मालेगाव : ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी (Maulana Sajjad Nomani) यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) दरम्यान 'व्होट जिहाद'बाबत (Vote Jihad) विधान केले होते. त्यांच्या युट्यूबवरील एका व्हिडीओत त्यांनी व्होट जिहाद या शब्दाचा उल्लेख केला होता. तसेच नोमानी यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची स्तुती केली होती. भाजपला (BJP) मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाका. भाजपला मतदान करू नका. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) साथ द्या, असेही त्यांनी म्हणाले होते. त्यानंतर भाजपने व्होट जिहादच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला होता. आता एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी सज्जाद नोमानी यांच्यावर मालेगावातून बोलताना जोरदार हल्लाबोल केला.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, भाजपने महाराष्ट्रात प्रचार केला की, फतवा जितेगा या भगवा जितेगा आणि आमचे निवडून येणारे सीट पडले. सांगा कोण आहेत हे लोक? निवडणूक काळात काही लोक येतात आणि सांगतात याला मते द्या, त्याला मते द्या. अरे तुम्ही निवडणूक लढू शकत नाही तर तुमच्या जावयाला निवडणुका लढवायला सांगा. आम्ही यांना सांगू आम्ही त्यांना सांगू, शेवटी काय झालं? भाजपला तुम्ही भांडवल दिले, असे म्हणत त्यांनी नोमानी यांच्यावर टीका केली.
पाकीट घेऊन जीवन जगणाऱ्यांनो तुम्ही डूबून मरा
ते पुढे म्हणाले की, धर्माचे काम करता येत नाही तर नका करू. किमान प्रार्थना करा. सगळं आम्हालाच पाहिजे म्हणणारे आज कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही. इम्तियाज जलील यांना मत देऊ नका, समाजवादी पार्टीला मत द्या, असे सांगणारे लोक कुठे गेलेत? पाकीट घेऊन जीवन जगणाऱ्यांनो तुम्ही डूबून मरा, असा टोला त्युंनी नोमाणी यांना लगावला.
महाराष्ट्रातील मुस्लिमांना कमजोर करायचे कामa
ते माझ्या घरी आले, तेव्हा मी त्यांना इंग्रजीची कुराण भेट दिली. मी खूप काही बोलू शकतो, तुम्हाला घराच्या बाहेर पडणे मुश्किल होईल. किमान कुराणची तरी लाज ठेवायला हवी होती. तुम्ही जे काम करत आहात त्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांना कमजोर करायचे काम होत आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही निवडणुका लढा, आम्ही तुमच्या सोबत राहायला तयार आहोत. किती दिवस असं करणार? याला पाठिंबा, त्याला पाठिंबा. तुम्ही पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना किती मते पडली? तेवढ्याच मतांनी आमचे उमेदवार पडले, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय.
आपली मस्जिद आबाद ठेवा
भाजपला तुम्ही आयतं भांडवल दिलं, त्यांनी त्याचा प्रचार केला. उद्या भाजपने काही निर्णय घेतले तर त्यांना विरोध कोण करेल? मुस्लिम बांधवांनो, आपली मस्जिद आबाद ठेवा. मस्जिद कायम भरलेली ठेवा, मस्जिदमध्ये गर्दी करा. दर्गा, मस्जिद सांभाळा, कोणाला घाबरू नका, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा