Maharashtra Live Updates : गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान चोरी करणाऱ्या तिघांना अटक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Apr 2023 10:56 PM
Gondia News: गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून धान चोरी करणाऱ्या तिघांना अटक

Gondia News:  गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेले दोन व्यापाऱ्यांचे धान चोरट्यांनी चोरून नेले होते.  याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी धान चोरल्याचे कबूल केले आहे. राजकुमार विश्वकर्मा, संदीप बावनथडे , अतुल पारधी असे अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.

Maharashtra Politics: लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत: उद्धव ठाकरे

देशाला हुकूमशाहीचा धोका आहे.  लोकशाहीला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे; काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांची स्पष्टोक्ती

लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरेंसोबत आहे असे प्रतिपादन काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

Maharashtra Politics: काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मातोश्रीवर दाखल; उद्धव ठाकरे यांच्यासोबत करणार विविध मुद्यांवर चर्चा

Maharashtra Politics:   काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. वेणुगोपाल यांच्यासोबत भाई जगताप, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा हेदेखील मातोश्रीवर दाखल झाले आहेत.


 

Congress KC Venugopal : काँग्रेसचे केसी वेणुगोपाल हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला, मातोश्रीवर चर्चा

राज्यातील महाविकास आघाडी कायम एकजूट राहावी यासाठी आता काँग्रेसचे केंद्रीय नेते केसी वेणुगोपाल हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचले आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध ताणले असताना ही भेट महत्त्वाची आहे. 

Nanded News: नांदेड: आमदार अनुसया खेडकरसह इतर आरोपींचे जामीन मंजूर; महागाईविरोधातील आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान प्रकरण 

Nanded News: नांदेडमधील  हिंगोली गेट येथे महागाईच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी झालेल्या सरकारी मालमत्तेच्या नुकसानीस दोषी धरुन नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी तत्कालीन शिवसेना आमदार अनुसया खेडकर आणि इतर शिवसैनिकांना ठोठावलेल्या 5 वर्ष सक्तमजुरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात अपील दाखल करण्यात आले असून न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी खेडकर व इतर आंदोलकांचे जामीन आज मंजूर केले आहेत. सन 2008 मध्ये हे आंदोलन झाले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्य जवळपास दीडशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि एसटी चालकाच्या फिर्यादीवरुन एसटी बसेस, मनपा वाहन व पोलीस वाहनांचे नुकसान केले आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा गुन्हा दाखल करण्यात आला.

Nanded News: नांदेड: आमदार अनुसया खेडकरसह इतर आरोपींचे जामीन मंजूर; महागाईविरोधातील आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान प्रकरण 

Nanded News: नांदेडमधील  हिंगोली गेट येथे महागाईच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी झालेल्या सरकारी मालमत्तेच्या नुकसानीस दोषी धरुन नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी तत्कालीन शिवसेना आमदार अनुसया खेडकर आणि इतर शिवसैनिकांना ठोठावलेल्या 5 वर्ष सक्तमजुरी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात अपील दाखल करण्यात आले असून न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी खेडकर व इतर आंदोलकांचे जामीन आज मंजूर केले आहेत. सन 2008 मध्ये हे आंदोलन झाले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्य जवळपास दीडशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि एसटी चालकाच्या फिर्यादीवरुन एसटी बसेस, मनपा वाहन व पोलीस वाहनांचे नुकसान केले आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या 227 राहणार

BMC Election : ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका


मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या 227 राहणार


शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब


माजा नगरसेवक राजू पेडणेकरांची याचिका फेटाळली

आरे मेट्रो कारशेडमधील वृक्षतोडीच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा संताप

आरे मेट्रो कारशेडमधील वृक्षतोडीच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाचा संताप


एमएमआरसीएच्या मनमानी कारभारावर सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची तीव्र नाराजी


केवळ 84 झाडं तोडण्याची परवानगी दिलेली असताना 185 झाडं तोडायची परवानगी मागताच कशी? - सरन्यायाधीश


आणि आमच्या परवानगीच्यावर जात पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीनं अतिरिक्त झाडं तोडायची परवानगी दिलीच कशी?, सरन्यायाधीशांचा सवाल

Navi Mumbai: महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटना प्रकरण; कोकण विभागीय आयुक्तांनी सांस्कृतिक मंत्र्यांना दिला प्राथमिक अहवाल  

Navi Mumbai: महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटना प्रकरण 


कोकण विभागीय आयुक्तांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटना प्रकरणी सांस्कृतिक मंत्र्यांना दिला प्राथमिक अहवाल  


प्राथमिक अहवालात कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाबाबत  आढावा देण्यात आला असल्याची माहिती


 तसेच  मुख्य सचिवांनी काही आदेश देखील श्री सेवकांच्या  अंत्यसंस्काराबाबत  कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहेत

Navi Mumbai: नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला

Navi Mumbai: नवी मुंबईतील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला आहे.पालिका रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी एका श्रीसेवकाचा मृत्यू झाल आहे.  कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल आहे एकूण 12 जण दगावले आहे.  विनायक हळदणकर असे मृत व्यक्तीचे नाव असून कल्याण येथील रहिवासी आहेत. 


 

खारघरमध्ये उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12, नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू

Maharashtra Bhushan Award : नवी मुंबईतील खारघर इथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 12 झाली आहे. नवी मुंबई महापालिका रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला.

बीडच्या आष्टी तालुक्याला गारपिटीचा तडाखा, एक हजार तीनशे हेक्टर शेती बाधित
Beed News : बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरातील देऊळगाव घाट पिंपळगाव घाट यासह तालुक्यातील 18 गावांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे एक हजार तीनशे हेक्टर जमिनीवरील पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला आहे. आष्टी तालुक्यात दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकासह फळबागाचा देखील प्रचंड नुकसान झाला आहे. या गारपिटीमुळे तालुक्यातील 3 हजार 200 शेतकऱ्यांच नुकसान झालं आसून शासनाने तात्काळ पंचनामे करुन सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता दुसरीकडे तलाठी आणि मंडळाधिकारी याचबरोबर कृषी सहायक यांनी या नुकसानीची पाहणी करून दोन दिवसांमध्ये किती नुकसान झाले याची माहिती प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

 
वर्ध्यात धान्य महोत्सवाला भरभरुन प्रतिसाद, विविध धान्य ठरले आकर्षण

Wardha News :  बचत गट आणि शेतकऱ्यांच्या धान्याला धान्य महोत्सवातून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतीपिकाला वर्धेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या वतीने वर्ध्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल, भाजीपाला, देशी गाईच्या दुधापासून बनवलेले पदार्थ, बचत गटाने तयार केलेले पदार्थ, शेती अवजारे असे विविध उत्पादनाचे स्टॉल इथे लावण्यात आले. येथे एकूण 107 स्टॉलची उभारणी करण्यात आली. खपली गहू, तूर डाळ, मूग, उडीद, ज्वारी, हळद, धने, मोहरी असे विविध धान्य येथे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. लाकडी घाणीचे शुद्ध तेल आणि गवळाऊ गायीच्या दुधापासून बनवलेले पदार्थ येथे विशेष आकर्षण ठरले. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेती पिकाला येथे विशेष प्राधान्य देण्यात आले.

Raj Thackeray:  राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस करणार

Raj Thackeray:  राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस करणार आहे. सकाळी 11 पर्यंत राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात येत उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. 

Sindhudurg News:  सिंधुदुर्गातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात हत्ती अंगावर धावून आल्याने एक जण गंभीर जखमी

Sindhudurg News:  सिंधुदुर्गातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात हत्ती अंगावर धावून आल्याने पडून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील केर गावात ही घटना घडवी आहे. हत्तींचा कळप केर गावच्या माजी सरपंचांच्या अंगावर धावून आल्याने स्वता:च्या बचावासाठी पळत असताना पडून पायाला गंभीर जखम झाली आहे.  उपचारासाठी गोव्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

नाशिकच्या सटाणा शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट, रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांना वळूची धडक

Nashik News : नाशिकच्या सटाणा शहरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. शहरातील चावडी चौकात मोकाट वळूंच्या भांडणात एक वळू पळत सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेवेळी बाजूलाच एक महिला आपल्या चिमुरड्यासह त्याच ठिकाणी उभी होती. मात्र प्रसंगावधान राखत ती बाजूला सरकल्याने तिच्यावरील अनर्थ टळला, अन्यथा वळूची तिला देखील धडक बसली असती. शहरातील मोकाट जनावरांचा नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सटाणा शहरातील नागरिकांनी दिला आहे.

राज्याप्रमाणेच आता स्थानिक पातळीवर देखील फोडाफोडी, रत्नागिरीतील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांना पदावरुन हटवण्यासाठी शिंदे गटाकडून अविश्वास ठराव दाखल

Ratnagiri News : राज्याप्रमाणेच आता स्थानिक पातळीवर देखील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग


रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांना पदावरुन हटवण्यासाठी शिंदे गटाकडून अविश्वास ठराव दाखल


 

पूर्वा मुळे या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष; आज दाखल होणार अविश्वास ठराव 

 

अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर 12 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना 

 

 लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना बजावला व्हिप 

 

शिवसेना शिंदे गटाचे पाच नगरसेवक तसेच काँग्रेसचे दोन, अपक्ष दोन आणि भाजपाचे तीन असे एकूण 12 नगरसेवक हे अज्ञातस्थळी रवाना 

 

लांजा कुवे नगरपंचायत शिवसेना शहर विकास आघाडीकडे

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, सावरकर मुद्द्यावर आणि मविआतील मतभेदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता

K C Venugopal And Uddhav Thackeray Meet : काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार.


 सावरकर मुद्द्यावर आणि मविआतील मतभेदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता


ही भेट मातोश्रीवर सायंकाळी 8 : 30 वाजता होईल अशी माहिती मिळत आहे.

सांगलीतील खरसुंडीमधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस, गुलालाच्या उधळणीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठी सोहळा पार पडणार

Sangli News : आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. आज दुपारी 12 नंतर सासनकाठी सोहळा गुलालाच्या उधळणीत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल होतात. मानाची लोखंडी सासने, नवसाची सासनकाठी आणि पालखी सोहळा ही चैत्री यात्रेचा मुख्य आकर्षण असते. सासन काठी ही नवसाची असते तर सासनकाठीवर उधळण करण्यात येणारे गुलाल-खोबरे हे पण नवसाचे असते. सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने खिलार जनावराचा मोठा बाजार भरतो. बैलगाडी शर्यतीत खिलार बैलांना अधिक पसंती असते. या बाजारात अनेक राज्यातून शेतकरी आणि व्यापारी खिलार खरेदी  करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या बाजारात खिलार जनावर खरेदी-विक्रीत तेजी दिसून येईल.

नाशिकच्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरात धाडसी चोरी, स्थानिकांच्या मदतीने चोराला पकडण्यात पोलिसांना यश

Nashik News : नाशिकच्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरात रविवारी (16 एप्रिल) पहाटे धाडसी चोरी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार मंदिर परीसरातीलच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका चोराने लोखंडी रॉडने मंदिराच्या प्रवेशद्वाराची काच फोडत आत जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी सुरक्षारक्षक गंगाधर हाके आणि चोरामध्ये झटापट झाली. हाके यांच्या डोक्यावर रॉडने मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोर मंदिरात शिरला आणि बाप्पाच्या मूर्तीवरील 300 ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले दागिने घेऊन तो पसार झाला. विशेष म्हणजे याचवेळी पेट्रोलिंग करत असलेल्या सरकारवाडा पोलिसांच्या पथकाला हा प्रकार समजताच त्यांनी चोराचा पाठलाग केला असता चोरट्याने गंगावाडी परिसरात थेट गोदावरी नदीत उडी मारुन पळ काढण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. निहाल यादव असे चोराचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.

नाट्य परिषद निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूहाचा 8-2 असा विजय

Natya Parishad Election : नाट्य परिषद निवडणुकीत रंगकर्मी नाटक समूहाचा 8-2 असा विजय. 


प्रशांत दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर, वैजयंती आपटे  विजयी. 


आपलं पॅनेलचे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी- मोने विजयी

यवतमाळमध्ये तीन रोहींची शिकार करणारे तस्कर गजाआड, पोलीस विभाग आणि वन विभागाची संयुक्तरित्या कारवाई

Yavatmal News : वन्यजीव तस्कराकडून तीन नीलगाय यांची कत्तल करुन वाहनात नेत असताना पुसद पोलीस विभागाच्या पथकाने आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत वन्यजीव तस्करांना अटक केली. पुसद तालुक्यातील मोहदी ते काळी दौलत रस्त्याने वन्यजीव प्राण्याची शिकार करुन ते आपल्या चार चाकी वाहनांमध्ये घेऊन जाणार आहे अशा गोपनीय माहितीवरुन पथकाने सापळा रचला आणि दहा तस्करांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन वाहने, एक कोयता, तीन सुरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आदित्य खान ऐजाज खान, फय्यद अहमद मुस्ताक अहमद, उस्मान खान कदिर खान, इमरान खान अहमद सुलतान, शेख असाद शेख युनूस, समीर खान असद खान, शेख शाहरुख शेख उस्मान असे वन्यजीव प्राण्याची शिकार करणाऱ्या आरोपींची नाव आहेत. त्यांच्यावर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट


उष्माघातामुळं कार्यक्रमाला आलेल्या 11 श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सदस्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली श्री सदस्यांची भेट घेतली असून सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 


 प्रकाश आंबेडकराचं भाकित खरं ठरणार?


राज्याच्या राजकारणात भूकंप होणार ? 8 एप्रिलला अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर आणि सुप्रिम कोर्ट सत्ता संघर्षाची तारीख जवळ यायला लागल्यापासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गरम व्हायला लागल आधी अंजली दमानिया आणि आता प्रकाश आंबेडकरांनी राजकीय बॉम्ब स्फोटाचा दावा केला आहे. 15 दिवस थांबा दोन बॉम्ब स्फोट होणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हंटलय
 
 वॉर्ड पुनर्रचनेविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेचा फैसला आज ?  


ठाकरे गटाला मिळणार का दिलासा ? मविआ सरकारनं बृहन्मुंबई महापालिकेची प्रभागाची पुनर्रचना करून प्रभाग संख्या ती 227 वरुन 236 पर्यंत वाढवली. शिवसेनेतून शिंदे गटानं बाहेर पडून भाजपाशी हात मिळवणी करून नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर मविआ सरकारचा निर्णय बदलून प्रभाग संख्या पूर्ववत 227 केली. या निर्णयामुळे बृहन्मुंबई महापालिकेची आधीच रखडलेली निवडणूक आणखी लांबणीवर पडणार आहे. तसेच याचा सरकारी तिजोरीलाही मोठा फटका बसणार आहे,  असा दावा करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांच्यावतीनं याचिका दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टाचा फैसला आज होणार  आहे.


मुंबई:  पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून हायकोर्टात विशेष सुनावणी होणार आहे.  संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याकरता संजय राऊत सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावण्याची शक्यता आहे. 
 
दिल्ली : राज्यपाल नियुक्त 12 आमदार याचिकेवर सुप्रिम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.


सांगली : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी मधील प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असून सासनकाठी गुलालाच्या उधळणीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल होतात. खरसुंडी मधील सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने खिलार जनावराचा मोठा बाजार भरतो. बैलगाडी शर्यतीत खिलार बैलांना अधिक पसंती असते आणि बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतरचा हा खरसुंडी मधील खिलार जनावराचा पहिलाच बाजार भरतोय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.