Josh Hazlewood ruled out of Adelaide Test : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळत आहे. टीम इंडियाने पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता उभय संघांमधील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे, जो पिंक बॉल कसोटी सामना असेल. मात्र याआधीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे, पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड बाहेर गेला आहे.
हेझलवूडच्या बदलीची घोषणा...
ESPNcricinfo नुसार, जोश हेझलवूडला साइड स्ट्रेनमुळे डे-नाईट टेस्ट मॅचमधून बाहेर ठेवण्यात आले असून त्याच्या जागी सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचा ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण या दोघांना प्लेईंग इलेव्हनमध्ये जागी मिळणे कठीण दिसत आहे, कारण स्कॉट बोलँडचा संघात आधीच समावेश आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हेझलवूडने अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेतली. आता त्याच्या अनुपस्थितीमुळे संघावर मोठे संकट उभे ठाकले आहे.
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर सर्वत्र टीका होत आहे. आता जोश हेजलवूडच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचे संकट आणखी वाढले आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी दुसरा कसोटी सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी 8 जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत.
जोश हेझलवूडने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियासाठी 71 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 278 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 विकेट्स आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एकूण 67 विकेट्स आहेत.
हे ही वाचा -