Maharashtra News Updates 01 October 2022 : कोपरखेरणे येथे तीन मजली इमारत कोसळली, काही नागरिक अडकल्याची  प्राथमिक माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Oct 2022 11:14 PM
Navi Mumbai : कोपरखेरणे येथे तीन मजली इमारत कोसळली, काही नागरिक अडकल्याची  प्राथमिक माहिती

नवी मुंबईमधील कोपरखेरणे येथे तीन मजली इमारत कोसळली. 


बोनकोडे गावातिला घटना.


अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल..


काही नागरिक अडकल्याची  प्राथमिक माहिती.



Navi Mumbai : कोपरखेरणे येथे तीन मजली इमारत कोसळली, काही नागरिक अडकल्याची  प्राथमिक माहिती

नवी मुंबईमधील कोपरखेरणे येथे तीन मजली इमारत कोसळली. 


बोनकोडे गावातिला घटना.


अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल..


काही नागरिक अडकल्याची  प्राथमिक माहिती.



जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी केली चांदणी चौकाच्या पुलाची अंतिम पाहणी

 Pune : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. 

Bhiwandi Rain : भिवंडीत परतीच्या पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी

भिवंडी शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावारणासह पावसाला सुरवात झाली असून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. मागील एका तासांपासून होत असलेल्या पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागात पाणी साचले तर शहरातील तिनबत्ती बाजारपेठेत, मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली नाका, कमला हॉटेल, तसेच सीएनजी पेट्रोल पंप परिसरात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल पाहावयास मिळत आहे

Bhiwandi Rain : भिवंडीत परतीच्या पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी

भिवंडी शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावारणासह पावसाला सुरवात झाली असून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. मागील एका तासांपासून होत असलेल्या पावसामुळे शहर आणि ग्रामीण भागात पाणी साचले तर शहरातील तिनबत्ती बाजारपेठेत, मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली नाका, कमला हॉटेल, तसेच सीएनजी पेट्रोल पंप परिसरात पाणी साचल्याने नागरिकांचे मोठे हाल पाहावयास मिळत आहे

Yavatmal : एम टेक झालेल्या युवकाने बनवली  स्वयंचलित सोनिक कार; 150 रुपयात करता येणार 250 किलोमीटरचा प्रवास

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्येसाठी ओळखला जातो. याच जिल्ह्यातील शेतकरी पुत्र हर्षल नक्षणे या युवकाने आपल्या भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायड्रोजनिक कार बनवली आहे. या कारच्या माध्यमातून केवळ 150 रुपयात 250 किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे.

Sanjay Rathod : बंजारा समाज कोणासोबत आहे हे येणारा वेळच दाखवून देईल: संजय राठोड

बंजारा समाज कोणासोबत आहे हे तुम्हाला येणारा वेळच दाखवून देईल असं राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशावर सूचक वक्तव्य केलं. इतरही अनेक महंत आहेत,  जे कुठल्याही पक्षात गेलेले नाहीत.लोकशाहीत कोणी कुठेही जाऊ शकतात असंही ते म्हणाले. 

Vashim News: टोलनाक्यावरील असलेले लोखंडी शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळले

वाशीम जिल्ह्यातील तोंडगाव  फाट्याजवळील अकोला-हैद्राबाद महामार्गावर असलेल्या टोलनाक्यावरील असलेले लोखंडी शेड काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे  कोसळल्याची घटना घडली. पाऊस सुरु असल्याने  कोणतेही वाहन या शेडखाली नसल्याने सुदैवाने  जीवितहानी टळली 

Parbhani News: परभणीत राष्ट्रवादी भवनसमोर सरस्वती पूजन

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वतीच्या फोटो ऐवजी सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावा या वक्तव्याविरोधात परभणीत भाजप युवा मोर्चाने आंदोलन केले. सोबत राष्ट्रवादी भवन समोर सरस्वती पूजन केले.यावेळी छगन भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या आंदोलनकर्त्यांनी केलीय..

Nanded News : जेवणाचं ताट उचलण्याच्या कारणावरून वाद, मुलाकडून पित्याची निघृण हत्या
नांदेड मध्ये सुनेनं जेवणाचं ताट उचललं नाही म्हणून झालेल्या वादातून रागाच्या भरात मुलाने चक्ककुऱ्हाडीने सपासप वार करुन वडिलांचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय. बिलोली तालुक्यातील कासराळी येथे रात्री घडलीय. लालू कांबळे असं मृत पावलेल्या वडिलांचं नाव आहे. तर प्रकाश कांबळे असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव आहे.. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीतूनच प्रकाशाला अटक केलीय... रात्रीचं जेवण झाल्यानंतर लालू कांबळे यांनी सुनेला ताट का उचलायला सांगितले. यावेळी सुनेनं ताट उचलले नाही म्हणून लालू कांबळे आणि सुनेतं वाद झाला. यात बाजूलाच असलेल्या मुलगा प्रकाशाला राग आला आणि त्याने जवळच असलेली कुऱ्हाडीने वडील लालू यांच्या अंगावर सपासप वार करुन खुन केलाय. हत्या करुन प्रकाश फरार होत होता.या प्रकरणी प्रकाश कांबळे विरोधात बिलोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी प्रकाशला अटक केलीय..

 
बार्शीतील कुसळंबमध्ये दोन मुलांसह विवाहितेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा दाखल

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील मृत रोहिणी उर्फ अनुराधा काशीद हिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी पती बाबासाहेब काशीद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी छळ करणे, मारहाण करणे यामुळे महिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याच्या आशयची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 2017 साली देखील बाबासाहेब काशीद याच्यावर पहिली पत्नी अनुराधा काशीद हिला आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आता दुसऱ्यांदा त्याच्यावर असा गुन्हा आहे. बार्शी तालुका पोलीस आरोपीला आज न्यायालयात हजर करतील...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते दि. बा. पाटील  यांच्या घरी जाऊन घेतली भेट

नवी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते दि. बा. पाटील  यांच्या घरी जाऊन घेतली भेट. यावेळी त्यांनी नवी मुंबई  विमानतळाला दि .बा .पाटील यांचा नाव देण्याच्या प्रस्तावाबाबत दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितलं.  

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाची अमेरिकेच्या MIT विद्यापीठात निवड, आदित्य ठाकरेंकडून सन्मान

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा आकाश पोपळघट याची जगातील सर्वश्रेष्ठ अशा अमेरिकेच्या MIT विद्यापीठात निवड झाली. आज मातोश्रीवर आकाश आणि त्याच्या आई वडील यांचा आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संपर्कप्रमुख बबनराव थोरात व जिल्हाप्रमुख संदेश देशमुख उपस्थित होते.

देशातील सर्वात मोठी जप्ती; Xiaomi चे 5,5571 कोटी रुपये जप्त करण्याची ईडीला मिळाली मंजुरी

देशातील सर्वात मोठ्या जप्तीच्या कारवाईची परवानगी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीला मिळालेली आहे. चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी शाओमीचा 5 हजार 551 कोटींचा निधी आता ईडीकडून गोठवण्यात येणार आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने कंपनीविरुद्ध तपास केला होता. यानंतर कंपनीचा 5 हजार 551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे. बनावट कागदपत्र तयार करून रॉयल्टीच्या नावाखाली शाओमीनं ही रक्कम परदेशात पाठवल्याचा आरोप आहे.

मुस्लिम समाजातील व्यक्तीची अंत्ययात्रेदरम्यान दांडिया थांबवला,सरमसपुरामधील घटनेचं कौतुक

देशात एकीकडे हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये विविध विषयांवरून नेहमीच तणावाचे वातावरण दिसत असताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरातील सरमसपुरा येथे मात्र दोन्ही धर्मातील ऐक्य दिसून आले. अचलपुरात श्री जगदंबा देवी संस्थांन परिसरातील नवरात्र दांडिया सुरू असतानाच मुस्लिम समाजातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा तिथून येत असल्याची माहिती मिळताच विजय महाराज भुजाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता आदेश देत रंगात आलेला दांडिया थांबवत माणुसकी आणि सभ्यतेचा परिचय देत दोन धर्मातील सलोख्याची अनुभूती उपस्थितांना करुन दिली.. विजय महाराज आणि दांडिया खेळणाऱ्या भाविकांनी दाखवलेल्या या समांजस्याच्या भूमिकेचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे...

राज्यात लंपी आजार कमी झाल्याचं दिसतंय- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

लंपीचा प्रादुर्भाव मागील पंधरा ते वीस दिवसांच्या तुलनेत मागच्या दोन तीन दिवसात कमी झाल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे आपण केलेलं 70 टक्के लसीकरण. आतापर्यंत आपण 72 लाख पशुधनाचे लासीकरण पूर्ण केले असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एबीपी माझाला दिली. विखे पाटील म्हणाले की, राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत आपल्या राज्यात मृत्युदर कमी आहे. आपण मृत्यू झालेल्या दुधाळ गाईंना 35 हजार, बैलांना 25 हजार अशी मदत आपण देतो. औषध आणि लसीकरणाचा खर्च राज्य सरकार करीत आहे. तसंच यावेळी उपचारवेळी डॉक्टर कडून काही निष्काळजी झल्याचे दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला यावेळी दिली. .

राज्यात लंपी आजार कमी झाल्याचं दिसतंय- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

लंपीचा प्रादुर्भाव मागील पंधरा ते वीस दिवसांच्या तुलनेत मागच्या दोन तीन दिवसात कमी झाल्याचे दिसत आहे. याचे कारण म्हणजे आपण केलेलं 70 टक्के लसीकरण. आतापर्यंत आपण 72 लाख पशुधनाचे लासीकरण पूर्ण केले असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एबीपी माझाला दिली. विखे पाटील म्हणाले की, राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत आपल्या राज्यात मृत्युदर कमी आहे. आपण मृत्यू झालेल्या दुधाळ गाईंना 35 हजार, बैलांना 25 हजार अशी मदत आपण देतो. औषध आणि लसीकरणाचा खर्च राज्य सरकार करीत आहे. तसंच यावेळी उपचारवेळी डॉक्टर कडून काही निष्काळजी झल्याचे दिसल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला यावेळी दिली. .

गांधी फिल्म फाऊंडेशनकडून “पंच्याहत्तरीतील माझा भारत” (How I see my India @75)  या विषयावर चित्रकला स्पर्धा

मुंबई : 2, ऑक्टोबर, 2022– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 153वी जयंती 2 ऑक्टोबर, 2022 रोजी देशभरात साजरी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गांधी फिल्म फाऊंडेशनने “पंच्याहत्तरीतील माझा भारत” (How I see my India @75)  या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. 2 ऑक्टोबर, 2022 पासून या स्पर्धेला सुरूवात होईल.  मा. प्रभाकर कोलते, ज्येष्ठ कलाकार यांचे या स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.


 सदर स्पर्धा कलाविशारद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आपली पेंटींग्ज जमा करायची आहेत. 3’ X 3’ आकाराचे पेंटींग असावेत. निवडण्यात आलेल्या पेंटींग्जचे 2 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान “गांधी फिल्म्स फाऊंडेशन आर्ट गॅलरी”मध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. देशभरातील कला विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन गांधी फिल्मस फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नितीन पोतदार यांनी केले आहे.   


स्पर्धेसंदर्भातील सर्व माहिती व नियम यांच्या अनुषंगाने गांधी फिल्म फाऊंडेशनच्या वेबसाईटला http://www.gandhifilmsfoundation.org   भेट देऊ शकता. कलाविशारद, मुंबई यांच्याशीही सदर स्पर्धेसंदर्भात कलाकार संपर्क साधू शकतात तसेच, kalaevents@gmail.com या मेलवर मेल किंवा +91 8779023704 वर संपर्क करु शकता.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ओझर विमानतळावर दाखल, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत 

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या शिर्डी आणि नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते नुकतेच ओझर विमानतळावर दाखल झाले आहेत. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांचे राज गर्जनेसह स्वागत केले आहे. नाशिकमध्ये ते पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. 

Raj Thackeray : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर घेतली भेट 

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला राज ठाकरे यांनी शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईबाबांची विधिवत पूजा केली. यावेळी शिर्डी संस्थानाने राज ठाकरे यांचे स्वागत केले. त्याचबरोबर विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संचालक शंकर गायकर व सहकारी पदाधिकाऱ्यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 

मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा, 'एक व्यक्ती एक पद' या सूत्रानुसार खरगेंचा राजीनामा

मल्लिकार्जुन खरगे यांचा राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा


एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार खरगेंचा राजीनामा


काल काँग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज भरल्यानंतर आज राज्यसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा


राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कुणाकडे सोपवणार याची उत्सुकता


पी चिदंबरम, दिग्विजयसिंह, जयराम रमेश यांची नावे चर्चेत

Ahmednagar Accident: मोहटादेवी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

मोहटादेवी दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला अपघात... अपघात दोन जण जागीच ठार, तीन जण जखमी... पाथर्डी जवळ भाविकांची अल्टो कार आणि महिंद्रा स्कॉर्पिओची समोरासमोर धडक...अपघातात मृत्यू झालेले भाविक औरंगाबादच्या चित्तेपिंपळगाव येथील असल्याची माहिती...

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई भाजपच्या वतीने स्वयं रोजगार मेळाव्याचं आयोजन

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत. त्यातच आज मुंबई भाजपच्या वतीने भव्य स्वयं रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे या रोजगार मेळाव्याला उपस्थित असतील. थोड्याच वेळात नेतेमंडळी आले की, हा रोजगार मेळावा सुरु होईल.

जादू आणि करणीने आपल्या मुलाला मारल्याचा संशय, महिलेची भावाकडूनच हत्या, बुलढाण्यातील चांडोळ गावातील धक्कादायक प्रकार

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावातील एका 60 वर्षीय महिलेची तिच्याच सख्ख्या भावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलावर जादू आणि करणी करुन त्याला बहिणीनेच संपवल्याच्या संशयावरुन ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांना आहे. यावरुन पोलीस आता तपास करत आहेत. धनाबाई सुभाष गोमलाडू अस हत्या झालेल्या महिलेचं नाव असून हत्या करुन तिचा मृतदेह एका विहिरीत टाकण्यात आला होता. मृत महिलेने आमच्या तरुण मुलास भानामती करुन मारल्याचा आरोप आरोपीना केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी धाड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मृत महिलेच्या भावासह चार जणांना अटक केली आहे.

Raj Thackeray at Shirdi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस शिर्डी, नाशिक दौऱ्यावर

Raj Thackeray at Shirdi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या शिर्डी आणि नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे शिर्डीच्या साई मंदिरात पोहोचलेत... राज यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आहेत.. राज ठाकरे सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेणार आहेत. यानंतर ते शिर्डीतील मनसैनिकांशी संवाद साधतील..  शिर्डीचा दौरा आटोपून राज ठाकरे ओझर विमानतळावरुन नाशिककडे रवाना होतील. नाशिकमध्येही ते पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. 

Aurangabad: मोहटादेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला अपघात, दोघांचा मृत्यू

Aurangabad News: औरंगाबाद तालुक्यातील चित्तेपिंपळगाव येथील मोहटादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारला भरधाव महिंद्रा स्कारपीयो समोरासमोर जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ झालेल्या या अपघात चित्तेपिंपळगाव येथील दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी आहेत.

कंगना रनौत एकनाथ शिंदेंची भेट घेणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कट्टर विरोधक मानली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. कंगना आज रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांसह त्यांच्या विरोधकांनाही आपल्या बाजूनं वळवण्याचा शिंदे यांचा सातत्यानं प्रयत्न आहे. त्यामुळं कंगना रणौतच्या निकटवर्तियांकडून विचारणा झाल्यावर शिंदे यांनी तिला तातडीनं भेटीची वेळ दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगनानं उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वारंवार वादग्रस्त विधानं करून थेट शिवसेनेशी पंगा घेतला होता. तसंच कंगनाच्या कार्यालयातल्या बांधकामावरही मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती.

Maharashtra Rain Updates : पावसाची शक्यता

Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. अशात पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ज्यात पुढील तीन दिवस मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तीन ते चार ऑक्टोबर रोजी विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटन

सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार  आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.

5G iN India : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवांचा शुभारंभ

5G iN India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवांचा शुभारंभ होणार आहे. त्याचवेळी मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानात सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 (IMC-2022) चे उदघाटन होणार आहे. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 5G सेवांचा शुभारंभ होत आहे. अलीकडेच 5G ध्वनिलहरींचा यशस्वीरित्या लिलाव करण्यात आला आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांना 51,236 मेगाहर्टझ इतक्या क्षमतेचे स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या करण्यात आले ज्याचे एकूण उत्पन्न 1,50,173 कोटी रुपये इतके आहे.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...













पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवांचा शुभारंभ 












पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवांचा शुभारंभ होणार आहे. त्याचवेळी मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानात सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 (IMC-2022) चे उदघाटन होणार आहे. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 5G सेवांचा शुभारंभ होत आहे. अलीकडेच 5G ध्वनिलहरींचा यशस्वीरित्या लिलाव करण्यात आला आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांना 51,236 मेगाहर्टझ इतक्या क्षमतेचे स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या करण्यात आले ज्याचे एकूण उत्पन्न 1,50,173 कोटी रुपये इतके आहे.
 
सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटन


सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार  आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.


पावसाची शक्यता 


महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. अशात पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ज्यात पुढील तीन दिवस मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तीन ते चार ऑक्टोबर रोजी विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे.


कंगना रणौत एकनाथ शिंदेंची भेट घेणार


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कट्टर विरोधक मानली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. कंगना आज रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांसह त्यांच्या विरोधकांनाही आपल्या बाजूनं वळवण्याचा शिंदे यांचा सातत्यानं प्रयत्न आहे. त्यामुळं कंगना रणौतच्या निकटवर्तियांकडून विचारणा झाल्यावर शिंदे यांनी तिला तातडीनं भेटीची वेळ दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगनानं उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वारंवार वादग्रस्त विधानं करून थेट शिवसेनेशी पंगा घेतला होता. तसंच कंगनाच्या कार्यालयातल्या बांधकामावरही मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती.


रुपाली चाकणाकर हिंगोली दौऱ्यावर


आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणाकर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. जवळा बाजार येथे महिला मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत. यासह वसमत शहरात  अनेक कार्यक्रम आहेत. 


देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहेत. आज सकाळी ते हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यात जाणार असून तिथल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होणार आहे.. तिथून ते वर्धा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार असून संध्याकाळी परत नागपुरात पोहोचणार आहे..


शशी थरूर नागपूर दौऱ्यावर


काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर आज नागपूरच्या काही तासांच्या दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांचे नागपूर आगमन होणार असून त्यानंतर ते दीक्षाभूमी येथे जाणार आहेत... संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांची दीक्षाभूमी येथेच पत्रकार परिषद होणार आहे..


भाजपचा रोजगार मेळावा


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज भाजपच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रोजगार मेळाव्याची सुरुवात होईल


 चीनचा राष्ट्रीय दिवस 


चीनचा आज राष्ट्रीय दिवस आहे. त्यानिमित्ताने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग राष्ट्राला संबोधित करणार आहेत. तसेच त्यापूर्वी सैन्याच्या परेडची सलामी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी साडेसात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 


केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर


आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. 
गांधीधाम आणि जूनागढ येथे ते सभांना संबोधित करणार आहे. त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी सुरेंद्र नगर आणि खेडब्रह्म येथे केजरीवाल यांची सभा होणार आहे.  


स्वच्छ सर्वेक्षण 2022 अवार्ड समारंभ 


आज दिल्लीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 अवार्ड समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. 


मुंबईमध्ये आजपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाड होणार


मुंबईमध्ये आजपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये वाढ लागू होणार आहे. टॅक्सीचे दर तीन रुपयांनी तर रिक्षाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबईमध्ये आता टॅक्सीसाठी कमीत कमी 28 रुपये तर रिक्षासाठी 23 रुपये आकारले जाणार आहेत. 


Card Tokenisation नियम लागू


एक ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता, पण RBI ने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. नंतर आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करण्याचे निश्चित केले. 


डिमॅट अकाउंट 


शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असते. अनेकजण शेअर बाजारात व्यवहार करतात. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये  Two Factor Authentication चा पर्याय 30 सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही. 


एलपीजी गॅस दरात वाढ?


एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एक ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर होतात.


 दिल्लीतील वाढतं वायूप्रदूषण रोखण्यासाठी आजपासून (जीआरएपी)  ‘GRAP योजना लागू केली जाईल... वायू प्रदूषण थांबवण्यासाठी योग्य पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे... पर्यावरण तज्ञांच्या मतानुसार याच वर्षाअखेर योजनेमुळे प्रदूषणांची समस्येत घट होईल. याआधी जीआरएपीची 15 ऑक्टेबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. दरम्यान दिल्लीतील वायू प्रदूषण थांबवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे


दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय आज दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.. रक्तदान दिनानिमित्त सकाळी 11 वाजता एम्स रुग्णालयातील रक्तदान शिबीरमध्ये सहभागी होणार आहेत.


सौराष्ट्र आणि शेष भारतमध्ये सामना 


ईरानी चषकात आज सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्यात सर्व नजरा चेतेश्वर पुजारा याच्यावर असणार आहेत. अनुभवी पुजाराच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. 


आशिया चषकात भारतीय महिलांचा सामना 


आजपासून भारतीय महिलांचा आशिया चषकाची  सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील लय कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. इंग्लंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय महिलांचा उत्साह नक्कीच वाढला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकाचा दावेदार म्हटले जातेय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.