Maharashtra Live Updates : भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध केलं जातंय, दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते; उद्धव ठाकरेंचा आरोप

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Apr 2023 08:29 PM
Uddhav Thackeray : भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध केलं जातंय, दुसऱ्या पक्षातील नेत्याच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते; उद्धव ठाकरेंचा आरोप

भाजपमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना शुद्ध केलं जातंय, दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांचे आरोप झालेल्यांना भाजपमध्ये घेतलं जातंय. दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray Pachora Sabha: ज्यांनी भगव्याला कलंक लावला, ते हात कायमचे गाडा - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Pachora Sabha: ज्यांनी भगव्याला कलंक लावला, ते हात कायमचे गाडा असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर, यांना जसं घोड्यावर चढवलं होतं तसं आता खाली खेचा, असं आवाहन करत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Pachora Sabha: पाठीवर वार करणारी औलाद आमची नाही - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Pachora Sabha: सगळे घोषणा देत होते, कोण आला रे कोणा आला? गद्दारांचा बाप आला. पण ही अशी घाणेरडी औलाद आमची असू शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. पाठीवर वार करणारी तर सोडाच, पण आईच्या कुशीवरती वार करणारी औलाद आमची नाही, असेही ते म्हणाले.

Uddhav Thackeray Pachora Sabha: सभेत घुसणार म्हणणाऱ्या घुशी खुप पाहिल्या - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Pachora Sabha: सभेत घुसणार म्हणणाऱ्या घुशी खुप पाहिल्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे. घुशींना बिळातून काढून आपटणार, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. 

शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला कळत नाही - उद्धव ठाकरे

जल्लोष पाहिल्यावर शिवसेना कुणाची हे कळतं, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. तर, शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोगाला कळत नसल्याचंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray Pachora Sabha: जमलेली गर्दी पाहून कळते की शिवसेना कुणाची - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Pachora Sabha: जमलेली गर्दी पाहून कळते की शिवसेना कुणाची - उद्धव ठाकरे
पाकिस्तानला विचारले तरी सांगतील शिवसेना कुणाची, पण काहीजणांना मोतिबिंदू झाले - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Pachora Sabha: उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल

Uddhav Thackeray Pachora Sabha: उद्धव ठाकरे व्यासपीठावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते भाषणाला सुरुवात करतील.

Jalgaon Pachora Sabha : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सभास्थळी होणार दाखल

Jalgaon Pachora Sabha : थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.

Jalgaon Pachora Sabha : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार आर ओ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Jalgaon Pachora Sabha : उद्धव ठाकरे आज पाचोऱ्यात दाखल झाले असून थोड्याच वेळात सभेला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी ठाकरे यांनी पाचोऱ्यातील निर्मल सिड्स कंपनीत माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरेच्या हस्ते झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत, अरविंद सावंत, आंबदास दानवे उपस्थित आहेत. तर यावेळी ठाकरे यांनी निर्मल सिड्स कंपनीत कार्यक्रम सुरू असून जळगाव जिल्ह्यातील उद्योजक यांच्याशी चर्चा करण्यात आली. 

Jalgaon Pachora Sabha : पाचोरा जाणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखल

Jalgaon Pachora Sabha : आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिकांनी पाचोरा गाठले आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील संजय राऊत यांचे आव्हान स्वीकारत पाचोरा शहरात दाखल होत आहेत. अशातच काही शिवसैनिकांना शिरसोली गावाजवळ पोलिसांनी रोखले आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली, रात्री नऊ वाजता वर्षा बंगल्यावर बैठक

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली.


आज रात्री नऊ वाजता ही बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी होणार आहे.


या बैठकीला खासदार, आमदार, मंत्री, आणि मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


शिवसेना पक्षाची संघटनात्मक चर्चा या बैठकीत होणार आहे.

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर इथे होणार

Akhil Bharatiya Marahti Sahitya Sammelan : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथे होणार आहे.

नदीच्या पाण्यात वीजप्रवाह आल्याने युवकाचा मृत्यू, यवतमाळमधील धक्कादायक घटना
Yavatmal News : यवतमाळच्या पाटणबोरी जवळसलेल्या कोदोरी येथे मोटारपपंची वायर नदीच्या पाण्यात पडली. परिणामी नदीच्या पाण्यात वीज प्रवाह संचारला. याचवेळी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाने नदीच्या पाण्याला स्पर्श करताच, शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अशोक विठ्ठल कुरमेलकर (वय 37 वर्षे) असे मृताचे नाव आहे. मृत अशोक कुरमेलकर हा तरुण आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला होता. त्याने नदीतील पाण्याला स्पर्श करताच, त्याला विजेचा शॉक बसला आणि पाण्यातच त्याचा मृत्यू झाला. अशोक हा बाराही महिने दररोज सकाळी पैनगंगा नदीवर आंघोळ करायला जात असे. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. पांढरकवडा पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून घटनेचा तपास सुरु आहे.
महाजेनकोच्या असिस्टंट इंजिनिअर आणि ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी होणारी परीक्षा पुढे ढकला, खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

Chandrapur News : महाजेनको म्हणजेच महानिर्मितीच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेपासून मुकणार असल्याचा काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी आरोप केला आहे. धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहून महाजेनकोच्या असिस्टंट इंजिनिअर आणि ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. महाजेनकोची असिस्टंट इंजिनिअर आणि ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी 27 एप्रिलला परीक्षा आहे. मात्र याच काळात म्हणजे 26 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, मध्य प्रदेश जनरेशन कंपनी या देखील परीक्षा व मुलाखती आहेत. महाजेनको सोडून बाकी सर्व परीक्षांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले होते. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी या परीक्षांना मुकणार असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची धानोरकर यांनी फडणवीसांकडे मागणी केली आहे.

संगमनेरमध्ये बिबट्याने घरात घुसून 62 वर्षीय व्यक्तीला जीवे मारलं

Ahmednagar News : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील  बोटा शिवारात असणाऱ्या वडदरा गावात उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय 62 वर्षे ) या व्यक्तीवर घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला असून बिबट्याचा हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेरमध्ये बिबट्याने घरात घुसून 62 वर्षीय व्यक्तीला जीवे मारलं

Ahmednagar News : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील  बोटा शिवारात असणाऱ्या वडदरा गावात उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय 62 वर्षे ) या व्यक्तीवर घरात घुसून बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. यात त्यांचा जागीच मृत्यूू झाला असून बिबट्याचा हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू तर 18 जखमी 

Pune–Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात 


मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात


या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर 18 जखमी 


जखमी अवस्थेत असलेल्या एकूण 18 जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर 


जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू


ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला


साताऱ्याकडून मुंबईकडे ही बस जात असताना झाला अपघात 


चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामधील ट्रकचालकाचा देखील मृत्यू झाला

महाबळेश्वरमध्ये पारा खालावला, 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद तर वेण्णालेक परिसरातील तापमान 9 अंशावर

Satara News : ऐन उन्हाळ्यात साताऱ्यातील महाबळेश्वरचं तापमान खालावलं आहे. महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर वेण्णालेक परिसरातील तापमान 9 अंशावर पोहोचलं आहे.

रत्नागिरीतील नाणार रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना अटक

Ratnagiri News : रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्या साथीला असलेले मंगेश चव्हाण यांना देखील अटक केल्याची माहिती मिळत आहे. तर, रिफायनरी विरोधकांचे अध्यक्ष अमोल बोळे ज्या गाडीने राजापूर या ठिकाणी गेली होती ती गाडी देखील पोलिसांनी अपुऱ्या कागदपत्र असल्याचे कारण देत पोलीस स्टेशनला ठेवली असल्याचा दावा बोळे यांनी केला आहे.

चंद्रपुरात अवकाळी पावसात वीज पडून दोन जणांचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. ब्रह्मपुरी तालुक्यातील धानोलीपोहा येथे वीज पडून नवलाजी लडके या गुराख्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर शहराजवळील दाताळा शेतशिवारात पुंडलिक चेडे या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..


आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राधाकृष्ण विखे पाटील 


आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते, मात्र आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी, असं वक्तव्य महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. शिर्डी मतदारसंघातील राहाता इथे प्रकट मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवार राज्याला नेहमी कन्फ्युज ठेवतात. मात्र आता अजितदादांनी त्यांना सुद्धा कन्फ्युज केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय हे कोणाला समजणार? असं मिश्किल भाष्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांबाबत केलं.


महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचं मला टेन्शन येतं : पंकजा मुंडे


महाराष्ट्रात इतके राजकीय भूकंप झाले याचं मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं. मात्र या संदर्भात मला काहीही माहित नाही. राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील. भाजपाला अतिरिक्त नेत्यांची गरज असेल तर हा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या.


अनेकांना मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं, मात्र प्रत्येकाला होता येत नाही : देवेंद्र फडणवीस


मी त्यांची मुलाखत पाहिलेली नाही. कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. त्यात काही वावगं नाही. अनेकांना असं वाटते की मुख्यमंत्री व्हावे मात्र प्रत्येकाला होता येतं असं नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


दिल्लीतील घर सोडताना राहुल गांधी भावूक


सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगलाही सोडावा लागला आहे. हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचं दिसून आलं. ही सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं.


कोरोनामुळे जगभरात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ


कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे. या काळात शाळा बंद असल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.