Maharashtra News Updates : अवकाळी पावसाने उडवली चिपळूण आणि साखरपा परिसरात दाणादाण, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Beed News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव इथे यात्रेमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छत्रबोरगाव येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर माजलगाव इथल्या ग्रामीण पोलीस कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी जुगार चालवणाऱ्यांनी पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व प्रकरणानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangli News: सांगलीच्या इस्लामपूरजवळील पेठ येथे पुणे- बंगळूर महामार्गावर एका चालत्या कारने पेट घेतल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये कार पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना पेठ इथल्या पुणे-बंगळूरु महामार्गावरील तीळगंगा ओढ्याजवळ गाडी पोहोचली असता,अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला, त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेताचं गाडीतील सर्व जण तात्काळ खाली उतरले,आणि काही क्षणात गाडीने पेट घेत रौद्ररूप धारण केले.
Ratnagiri News: अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूणमधील टेरव गावात तर साखरपा मध्ये दाणादाण उडवली..अनेक भागात सोसायट्याच्या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडाले. तर चिपळूणच्या टेरव गावात हाती आलेल्या आंबा पिकाने गळ लागल्याने आंबा बागायत दारांचे नुकसान झाले आहे..
Navi Mumbai : केंद्र सरकारने पीएनजी आणि सीएनजी दरात कपात केली असल्याने याचा आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. ज्या प्रमाणे सीएनजी-पीएनजी च्या किंमती कमी झाल्या असल्या तरी पेट्रोल , डिझेलच्या किंमती सुध्दा कमी करा अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी पार केल्याने लोकांनी सीएनजी गाड्यांना जास्त पसंती दिली होती. मात्र गेल्या काही वर्षात सीएनजीच्या किंमती सुद्धा नव्वदीच्या घरात गेल्या होत्या. यामुळे कार चालक आणि रिक्षा चालकांना याची झळ सोसावी लागली होती. मात्र आता सरकारने देशातील PNG च्या किमती 10 टक्के आणि CNG च्या किमती 5 टक्के ते 9 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईत सीएनजी गॅस दर 5 ते 7 रुपयांनी स्वस्त होऊ शकतो. असे झाल्यास 87 रुपयांचा सीएनजी 79 ते 82 रुपयांवर येणार आहे. त्याचप्रमाणे पीएनजीची किंमत 54 रुपये आहे, जी 49 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते.
मुख्यमंत्री उद्या अयोध्या दौऱ्यासाठी निघणार आहेत.. उद्या संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री शिंदे वर्षावरून मुंबई विमानतळाकडे रवाना होतील.. विमानानं ते लखनौला जातील आणि रात्री लखनौमध्येच मुक्कामी असतील. रविवारी दुपारी ते अयोध्येत राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील, आणि दुपारी साडे बारा वाजता नव्या राम मंदिराच्या बांधकाम स्थळाला भेट देतील. संध्याकाळी सात वाजता अयोध्येतून रवाना होऊन रात्री ९ वाजता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.. ही भेट झाल्यावर ते मुंबईकडे रवाना होतील, आणि रात्री पाऊण वाजता मुंबईत दाखल होतील.
Gondia News: आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील लोकांना चांगल्या आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात म्हणून जिल्हा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असतं. मात्र ग्रामीण भागातील रुग्ण वेळेवर रुग्णलयात पोहोचू शकत नसल्याने अनेकदा त्यांच्या वाटेतच किंवा घरीच मृत्यू व्हायचा. मात्र आयसीआयसीआय बँकेनं पुरविलेल्या 5 अत्याधुनिक एम्बुलन्समुळे ग्रामीण भागातील लोकांना आता आरोग्य सुविधेचा लाभ घेता येणार असून या अत्याधुनिक वातानुकूलित एम्बुलन्स रुग्णांना रुग्णालयात वेळेवर पोहचवण्यात मदत करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक अंबरीश मोहबे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या एम्बुलन्सचे लोकार्पण गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले.
Washim News: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज वाशिमच्या कारंजा शहरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सतत उष्ण दमट वातावरण आणि अवकाळी पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय.
Ulhasnagar News: उल्हासनगरात शिवसेना विभाग प्रमुखाला जीवे मारण्यासाठी 10 लाखांची सुपारी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सुपारी देणाऱ्या गुंडालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सुपारी देणारा कारी माखिजा हा मात्र अजूनही फरारच आहेत.
Akola News: अकोला जिल्ह्यासाठी आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
पुढील दोन तास वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गाऱ्यांची शक्यता
झाडाखाली उभे न राहण्याच्या तसेच कच्च्या भिंतींजवळ उभं न राहण्याचा सल्ला
अमृता फडणवीस यांना धमकी देत खंडणी मागितल्याचं प्रकरण
आरोपी अनिल जयसिंघानीची सर्वोच्च न्यायालयात धाव
मुंबई उच्च न्यायालयानं अटक कायदेशीर मानल्याच्या निर्णयाला आव्हान
14 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई पोलिसांनी गुजरातला अटक करून मुंबईतील कोर्टात 40 तासांनी हजर करत कायदेशीर प्रक्रियेचा भंग केल्याचा जयसिंघानीचा आरोप
याचिकेत गुजरात ईडी, महाराष्ट्र, गोवा आणि मध्यप्रदेशच्या तपासयंत्रण करत असलेल्या तपासावरही आक्षेप
Maharashtra News: राष्ट्रवादीचं युवा मंथन शिबिर 26 एप्रिलला होणार
गिरीश बापट यांचा निधनामुळे 29 मार्च रोजी होणारे शिबिर पूढे ढकलण्यात आलं होतं
शिबिराला राष्ट्रवादीचें अध्यक्ष शरद पवार युवकांना मार्गदर्शन करणार
लवकरच ठिकाण ठरवण्यात येणारं असल्याची युवकचे मुंबई जिल्हाध्यक्ष ऍड निलेश भोसले यांची माहिती
Maharashtra News: राष्ट्रवादीच युवा मंथन शिबिर 26 एप्रिलला होणार
गिरीश बापट यांचा निधनामुळे 29 मार्च रोजी होणारे शिबिर पूढे ढकलण्यात आलं होतं
शिबिराला राष्ट्रवादीचें अध्यक्ष शरद पवार युवकांना मार्गदर्शन करणार
लवकरच ठिकाण ठरवण्यात येणारं असल्याची युवकचे मुंबई जिल्हाध्यक्ष ऍड निलेश भोसले यांची माहिती
Maharashtra Corona Updates: देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काल राज्यात एकूण 803 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेय. तर मुंबईत काल दिवसभरात 216 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेत. राज्यात काल 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईनंतर सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आहे.. मुंबईत एकूण 1 हजार 268 ॲक्टिव्ह रुग्ण तर पुण्यात 738 ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे..मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, पालघर, साताऱ्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असल्यानं कोरोना धोका हळूहळू वाढताना दिसत आहे.
Petrol Diesel Price on 7 April 2023: गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price) चढ-उतार सुरूच आहे. आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर शुक्रवार 7 एप्रिल रोजी किमतीत किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या (Brent Crude Oil) किमतींत 0.15 टक्क्यांच्या किंचित वाढीसह, ते प्रति बॅरल 85.12 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. दुसरीकडे, डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या (WTI Crude Oil) किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, 0.11 टक्क्यांच्या वाढीनंतर ते प्रति बॅरल 80.70 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे. या वाढीनंतर आज देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) किंचित वाढ झाली असली तरी देशातील चारही महानगरांमध्ये दर स्थिर आहेत.
Akola News: अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालूक्यातल्या धामणदरी गावातील ते दोन्ही नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांचे आदेश. राजेश रामभाऊ तायडे आणि सुधाकर रामदास ढगे अशी बडतर्फ आरोपी शिक्षकांची नावे. जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांकडून चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण. विद्यार्थींनीकडून सातत्याने होत असलेल्या अत्याचाराची पालकांकडे केली वाच्यता. दोन्ही शिक्षकांवर बार्शिटाकळी पोलिसांत गुन्हे दाखल करून अटक. दोघांवरही कारवाईसाठी गावकरी, ठाकरे गट आणि मनसे झाले होते आक्रमक.
Mumbai News: पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पालिका खड्डे भरण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे भरपावसात देखील खड्डे बुजवणं शक्य होणार आहे. 'रॅपिड हार्डनिंग काँक्रीट' या तंत्रज्ञानामुळे अवघ्या सहा तासात खड्डे बुजवून वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करता येणार आहे. यासाठी पालिका 92 कोटींचा खर्च करणार आहे. या महिन्यापासूनच याची कार्यवाही सुरु होणार आहे.
Maharashtra Water Updates: सध्या राज्यात उन्हाच्या झळ्या बसायला सुरुवात झालीय. मार्च महिन्यात उन्हाच्या पाऱ्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. तर एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाही अशीच स्थिती आहे..उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. तर तिकडे विदर्भात चंद्रपूर, अकोला आणि वर्ध्याचा पारा 40.4 अंशांवर पोहोचला आहे. तर पुण्यातही सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. पुण्यात दुपारी उन्हाचे चटके जाणवत असून दुपारी पुणेकरांना घराबाहेर पडणं कठीण झालंय.एप्रिल महिन्यात मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. या काळात पारा 40 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलाय
Maharashtra News: निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासाठीं मुख्यमंत्री अनुकूल; राजपत्रित अधिकारी महासंघाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जुन्या पेन्शन लागू करा या मागणीसाठी केलेल्या संपानंतर मुख्यमंत्र्यांसोबत गुरूवारी मंत्रालयात बैठक पार पडली
बैठकीत निवृत्तीच वय 60 वर्ष करण्याबाबत सरकार विचाराधीन तसेच जुन्या पेन्शन पेक्षा कोणतेही लाभ कमी मिळणारं नसल्याच मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांची एबीपी माझाला माहिती
JEE Main 2023: आयआयटी अभियांत्रिकी (IIT Engineering) शाखेच्या प्रवेशामध्ये पात्रता परीक्षा (Exams) असताना 75 टक्के गुणांच्या पात्रता निकषाचा गरजच काय? असा सवाल हायकोर्टानं (High Court) गुरुवारी केंद्रीय परीक्षा संस्थेला (NTA) केला आहे. राज्य परीक्षा मंडळांसह (Education News) एकूण 30 परीक्षा मंडळं सध्या देशभरात कार्यरत असून प्रत्येक मंडळ पर्सेंटाईल यादी प्रसिद्ध करत नाही. त्यामुळे या पद्धतीचा लाभ केवळ काही परीक्षा मंडळांनाच होईल. मग ही शिथिलता किती योग्य? असाही मुद्दा उपस्थित करत प्रवेशासाठी नव्यानं तयार करण्यात आलेली पर्सेंटाईल पद्धती आणि त्यातील तफावतीवर आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचं आदेशही हायकोर्टानं एनटीएला दिले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. त्याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करणार आहेत. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक
गेल्या काही दिवसापासून मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. त्या पार्श्वभुमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.या बैठकीनंतर देशात काही निर्बंध लागु होणार का? लोकांना पुन्हा मास्क सक्तीचं पालन करावं लागणार का? या बैठकीत सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांबरोबर ऑनलाईन संवाद साधणार आहेत. 10 आणि 11 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या निर्देषानुसार मॉकड्रील होणार आहे.
दरम्यान, राज्यातील अँक्टीव्ह रुग्णसंख्या संख्या 3 हजार 987 वर गेलीये. मुंबईनंतर सर्वाधिक पुण्यात रुग्णसंख्या, मुंबईत 1 हजार 268 अँक्टिव्ह रुग्ण तर पुण्यात 738 अँक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, पालघर, साताऱ्यात सर्वाधिक अँक्टिव्ह रुग्णसंख्या.
गज उत्सव-2023 चे उद्घाटन -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, 7 एप्रिल 2023 रोजी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील. त्यानंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील. त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. 8 एप्रिल, 2023 रोजी, राष्ट्रपती, तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून उड्डाण करतील.
भारत गौरव ट्रेन दिल्लीवरुन रवाना होणार -
आज दिल्लीवरुन भारत गौरव ट्रेन रवाना होणार आहे. ही डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन असेल. दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून ही ट्रेन रवाना होईल...पुरुषोत्तम राम यांच्याशी संबंधित असणाऱ्या धार्मिक स्थळाच्या मार्गे जाणार आहे. ही ट्रेन 18 दिवस प्रवस करेल. आयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, नेपाळमदील जनकपूर (राम-जानकी मंदिर).. या मार्गे काशीमध्ये पोहचणार आहे. आज या भारत गौरव ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला मनमाड, नांदगाव या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहेत. ठाण्यातून आयोध्यासाठी आज दुपारी 4 वाजता ट्रेन निघणार आहे. या ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आठ तारखेला आयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
पुष्पाचा टिजर येणार -
आज रश्मिका मंदानाचा वाढदिवस आहे. काही दिवसापुर्वी पुष्पा च्या निर्मात्यांनी ट्विट करत कहां है पुष्पा म्हणत एक व्हीडीओ ट्विट केला होता. आणि 7 एप्रिलला 4 वाजता भेटुयात असं म्हंटलं होतं. आज पुष्पा द रूल ची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.. तसेच चित्रपटाचे टीजर येणार असल्याची चर्चा रंगलीये.
पुण्यातील राजकिय नेत्यांना धमक्याचे फोन, पोलिसांचा तपास सुरु, आज मोठा खुलासा होण्याची शक्यता
पुणे – पुण्यातील राजकिय नेत्यांना सातत्याने धमक्यांचे फोन येतायत आणि खंडणीची मागणी होतेय. यामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश आहे. या तिघांनाही धमक्या देणारा व्यक्ती एकच आहे. हा धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात रहातो आणि विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल चालवतो. या व्यतिकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. मनसेचे वसंत मोरे प्रकरणात या व्यक्तीला अटक झाली. पण जामीनावर सुटल्यावर त्याने हेच उद्योग सुरु केले आणि कॉंग्रेसचे बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमक्या दिल्या. याला पुन्ह अटक करण्यात आलीय.
राजस्थान – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेवा संगम मध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह तीन हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
पुणे – पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. 1 मे रोजी नितीन गडकरी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प कसा असेल, अंडरपास कसे रंगीबेरंगी पेंटींग्जनी सजवण्यात आलेत.
बारामती – संजय राऊत बारामतीमध्ये असणार आहेत. सकाळी पत्रकार परिषद घेतील. आज कर्जतला एक कार्यक्रम आहे त्यासाठी ते बारामतीतून कर्जतला जाणार आहेत.
केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार
सोलापूर – ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात सोलापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेड्युल एच आणि नार्कोटिक्स संदर्भातील औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकता येत नाहीत. मात्र फ्लिपकार्ट प्लस या ऑनलाईन वेबसाईटचा वापर करून लोकल वेंडरद्वारे कोणताही प्रिस्क्रीप्शन विना ही औषधे मिळत असल्याचं जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा दावा आहे. त्यामुळे या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने केली जाते.
अहमदनगर – खासदार संजय राऊत आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार मेळाव्याला उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख हे आहेत, सकाळी 10 वाजता, शारदाबाई पवार सभागृह, कर्जत.
जळगाव – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा शुभारंभ आज धरणगाव तालुक्यातील अहिरे या गावात होणार असून यावेळी गुलाबराव पाटील यांची सभा होणार आहे.
धुळे – मंत्री विजयकुमार गावीत जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिरपूर येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा एकलव्य निवासी इमारत बांधकामाच्या पायाभरणी कार्यक्रम होणार आहे.
छ. संभाजीनगर – मंत्री गिरीश महाजन आज घाटी रुग्णालयात आरोग्य दिनानिमित्त अवयव दानासंदर्भात आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
हिंगोली – उन्हाची चाहूल लागू लागली आहे. जिल्ह्यात तापमान 39 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय. त्यामुळे कुलरची मागणी वाढू लागलीये. यामुळे कुलर विक्री करणाऱ्या व्यवसायिकांच्या व्यवसायाला वाढ झालीये.
परभणी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत असणार आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव तसेच शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.
आझाद मैदानावर आंदोलन
मुंबई – मागील जवळपास 46 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी 149 अंतर्गत नोटीसा बजावले आहेत या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगला सागर बंगला किंवा राजभवन या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात वायरल केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना नोटिसा बजावले आहेत महाराष्ट्रभरातून 861 विद्यार्थी मागील 46 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत उद्या हे आंदोलन उग्र स्वरूप प्राप्त करू शकते. हे सर्व विद्यार्थी बार्टी अंतर्गत फेलोशिप प्राप्त विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची फेलोशिप बंद करण्यात आल्यामुळे हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
भिवंडी – सावरकर गौरव यात्रेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील सहभागी होणार आहेत.
हैदराबाद-लखनौमध्ये लढत
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 7 एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर (Ekana Stadium) शक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमातील लखनौ संघाचा हा तिसरा सामना असेल तर हैदराबाद संघाचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघ विजयाच्या आशेने मैदानावर उतरतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -