Maharashtra News Updates 18th May 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pune News: बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ४८ लाखांचा हिरा पान मसाला व रॉयल गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तुळजाभवानी मंदीर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न
तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी काढले जाहीर प्रकटन
तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण
तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली होती
अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना आता मंदिरात प्रवेश नाही असे लावले होते बोर्ड
Jalna News: जालना येथील रावसाहेब पाटील दानवे फॉर्मसी कॉलेज मधील फार्मसी मध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना फीस न भरल्यामुळे परिक्षेपासून वंचित राहावं लागलंय, या प्रकरणी विद्यार्थ्यांनी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे.
Sangli News: अत्यंत संवेदनशील आणि रोमहर्षक निवडणूक झालेल्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना धक्का देत शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. आज झालेल्या सभापती निवडीमध्ये सभापती पदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी तर उपसभापतीपदी काँग्रेसचे राहुल गायकवाड यांची निवड झाली.
Dr. Dabholkar Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याबाबत सीबीआयनं घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी केली आहे.
Bhandara News: मागील दहा दिवसांपासून गायब झालेल्या अवकाळी पावसानं आज दुपारी अचानक जोरदार हजेरी लावली. गत आठवडाभरापासून तापमानाने उच्चांक गाठल्याने भंडारा जिल्ह्यात नागरिक उकाळ्यामुळ त्रस्त झालेत. अशात आज दुपारी वातावरणात बदल झाला आणि मोहाडी, तुमसर सह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं उकळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्ह्यातील काही भागात वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Thane-Kalyan News: कल्याण पूर्व मधील सुदर्शन कॉलनी येथे राहणारा अमित हा नेहमीप्रमाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले फळभाजीच्या गोणीवर बसला होता त्या गोणीच्या आड असलेल्या विषारी सापाने अमितला चावा घेतला. अमितला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले असता तेथे लस उपलब्ध नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मात्र पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये अमितला पाठवण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Sangli News : सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थांनच्या गणपती मंदिरात वर्षानुवर्षे मोहरम काळामध्ये धूप दाखवण्याची प्रथा आणि परंपरा आहे आणि आजही ती प्रथा परंपरा जोपासली जाते. सांगली शहरांमध्ये मोहरम काळामध्ये बसवले जाणारे सर्व पंजे विसर्जनाच्या अगोदर गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणले जातात. तिथे गणपती मंदिराच्या मुख्य गेटवर हे सर्व पंजे एकत्र आणत तिथूनच धूप दाखवली जाते. गणपती मंदिराच्या स्थापनेपासून ही प्रथा-परंपरा जोपासली जात असल्याचे सांगितले जात आहे. गणपती मंदिरात सर्व पंजे एकत्र आल्यानंतरच आणि धूप वाहल्यानंतर सगळे पंजे विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो.
Beed News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या महाप्रबोधन यात्रेचा जिल्हास्तरावरील समारोप येत्या 20 मे रोजी बीडमध्ये होणार आहे. या सभेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर सुषमा अंधारे आणि महाराष्ट्रातील इतर शिवसेनेचे नेते देखील या महाप्रबोधन यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत. 20 मे रोजी ही महाप्रबोधन यात्रा बीड शहरातील पारस नगरी येथे असलेल्या मैदानावर पार पडणार असून यासाठीची संपूर्ण तयारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तर या महाप्रबोधन यात्रेसाठी बीड जिल्ह्यातून पंधरा हजाराच्या वर शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख आणिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कल्याण पूर्व मधील सुदर्शन कॉलनी येथील अमित हा नेहमीप्रमाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले फळभाज्याची गोणी घेण्यासाठी गेला होता. गोणीच्या आड असलेल्या विषारी सापानं अमितला चावा घेतला. अमितला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले असता, तेथे लस उपलब्ध नसल्याने ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये अमितला पाठवण्यात आले होते. मात्र रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आमच्या मृत्यूने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
Latur News: महिला टोईंग कर्मचारी आणि वाहन चालक महिला फ्रिस्टाईल हाणामारी ते ही लातूरच्या मुख्य बाजारपेठेत. पन्नास रुपयाच्या दंडाच्या पावतीवरून पेटला वाद. व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
लातूरच्या मुख्य बाजारपेठत काल महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेने गाजले. लातूर शहरात बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागावी म्हणून खासगी संस्थेला परवाना देण्यात आला आहे. यात वाहन चुकीच्या ठिकाणी पार्क केले असेल तर आर्थिक दंड केला जातोय. यावरून या कर्मचारी आणि वाहन चालकाचे कायमच भाडणे होतात.. यामुळे या खासगी संस्थेने दहा महिला कर्मचारी नियुक्त केल्या आहेत. त्याच्या बरोबर ही आता लोक वाद घालत नाहीत तर थेट हाणामारी पर्यंत येत आहेत.
Nanded News: नांदेड जिल्ह्यात शेतकरी उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला लागलेत. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचेही मोठे नुकसान झालंय. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झालीय. तर बाजारातही कांद्याला पुरेसा भाव नसल्याने उत्पन्नाचा खर्च निघाणेही कठीण झालंय, त्यामुळे शेतकरी हतबल झालेत.
Ulhasnagar Crime: उल्हासनगरच्या काही महिला समाजसेविकाना याची माहिती मिळताच त्यांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकारचा पर्दाफाश केलाय. दरम्यान नाशिकहून आलेल्या एका महिलेच्या 22 दिवसाच्या बाळाला सात लाखांना डमी ग्राहकाला विकताना ठाणे क्राईम ब्रांच आणि महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. धक्कादायक म्हणजे मुली आणि मुलांचे वेगवेगळे रेट या महिला डॉक्टरने ठरविले होते. आज 22 दिवसांच्या बाळाची विक्री 7 लाखात होणार होती, दरम्यान महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील टोळी या बाळाची विक्री करणाऱ्या या रॅकेटमध्ये सहभागी आहे. सध्या महिला बालकल्याण विभाग आणि क्राईम ब्रँच अधिकारी या सगळ्या घटनेची चौकशी करत असून लवकरच एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश होणार आहे.
डीआरडीओचे अधिकारी प्रदीप कुरलुकर यांच्या हनी ट्रॅप प्रकरणाच्या तपासा दरम्यान नाव आलेल्या निखिल शेंडेच्या कुटुंबीयांनी निखिल पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. निखिलची आई आणि काकांनी एबीपी माझाशी Exclusive बातचीत करताना निखिल निर्दोष असल्याचा आणि त्याला कोणीतरी फसवल्याचा दावा केला आहे. मुळात धावपटू असलेला निखिल शेंडे 2015 मध्ये हवाई दलात रुजू झाला होता. निखिल कधीच शत्रूराष्ट्राला गुप्त माहिती देणार नाही, अशी त्याच्या आईची भावना आहे. लहानपणापासून निखिलचा सांभाळ करणारे त्याचे काका राम शेंडे हेही निखिलच्या एटीएस मार्फत चौकशीच्या बातमीमुळे धक्क्यात आहेत. निखिल कधीही चुकीचे कृत्य करू शकत नाही, त्याला कोणीतरी फसवले आहे, असा दावा राम शेंडे यांनी केला आहे.
Bullock Cart Racing: महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा राज्य सरकारचा कायदा वैध
बैलगाडा शर्यती बद्दलचा सुप्रीम मार्ग मोकळा
बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी मोठा दिलासा
Kolhapur News : कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीत घर फोडून 20 तोळे दागिने लंपास
चोरट्यांचा राहत्या घरात तीन तास मुक्तसंचार
सूरज सुतार यांचे कुटुंब बेडरुममध्ये झोपलेले असताना चोरी
दागिन्यांसह दरातील मोपेड गाडी देखील चोरट्यांनी पळवली
Mumbai News : मुंबईतील चेंबूर इथे बुधवारी (17 मे) रात्री 11.30 च्या सुमारास बसने दुचाकीला धडक दिली. याचा दुचाकीचालकाच्या गाडीचा अपघात झाला असून गाडीचे नुकसान झालं. नुकसानभरपाई द्यावी म्हणून दुचाकीस्वार हा बसच्या समोर तुटलेल्या गाडीवर बसून राहिला. दुचाकीस्वाराच्या म्हणण्यानुसार त्याला बस चालकाने शिवीगाळही केली. हे बस नंबर 8 हा आहे. दुचाकीस्वार हा घटना स्थळापासून जवळ राहणारा असल्यामुळे इथे तणावाचे वातावरण तयार झाले होते. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.
कांदिवलीमधील बिल्डर जयेश तन्नाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
जयेश तन्नावर अश्याच प्रकारचे यापूर्वी फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल आहेत.
आरोपीने फिर्यादी यांचे फ्लॅट ताबा दिलेला नाही किंवा पैसेही परत केले नाही.
एकुण रू 3.63 कोटी ची फसवणुक केलेली असल्याचे आरोप.
आरोपी जयेश विनोद तन्ना व त्याचे कंपनी साई सिध्दान्त डेव्हलपर्स यांचेविरुध्द कलम 409, 420, भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तन्नाला आज त्याचे कांदीवली येथील घरातुन ताब्यात घेवुन अटक केलेली आहे.
आज न्यायालयात हजार केले असता त्याला 22 मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
DK Shivakumar: उपमुख्यमंत्री नको... मुख्यमंत्रीपदच हवं; नाराज डीके शिवकुमार यांची भूमिका, काँग्रेससमोरील पेच वाढला
Karnataka Government Formation: कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून अजूनही अंतिम निर्णय झाला नाही. सिद्धारमय्या यांचे नाव अंतिम झाल्याच्या बातम्या येत असताना आता मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार असलेले डीके शिवकुमार (DK Shivakumar) नाराज असल्याची चर्चा आहे. डीके शिवकुमार हे अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी अडून असल्याची बातमी आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांड अद्याप कोणत्याही निर्णयावर आलं नाही.
सिद्धारय्या यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम झालं असून डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाची सहा खाती देण्याची ऑफर असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाव्यतिरिक्त कोणतंही पद नको असल्याचं कळवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढली असून मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. काँग्रेसचा एक डॅशिंग नेता अशीच त्यांची ओळख असून भाजपला जशास तसं उत्तर देण्यात तरबेज आहेत.
Maharashtra ST Bus News: एसटीचा चालताबोलता इतिहास हरपला; ST चे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन
Maharashtra ST Bus News: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे (MSRTC) पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे आज (17 मे 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. आज रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे एसटी प्रेमींमध्ये (ST Bus) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या एक जून रोजी पहिल्या एसटी प्रवासाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापूर्वीच केवटे यांचे निधन झाल्याने एसटीच्या इतिहासाचा (ST Bus) साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्या, गुरुवारी अहमदनगर येथील अमरधाम येथे सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राज्यातील पहिली एसटी बस सेवा 1948 मध्ये अहमदनगर ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली. त्या काळी नगर शहर फार लहान होते. सरकारची प्रवासी बससेवा नसल्याने बसस्थानक असे नव्हतेच. खासगी बस माळीवाडा परिसरातून बाहेरगावी जात असत. याच परिसरातून पहिली बस पुण्याकडे धावली. त्यावेळी देखील खासगी अवैध प्रवासी वाहतूक होत असे. त्यांच्याकडून ही एसटीला अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असे, जाणकार सांगतात. अहमदनगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक आणि वाहक दोघेही अहमदनगरचे होते. एसटीचे वाहक म्हणून लक्ष्मण केवटे आणि चालक म्हणून किसन राऊत यांच्याकडे जबाबदारी होती. लक्ष्मण केवटे हे एसटी महामंडळातून 30 एप्रिल 1984 रोजी सेवानिवृत्त झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -