Maharashtra News Updates 3rd May 2023 : बारसू रिफायनरीचा वाद पेटणार, बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा 6 मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Barsu Refinery: बारसू रिफायनरीचा वाद पेटणार
रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती भिडणार
बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुतीचा प्रत्युत्तर मोर्चा
रत्नागिरीत 6 मे रोजी युतीचे नेते काढणार समर्थन मोर्चा
उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार करणार मोर्चाचे नेतृत्व
उद्धव ठाकरे उतरणार असलेल्या हेलिपॅडपासूनच युतीच्या नेत्यांचा मोर्चा
ठाकरे गट व शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकणार
Latur Unseasonal Rains: मागील काही दिवसापासून जिल्हाभरात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रमाणात शेतीचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. भाजीपाला फळबाग आणि ज्वारीचे नुकसान या पावसाने केले होते .. दोन दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे मात्र त्यात नुकसान झाल्याची घटना घडली नाही .. मात्र आज अहमदपूर शहर आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे..वारे आणि ढगांचा गडगडाट होत पावसाने हजेरी लावली आहे. जिल्हाभरात ढगाळ वातावरण आहे. थंड हवा वाहत असल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र गारवा जाणवत आहे
Beed News: बीडच्या नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भागववत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..यावेळी हजारो महिलांनी एकाच वेळी या कृष्ण जन्मोत्सवामध्ये फेरा धारल्याच पाहायला मिळालं.
अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्या प्रकरणी आरोपीला आज खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेड तालुक्यातील सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे 19 जुलै 2018 रोजी श्रुती सतीश चव्हाण या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून शौचालयाच्या टाकीमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता. हा आरोपी देखील सुकिवली गावातील होता व मुलीच्या नात्यात होता. या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. आज या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल.निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गावकऱ्यांनीही सरकारी वकिलांचा सत्कार करून गौरव केला. या प्रकरणात सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तीवाद व सबळ पुरावे तपासून या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल पाच वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Maharashtra Politics: परळी शहरातील नगर परिषद रोड परिसरात माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरवर खा. शरद पवार, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. धनंजय मुंडे, परळी नगर परिषदचे माजी गटनेते वाल्मिक आणा कराड यांचे फोटो देखील आहेत. असे बॅनर परळी वैजनाथ नगर परिषदचे माजी नगर सेवक जाबेर खान पठाण यांनी लावले आहेत. बॅनरमुळे शहरात चर्चा होत आहे.
Beed News: विठुरायाच्या श्रद्धेपोटी भाविक देवाच्या चरणी विविध प्रकारच्या सेवा अर्पण करीत असतात . कोणी लाखोंचे सोने अर्पण करते तर कोणी रोकड दानपेटीत टाकते. अशीच एक अनोखी सेवा बीड जिल्ह्यातील आपेगाव येथील आज्जीनी केली आहे. विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीसह अनेक परिवार देवता आहेत. दिवसभर चालणाऱ्या या राजोपाचारात आरतीसाठी जवळपास 500 कापसाच्या वाती लागतात.
आपेगाव येथील रत्नमालाताई बाळासाहेब तट यांनी तब्बल दीड वर्षे कष्ट करीत देव कापसाच्या सव्वा लाख वाती तयार करून विठ्ठल मंदिरात आणून दिल्या आहेत . त्यांचे गुरु जगन्नाथ महाराज देशमुख यांनी त्यांना हि सेवा देण्यास सांगितल्यावर गेले दीड वर्षे आज्जीबाईनी या वाती आपल्या लाडक्या विठूरायाची बनविल्या आहेत . याचे मोल फार नसले तरी यामागे या आज्जी बाई यांची श्रद्धा आणि कष्ट महत्वाचे आहेत. आता या वातीमुळे विठ्ठल मंदिरातील सर्व देवतांच्या आरती करता येणार आहे. आपण दिलेल्या वातीचा वापर होऊन विठुराया उजळून निघेल हीच भावना या आज्जीबाई यांच्या मनात होती. आज रत्नमालाताई यांनी विठ्ठल मंदिरात येऊन या कापसाच्या वाती देवाच्या चरणी अर्पण केल्या.
Acciden News: मुंबई-गोवा महामार्गावरील पेण नाजिक हमरापूर फाटा येथे एच.पी.गॅस ट्रक आणि महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये भीषण अपघात होऊन त्यात एक ठार एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
Wardha News: वर्ध्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठवड्याभरपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक नुकसान देवळी, हिंगणघाट तालुक्यात झालं आहे. अचानक पडणाऱ्या पावसाने उन्हाळ्यात नदी नाल्यांमध्ये पाऊस दिसून येत आहे. आजही काही ठिकाणी साधारण तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस वर्ध्यात रात्रभर सर्वदूर होता. आता पुन्हा विश्रांतीनंतर पावसाने झळ लावली आहे. काही भागांत या अवकाळी पावसामुळे विजेचे खांब कोसळले आहे.
Beed News: बीडच्या वडवणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चक्क हेलिकॉप्टरने शहरात असलेल्या महापुरुषांच्या चौका चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक भीमसैनिक एकत्र आले होते. यावेळी शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
Maharashtra News: वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिपरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरावरील टीनाचे छत उडाले. घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. रात्रीला पिंपरी येथील रहिवाशी दिलीप तुकाराम काळे यांच्या घरावरील पत्रे उडाले. छतंच उडाल्याने संसार उघड्यावर आलाय. घरातील साहित्य, गहू, ज्वारी, तांदूळ असे धान्याचे देखील नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने घराची भिंत देखील कोसळली आहे.
Share Market Opening on 3 May: जगभरातील आर्थिक मंदीच्या (Economic Recession) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. बदललेल्या परिस्थितीत घसरणीचा ट्रेंड जगभरातील बाजारपेठांमध्येही दिसून आला. आज बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टी (NSE Nifty) या दोन्ही प्रमुख देशांतर्गत इडेक्सची सुरुवात घसरणीसह झाली.
Pune News: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील पळसदेव- काळेवाडी नंबर दोन येथे बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. अचानक रस्त्यावर बिबट्या आल्यानंतर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो काही काळ रस्त्यावरती जखमी अवस्थेत पडला होता.
स्थानिकांनी वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबच्या सदस्यांना ही माहिती दिली त्यानंतर तातडीने त्या बिबट्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत तो गतप्राण झाला होता. 18 मार्चला दौंड तालुक्यातील यवत परिसरात महामार्गांवर बिबट्या अपघातात मृत्युमुखी पडला होता. मागील आठ दिवसापासून बिबट्या इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयाच्या भीमा नदीकाठच्या पट्ट्यात वावर असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिल्याचा दुजोरा इंदापूर तालुका वनपरिक्षेत्राधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितलेय. त्यांनी तातडीने घटनास्थळी जावून पंचनामा करत त्या मृत बिबट्यास ताब्यात घेतले.
Buldhana News: बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय व रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सध्या एका भलत्याच समस्येने ग्रासले आहेत. इंग्रजांच्या काळातील हे रुग्णालय राज्यातील एक नावाजलेल रुग्णालय आहे ,मात्र जिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक नसल्याने रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रुग्णालय परिसरात शेकडो वराह अर्थक डुकरांचा मुक्त संचार बघायला मिळत असून अनेकदा रुग्णांच्या वॉर्डमध्येसुद्धा हे प्राणी जाऊन परिसर अस्वच्छ करतात तर रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रूग्णांना डुकराच्या सहवासात उपचार घेण्याची वेळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात हल्ली बघायला मिळत आहे.त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक या समस्येने ग्रासले आहेत.
Nashik News: नाशिकच्या मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका दुर्लक्ष करत असून सोयगाव ते नामपूर या रस्त्यावर दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तक्रारी करून देखील कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकीकडे उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण होत असतांना दुसरीकडे मात्र पाणी वाया जात असतानाही पाणी पुरवठा विभाग मात्र अजूनही दुर्लक्षच करतो आहे. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या रस्त्याच्या मधोमध हा लीकेज असल्याने रस्ता देखील यामुळे खराब होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि वाया जाणारे पाणी वाचवावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Pune Crime : पुण्यातील पंच तारांकित हॉटेल मध्ये सुरू होता वेश्यव्यवसाय
पुणे स्टेशन परिसरातील हॉटेल मधून 3 दलालांना अटक
दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणी ताब्यात
रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.
हे दलाल सोशल मीडियावरून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील फाईव्ह स्टार हाॅटेलमधील खोली बुक करून परराज्यातील तरुणींना तेथे बोलावून घेत. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाइन पद्धतीने संपर्क साधून आर्थिक व्यवहार करत होते.
पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशीअंती येरवडा भागात आणखी दोन तरुणी व तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल
Maharashtra Politics: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता
कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आपल्या टीमसह कर्नाटकात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाच्या सोहळ्यास मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्यभरातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष, बडे नेते आणि बहुतांश आमदारांना निमंत्रणे होती. प्रकाशनासारख्या साध्या कार्यक्रमाची जय्यत तयारी पाहता पवारांच्या राजीनाम्याची घोषण आणि त्यानंतरचे कार्यकर्त्यांचे आंदोलन हे पूर्वनियोजित होते असे स्पष्ट होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रवादीतल्या पक्षांतर्गत निवडणूक रखडलेल्या आहेत. पण त्याच्या आधी शरद पवार यांनी आपल्यापासूनच भाकरी फिरवली का, अशी चर्चा आता सूरू झाली आहे.
DGCA-GO First Update: गो फर्स्ट एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर, तीन आणि चार मे ची सर्व उड्डाणे रद्द. कंपनीला इंजिनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याची कंपनीची माहिती. कंपनीने दिवाळखोरी घोषित करण्यासाठी NCLT कडे केला अर्ज.
Pune News: पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची बॅनरमार्फत विनंती
"साहेब निवृत्त पदाधिकारी होत असतात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जनतेच्या मनातील राजे नव्हे"
"केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे साहेब, कृपया आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा" अशा मजकुराचे लावले बॅनर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष समीर उत्तरकर यांनी केली आहे
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आज 3 मे रोजी देखील अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी पहिला भारतीय मूकपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित झाला. तर, आज चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची जयंती आहे. मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई, अभिनेत्री नर्गिस, गीतकार जगदीश खेबुडकर यांचा स्मृतीदिनदेखील आहे.
1897: चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा जन्म
मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक भालचंद्र पेंढारकर ऊर्फ भालजी पेंढारकर यांचा जन्म. भालजी पेंढारकर यांनी अनेक आशयघन चित्रपटांची निर्मिती केली. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे मोठे योगदान आहे. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली.
भालजी पेंढारकर यांची चित्रपट निर्मिती संस्था म्हणजे त्या काळी एक कलाकार घडवणारी संस्था होती. भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ हा भालजींनी उभारला. या स्टुडिओत अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पार पडले आहे.
भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
1913: पहिला भारतीय मूकपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित
राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट होता. याची निर्मिती दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांनी केली होती. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. भारतातील पुराणकथा राजा हरिश्चचंद्र यांच्या कथेवर आधारीत हा चित्रपट होता. चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार मराठी असल्याने हा चित्रपटही मराठी चित्रपटांच्या श्रेणीत आला आहे. या चित्रपटात दत्तात्रय दामोदर दाबके यांनी राजा हरिश्चचंद्राची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका अण्णा साळुंके नावाच्या अभिनेत्याने साकारली होती. 'राजा हरिश्चंद्र' चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला.
1939: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली
काँग्रेसमधून बाहेर पडत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. हा पक्ष काँग्रेसमध्ये एक गट म्हणून काम करत होता. स्वातंत्र्यानंतर या गटाने वेगळा राजकीय पक्ष स्थापन केला. महात्मा गांधी यांच्यासोबत मतभेद झाल्याने सुभाषचंद्र बोस यांनी 29 एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 3 मे रोजी उत्तर प्रदेशमध्ये ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. सुरुवातीला फॉरवर्ड ब्लॉकचे उद्दिष्ट काँग्रेसमधील सर्व डाव्या वर्गांना एकत्र आणणे आणि काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कविशर हे त्याचे उपाध्यक्ष झाले. जूनच्या अखेरीस मुंबईत फॉरवर्ड ब्लॉकची परिषद झाली. त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर करण्यात आला.
1969 : भारताचे तिसरे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन
भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी (1963) होते. जर्मन भाषेमध्ये त्यांनी महात्मा गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले. 1956 साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. 1967 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. झाकिर हुसेन यांनी अनेक शैक्षणिक समित्यांवर काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (1954) हा पुरस्कार देण्यात आला.
1971: प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ धनंजय रामचंद्र गाडगीळ यांचे निधन
धनंजय गाडगीळ हे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी भारतात आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची उभारणी केली होती. गाडगीळ हे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष देखील होते.
पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. केंद्र सरकारकडून चौथ्या आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान राज्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य वाटपासाठी त्यांनी सूत्र निश्चित केले होते. महाराष्ट्रातील शेतकरी सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचे श्रेय त्यांना जाते.
1977 : मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई यांचे निधन
मुस्लिम समाज सुधारक, पत्रकार, लेखक हमीद दलवाई यांचे निधन. मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी 1970 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन केले होते. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे. 1966 मध्ये सात मुस्लिम महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा. या मोर्चाची मोठी चर्चा झाली, त्याशिवाय मुस्लिम महिलांचा प्रश्नही ऐरणीवर आला. महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती.
1981 : अभिनेत्री नर्गिस यांचे निधन
फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन आजच्या दिवशी झाले. नर्गिस यांनी बाल कलाकार म्हणून 1935 मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात 1942 साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते 1960 च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गीसने अनेक सिनेमांतून कामे केली. राज कपूर आणि नर्गिस यांच्या ऑन स्क्रिन जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. मदर इंडिया चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांना आगीतून वाचवले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि ते विवाहबद्ध झाले. नर्गिस या राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार होत्या.
कर्करोगासारखा जीवघेण्या आजाराने नर्गिस यांनी वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नर्गिस यांचे पती आणि अभिनेते सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या स्मरणार्थ नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना केली.
2011: गीतकार जगदीश खेबुडकर यांचे निधन
लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना करणारे गीतकार अशी जगदीश खेबुडकर यांची ओळख होती. पेशाने शिक्षक असणाऱ्या जगदीश खेबुडकर यांनी आपल्या कारकिर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते सोनू निगमपर्यंत सर्वच दिग्गज, प्रसिद्ध गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य समजले जाते.
साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’, पिंजरा' आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली.
सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. 25 पटकथा, संवाद , 50 लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. जगदीश खेबुडकर यांनी आपल्या पाच दशकाच्या कारकीर्दीत जवळपास 36 दिग्दर्शक, 44 संगीतकार आणि जवळपास 30 हून अधिक गायकांसोबत काम केले आहे.
इतर महत्त्वाच्या घटना
1994 : सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्त्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण
2006: भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -