Maharashtra News Updates 4th May 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनमध्ये दाखल; राजकारणावर चर्चा?

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 May 2023 10:13 PM
Maharashtra Unseasonal Rains: कसारा भागात वादळ-वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस, दुचाकी स्वारासह नागरिकांची तारांबळ

Maharashtra Unseasonal Rains:  कसारा भागात संध्याकाळच्या सुमारास प्रचंड  वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना समोर काही दिसत नसल्यामुळे गाड्या बाजूला थांबवाव्या लागल्या तर दुचाकीस्वार व नागरिकांची अचानक आलेल्या या पावसाने ताराबंळ उडविली. 

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनमध्ये दाखल; राजकारणावर चर्चा?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनमध्ये दाखल झाले आहेत. ही भेट स्नेहभोजनानिमित्ताने असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या भेटीमागे राजकीय अर्थ काढले जात आहेत. 

Chh. Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कंपनीला भीषण आग

छत्रपती संभाजीनगर मधील एका कंपनीला भीषण आग,


बडवे इंजीनियरिंग कंपनीला भीषण आग,


घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल,


पाच ते सहा खासगी टँकरने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू,


कंपनीच्या दोन प्लँटमध्ये आग लागल्याने कामगारांची धावपळ.


घटनास्थळी बिडकीन पोलीस दाखल,


गावकऱ्यांकडून आग वीजवण्यासाठी प्रयत्न सुरू.

Unseasonal Rains: ठाणे: भिवंडीत अवकाळी पावसाला सकाळपासून जोरदार सुरूवात

Bhiwandi News: भिवंडी शहर व ग्रामीण भागात  जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाला वातावरण असून अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शहरात व ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. दोन दिवसांच्या उकळ्यानंतर नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Pune Blast : पुणे सहरकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट, एटीएसचा तपास सुरू

पुण्यातील सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात शनिवारी स्फोट झाला होता. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. यावर आता एटीएसने तपास सुरू केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस

हिंगोली जिल्ह्यासह औंढा नागनाथ तालुक्यांमध्ये आज दुपारी साडेचारच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी  वाऱ्यासह पाऊस हा मुसळधार बरसला. औंढा नागनाथ येथे आज गुरुवारी बाजारचा दिवस असल्यामुळे अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांची व भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चांगलीच धांदल उडाली. व्यापाऱ्यांचा भाजीपाला ही पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेला त्यामुळे व्यापाऱ्यांचेही  नुकसान झाले. अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

एक- दोन दिवसांत मी अंतिम निर्णय घेणार: शरद पवार

कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, एक- दोन दिवसांत मी अंतिम निर्णय घेणार: शरद पवार

Sharad Pawar Resigns : वाय.बी सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यरर्त्यांमध्ये नाराजी पसरली त्याच पार्श्वभूमीवर आज वाय.बी सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

Kalyan News: कल्याण मधील दुर्दैवी घटना; पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News: कल्याण मधील दुर्दैवी घटना 


पाचव्या माळ्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू


कल्याण पश्चिम गांधारे रिद्धी सिद्धी सोसायटी मधील घटना


मयत इमारती जवळ राहणाऱ्या लॉन्ड्री वाल्याचा मुलगा


कपडे देवून परत येत असताना घडली घटना

Sharad Pawar: अध्यक्ष पदासाठी नेमलेली समितीची बैठक उद्या अकरा वाजता बैठक

Sharad Pawar: अध्यक्ष पदासाठी नेमलेली समितीची बैठक उद्या अकरा वाजता बैठक आहे. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात होणार बैठक होणार आहे. शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यावर समितीची घोषणा केली होती, उदया समिती याबाबत निर्णय घेणार आहे. शरद पवार राजीनाम्यावर ठाम राहिल्यास सुप्रिया सुळे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. 

Sangli Accident: विटा-सातारा रोडवर ट्रॅव्हल्स-कारचा भीषण अपघात, कारमधील चार जणांचा मृत्यू

Sangli Accident: विटा सातारा रोडवर  ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला आहे.  गाडीतील पाच जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे.  1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे एकजण जखमी असून अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट  आहे. 

Buldhana News : राज्य भाजपची कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांचा समावेश

Buldhana News : राज्य भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज्य भाजपा कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे आणि आधीच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष असलेले जळगाव जामोदचे भाजपा आ. संजय कुटे यांची कुठेही वर्णी न लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. डॉ. संजय कुटे हे फडणवीस यांचे अतिशय विश्वासू निकटवर्तीय मानले जातात. मात्र, बुलढाण्यातुन संजय कुटे यांना राज्य भाजपा कार्यकारिणीत कुठे स्थान न मिळाल्याने नेमकी कुटे यांचं डिमोशन करण्यात आलंय की काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून मलकापूरचे माजी आ. चैनसुख संचेती यांना स्थान देण्यात आलं आहे.

Pune Crime : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला दिले गरम हिटरने चटके, पुण्यातील कोंढवा भागातील घटना

Pune Crime : पुण्यातील कोंढवा भागातून धक्कादायक घटना आली समोर आली आहे. पिडीत महिलेच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून पतीने 'तू कोणाबरोबर बोलत तर नाहीत ना' म्हणून तिला ओढून बेडरूममध्ये नेले. ओढणीने तिला बेडला बांधून या नराधमाने तिला गरम हिटरने चटके दिले. तसेच, पीडितेच्या डोक्यात, हातापायावर खलबत्त्याने मारहाण देखील केली. 30 एप्रिल रोजी कोंढवा भागात हा प्रकार घडला. पिडीत महिलेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असता 40 वर्षीय या नराधमाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 

Sambhajinagar News : प्रेमाच्या जाळ्यात ओढून घाटीतील ब्रदरने केला सिस्टरवर अत्याचार; तरुणीने विषारी इंजेक्शन टोचून केली आत्महत्या 

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ब्रदरने सहकारी सिस्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नास नकार देत सोबतच संसार थाटला. प्रियकराने विश्वासघात केल्याच्या तणावातून सिस्टरने राहत्या घरात विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. ही घटना 1 मे रोजी जयसिंगपूरा भागात घडली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरून ब्रदरवर गुन्हा दाखल केला. आत्महत्या करणाऱ्या तरुणीच नाव पल्लवी विठ्ठलराव जाधव असून   ज्ञानेश्ववर किसन पवार फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

Sharad Pawar Resigns : शरद पवार आज देखील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांना भेटणार

Sharad Pawar Resigns : शरद पवार आज देखील वाय बी चव्हाण सेंटर येथे कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. सकाळी साडेदहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाय बी चव्हाण सेंटर येथेच भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. राज्यातून आणि देशातून कार्यकर्ते मागील दोन दिवसांपासून शरद पवारांच्या भेटीला येत आहेत.

Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या समर्थनार्थ झडकलेत भंडाऱ्यात बॅनर....निर्णय मागे घेण्याची केली विनवणी.....

Sharad Pawar Resigns : वस्ताद.... कधी कुस्ती सोडत नसतो, तो आणखी नव्या जोमाने पैलवानांची भावी पिढी घडवत असतो....साहेब तुमचा निर्णय मागे घ्या....शरद पवार यांना विनवणी करणारे बॅनर आता भंडाऱ्यातील तुमसरात झडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली देशातील राजकारणात जणू राजकीय भूकंप आला. पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी राज्यभरात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी, त्यांनी निर्णय घ्यावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं विनवणी करीत आहेत. शरद पवार यांच्या समर्थनार्थ मुंबई, पुणेसह राज्यातील विविध जिल्ह्यांत बॅनरबाजी बघायला मिळत आहे. तशीच बॅनरबाजी आता भंडाऱ्यातील तुमसरात झडकले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात. काही घडामोडी या सामाजिक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असतात. आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. 


मुंबई 


- राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे पदाधिकारी आज एकत्रितरित्या शरद पवार यांना आपल्या पदाचे राजीनामे स्वतः भेटून देणार आहेत. पक्ष संघटना बळकट करायची असेल तर शरद पवार हेच अध्यक्ष आहेत अशी या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. 


- राजकीय सामाजिक गुन्हे किंवा खटले काढून घेण्यासाठी राज्यपातळीवर आंदोलनाबाबत सुजात आंबेडकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. 


- हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांनी ईडीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.


- मालेगाव ब्लास्ट 2008 प्रकरणी युएपीए कायद्यातील गंभीर कलम लावण्याकरता दिलेली चुकीची मंजूरी रद्द करण्याच्या मागणीसाठी आरोप समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात दाखल केलेल्य याचिकेवर आज सुनावणी.


बुलढाणा 


- शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आनंद सागरमधील आध्यात्मिक केंद्र आजपासून भक्तांसाठी खुले होणार. संत गजानन भक्तांना अनेक वर्षांपासून आनंद सागर अध्यात्मिक केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा होती. 


पुणे


- दिल्लीत सुरु असलेल्या कुस्तीपटुंच्या आंदोलनाला पुण्यातील कुस्तीपटू प्रतिकात्मक कुस्त्या खेळून पाठिंबा देणार आहेत. एस पी कॉलेज समोर या प्रतिकात्मक कुस्त्यांचे कॉंग्रेस पक्षाकडून आयोजन करण्यात आले आहे. 


पिंपरी - खासदार अमोल कोल्हे यांची पत्रकार परिषद होणार आहे. 


सोलापूर


- मंगळवेढा येथे मंगळवेढा फेस्टिवल होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. 


नाशिक 


- कृषिमंत्री अब्दुल सत्तार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता खरीप हंगाम आढावा बैठक घेणार आहेत. 


राष्ट्रीय


बेळगाव - शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. 


दिल्ली - भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला पहिलवानांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. 


उत्तर प्रदेश - आज सहारनपूर, मुरादाबाद, आग्रा, झाशी, प्रयागराज, लखनौ, देवीपाटन, गोरखपूर, वारणसी इथे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 


दिल्ली/जयपूर - आंतरराष्ट्रीय कुस्ती पहिलवानांच्या समर्थनात आज जयपूर मध्ये प्रादेशिक खेळाडू एकत्र येणार आहेत. 


दिल्ली - दोषींना राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी बनण्यापासून अजिवन बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 2017 साली ही याचिका करण्यात आली होती.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.