Mohammed Shami Injured : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या एक वर्षापासून भारतीय संघातून बाहेर आहे. यामागे त्याची दुखापत हेच कारण आहे. गेल्या वर्षी 2023 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर फेब्रुवारी 2024 मध्ये शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना पुनरागमन केले. मात्र शमी पुन्हा एकदा जखमी झाला आहे.
मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात झाली दुखापत
बंगालच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात मध्य प्रदेश विरुद्ध निरंजन शाह स्टेडियम ग्राउंड सी येथे शुक्रवारी मोहम्मद शमी जखमी झाला. खरंतर, गोलंदाजी करताना त्याला पाठीची समस्या जाणवली. मोहम्मद शमी गोलंदाजी करताना सामन्याच्या मध्येच खाली बसला. त्यावेळी त्याच्या पाठीत खुप दुखत होते. शमीची खराब स्थिती पाहून वैद्यकीय पथकाला मैदानात यावे लागले.
मोहम्मद शमीला वेदना होत असल्याचे पाहून सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली, त्या वेळी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या वैद्यकीय पॅनेलचे प्रमुख नितीन पटेल हेही मैदानावर उपस्थित होते. मात्र, अल्प उपचारानंतर शमीने पुन्हा गोलंदाजी करत आपले षटक पूर्ण केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अशा परिस्थितीत तो यापुढेही स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
शमी गेल्या एक वर्षापासून दुखापतग्रस्त
टीम इंडिया सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारतीय निवड समितीने या दौऱ्यासाठी 18 खेळाडूंचा संघात समावेश केला होता पण शमी या संघाचा भाग नव्हता. गेल्या एक वर्षापासून तो दुखापतीने त्रस्त असून अद्याप तो सावरू शकलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शमीचा या सीरिजदरम्यान टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो. त्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
हे ही वाचा -