Maharashtra News LIVE Updates : प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Mar 2024 02:56 PM
खैरेंना उमेदवारी मिळताच विनोद पाटील दानवेंच्या घरी, पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळताच विनोद पाटील यांनी घेतली दानवे यांची भेट. अंबादास दानवे यांच्या घरी जाऊन विनोद पाटील यांनी घेतली भेट. विनोद पाटील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक. विनोद

यांना शिवसेनेकडून तिकीट मिळण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची. निवडणूक लढण्यासाठी मागितला पाठिंबा...

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि इच्छुक उमेदवार हेंमत गोडसे आपल्या समर्थकांसह मुबंई च्या दिशेनं रवाना होणार


नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती कडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाल्यानं शिवसेनेमध्ये अस्वस्थता त्या असवस्थेतून शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना होणार

खेड शिवापूर रांजे येथे एका पेंटच्या कंपनीमध्ये आग, वेळीच आगीवर नियंत्रण

खेड शिवापुर, रांजे येथे एका पेंटच्या कंपनीमध्ये आग लागली होती. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत वेळीच आगीवर नियंञण मिळवून आग इतरञ पसरु न देता धोका दुर केला . आग विजली आहे. सध्या कुलिंग च काम सुरू आहे.

खासदार भावना गवळी तातडीने मुंबईसाठी रवाना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बोलावल्याची माहिती

खासदार भावना गवळी तातडीने मुंबई साठी रवाना ,


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांना तातडीने बोलविल्याची माहिती 


यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम 


संजय राठोड यांचे नाव पुढे असल्याची माहिती

महायुतीच्या  राज्यातील  स्टार  प्रचारकांची नावे  जाहीर

महायुतीच्या  राज्यातील  स्टार  प्रचारकांची नावे  जाहीर झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , तसेच योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार करणार प्रचार.

ठाकरेंनी सांगलीच्या जागेचा  घोषणा केली त्याबद्दल आमची सर्वांची नाराजी : बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात


- शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेचा  घोषणा केली त्याबद्दल आमच्या सर्वांची नाराजी असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. 
- युती आघाडीचा धर्म पाळला पाहिजे यावर त्यांनी विचार केला पाहिजे होता आता पुन्हा फेरविचार केला पाहिजे
- भिवंडी सांगली या पारंपारिक आमच्या जागा आहेत
- मुंबईत एक जागा दिलेली आहे आणखी एक जागा द्यावा आमची अपेक्षा आहे
- मात्र तसं न करता आघाडी धर्म पाळला नाही त्यांनी काळजी घेणे आवश्यक होतं. ती त्यांनी घेतली नाही
- या जागांवरती आम्ही आणि आमचे कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत
- दिल्लीतील आमचे नेतेही यावरती आग्रही आहेत
- सांगलीची जागा ही वसंतदादा पाटील यांच्या पासुन राहिलेली आहे
- या जागा सोडणे आम्हाला खूप वेदनादायी आहेत त्यामुळे याचा फेरविचार झाला पाहिजे
- सांगली, भिवंडी आणि मध्य मुंबई यासाठी अजूनही आम्ही आग्रही आहे आणि प्रयत्न करत आहोत त्यांनी फेरविचार करावा



- या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत पाहिजेत अजूनही वेळ गेलेली नाही याचा विचार केला पाहिजे
- त्यांना काय पाहिजे या संदर्भातही त्यांनी चर्चा केली पाहिजे आघाडीची भूमिका आहे त्यांनी आमच्या सोबत राहील पाहिजे
- या परिस्थितीमध्ये जनतेचा विश्वास आमच्या सोबत आहे त्यामुळे जागा वाढवून मिळावा हे कोणाची ही  भूमिका असेल
- प्रकाश आंबेडकरांनी 16 जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता आम्हीही पाच जागांचा प्रस्ताव दिला होता
- मराठा समाजामध्ये नाराजी आहे ती सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहे त्यामुळे ती सरकारच्या विरोधामध्ये काम करेल
- प्रकाश आंबेडकरांनी अजूनही बसलं पाहिजे आणि भूमिका बदलली पाहिजे
- सर्वच पक्षांमध्ये अडचणी सुरू आहेत त्यामुळे आमच्या पक्षातील अडचणीही आम्ही सोडू त्यात काही विषय नाही

नवनीत राणांविरोधात बच्चू कडूनंतर आता भाजपही मैदानात, राणांच्या उमेदवारीला विरोध

नवनीत राणा विरोधात बच्चू कडू नंतर आता भाजप ही मैदानात


अमरावती स्थानिक नेत्यांनी फडणवीस, बावनकुळे यांच्याकडे नवनीत राणाच्या उमेदवारीला केला विरोध


अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अमरावतीच्या भाजप नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे केली..


यातून अमरावतीच्या भाजप नेत्यांनी एकप्रकारे नवनीत राणा यांच्या उमेदवारीविरोधात रान उठवले आहे हे स्पष्ट...


उमेदवारी प्रक्रिया सुरू होण्यास अवघा एकच दिवस शिल्लक असताना अचानक भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या गटाने काल रात्री नागपुरात फडणवीस यांची भेट घेतली...


काहीही झाले तरी भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार करू नये अशी मागणी अमरावती येथील भाजपच्या 17 सदस्यीय गटाने भेट घेऊन नवनीत राणा विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली...


गेल्या काही वर्षात बदललेल्या भाजपमध्ये ही पहिलीच वेळ आहे, की जिल्हा भाजपने एकजूट दाखवून वरिष्ठांपर्यंत कोणाची तरी तक्रार केली, तीही आपल्या पक्षाचा सामान्य सदस्य नसलेल्या नेत्याच्या विरोधात त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत भाजपमधून नकारघंटा येते की होकार हे पाहावं लागेल..

पक्षाचे आदेश आले तर हातकणंगले मतदारसंघातून शौमिका महाडिक यांची तयारी : धनंजय महाडिक

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही पैकी एक जागा भाजपला मिळेल अशी कोणती चर्चा नाही किंवा पक्षाचे तसे आदेश नसल्याचे मत भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं. जर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून लढण्याचे पक्षाचे आदेश आले तर आमची शौमिका महाडिक यांची तयारी असल्याचे महाडिक म्हणाले. 


पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडे तगडे उमेदवार आहेत, त्यामुळे कुठंही अडचण येणार नाही


मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या सोबत 13 खासदार आले आहेत


भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र चर्चा होत आहे


तीन पक्ष असल्याने उमेदवार घोषित करण्यास विलंब होतं आहे हे खरं आहे

साताऱ्याची जागा उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार, राज्यसभेचा राहिलेला कार्यकाळ राष्ट्रवादी काँग्रेसला

Satara Loksabha Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोट्यातील जागा अखेर भाजपला देण्यात आली


सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा उदयनराजे भोसले भाजपच्या चिन्हावर लढणार 


त्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेचा राहिलेल्या कार्यकाळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्यात येणार


उदयनराजे भोसले यांचा 2026 पर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक


उदयनराजे भोसले यांच्या जागी येणाऱ्या राष्ट्रवादीचा सदस्याला 2 वर्षांचा कार्यकाळ मिळणार

मुरलीधर मोहोळ मोठ्या मताधिक्क्यानं निवडून येणार, अजित पवारांना विश्वास

Ajit Pawar : आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांना ही प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही अडचण वाटत नाही.

राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर ठाकरे गट हातकणंगलेची जागा लढणार, सूत्रांची माहिती 

Loksabha Election : राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची सूत्रांची माहिती 


ठाकरे गटाकडून हातकंगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरु 


चेतन नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत तर सुजित मिणचेकर हे हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत


चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती 


राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा बाहेरून पाठींबा मागत आहेत तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीने सांगितलं आहे 


नरके यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणुक लढवण्याची देखील ईच्छा दर्शवली होती. परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकंगलेमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे

प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी, दोघे मिळून लोकसभा उमेदवार देणार.

मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडी मिळून निवडणूक लढणार असल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले. काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झाले आहेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाल्याचे आंबेडकर म्हणाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली.  

ठाकरे गटाकडून सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज

ठाकरे गटाकडून सांगली मधून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेस चे नेते नाराज


चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच सोशल मीडियावर काँग्रेस च्या कार्यकर्त्यांकडून सांगलीत नो मशाल ओन्ली विशाल असा ट्विटर ट्रेंड करण्यात आला आहे


सांगलीचे आमदार विश्वजित कदम आणि विक्रम सावंत हे दोन्ही आमदार थोड्याचे वेळात दिल्लीत काँग्रेस च्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत आणि सांगली लोकसभेच्या संदर्भात भूमिका मांडतील


माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या अशी मागणी काँग्रेस कडून करण्यात आली आहे

बारामती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप.. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.. त्यांच्या गावभेट दौऱ्याची सुरुवात बारामती शहरातून करण्यात आली.. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप करण्यात आलं.. दरम्यान, समाजकारणातील दैदिप्यमान कामगिरीनंतर सुनेत्रा पवार या आता पक्ष संघटनेतही सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे.

अरविंद केजरीवाल यांची जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव

अरविंद केजरीवाल यांची जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव


केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणीला सुरूवात


अटक आणि इडीच्या कोठडीच्यी विरोधात अरविंद केजरीवाल यांनी अर्ज दाखल केला आहे


केजरीवाल यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी इडीने वेळ मागितला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज यादी जाहीर होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची आज यादी जाहीर होण्याची शक्यता


यादी जाहीर होण्यापूर्वी दोन महत्त्वाचे चेहरे शरद पवारांच्या भेटीला


दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे आमदार जे पी गावित शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत


रावेर विधानसभेचे काँग्रेस आमदार श्री चौधरी देखील शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत


रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजची शिरीष चौधरी यांची भेट महत्त्वाची


जे पी गावित यांना देखील कार्यकर्त्यांसोबत नाशिक मध्ये चर्चा केल्यानंतर दिंडोरी लोकसभेतून उभा राहण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे जे पी गावित अपक्ष उभे राहणार की महाविकास आघाडीचे उमेदवार होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

मोठी बातमी! ठाकरे गटाची उमेदवारांची यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आपल्या 16 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांन ही यादी जाहीर केलीय.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना ईडीकडून समन्स, कथित खिचडी घोटाळा प्रकरणी आज होणार चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना ईडी समन्स. कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडी ने आज चौकशीसाठी बोलावले. याच प्रकरणात सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. अमोल यांना खिचडी स्कीममधून 50 लाख पेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचा आरोप केला जातोय.

सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेसचे शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार

सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेसचे शिष्टमंडळ आज दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार


उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने कॉंग्रेस मध्ये नाराजी


सांगलीची जागा कॉंग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाणार

नागपुरात आज महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन, नितीन गडकरी उमेदवारी अर्ज दाखल करणार

नागपुरात आज महायुतीचा जोरदार शक्ती प्रदर्शन होईल... नागपूर लोकसभेसाठी नितीन गडकरी आणि रामटेक लोकसभेसाठी राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आकाशवाणी चौकावर महायुतीची जाहीर सभा होणार आहे... त्यासाठी आकाशवाणी चौकावर एक तात्पुरता मंच उभारण्यात आला असून या मंचावरून दोन्ही उमेदवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधणार आहे... संविधान चौकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला तर विधिमंडळाजवळ राजे बख्त बुलंदशहा यांच्या प्रतिमेला वंदन केल्यानंतर दोन्ही उमेदवार रॅलीच्या स्वरूपात आकाशवाणी चौकावर पोहोचतील.. आकाशवाणी चौकावर सभा होईल आणि त्यानंतर दोन्ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करतील...

प्रकाश आंबेडकरांनी रात्री उशीरा घेतली मरोज जरांगे यांची भेट

प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट झाली आहे. रात्री उशिरा प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.