेजवानी नागपूरकरांसाठी आयोजित केली जात आहेत. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन करण्यात आलं. 'हा महोत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचं एक ठिकाण असल्याचे अभिनेता नाना पाटेकर यावेळी म्हणालेत. राजकारणात अजातशत्रू कसा असावं याचं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी असल्याचे' गौरवोद्गार नाना पाटेकर यांनी काढले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील एक हजार स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली.


 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाची पाहणी करणार


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ४ डिसेंबरला पाहणी दौरा


नागपूर ते शिर्डी महामार्गाची करणार पाहणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला करणार समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

मुंबई आयआयटी प्लेसमेंट सिजनला सुरवात, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार प्लेसमेंट्स

मुंबई आयआयटी प्लेसमेंट सिजनला सुरवात, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार प्लेसमेंट्स



या प्लेसमेंट सीझनमध्ये देशातील आणि देशाबाहेरील 300 कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे


या प्लेसमेंट सीजन ची सुरुवात सकारात्मक झालेली पाहायला मिळत आहे पहिल्याच दिवशी 300 प्रीप्लेसमेंट ऑफर्स विद्यार्थ्यांना देण्यात आला त्यातील 194 ऑफर्सचा विद्यार्थ्यांनी स्वीकार केला


तर पहिल्या दिवशी एकूण अडीचशे जॉब ऑफर्स पैकी 175 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत


प्लेसमेंट सीझनच्या पहिल्या दिवशी एकूण 46 कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या


एक्सेंचर सोल्युशन ,एअरबस इंडिया मायक्रोसॉफ्ट इंडिया मॉर्गन स्टॅन्ली, क्वालकॉम, शेल इंडिया, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, टाटा स्टील या कंपनीचा पहिल्या दिवशीच्या प्लेसमेंट सीजन मध्ये सहभाग होता

यवतमाळ- तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात करंट लागला

यवतमाळ- तपासणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेला रुग्णालयात करंट लागल्याची घटना घडली आहे. विजेचा करंट लागण्याने महिलेची प्रकृती गंभीर आहे. निशा आनंद इंगोले असे जखमी महिलेचे नाव आहे. 


दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिला तपासणी साठी गेली होती तिथं असलेल्या एका पाईप मध्ये विजेचा करंट होता त्या पाईपच्या आधाराने महिला चालत असताना एकदम विजेचा धक्का महिलेला लागला असून ती जागीच कोसळली. 


 तिला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गर्भवती महिलेला लागला विजेचा धक्का

मुंबई आयआयटी प्लेसमेंट सीझनला सुरुवात, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार प्लेसमेंट्स

मुंबई आयआयटी प्लेसमेंट सीजनला सुरुवात, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होणार प्लेसमेंट्स


या प्लेसमेंट सीझनमध्ये देशातील आणि देशाबाहेरील 300 कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे


या प्लेसमेंट सीजन ची सुरुवात सकारात्मक झालेली पाहायला मिळत आहे पहिल्याच दिवशी 300 प्रीप्लेसमेंट ऑफर्स विद्यार्थ्यांना देण्यात आला त्यातील 194 ऑफर्सचा विद्यार्थ्यांनी स्वीकार केला


तर पहिल्या दिवशी एकूण अडीचशे जॉब ऑफर्स पैकी 175 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत


प्लेसमेंट सीझनच्या पहिल्या दिवशी एकूण 46 कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या


एक्सेंचर सोल्युशन ,एअरबस इंडिया मायक्रोसॉफ्ट इंडिया मॉर्गन स्टॅन्ली, क्वालकॉम, शेल इंडिया, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, टाटा स्टील या कंपनीचा पहिल्या दिवशीच्या प्लेसमेंट सीजन मध्ये सहभाग होता

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये; मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा

सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये,  असा संदेश कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती  राम दुर्ग तालुक्यातील सालहळी येथे पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज  बोमाई यांनी दिली

बिबट्या आणि जर्मन शेफर्ड आमने-सामने; झुंजीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

बिबट्या आणि जर्मन शेफर्ड या पाळीव कुत्र्यांच्या कुत्र्याच्या झुंजीचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला. एका बंगल्याबाहेर जर्मन शेफर्ड बसलेला होता. तेंव्हा चोरट्या पावलांनी बिबट्या तिथं पोहचला. काही कळण्याआधीच बिबट्याने जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या दिशेने झडप घेतली. जर्मन शेफर्डचा गळा बिबट्याच्या जबड्यात होता. मात्र त्याने हार मानली नाही. तो बिबट्याला झुंज देत राहिला. अखेर जर्मन शेफर्डने बिबट्याच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून घेतली. अवघ्या पंधरा सेकंदाची ही थरारक झुंज सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 27 नोव्हेंबरच्या पहाटे ही घटना घडली असून हा व्हिडीओ पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील असल्याचं बोललं जात आहे. मात्र वनविभागाला अद्याप घटनास्थळ सापडलेलं नाही.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 तारखेला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार

Mumbai Nagpur Samriddhi Mahamarg: नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11  तारखेला उद्घाटन होणार असून त्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा म्हणजे 4 तारखेला समृद्धी महामार्गावर प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतील, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली आहे. मुंबई ते नागपूर प्रवासात पाहणी करताना जालना येथे त्यांनी समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला.


 

हात जोडून विनंती करतो, उदयनराजेंनी राज्यपालांबाबतचा विषय थांबवावा : चंद्रकांत पाटील

"शिवरायांचा अपमान कोणीही केला नाही. आपण त्यांच्यामुळे उभा आहोत. उगाच किती दिवस दुकान चालवायचं आहे, राज्यपालांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. परंतु, इतके दिवस गदारोळ योग्य नाही.  उदयनराजे भोसले छत्रपती आहेत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, राज्यपाल यांच्याकडून चुकलं असेल तरी हा विषय थांबवला पाहिजे, असे मत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

भाजप आमदार गणेश नाईक यांना अत्याचाराच्या आरोप प्रकरणात मोठा दिलासा

नवी मुंबईतील भाजपा आमदार गणेश नाईक यांना बलात्कार केसमधून मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्या वर काही महिन्यांपूर्वी महिलेने बलात्कार आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची केस दाखल झाली होती. नाईक यांच्या बरोबर आपले लिव्ह इन रिलेशनशिपचे संबंध असून त्यांच्यापासून एक मुलगा असल्याचा आरोप महिलेने केला होता.  नेरूळ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि सिबीडी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याची धमकी असे गणेश नाईकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. मात्र आता या दोन्ही केस मधून गणेश नाईक यांना दिलासा मिळाला आहे.  पुराव्या आभावी या केस बंद करण्याबाबतचा ए समरी रिपोर्ट नवी मुंबई पोलीसांनी हाय कोर्टात सादर केला आहे.  या गुन्ह्यांबाबत गणेश नाईक विरोधकांना जबाबदार धरत आपल्याला राजकीय दृष्ट्या बदनाम केले जात असल्याचा स्पष्टीकरण दिले होते.

लोकल ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती, टिटवाळा रेल्वे स्थानकावरील घटना; बाळ आणि आईची प्रकृती स्थिर

Mumbai Local Train : कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्येच एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. प्रीती वाकचौरे असे या महिलेचं नाव आहे. ही गरोदर महिला आटगाव येथून लोकलने मुंबईच्या दिशेने रुग्णलयात जात होती. टिटवाळा रेल्वे स्थानकात तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या. महिला डब्यातील महिला प्रवासी यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. महिला जीआरपी आणि आरपीएफ रेल्वे पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. महिला प्रवासी, महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला असून तिची आणि बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोघांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Jalgaon Gold News : जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; जीएसटी सह सोन्याचा दर 55 हजारांच्या पार

Jalgaon Gold News : लग्नसराईच्या मुहूर्तावर गेल्या चोवीस तासांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत 10 ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी आज तब्बल 55,500 इतका विक्रमी भाव पोहोचल्याने ग्राहकांना सोने खरेदीसाठी पाठ फिरवली असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ आणि त्याचा परिणाम म्हणून जगभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून जळगावच्या सुवर्णनगरीतही त्याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचे दर 52,000 हजारांवर स्थिर होते.  आज मात्र 53,800 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहे. त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला असून वाढत्या किमती पाहता ज्यांना आवश्यकच आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना दिसतायत. नियोजित बजेट बिघडल्याने कमी प्रमाणत सोने खरेदी करीत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहे. काही ग्राहकांनी मात्र तूर्तास सोने खरेदीकडे पाठ फिरवत वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.  


 


 

बीडच्या गेवराईमध्ये तहसीलदारांनी कारवाई करुन बसस्थानकात लावलेले सहा ट्रॅक्टर वाळू माफियांनी पळवले

Beed News : तीन दिवसांपूर्वी बीडच्या गेवराईमध्ये अवैध वाळू उपसा करणारे दहा ट्रॅक्टर तहसीलदारांनी कारवाई करुन बसस्थानकात लावले होते. मात्र पहाटेच्या वेळी वाळू माफियांनी यापैकी सहा ट्रॅक्टर बस स्थानकातून पळवून नेले आहेत. ट्रॅक्टर पळवून नेतानाची ही सर्व घटना बसस्थानकामधल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दोन सुरक्षारक्षकांनी या ट्रॅक्टरला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाळू माफियांनी त्यांनाही न जुमानता या ठिकाणाहून ट्रॅक्टर पळवले आहेत. याप्रकरणी गेवराई पोलिसात ट्रॅक्टर पळवणाऱ्या वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Yavatmal News: पुसद येथे सावकाराच्या घरावर धाड

Yavatmal News: यवतमाळच्या पुसद येथे आशिष कदम या अवैध सावकाराच्या घरावर धाड टाकण्यात आली असून त्यांच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पुसद येथे जिल्हास्तरीय सावकारी पथकानं केली.


पुसद येथील डॉ. रवींद्र वडते यांच्या तक्रारीवरून आशिष कदम यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. या धाडीत 25 संशयित कागदपत्रे आढळून आली आहे. पुसद येथे जिल्हास्तरीय सावकारी नियंत्रण पथक आणि सावकाराचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक कार्यालयाने ही कार्यवाही केली.


 

पुसदच्या डॉ. रवींद्र रतन वडते यांनी अवैध सावकाराचा व्यवसाय करीत असल्याची जिल्हा निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. डॉ. वडते यांनी आशिष कदम यांच्याकडून 11 लाख 4 टक्के व्याजदराने घेतले घेतले होते. यावेळी सावकार आशिष कदम यांना तारण म्हणून सहा कोरे चेक, तीन कोरे बाँड दिले असल्याचे डॉ. वडते यांनी तक्रारीत नमूद केले होते.

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडोबाची दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असणाऱ्या यात्रेत पशुप्रदर्शनास प्रशासनाची मनाई

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडोबा यात्रा ही दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध यात्रा म्हणून परिचित आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या गुलाबी थंडीत,बेल भंडारा उधळत, "येळकोट यवळकोट जय मल्हार "च्या गजरात या यात्रेस प्रारंभ होतो.पण गेले तीन वर्षे कोरोना महामारीच्या धरतीवर यात्रा ,मेळावे यावर निर्बंध होते.त्यामुळे यात्रा झाली नव्हती.दरम्यान दक्षिण भारतातील प्रसिद्ध असणाऱ्या या यात्रे मध्ये देशभरातून उंट, घोडे, गाढव, कुत्री, गायी, म्हशी, बैल,मांजर, खेचररासह विविध पशूंचे या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात येते. ज्यातून देशभरातील पशु पालक व शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळून यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. पण गेल्या तीन वर्षात कोरोना महामारीमुळे ही उलाढाल बंद झाली होती.आणि यावर्षी कोविडचे निर्बंध हटल्यामुळे श्री क्षेत्र खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. परंतु ही यात्रा सुरू होण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने पशु पालक शेतकऱ्यांच्या उत्साहाचा हिरमोड केलाय. कारण स्थानिक खोंड म्हणून देशभरात ओळख असणाऱ्या लाल कंधारी खोंड व गाईस यावर्षी लंपी रोगाच्या पाश्वभूमीवर,जिल्हा प्रशासनाने पशु प्रदार्शनात परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. दरम्यान ग्रामीण अर्थकरणाशी नाळ असणाऱ्या या यात्रेत शेतकरी, शेतमजूर,पशु पालक यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. पण तीन वर्षानंतर होणाऱ्या या यात्रेत आणि अगोदरच अतिवृष्टी, परतीचा पाऊस,अवकाळीच्या फटक्याने पिके मातीमोल होऊन नुकसान झालेल्या,शेतकऱ्यांना व पशु पालकांना पशु विक्रीतून काही आर्थिक मदत होईल ही अपेक्षा होती. पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे तो फायदा मिळेल ही अशाही धूसर झालीय.


 
Beed News: बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी एक हजार 998 अर्ज तर सदस्य पदासाठी आठ हजार 591 अर्ज दाखल

Beed News: बीड जिल्ह्यात होत असलेल्या 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी एकूण एक हजार 998 अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले असून सदस्य पदासाठी आठ हजार 591 अर्ज दाखल झाले आहेत. 5 डिसेंबर रोजी या अर्जाची छाननी होईल आणि 7 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून गावांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळतेय.

कामावरुन काढल्याचा राग, जिओचा टॉवर रिपेअर करणाऱ्या तरुणाने केबल कापली, ग्राहकांना फटका

Mumbai News : कामावरुन काढल्या रागातून एका कर्मचाऱ्याने जिओच्या टॉवरची केबल कापल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात घडला. प्रवेश खान हा जियो टॉवरचा रिपेअर करण्याचं काम करत होता. मात्र काही कारणामुळे जिओ कंपनीने त्याला कामावरुन काढलं होतं. याचा राग मनात ठेवून प्रवेश खानने काल दुपारी गोरेगाव पश्चिममधील जवाहरनगर परिसरात असलेलं जिओच्या टॉवरची केबल कापली. ज्यामुळे मोठा संख्येने जिओच्या ग्राहकांना तब्बल दोन तास नेटवर्क नसल्याचा त्रास सहन करावा लागला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी प्रवेश खानविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे

Aurangabad Measles Updates: औरंगाबादमध्ये गोवरचे सात नवे रुग्ण; संशयितांचा आकडा 80 वर 

Aurangabad Measles Updates: मुंबईप्रमाणेच आता औरंगाबादमध्ये देखील गोवर रुग्णांची (Measles) वाढ झपाट्याने होताना पाहायला मिळत आहे. कारण गुरुवारी एकाच दिवसांत सात नवीन गोवर बाधितांची भर पडली आहे. तर गुरुवारी गारखेड्यातील विजयनगर, चिकलठाणा आणि नेहरूनगर या तीन भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसांत 7 गोवर बाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी 14 संशयित रुग्ण देखील आढळले आहेत.

मुंबै बँक प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट 

मुंबै बँक प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट 


मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या वर्ष 2015 मधील आर्थिक अनियमिततेचं प्रकरण


मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजपचे विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट दिली आहे


आर्थिक गुन्हे शाखेनं मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात नुकतंच आपलं आरोपपत्र दाखल केलं


या आरोपपत्रात दरेकर यांच्या विरोधात याप्रकरणी कुठले ही पुरावे सापडले नसल्याचा उल्लेख करत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे

Andheri News: मुंबईच्या अंधेरी स्टेशन परिसरात असलेला तीन ते चार दुकानांमध्ये आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

Andheri News: मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत स्टेशन परिसरात असलेला तीन ते चार दुकानांमध्ये आज पहाटे साडेपाच वाजता मोठी आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल एक तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 


अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाजूला दुकानांमध्ये आग लागल्यामुळे रेल्वेचा सुद्धा काही भाग जळून खाक झाला आहे. 


सुदैवानं या आगीमध्ये कुठल्याही जीवितहानी झाली असून मात्र 4 ते 5 दुकान दुकान जळून खाक झालं आहे.


शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र या संदर्भात डी.एन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहे. 

Mumbai News: मुंबई बँक प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखे कडून क्लीन चीट 

Mumbai News: मुंबई बँक प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखे कडून क्लीन चीट 


मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या वर्ष 2015 मधील आर्थिक अनियमिततेचं  प्रकरण


मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं भाजपचे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट दिली आहे


आर्थिक गुन्हे शाखेनं मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात नुकतंच आपलं आरोपपत्र दाखल केलं


या आरोपपत्रात दरेकर यांच्या विरोधात याप्रकरणी कुठले ही पुरावे सापडले नसल्याचा उल्लेख करत त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे

कल्याणमध्ये भक्ष्याच्या शोधात आलेला आठ फुटांचा धामण जाळीत अडकला, सर्पमित्राकडून सापाची सुखरुप सुटका

Kalyan News : भक्ष्याच्या शोधात आलेला आठ फूट लांबीचा धामण प्रजातीचा साप जाळ्यात अडकल्याची घटना कल्याण उंबर्डे गावातील एका गोदामात घडली. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत जाळे कापून या सापाची सुखरुप सुटका केली आहे. हा साप उंबर्डे गावातील भोईर यांच्या गोदामात भक्ष्याच्या शोधात शिरला होता. सूरज भोईर गोदामातून साहित्य काढण्यासाठी गेले असतानाच, अचानक त्यांना हा भलामोठा साप जाळ्यात अडकल्याचे दिसताच त्यांनी बाहेर पळ काढला. त्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संर्पक करुन माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र बोंबे हे घटनास्थळी येऊन जाळे कापून या सापाला शिताफीने पकडून पिशवीत बंद केले. साप पकडल्याचे पाहून भोईर कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला. हा साप धामण जातीचा असून याची माहिती कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन या सापाला निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहितीही सर्पमित्र  बोंबे यांनी दिली. 

बारामतीत अजित पवार यांच्याकडून सकाळी सहा वाजल्यापासून विकासकामांची पाहणी

Ajit Pawar in Baramati : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार यांनी बारामतीतील विविध विकासकामांची पाहणी सुरु केली आहे. विकासकामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार हे विद्या प्रतिष्ठान इथे जनता दरबार घेणार आहेत.

Aurangabad News: औरंगाबाद शहरात गोवरची झपाट्यानं वाढ, आणखी सात नवीन गोवर बाधितांची भर

Aurangabad News: औरंगाबाद शहरात गोवरची झपाट्याने वाढ


औरंगाबाद शहरात आणखी सात नवीन गोवर बाधितांची भर


विजयनगर, चिकलठाणा आणि नेहरूनगर या तीन भागांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव


एकाच दिवसात सात नवीन रुग्ण वाढवल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली


शहरातील गोवर बाधितांचा आकडा पोहोचला 17 वर

Gram panchayat elections in Chiplun: चिपळूणात ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार

Gram panchayat elections in Chiplun: चिपळूण तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.गेल्या तीन दिवसात फारसे अर्ज न आल्याने आज अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य ही ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरत असल्याने निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात पारा घसरला, थंडीचा कडाका वाढला

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात आज तापमानात मोठी घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. आज जिल्ह्यातील अनेक भागात दाट धुक्याची चादर बघायला मिळत आहे. धुक्यामुळे मात्र तूर, हरभरा या पिकांवर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस तापमाणत घट होताना दिसत आहे. दाट धुक्यामुळे काही भागात वाहतूक ही मंद गतीने सुरु आहे. 

Sangli News: जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील पाणी प्रश्नांवरुन मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावली आज महत्वाची बैठक

Sangli News: जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील पाणी प्रश्नांवरुन मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावली आज महत्वाची बैठक


सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक


बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री, खासदार, जतचे  आमदार , जिल्हाधिकारी, अन्य लोकप्रतिनिधीना बोलावणं


म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली 

Private Schools Fees: खासगी शिक्षण संस्थामधील 'फी'ला लगाम, राज्य सरकार ठेवणार वॉच

Private Schools fees: राज्यातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर लगाम लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा ( Higher & Technical Education Department ) वॉच राहणार आहे. खासगी संस्थांकडून केले जाणारे प्रवेश आणि घेतली जाणारी भरमसाठ फी यावर या विभागाचं विशेष लक्ष असणार आहे. 


राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण शुल्क नियंत्रण (FRA) प्राधिकरण स्थापन केले आहे. मात्र पुढील काळात या एफआरएकडून पारदर्शी कारभार होतो की नाही, याच्या पडताळणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ही यावर वॉच ठेवला जाणार आहे.  एफआरएकडून शुल्क ठरविण्यात आलेल्या राज्यातील शिक्षण संस्थांपैकी कोणत्याही 10 संस्थांचे ऑडिट उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरीकांसाठीही स्वतंत्र डबा राखून ठेवा; हायकोर्टात जनहित याचिका

Mumbai News: मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai Local News) असलेल्या उपनगरीय लोकलमध्ये दिव्यांगाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करावा, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या वकिलाकडून ही जनहित याचिका केली गेली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. के. पी. नायर जे पूर्वी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबईतील लोकलमधून प्रवास करताना ऐन गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते याकडे नायर यांनी याचिकेतून लक्ष वेधलेलं आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Private Schools fees: खासगी शिक्षण संस्थामधील 'फी'ला लगाम, राज्य सरकार ठेवणार वॉच


Private Schools fees: राज्यातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर लगाम लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा ( Higher & Technical Education Department ) वॉच राहणार आहे. खासगी संस्थांकडून केले जाणारे प्रवेश आणि घेतली जाणारी भरमसाठ फी यावर या विभागाचं विशेष लक्ष असणार आहे. 


राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण शुल्क नियंत्रण (FRA) प्राधिकरण स्थापन केले आहे. मात्र पुढील काळात या एफआरएकडून पारदर्शी कारभार होतो की नाही, याच्या पडताळणीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ही यावर वॉच ठेवला जाणार आहे.  एफआरएकडून शुल्क ठरविण्यात आलेल्या राज्यातील शिक्षण संस्थांपैकी कोणत्याही 10 संस्थांचे ऑडिट उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.


उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांतील प्रवेश आणि शुल्क यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या एफआरए वरही लक्ष ठेवले जाणार आहे. एफआरएकडून संस्थांचे शुल्क ठरविताना नियमांनुसार ठरवले गेले का? कोणास वाढीव शुल्काची शिथिलता देण्यात आली का? किती संस्थांनी कसे आणि किती शुल्क वाढविले ? या सगळ्याचा आढावा पुढील शैक्षणिक वर्षापसून घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. 


मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरीकांसाठीही स्वतंत्र डबा राखून ठेवा; हायकोर्टात जनहित याचिका


मुंबईची जीवनवाहिनी (Mumbai Local News) असलेल्या उपनगरीय लोकलमध्ये दिव्यांगाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करावा, अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या वकिलाकडून ही जनहित याचिका केली गेली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. के. पी. नायर जे पूर्वी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे सचिव म्हणून कार्यरत होते, त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबईतील लोकलमधून प्रवास करताना ऐन गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते याकडे नायर यांनी याचिकेतून लक्ष वेधलेलं आहे.


ज्येष्ठ नागरिकांसाठी उपनगरीय लोकलमध्ये स्वतंत्र डबा उपलब्ध करण्याच्या मागणीसंदर्भात 9 ऑगस्ट 2019 रोजी आपण तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनाही निवेदन दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या सार्वजनिक तक्रार कक्षानं त्याची एक प्रत रेल्वे प्रशासनाकडेही पाठवली होती. त्यावर 2 जानेवारी 2020 रोजी रेल्वेनं प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करणे शक्य नसल्याचं कळवलेल आहे. त्यामुळे आपण याप्रकरणी ही याचिका दाखल केल्याचंही नायर यांनी याचिकेत नमूद केलेलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.