Maharashtra Live Updates : पालघर: मुंबई वडोदरा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2023 09:55 PM
Parbhani News : परभणीत दिवसा तापमान 41.02 अंशावर रात्री वीज वाऱ्यासह पाऊस
Parbhani News:  परभणी शहरासह जिल्हाभरात मागच्या चार दिवसांपासून तापमान 40 पार गेले आहे आज तर तापमान हे 41.02 अंशावर गेल्याने दिवसभर कडक ऊन पडल्यानंतर संध्याकाळी वादळी वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस परभणीत बसरतोय त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री पावसाळा अशा दोन्ही ऋतूंची अनुभूती परभणी करांना आज आलीय.जवळपास एक तासापासून परभणीत विजांचा गडगडाट,वादळी वारे आणि पाऊस बरसतोय केवळ परभणी शहरच नाही तर जिल्ह्यातील अनेक भागात हा अवकाळी पाऊस पडतोय या वादळी वाऱ्यासह पावसाने फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झालीय.
Thane News: ठाणे: भिवंडीत जिवंत काडतुसे व दोन पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात हत्यार बाळगण्यास मनाई असताना ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरील मानकोली येथे पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावरील मानकोली येथील खडी मशीन जवळ सकाळी दोघे इसम आपल्या सोबत अग्निशस्त्र घेवून येणार असल्याची माहिती नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना समजली .त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा कारवाई करीत संशयित सुनिल मंगल डब (वय 43 रा.उत्तर पूर्व दिल्ली) आणि कुणाल किसनलाल वाल्मीक (वय 25 वर्षे रा.रोशनाबाद, हरिद्वार,उत्तराखंड) या दोघांना ताब्यात घेवून झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन पिस्तुल व एक जिवंत काडतूस आढळून आले. त्या दोघांना ताब्यात घेवून नारपोली पोलिसांनी दोघांविरोधात अग्निशस्त्र प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Palghar News: पालघर - मुंबई वडोदरा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला

Palghar News: मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्प बाधितांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला


डहाणूतील धानीवरी येथील शेतकऱ्यांचा रास्ता रोको 


मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला न देताच दुपारी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात घर तोडल्याने प्रकल्प बाधित आक्रमक


मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर प्रकल्पबाधितांचा ठिय्या


मोबदला न देताच घर तोडल्याने शेतकरी रस्त्यावर


डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या विरोधात प्रकल्प बाधितांची घोषणाबाजी

Thane News: ठाणे: ठाणे शहरातील काही भागातील वीज पुरवठा ठप्प, तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरू

Thane News: ठाणे: ठाणे शहरातील काही भागातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. खारेगाव कळवा मोठे सबस्टेशनची लाईन ट्रिप झाल्यामुळे ठाणे शहरातील काही भागात विद्युत पुरवठा बंद झाला असल्याची माहिती आहे. गेल्या एक ते दीड तासापासून खोपट, नौपाडा  ,कोपरी, बाळकुम आणि अन्य काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. 

Jalgaon News: जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेचा टीझर जारी

Jalgaon News: जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पाचोऱ्यातील सावा मैदानात 23 एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी करण्यात आले आहे

Dharashiv News:  नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून महिलेची तीन मुलांसह आत्महत्या

Dharashiv News:  नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून महिलेने आपल्या तीन मुलांसह तलावात उडी मारून आत्महत्या केलीये.. धाराशिव जिल्ह्यातील कोंड या गावात ही घटना घडली आहे. गावाजवळी तलावात उडी मारून महिलेने मुलांसह आत्महत्या केली. मृतांमध्ये सात महिन्याच्या चिमुकलीचाही समावेश असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.  पती दारू पिऊन मारहाण करत असल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे... 

Pune News:  पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर प्रशांत जगतापांच्या भावी खासदारकीचे बॅनर्स

Pune News:   सध्या पुण्यात एका बॅनर्सची मोठ्याप्रमाणात चर्चा सध्या सुरु आहे. पुण्यच्या राष्ट्रवादी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स लावण्यात आलेत. तर पुण्यातल्या वड़गाव भागातही जगताप यांचे बॅनर्स लागलेत. त्यामुळे या बॅनर्सची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरु आहे. 

 Pune News: पुणे विद्यापीठात अश्लील भाषेतील रॅपचं शुटिंग

 Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत अश्लील भाषेतील रॅप साँगचं शूटिंग केल्याचं समोर आलंय. रॅपर शुभम जाधव याने हे शूटिंग केलंय. धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठाची अधिसभा जिथे भरते. त्या अधिसभेतील कुलगुरूंच्या खुर्चीवर बसून शेजारी दारुच्या बाटल्या ठेवून शुटिंग करण्यात आलंय.. तर या रॅप साँगमध्ये पिस्तूल देखील दाखवण्यात आली आहे या शुटिंगसाठी विद्यापीठातीलच काही कर्मचाऱ्यांनी परवानगी दिल्याची माहिती समोर आलीये.

डहाणू तालुक्यातील आंबेसरी बारीपाडामध्ये घरावर वीज पडून तीन जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Palghar News : पालघरमधील डहाणू तालुक्याच्या काही भागात पहाटे विजांचा कडकडाट झाला. यामध्ये डहाणू तालुक्यातील आंबेसरी बारीपाडा येथील एका घरावर वीज पडून तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डहाणूतील कॉटेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये एका महिलेसह दोन मुलांचा समावेश आहे. आंबेसरी  बारीपाडा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी १) विशाल विष्णू आडगा वय - १४ वर्षे , २) वैशाली विष्णू आडगा वय - १२ तर एका महिलेचा समावेश आहे एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सिलवासामधील विनोबा भावे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आल आहे.

Mustard Procurement : नाफेडकडून मोहरीची खरेदी सुरु, हरियाणासह राजस्थान आघाडीवर

Mustard Procurement : सध्या देशात विविध शेतमालांची आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी सुरु करण्यात आली आहे. गव्हाची (Wheat) मोठ्या प्रमामात खरेदी सुरु झाल्यानंतर आता मोहरीची देखील आधारभूत किंमतीने खरेदी (Mustard Procurement) सुरु झाली आहे. आतापर्यंत नाफेडने (Nafed) 1,69,217.45 मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा (Haryana) पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Mustard Procurement : नाफेडकडून मोहरीची खरेदी सुरु, हरियाणासह राजस्थान आघाडीवर

Mustard Procurement : सध्या देशात विविध शेतमालांची आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी सुरु करण्यात आली आहे. गव्हाची (Wheat) मोठ्या प्रमामात खरेदी सुरु झाल्यानंतर आता मोहरीची देखील आधारभूत किंमतीने खरेदी (Mustard Procurement) सुरु झाली आहे. आतापर्यंत नाफेडने (Nafed) 1,69,217.45 मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा (Haryana) पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Mustard Procurement : नाफेडकडून मोहरीची खरेदी सुरु, हरियाणासह राजस्थान आघाडीवर

Mustard Procurement : सध्या देशात विविध शेतमालांची आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी सुरु करण्यात आली आहे. गव्हाची (Wheat) मोठ्या प्रमामात खरेदी सुरु झाल्यानंतर आता मोहरीची देखील आधारभूत किंमतीने खरेदी (Mustard Procurement) सुरु झाली आहे. आतापर्यंत नाफेडने (Nafed) 1,69,217.45 मेट्रिक टन मोहरीची खरेदी केली आहे. मोहरी खरेदीत हरियाणा (Haryana) पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या काही दिवसांत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Karnataka Election 2023 : काँग्रेस उमेदवारांची चौथी यादी जाहीर, माजी मुख्यमंत्री शेट्टरही रिंगणात

Karnataka Election : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाकमधील (Karnataka Election) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असाच सामना होत आहे. दरम्यान, काँग्रेसने निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सात जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर ( (Jagadish Shettar) यांचाही समावेश आहे. त्यांना हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.

Akola News: अकोला जिल्ह्यातील लोतखेड गावात गोळीबारात एकाचा मृत्यू

Akola News: अकोला जिल्ह्यातील लोतखेड गावात गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडलीये. आज (बुधवारी) रात्री साडेआठ दरम्यान ही घटना घडली आहे. गावातील फिरोज पठाण आणि कदीर शहा यांच्यात संपत्तीचा वाद होतात. याच वादातून आरोपी कदीर शहानं फिरोज पठाणवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात फिरोजचा जागीच मृत्यू झालाय. यातील आरोपी कदीर शहा हा माजी सैनिक आहेय. दहिहांडा पोलिसांनी आरोपी कदीरला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Nandurbar News:  शहादा शहरातील राज मोटर्स या ट्रॅक्टरच्या शोरूमला भीषण आग, आगीत 20 पेक्षा अधिक ट्रॅक्टर जळून खाक

Nandurbar News:  शहादा शहरातील राज मोटर्स या आयशर ट्रॅक्टरच्या शोरूम ला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.या आगीत वीस पेक्षा अधिक ट्रॅक्टर  जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे . शोरूम ला लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर आज संपूर्ण परिसरात पसरली शोरूम आणि परिसरात लावलेली ट्रॅक्टर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत.  राज मोटर्स हे शोरूम पूर्ण जळून गेल्याने इतर महत्वाच्या साहित्याचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आले नसले तरी स्थानिक नागरिक आणि शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने पहाटे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. आगीत कोट्यावधी रुपयाचा साहित्याचे नुकसान  झाल्याचा अंदाज आहे.

पार्श्वभूमी

19th April Headlines: Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुंबई - पक्ष फुटीची चर्चा रंगल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सावध भुमिका , पक्षातील सर्व आमदारांसोबत शरद पवार फोनवर बोलून माहिती घेत असल्याची सूत्रांची माहिती.राज्यांत पक्ष फुटीच्या रंगलेल्या चर्चा आणि आमदारांच त्याबाबत असलेले मत शरद पवार माहिती करून घेत असल्याची सूत्रांची माहिती  


मंत्रिमंडळ बैठक :  भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना कोटी रुपयांच्या कर्जाची खिरापत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता. भाजपच्या नऊ नेत्यांच्या साखर कारखान्यांना 1023 कोटी कर्जाची हमी राज्य सरकार देणार. हे साखर कारखाने अटी व शर्ती पूर्ण करत नसल्याने हा प्रस्ताव रखडला होता. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येणार आहे. फक्त भाजपच्या नऊ नेत्यांच्या साखर कारखान्यांना हे कर्ज देताना शिंदे गटाचे मंत्री आक्षेप घेण्याची शक्यता आहे


दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात भाजपा अधिक मजबूतच झाली आहे.


शहीद अमोल गोरेच्या पार्थिवावर आज वाशिममध्ये अंतिम संस्कार
 
भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील सोनखास गावातील अमोल गोरे या 33 वर्षीय जवानाला वीरमरण आलंय. अरुणाचल प्रदेशातील वापरी यांग बुल नाला येथे 14 एप्रिल रोजी हिमसख्खलन झाल्याने काही जवान बेपत्ता झाले होते. याच दुर्घटनेत अमोल गोरे यांना वीरमरण प्राप्त झाले. अमोल गोरे सैन्यदलात नायक या पदावर कार्यरत होते. तर ते दि 26 मार्च 2011 ला सैन्यदलात भरती झाले होते. आज त्यांचे पार्थिव राहते गाव सोनखास येथे आणण्यात येणार असून त्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.


जितेंद्र आव्हाड: गर्दीतल्या चेंगराचेंगरीचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊंटवरुन ट्विट केला आहे. समाज माध्यमांमधून हा वीडियो आला असल्याचं त्यांनी सांगितलं.. शिवाय हा व्हिडिओ मॉर्फ नाही असंही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटलंय... महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते आहे.... हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा ? असा सवाल आव्हाडांनी विचारलाय


चंद्रपूर - पोंभुर्णा शहरात सुरू असलेल्या रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलनावर अजूनही आदिवासी ठाम महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकही भाजपचा नेता पिडीतांच्या भेटीला गेले नाहीत



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.