एक्स्प्लोर

Maharashtra News Updates : अवकाळी पावसाने उडवली चिपळूण आणि साखरपा परिसरात दाणादाण, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates : अवकाळी पावसाने उडवली चिपळूण आणि साखरपा परिसरात दाणादाण, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. त्याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करणार आहेत. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक 
गेल्या काही दिवसापासून मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. त्या पार्श्वभुमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.या बैठकीनंतर देशात काही निर्बंध लागु होणार का? लोकांना पुन्हा मास्क सक्तीचं पालन करावं लागणार का? या बैठकीत सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांबरोबर ऑनलाईन संवाद साधणार आहेत. 10 आणि 11 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या निर्देषानुसार मॉकड्रील होणार आहे.
 
दरम्यान, राज्यातील अँक्टीव्ह रुग्णसंख्या संख्या 3 हजार 987 वर गेलीये. मुंबईनंतर सर्वाधिक पुण्यात रुग्णसंख्या, मुंबईत 1 हजार 268 अँक्टिव्ह रुग्ण तर पुण्यात 738 अँक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, पालघर, साताऱ्यात सर्वाधिक अँक्टिव्ह रुग्णसंख्या.

गज उत्सव-2023 चे उद्घाटन -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, 7 एप्रिल 2023 रोजी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील.  त्यानंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील.  त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. 8 एप्रिल, 2023 रोजी, राष्ट्रपती, तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून उड्डाण  करतील.

 

भारत गौरव ट्रेन दिल्लीवरुन रवाना होणार - 

आज दिल्लीवरुन भारत गौरव ट्रेन रवाना होणार आहे. ही डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन असेल. दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून ही ट्रेन रवाना होईल...पुरुषोत्तम राम यांच्याशी संबंधित असणाऱ्या धार्मिक स्थळाच्या मार्गे जाणार आहे. ही ट्रेन 18 दिवस प्रवस करेल. आयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, नेपाळमदील जनकपूर (राम-जानकी मंदिर).. या मार्गे काशीमध्ये पोहचणार आहे. आज या भारत गौरव ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. 
 
एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला मनमाड,  नांदगाव या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहेत. ठाण्यातून आयोध्यासाठी आज दुपारी 4 वाजता ट्रेन निघणार आहे. या ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आठ तारखेला आयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. 
  
पुष्पाचा टिजर येणार - 
आज रश्मिका मंदानाचा वाढदिवस आहे. काही दिवसापुर्वी पुष्पा च्या निर्मात्यांनी ट्विट करत कहां है पुष्पा म्हणत एक व्हीडीओ ट्विट केला होता. आणि 7 एप्रिलला 4 वाजता भेटुयात असं म्हंटलं होतं. आज पुष्पा द रूल ची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.. तसेच चित्रपटाचे टीजर येणार असल्याची चर्चा रंगलीये.
 
पुण्यातील राजकिय नेत्यांना धमक्याचे फोन, पोलिसांचा तपास सुरु, आज मोठा खुलासा होण्याची शक्यता 

पुणे – पुण्यातील राजकिय नेत्यांना सातत्याने धमक्यांचे फोन येतायत आणि खंडणीची मागणी होतेय. यामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश आहे. या तिघांनाही धमक्या देणारा व्यक्ती एकच आहे. हा धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात रहातो आणि विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल चालवतो. या व्यतिकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. मनसेचे वसंत मोरे प्रकरणात या व्यक्तीला अटक झाली. पण जामीनावर सुटल्यावर त्याने हेच उद्योग सुरु केले आणि कॉंग्रेसचे बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमक्या दिल्या. याला पुन्ह अटक करण्यात आलीय.  
 
राजस्थान – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेवा संगम मध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह तीन हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 
पुणे – पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. 1 मे रोजी नितीन गडकरी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प कसा असेल, अंडरपास कसे रंगीबेरंगी पेंटींग्जनी सजवण्यात आलेत. 
 
बारामती – संजय राऊत बारामतीमध्ये असणार आहेत. सकाळी पत्रकार परिषद घेतील. आज कर्जतला एक कार्यक्रम आहे त्यासाठी ते बारामतीतून कर्जतला जाणार आहेत.
 
केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार

सोलापूर – ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात सोलापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेड्युल एच आणि नार्कोटिक्स संदर्भातील औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकता येत नाहीत. मात्र फ्लिपकार्ट प्लस या ऑनलाईन वेबसाईटचा वापर करून लोकल वेंडरद्वारे कोणताही प्रिस्क्रीप्शन विना ही औषधे मिळत असल्याचं जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा दावा आहे. त्यामुळे या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने केली जाते.
 
अहमदनगर – खासदार संजय राऊत आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार मेळाव्याला उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख हे आहेत, सकाळी 10 वाजता, शारदाबाई पवार सभागृह, कर्जत.
 
जळगाव – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा शुभारंभ आज धरणगाव तालुक्यातील अहिरे या गावात होणार असून यावेळी गुलाबराव पाटील यांची सभा होणार आहे.
 
धुळे – मंत्री विजयकुमार गावीत जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिरपूर येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा एकलव्य निवासी इमारत बांधकामाच्या पायाभरणी कार्यक्रम होणार आहे.
 
छ. संभाजीनगर – मंत्री गिरीश महाजन आज घाटी रुग्णालयात आरोग्य दिनानिमित्त अवयव दानासंदर्भात आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 
 
हिंगोली – उन्हाची चाहूल लागू लागली आहे. जिल्ह्यात तापमान 39 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय. त्यामुळे कुलरची मागणी वाढू लागलीये. यामुळे कुलर विक्री करणाऱ्या व्यवसायिकांच्या व्यवसायाला वाढ झालीये.
 
परभणी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत असणार आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव तसेच शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.
 

आझाद मैदानावर आंदोलन

मुंबई – मागील जवळपास 46 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी 149 अंतर्गत नोटीसा बजावले आहेत या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगला सागर बंगला किंवा राजभवन या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात वायरल केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना नोटिसा बजावले आहेत महाराष्ट्रभरातून 861 विद्यार्थी मागील 46 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत उद्या हे आंदोलन उग्र स्वरूप प्राप्त करू शकते. हे सर्व विद्यार्थी बार्टी अंतर्गत फेलोशिप प्राप्त विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची फेलोशिप बंद करण्यात आल्यामुळे हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. 
 
भिवंडी – सावरकर गौरव यात्रेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील सहभागी होणार आहेत. 

हैदराबाद-लखनौमध्ये लढत 

आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 7 एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर (Ekana Stadium) शक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमातील लखनौ संघाचा हा तिसरा सामना असेल तर हैदराबाद संघाचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघ विजयाच्या आशेने मैदानावर उतरतील. 

22:10 PM (IST)  •  07 Apr 2023

जळगावात वीज कोसळल्याने नऊ बकऱ्या ठार; गुराखी थोडक्यात बचावला

Jalgaon News : जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथे विज कोसळल्याने नऊ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी (7 एप्रिल) रोजी साडेचारच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली. रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावालगत गेला होता. सायंकाळी साडे-चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने सुरुवात झाली. दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या. या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारार्थ मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले आहे. यात गुलाबसिंग बिलाले यांच्या पाच शेळ्या, तारासिंग बिलाले यांच्या तीन शेळ्या, लटु बिलाले यांची एक अशा एकूण नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती. उचंदे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.
22:05 PM (IST)  •  07 Apr 2023

जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक पोलीस निरीक्षक जखमी

Beed News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव इथे यात्रेमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर दगडफेक करण्यात आली.  यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छत्रबोरगाव येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर माजलगाव इथल्या ग्रामीण पोलीस कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी जुगार चालवणाऱ्यांनी पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व प्रकरणानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20:41 PM (IST)  •  07 Apr 2023

Sangli News: सांगली: पुणे-बंगळुरु महामार्गावर बर्निग कारचा थरार...चालती कार क्षणांत जळून खाक

Sangli News:  सांगलीच्या इस्लामपूरजवळील पेठ येथे पुणे- बंगळूर महामार्गावर एका चालत्या कारने पेट घेतल्याची घटना  सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये कार पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना पेठ इथल्या पुणे-बंगळूरु महामार्गावरील तीळगंगा ओढ्याजवळ गाडी पोहोचली असता,अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला, त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेताचं गाडीतील सर्व जण तात्काळ खाली उतरले,आणि काही क्षणात गाडीने पेट घेत रौद्ररूप धारण केले. 

19:10 PM (IST)  •  07 Apr 2023

Ratnagiri News: अवकाळी पावसाने उडवली चिपळूण आणि साखरपा परिसरात दाणादाण, अनेक भागात सोसाट्याचा वारा, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याची गळ

Ratnagiri News: अचानक आलेल्या अवकाळी पावसाने चिपळूणमधील टेरव गावात तर साखरपा मध्ये दाणादाण उडवली..अनेक भागात सोसायट्याच्या वादळी वाऱ्याने अनेक घरांचे पत्रे उडाले. तर चिपळूणच्या टेरव गावात हाती आलेल्या आंबा पिकाने गळ लागल्याने आंबा बागायत दारांचे नुकसान झाले आहे..

17:14 PM (IST)  •  07 Apr 2023

पीएनजी, सीएनजीप्रमाणे पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्याची नागरिकांची मागणी

Navi Mumbai : केंद्र सरकारने पीएनजी आणि सीएनजी दरात कपात केली असल्याने याचा आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. ज्या प्रमाणे सीएनजी-पीएनजी च्या किंमती कमी झाल्या असल्या तरी पेट्रोल , डिझेलच्या किंमती सुध्दा कमी करा अशी मागणी सर्वसामान्य करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरी पार केल्याने लोकांनी सीएनजी गाड्यांना जास्त पसंती दिली होती. मात्र गेल्या काही वर्षात सीएनजीच्या किंमती सुद्धा नव्वदीच्या घरात गेल्या होत्या. यामुळे कार चालक आणि रिक्षा चालकांना याची झळ सोसावी लागली होती. मात्र आता सरकारने देशातील PNG च्या किमती 10 टक्के आणि CNG च्या किमती 5 टक्के ते 9 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईत सीएनजी गॅस दर 5 ते 7 रुपयांनी स्वस्त होऊ शकतो. असे झाल्यास 87 रुपयांचा सीएनजी 79 ते 82 रुपयांवर येणार आहे. त्याचप्रमाणे पीएनजीची किंमत 54 रुपये आहे, जी 49 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget