Maharashtra News Updates 01 December 2022 : सांगलीनंतर आता नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांची गुजरातमध्ये विलीन होण्याची मागणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Dec 2022 11:45 PM
आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली पोलखोल




आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केली पोलखोल

 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाने दाखवला खाजगी औषधालयाचा रस्ता

 

शासकीय रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याने खासजी दुकानातून खरेदी करण्याचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा सल्ला

 

भारती पवार स्वतः रुग्णाची चिठ्ठी घेऊन औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्या असता घडला प्रकार

 

केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी केला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाचा पंचनामा

 

अनेक औषधे उपलब्ध नसल्याच्या नागरिकांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे केल्या तक्रारी

 

 



 


मुंबईत गोवरग्रस्त बालकांची संख्या 346 , संशयित रुग्णांची संख्या 4355 वर

मुंबईत गोवरग्रस्त बालकांची संख्या 346 , संशयित रुग्णांची संख्या 4355 झाली आहे.  मुंबईत 117 मुलं रुग्णालयात दाखल, 16 ऑक्सिजन सपोर्टवर, 4 आयसीयूमध्ये आणि 3 व्हेंटिलेटरवर आहेत. आज 45 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वलसाड (गुजरात) : वंदे भारत ट्रेनला पुन्हा ग्रहण, उदवाडाजवळ ट्रेनला बैल धडकल्याने अपघात

वलसाड (गुजरात) : वंदे भारत ट्रेनला पुन्हा ग्रहण, उदवाडाजवळ ट्रेनला बैल धडकल्याने अपघात


 अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला बैलाची धडक 


 वलसाड जिल्ह्यातील उडवाडाजवळ एका बैलाला धडकल्याने ट्रेनचे नुकसान झाले


 संजानजवळ गाडी थांबवण्यात आली, दुरुस्ती करून मुंबईला पाठवण्यात आली.

Pune : कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू

राजीव गांधी प्राणीसंग्रहलयातील गव्याची प्रकृती मागील 15 दिवसांपासून खराब झाली होती. आज अखेर त्याचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्याचे वजन अचानक कमी व्हायला सुरवात झाली. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली उपचार सुरु होते. मात्र, त्या उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

Gopichand Padalkar: एमपीएससी नाही झालात तरी गावाकडे जाऊन सरपंचाची पोस्ट तुमची वाट बघत : गोपीचंद पडळकर

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गोपिचंद यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी करियर कसं घडवावं याचं मार्गदर्शन पडळकर करणार होते. मात्र प्रत्यक्षात पडळकर यांनी विद्यार्थ्यांना अजबच सल्ला दिला. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, एमपीएससी नाही झालात तरी गावाकडे जाऊन सरपंचाची पोस्ट तुमची वाट बघत आहे. एमपीएससी नाही झालात तर पंचायत समिती सदस्य होता येतं. एमपीएससी नाही झालात तरी आमदार आणि खासदार होता येतं. मात्र आमदार खासदार व्हायला मोठी स्पर्धा आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती


आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार होतं नियुक्तीपत्र 


नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना हायकोर्टाचा दिलासा


सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाची स्थगिती 


मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे संध्याकाळी झाला तातडीची सुनावणी


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्यात त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाची स्थगिती


मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता नियुक्तीपत्र देता येणार नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारी दिलेल्या 111 जणांच्या नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती, आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात येणार होतं नियुक्तीपत्र 


नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना हायकोर्टाचा दिलासा


सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास हायकोर्टाची स्थगिती 


मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे संध्याकाळी झाला तातडीची सुनावणी


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्यात त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टाची स्थगिती


मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता नियुक्तीपत्र देता येणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व डाऊन झाल्यामुळे चेक इन करताना प्रवाशांना अडचणी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व डाऊन झाल्यामुळे मागील 20 मिनिटांपासून चेक इन करताना प्रवाशांना अडचणी येत आहेत. नियोजित फ्लाइट्स बुकिंग केलं असताना विमानतळावर चेक इन साठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहेत. सर्वर डाऊन झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाल्याचं सांगण्यात येत आहे ही तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येईल, असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलाय

दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकनं 'पाणी' पाजलं; कर्नाटकने तुबची बबलेश्वर योजनेतून तिकोंडी तलावात पाणी सोडलं

दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी जत दौर्‍यावर असतानाच कर्नाटकने सोडलेल्या पाण्याने पूर्व भागातील तिकोंडी तलाव तुडूंब भरून वाहू लागला आहे. कोणतेही आवर्तन जाहीर केले नसताना कर्नाटकने तुबची बबलेश्‍वर योजनेतून पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या आजच्या कार्यक्रमाविरोधात हायकोर्टात याचिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याच्या आजच्या कार्यक्रमाविरोधात हायकोर्टात याचिका,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती आज रात्री होणारा कार्यक्रम तीन उमेदवारांची हायकोर्टात धाव, मुख्य न्यायमूर्तींपुढे तातडीची सुनावणी सुरू

Nagpur : रॉंग साईडने येणाऱ्या कंटेनची दुचाकीला धडक; महिला अन् चिमकुला जागीच ठार

Nagpur News : मौदा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रॉंग साईडने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील महिला आणि त्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिला कुही तालुक्यातील चिकना धामना येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातातील इतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Nashik: सांगलीनंतर आता नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांची गुजरातमध्ये विलीन होण्याची मागणी 

सांगलीच्या जत तालुक्यातील ग्रामस्थांनी कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी केल्यानंतर आता सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांची गुजरातमध्ये विलीन होण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी ही मागणी केली आहे. सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या गावातील ग्रामस्थांना सोयी सुविधा मिळत नसल्याने तहसीलदार यांना गुजरातमध्ये विलीन होण्याचे निवेदन देण्यात आले. रस्ते,पाणी वीज, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

Malegaon Blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून दोषमुक्तीची याचिका मागे; हायकोर्टात दाखल केली होती याचिका

Malegaon Blast:  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींकडून दोषमुक्तीची याचिका मागे; हायकोर्टात दाखल केली होती याचिका

Parbhani News: परभणीत वीज तोडणी विरोधात शिवसेनेचे आंदोलन

Parbhani News: महावितरण कडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ आज परभणीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडुन शहरातील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला घेराव घालण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तत्काळ कृषी पंपांचे वीज बिल माफ करून शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या करून देण्याची मागणी महावितरणच्या अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ द्यावी, बावनकुळेंची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

Chandrashekhar Bawankule : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) अर्ज भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा (Election Commission Website) सर्व्हर डाऊन असल्यामुळं उमेदवारी अर्ज भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही  मागणी केली आहे. बानवकुळे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान (State Election Commissioner U.P.S. Madan)यांची भेट घेऊन मागण्यांचे पत्र दिले आहे.

Mumbai News: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नावे वॉरंट जारी

Mumbai News: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नावे वॉरंट जारी


मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून जामीनपात्र वॉरंट जारी


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोरील हनुमान चालीसा प्रकरणानंतर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता


राणा दाम्पत्याला 11 नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे निर्देश दिलेले असतानाही ते सतत गैरहजर राहिल्यानं अखेर कोर्टानं जामीनपात्र वॉरंट जारी केलं


5 हजार रुपयांच्या जामीनावावर वॉरंट रद्द करता येणार 

Solapur News: सोलापूर विजयापूर रस्ता सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी रोखला

Solapur News: सोलापूर विजयापूर रस्ता सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी रोखला


चिमणी बचाव, कारखाना बचावच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको


सोलापूर - विजयपूर महामार्गावर हत्तूर येथे मागील 15 मिनिटापासून रास्ता रोको


विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरु व्हावी या साठी मागील 25 दिवसापासून सोलापूर विकास मंचतर्फे सुरु आहे उपोषण


त्या आंदोलनाच्या विरोधात साखर कारखानाच्या सभासदांनी मागील काही दिवसापासून सुरु केले आहे उपोषण


त्यानंतर आता सोलापूर विजयपूर रास्ता कारखान्याच्या सभासदांनी रोखला 

Mumbai News: माझी मुंबई स्वच्छ मुंबई अंतर्गत अंधेरी होणार आता स्वच्छ; अंधेरीत महापालिकेच्या कार्यालयात कचरा स्वच्छ करणारी गाडी दाखल

Mumbai News: अंधेरीत पहिल्यांदाच अंधेरी 'के' पूर्व विभागात 'घाण साफ करणारी मशीन' दाखल झाली आहे. या मशीनमुळे रस्त्याच्या पार्कींगमध्ये आणि अन्य ठिकाणच्या कानाकोपऱ्यात साचलेला कचरा अवघ्या काही क्षणात साफ होणार आहे. आज महापालिका उपायुक्त रणजित ढाकणे आणि महापालिका सहआयुक्त मनीष वळंजू यांच्या हस्ते उद्घाटन करून मशीनचे लोकार्पण करण्यात आले.


मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार "माझी मुंबई स्वच्छ मुंबई" ही संकल्पना गुरुवारी अंधेरीत राबवण्यात आली.  त्यानिमित्ताने महापालिकेच्या 'के' पूर्व प्रभागात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती अभियान अंधेरीत राबवण्यात आली. या अभियानामध्ये मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता तसेच महानगरपालिका 'के' पूर्व विभागाच्या कार्यालय आवारात स्वच्छते बाबत तरुणांनी पथनाट्य सादर केले. यावेळी तरूणांनी स्वच्छतेबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. या अभियाना अंतर्गत एक विशेष 'घाण साफ करणारी मशीन' ही मशीन रस्त्याच्या पार्कींग मधील कचरा आणि अन्य ठिकाणी कानाकोपऱ्यातील कचरा अगदी काही वेळात स्वच्छ होणार आहे. यामुळे अंधेरीतील रस्त्याच्या पार्कींग मधील व कानाकोपऱ्यातील कचरा साफसफाई होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

Helicopter Emergency Landing: इंडियन एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग

Helicopter Emergency Landing: इंडियन एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बारामती तालुक्यातील खांडजमध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास चेतक
 ZA 425 या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये इंडियन एअर फोर्सचे एक महिला तर तीन एअरफोर्सचे जवान होते. खांडज येथील ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. सदरचे पुण्याहून हेलिकॉप्टर सोलापूरकडे जात असताना हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पायलटने प्रसंगावधान ओळखून हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या लँड केलं. दरम्यान एअर फोर्सचे आणखी एक हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाले होते मदत पुरवून ते हेलिकॉप्टर परतले.  

Ramdas Kadam on Sanjay Raut: संजयजी शेपूट का घालताय? माजी मंत्री रामदास कदम यांचा सवाल

Ramdas Kadam on Sanjay Raut: शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधत खासदार संजय राऊत यांचा पळपुटा असा उल्लेख करत कर्नाटकात जायच्या भीतीनं शेपूट का घालताय, असा सवाल उपस्थित केलाय. कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत घाबरले का? याचेच आश्चर्य वाटत असल्याचे रामदास कदम म्हणाले. खेड तालुक्यातील जामगे येथे आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे. रामदास कदम यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मला देखील कर्नाटक न्यायालयानं समन्स काढलं होतं आणि मी सुद्धा कर्नाटकात जाऊन आलो. सीमाभागांतील मराठी लोकांनी माझे तिथे स्वागत केले आणि माझ्या जामिनासाठी तिथल्याच मराठी लोकांनी मला सहकार्य केले. त्यामुळे संजयजी तुम्ही घाबरू नका आणि मराठी माणूस पळपुटा आहे, असा संदेश देऊ नका, तुम्ही कर्नाटकात जा तेथील मराठी लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहतील, असा सल्ला देखील रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला आहे. 

Beed News: मला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील स्थानिक, वरिष्ठ नेत्यांनी रचलेलं षडयंत्र; गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया
Beed News: देवस्थान जमिनी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी माझ्या विरोधात रचलेल हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. मी पूर्वीच्या पक्षात होतो, त्या पक्षातील स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेत्यांनी मिळून मला बदनाम करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं धस म्हणाले आहेत. 

 

माझ्यावर जे आरोप झाले आहेत आणि ज्या प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यासाठी मी पोलिसांना सहकार्य करायला तयार असून कुठलीही चौकशी झाली तरी मी त्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत. एखाद्या राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचं षडयंत्र रचले जात असेल तर अनेक देवस्थानं आणि चॅरिटेबल ट्रस्टवर काम करणाऱ्या नेत्यांचं राजकीय आयुष्य संपुष्टात येईल, अशी देखील शंका धस यांनी व्यक्त केली आहे. 
Hingoli News: कैद्याच्या बँक खात्यातून रक्कम गायब; कैद्यानं कारागृहातून पाठवलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Hingoli News: परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यातून परस्पर पैसे काढण्याची तक्रार तक्रारदाराने चक्क तुरुंगातून पत्र पाठवून वसमत शहर पोलिसांत केली आहे. याप्रकरणी विरेगाव येथील एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वसमत तालुक्यातील विरेगाव येथील ज्ञानेश्वर जाधव आणि त्याचे वडील अंबादास जाधव हे मागील काही वर्षापासून एका गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे ते औरंगाबाद येथील हरसूल कारागृहात आहेत दरम्यान अंबादास जाधव यांच्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यातून परस्पर खोटी सही करून सहा हजार रुपये उचलले आहेत तशी तक्रार करण्यात आली आहे.

 

कोरोना काळात बँकांमध्ये मास्क आणेवारी होता आणि याच मास्कचा फायदा घेत या व्यक्तीने बँक खात्यातून परस्पर पैसे उचलण्याचे तक्रारीत म्हणाले आहे, त्यानुसार वसमत शहर पोलिसांत एका आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पुणे श्रमिक पत्रकार संघात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी, ढकलाढकली करण्यात आली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात मोठी गर्दी करण्यात आली आहे. वास्तव कट्टा आणि अर्हम फाउंदेशनच्यामार्फत कार्यक्रम घेण्यात येणार होता. त्यासाठी सगळे विद्यार्थी जमले होते. यात अपक्ष आमदार बच्चू कडू, भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. यापूर्वी विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याने आयोजक आणि विद्यार्थ्यांमधे बाचाबाची झाली.

नागपूरच्या दीक्षाभूमीत 400 किलो वजनाची अष्टधातूच्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना

Nagpur News : थायलंडमधून आणण्यात आलेली 400 किलो वजनाची अष्टधातूची 9 फूट उंच तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना नागपुरातील दीक्षाभूमीतील स्तुपात करण्यात आली. थायलंडमध्ये जवळपास आठ महिन्यांपासून ही मूर्ती तयार करण्यात येत होती. थायलंड येथील एका दाम्पत्याने दीक्षाभूमी येथे मूर्ती द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ही मूर्ती तयार करण्यात आली. थायलंडचे भिक्कू संघाचे सचिव भन्ते महाकायिक यांच्यासह 24 भन्ते यांच्या उपस्थितीत प्रार्थना करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशासमोर तथागत गौतमाची मूर्तीची स्थापना करण्यात आली. ध्यानस्थ मुद्रेत असणारी ही मूर्ती लोभस असून लक्ष वेधून घेत आहे. या भाव मुद्रेतील ही जगातील एकमेव मूर्ती ठरावी अशी काळजी मूर्ती निर्माणकर्त्यांनी घेतली आहे.  

नागपुरात संघ कार्यालयात स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा निघाला महापारेषणचा कार्यकारी अभियंता; पोलिसांकडून अटक

Nagpur News : शहरातील रेशीमबाग येथील संघ कार्यालय, रेशिमबाग मैदान आणि मैदानाजवळील कविवर्य सुरेश भट सभागृह स्फोटाने उडवून लावू, अशा आशयाची धमकी देणारा निनावी पत्र हाती लागल्यावर शहरात खळबळ उडाली होती. याचा सखोल तपास करत असताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली असून धमकी देणारा महापारेषणचा कार्यकारी अभियंता निघाला. त्या अभियंत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 25 नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये एक निनावी पत्र मिळाले होते. त्यामध्ये संघाचे रेशीमबाग येथील कार्यालय, रेशीमबाग मैदान आणि मैदानाजवळील कविवर्य सुरेश भट सभागृह या ठिकाणी धमाका करू, अशी धमकी लिहिण्यात आली होती. सोबतच एक बॉम्बचा चित्रही त्या पत्रावर काढण्यात आला होता. पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिसमध्ये तो निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून धमकीचे निनावी पत्र मीच लिहिले आहे, असे कबूल केले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

राज ठाकरे आज सिंधुदुर्गातल्या मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Sindhudurg News : आपल्या कोकण दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग इथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक उत्साह आहे. आजच्या दिवशी राज ठाकरे काय कानमंत्र देणार? याकडे सध्या प्रत्येक मनसे कार्यकर्त्याचं लक्ष लागलं आहे.

धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बस पलटल्याने अपघात; 15 प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

Dhule News : धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी बस पलटल्याने अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरु आहे.



कोकण रेल्वे मार्गावरुन वातानुकूलित कंटेनर ट्रेन धावली; रस्त्याने वाहतुकीमधील धोके टळणार, वेळ, पैशांची बचत होणार

Ratnagiri News : कोकण रेल्वे मार्गावरुन बुधवारी (30 नोव्हेंबर) पाहिल्यांदाच वातानुकूलित कंटेनर ट्रेन धावली. ही पहिली वातानुकूलित कंटेनर ट्रेन कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, संचालक संतोषकुमार झा, दीपक गद्रे, विभागीय व्यवस्थापक मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रत्नागिरी रेल्वे स्थानकातून जेएनपीटीकडे रवाना झाली. या पहिल्या ट्रेनमधून उद्घाटनाच्या पहिल्या फेरीत 250 मेट्रिक टन प्रक्रियायुक्त मासळी पाठवण्यात आली. अकरा कंटेनर बुधवारी रवाना झाले आहेत. या कंटेनर ट्रेनमुळे रस्त्याने वाहतुकीतील धोके टाळता येणार आहेत, तसेच वेळ आणि पैशांचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Nanded News: आम्हाला तेलंगणात सामिल करा, नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांची मागणी

Nanded News: नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील नागरिकांच्या "प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे"या कृती समितीकडून तेलंगणा राज्यात समाविष्ट करा,यासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर, रस्ता रोको करत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या तुलनेत शेतकरी, मजूर,नोकरदार यांना शासनाकडून विविध योजनां अंतर्गत अर्थसहाय्य व मदत केली जाते. ज्यात शेतीसाठी मोफत वीज ,पाणी व विविध योजनां अंतर्गत, बी-बियाणे, शेती अवजारे, ट्रॅकटर, विहीर, कृषिपंप आदी योजना. तर दिन बंधू योजने अंतर्गत मजूर कष्टकरी कुटुंबास घरे,व्यवसायासाठी आर्थिक मदत,आरोग्य योजनेचा आणि शिक्षणात सवलत, तर दलित बंधू योजने अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना मोफत उच्च शिक्षण, घरे, व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि 4 एकर जमीनीची तरतूद अशा विविध योजनेमुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नागरिकांचा तेलंगणात जाण्याची मागणी करत आज आंदोलन केले जाणार आहे.

Parbhani Updates: परभणीत थंडी परतली दोन दिवसांपासून तापमान 10 अशांखाली

Parbhani Updates: मागच्या आठवड्यात गायब झालेली थन्डी पुन्हा परतली असून परभणीत दोन दिवसांपासून तापमान हे 10 अंशाखाली गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा परभणीकर गारठून गेले आहेत. ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटत आहेत तसेच उबदार कपड्यांचा वापर वाढलाय. तसेच सकाळी गुलाबी थंडीत व्यायाम करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

मनमाड, पाथर्डी आणि सोलापूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाची दूरवस्था, आमदार निलेश लंकेंचा उपोषणाचा इशारा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड, पाथर्डी आणि सोलापूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या दूरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आपण याबाबत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे 7 डिसेंबरपासून याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयामोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी दिला आहे. सोबतच ज्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर दौऱ्यावर होते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी बोलताना म्हटलंय की, जिल्ह्यातील एकाही रस्त्याचे काम प्रलंबित नाही. त्यामुळे आता जोपर्यंत या रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरु होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. 7 डिसेंबर पर्यंत काम सुरु करण्यासाठी आम्ही मुदत दिली आहे, काम सुरु झाले नाही तर नगर, पाथर्डी, शेवगाव इथल्या नेत्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

म्हैसाळ विस्तारित योजनेचा अहवाल पाठवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Sangli News : म्हैसाळ विस्तारित योजनेचा अहवाल पाठवण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना


सांगलीचे जिल्हाधिकारी आज दुपारी उमदीमध्ये जाऊन योजनेची घेणार माहिती


म्हैसाळ पाणी योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला सरकारकडून आधीच तत्वत: मान्यता देण्यात आली आहे

Aurangabad News: निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ

Aurangabad News: राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची लगबग सुरू असतानाच, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना रात्रभर जागून काढावी लागत आहे. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धडपड पाहायला मिळत आहे. 


औरंगाबाद मधील अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरताना वेबसाईट चालत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात गेल्या दोन दिवसांपासून 50 पेक्षा अधिक उमेदवार आपला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रात रात्र जागून काढत आहे. मात्र असे असताना उमेदवारांना दोन दोन दिवस अर्ज भरण्यासाठी लागत आहे. 

Ahmednagar News: गदर टू चित्रपटाचे भिंगार परिसरात शूटिंग

Ahmednagar News: झी टेलिफिल्म निर्मित "गदर टू "या चित्रपटाचे शुटींग सध्या अहमदनगरच्या भिंगार येथील परिसरात सुरू आहे. या शूटिंगला अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन अभिनेते सनी देओल यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अनिल शर्मा, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, नगरसेवक धनंजय जाधव, अक्षय कर्डीले, उद्योजक नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते. शूटिंगसाठी अहमदनगरची निवड केल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे सुजय विखेंनी आभार मानले आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडीतील विकास कामांवरून वाद
Ahmednagar News: भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. मात्र, आता त्यांच्यातील वादाचा मुद्दा हा अतिशय भावनिक मुद्दा आहे. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाशेजारी असलेल्या नदीवर आमदार रोहित पवारांनी घाट बांधण्याचे काम हाती घेतले होते. चौंडीच्या विकासासाठी साडे सात कोटींचा विकास निधी रोहित पवारांनी आणला होता. मात्र या कामाला सरकारने स्थगिती दिलीये. दरम्यान भाजप आमदार राम शिंदे यांनी रोहित पावरांवर गंभीर आरोप केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाला समकक्ष काम करून अहिल्यादेवी होळकर यांचे काम पुसण्याचा रोहित पवारांचा डाव असल्याचं राम शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच हा आमच्या भावनेचा विषय असून चौंडीतील नागरिकांचा विचार न घेता काम केली जात आहे असं राम शिंदे म्हणाले. 

 

तर आमदार रोहित पवारांनी राम शिंदेंच्या आरोपांना उत्तर देताना राम शिंदे अतिशय खालच्यास्तराचे राजकारण करत असल्याचे म्हंटले आहे...त्यांच्या विचारांची पातळी तेवढ्या उंचीची राहिलेली दिसत नाही, कोणत्याही थोर व्यक्तीची कुणीही बरोबरी करूच शकत नाही , मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावाचा विकास व्हावा यासाठी आम्ही भरीव निधी आणला मात्र या कामाला देखील आमदार राम शिंदे यांनी स्थगिती आणली. स्वतः मंत्री असताना चौंडीच्या विकासासाठी एक रुपया देखील त्यांनी आणला नाही आता भावनिक राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
Shraddha Walkar Case: आफताबची आज होणार नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्टमध्ये गुन्ह्याची कबुली, छतरपूर-गुरुग्रामच्या जंगलात पुन्हा सर्च ऑपरेशन

Aftab Narco Test: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालची आज नार्को टेस्ट होणार आहे. यापूर्वी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीही स्थापन केली आहे. दुसरीकडे, आफताबचे वक्तव्य आणि आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे छतरपूर आणि गुरुग्रामच्या जंगलात पुन्हा शोधमोहीम राबवली जाईल, जेणेकरून मृतदेहाचे तुकडे किंवा इतर पुरावे मिळू शकतील.

बैलगाडा शर्यत आयोजकांवरील खटले मागे घेण्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

Bombay High Court News: बैलगाडा शर्यतींवर (Bullock cart race) बंदी असतानाही शर्यतींचं आयोजन करणाऱ्या आयोजक आणि सहभागी होणाऱ्यांवरील खटले मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) काळात घेतलेल्या या निर्णयात प्रामुख्यानं आजी-माजी खासदार आणि आमदारांवरील खटल्यांचाही समावेश असल्यानं हा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठानं राज्य सरकारला (Maharashtra Govt) भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Gujrat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान

Gujrat Assembly Election : गुजरातमध्ये (Gujrat Election) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. आज पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ 6 उमेदवार उभे केले आहेत.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


बातमी कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. अशात काही कार्यक्रम मात्र ठरलेले असतात. आज दिवसभरात काय काय कार्यक्रम आहेत. याबाबत आम्ही आपल्याला या बातमीतून माहिती देत आहोत. तर आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी  गुजरात विधानसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. तर अहमदाबादमध्ये पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे. इकडे औरंगाबादेत रिक्षाचालकांचा संप, शिवसेनेचं आंदोलन होणार आहे. तिकडे नांदेडमध्ये  आम्हाला तेलंगणात सामिल करा, असं म्हणत काही गावकरी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल...


Gujrat Election: गुजरातमध्ये आज विधानसभेचं पहिल्या टप्प्यासाठी मतदान
गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत असून आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. आज पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार मतदान करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 70 महिला उमेदवारांसह 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्षानेही 57 उमेदवारांना तिकीट दिले आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमने पहिल्या टप्प्यात केवळ 6 उमेदवार उभे केले आहेत.


पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांचा रोड शो


पहिल्या टप्प्याचं मतदान दोत असताना पंतप्रधान मोदींचा  अहमदाबादमध्ये मेगा रोड शो आज होणार आहे. अहमदाबादमधील पाच विधानसभा मतदारसंघातून हा रोड शो जाणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 पर्यंत हा रोड शो असेल.  तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सानंदमध्ये सकाळी 10.30 वाजता रोड शो करतील.   


मुंबईत गुंतवणूकदारांची बैठक


मुंबई - कोळसा खाणींच्या व्यावसायिक लिलावात बोली लावणाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आज मुंबईत गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. आज होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी असतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असतील.


राज्यपालांवर महाभियोग चालणार?  
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.   


विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांचा संप 
आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक आज संप करणार आहेत. शहरात साधारण 15 रिक्षा संघटना आहेत. संपामुळे लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. 
 
आम्हाला तेलंगणात सामिल करा, नांदेडमधील  काही गावाचं आंदोलन
नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रात सीमा भागात रहाणाऱ्यां नागरिकांचे तेलंगणात सामिल करा आंदोलन आज होणार आहे.  नागरिकांचे प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिकांचे या कृती समितीकडून आंदोलन होत आहे. माहूर, किनवट, धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली तालुक्यातील काही गावांची तेलंगणात जाण्याची इच्छा आहे. दुपारी 12 वाजता तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला जणार आहे.
 
श्रद्धाच्या आरोपीची आज नार्को टेस्ट
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट होणार आहे.  एफएसएल बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात नार्को टेस्ट होणार आहे. साधारण 45 मिनिट ही टेस्ट चालते. 
 
औरंगाबाद शिवसेना आंदोलन 
सरकारच्या विरोधात आज शिवसेना जिल्ह्यातील आठ ठिकाणी आंदोलन करणार आहे.  यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गंगापूरच्या इसरवाडी फाटा येथे, तर चंद्रकांत खैरे वैजापूर येथील शिऊर बंगला येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत.
 
नशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली जाणार 
नाशिक – नशिकमध्ये आजपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली जाणार आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाल्यानंतर नशिकमध्ये हेल्मेटसक्ती ठेपळली होती. आता नव्याने हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आलेत.  
  
पुणे ते सिंगापूर या नव्या विमानसेवेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. एअर विस्तारा एअरवेजची ही सेवा असेल


मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर
 सिंधुदुर्ग – मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता वेंगुर्ला येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांनतर दुपारी 4 वाजता मालवण येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.